अ हेवी प्राईझ् - अ मिस्टर वाघ स्टोरी 10 Suraj Gatade द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अ हेवी प्राईझ् - अ मिस्टर वाघ स्टोरी 10

"मग प्रभा यांचे काय झाले?"
"शी वॉज फौंड डेड इन हर हाऊस!"
"त्या गोळीत असं काय मिक्स केलं होते?"
"मण्यारचे विष!"
"ती मेल्याच बघून कोणी पोलिसात नाही गेलं?"
तो हसला,
"जायला शिल्लक कोण होतं? शेजारच्यांनी तिचे अंत्यसंस्कार केले."
"आणि पोलिसांपर्यंत हे प्रकरण गेलेच असते तर?"
"तर काय? त्यांना काहीच सापडले नसते. अटॉप्सी रिपोर्टमध्ये तिचा मृत्यू बंगारस केरुलेअस म्हणजे मण्यारच्या न्यूरोटॉक्सिक पॉइसनमुळे झाल्याचे आढळले असते.
"तुला माहिती आहे, मण्यारच्या विषाने किती भयंकर मृत्यू येतो ते! तहान लागते, पोटदुखी, श्वसनाचा त्रास होतो. काही वेळाने रेस्पिरेटरी सिस्टीम म्हणजे श्वसन प्रणाली बंद पडून मृत्यू होतो."
हे ऐकून माझ्या अंगावर तर काटा उभा राहिला. 
          पण अजून काही प्रश्न मनात झुरत होते...
"रवी पवार, डॉक्टर मोहन पाटील यांना दिनेश यांच्या आजाराचा खोटा रिपोर्ट द्यायला तुम्ही तयार कसे केले?" मी विचारले.
तो हसला. त्याचे हे असे हसणे माझ्या प्रश्नांना तो किती मूर्खपणाचे समजत होता हे दर्शवत होते. 
         पण मला पर्याय नव्हता. मला सगळी उत्तरे हवीच होतीत. एक तर याने मला काही सांगायला नको होते. आणि आता सांगितलंय, तर काही अर्धवट ठेवायला नकोय!
"मरणाला कोण घाबरत नाही!" तो म्हणाला.
"आणि हे मॅनेज कसे केले? नवीन व कार्तिक तुमच्यावर लक्ष ठेऊन होते. तुमचे मोबाईल, लँडलाईन टॅप केले असणार नक्कीच!" माझी आणखी एक शंका.
"माणूस दोन - दोन मोबाईल वापरू शकतो हे त्यांनी लक्षातच घेतले नाही! मी दुसऱ्या नंबरवरून सगळं ऑपरेट करत होतो."
"आणि नेहमीच्या नंबरवर आलेले कॉल्स? लँड लाईनचे काय? तुम्ही फोन उचलत नाही म्हटल्यावर त्याचा शंशय बळावला असणार..." 
"नो! मी रेग्युलर नंबरवर येणारे कॉल्स प्रायव्हेटवर डायव्हर्ट केले होते. आणि लँड लाईनसाठी आन्सरिंग मशीन सेट केले होते. संशय येण्याचा चांसच नाही!" 
"म्हणजे शेखर बाबत सुद्धा हेच केलंत? त्याच्या न्यूरॉलॉजिस्टला सुद्धा..."
 "माणूस हा सगळ्यांत भित्रा प्राणी!" 
माझ्या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर न देता तो असं काही तरी बोलला. पण यात माझ्यासाठीचे उत्तर स्पष्ट होते.
"मग शेखरची हेड इंज्युरी...?"
"दॅट व्हॉज जेन्युअन. म्हणून तर मी त्याला पार्किंन्सन्स डिसीज असल्याचा आभास निर्माण करू शकलो."
"नवीनच्या आजाराबद्दलच्या शंकेचं काय झालं?"
"दिनेश आणि शेखरचे मृत्यू हे नॅचरल व एक्सिडेंटल डेथ्स् आहेत हे दाखवण्यासाठी त्यांना असे आजार आहेत हे दाखवणं मला गरजेचं होतं. पण ते ओथेन्टीक वाटावेत असा सेट अप मी समर नकातेला हाताशी धरून आधीच तयार केला होता. शेखरच्या हेड इंज्युरीमुळे, त्याचे पॅरेलाइज्ड् असणे आणि त्याचे अधून - मधून उद्भवणारे किरकोळ आजार यामुळे त्याच्यासाठी पार्किन्सन्स डिसीज हा आजार ठरवणे मला सोपे गेले. त्याला आधीच मेजर हेड इंज्युरी झाली असल्याने  अटॉप्सीमध्येही तो खरेच पार्किन्सन्स डिजीजचा पेशन्ट होता, की नाही हे समजणे अवघड होते. या आजारामुळे नायट्रिक ऑक्साईडचा त्याच्यावर लवकर व घातक परिणाम झाला असेच सर्वांना वाटले. यामुळे त्याच्या शंकेला विचारात घेतले असतेच, तरी तपासात मी सापडूच शकत नव्हतो!"
"या रवी पवार, डॉक्टर व न्यूरॉलॉजिस्ट कॉन्टॅक्ट केलेत कसे?" 
"पेशन्स! कळेल."
"मग प्रभा यांचे काय? त्यांना कसे मॅनेज केलेत? त्यांनी पार्किन्सन्स डिसीजच्याच सिम्टम्स् बरोबर कशा काय सांगितल्या?" माझा आणखी एक प्रश्न.
"शेखर त्या फौंड्रीमध्ये अल्युमिनियम व हाय अलोय्ड् स्टेनलेस स्टीलचे वेल्डिंग करायचा ओझोन प्रोड्युस होऊ नये म्हणून आणि वेल्डिंग आर्क स्थिर रहावे यासाठी नायट्रिक ऑक्साईड या गॅसचा त्याला वापर करावा लागायचाच. त्यामुळे रोजच्या नायट्रिक ऑक्साईडच्या संपर्काने, इंहेलेशनने त्याला हेडएक, रेस्टलेसनेस, नॉशिया, ब्रिदिंग प्रॉब्लेम असे वरचेवर होत होते. हेड इंज्युरीमुले तो पॅरेलाईज्ड् होताच. तेच प्रभाने कार्तिकला सांगितले. आणि कार्तिकने त्याचा संबंध अटॉप्सी रिपोर्टशी जोडला आणि त्यामुळे शेखरला पार्किन्सन्स डिसीज् असल्याचे कार्तिकला पटले."
"आणि ते लिक्विड नायट्रोजनमध्ये बुडवलेले इलेक्ट्रोड्स? ते तुम्ही शेखरपर्यंत कसे पोहोचवलेत?"
"शेखर फौंड्रीतील चीफ वेल्डर होता. लागणारे इलेक्ट्रोड्स खरेदी करण्याचे काम त्याच्याकडेच दिले गेले होते.तो स्वतः हे खरेदी करायचा. त्याच्या नेहमीच्या दुकानात मी चौकशीचे कारण काढून त्याला भेटलो. त्याला इलेक्ट्रोड्स सांभाळण्यासाठी मदत करण्याचे निमित्त करून हातचालकीने मी ती बदलली होती. यामुळे मी पाळतीवर असलेल्या कार्तिकच्या ऑफिसर्सनाही चुकवू शकलो. लांबून लपून सावधगिरीने माझ्यावर लक्ष ठेवणाऱ्या त्यांना समजलेच नाही की मी काय केलंय!"
"आणि हे इलेक्ट्रोड्स दुसऱ्याच कोणी वापरले असते, तर? तुम्ही त्या माणसाची लाईफ कॉम्प्रोमाईज केली असतीत?" 
वाघच्या प्लॅनमध्ये इतकी मोठी त्रुटी होती. माझ्या या प्रश्नाने तो चांगलाच दुखावला.
"नो माय फ्रेंड! मिस्टर वाघ कोणत्याच इनोसेंट माणसाचे आयुष्य कॉम्प्रोमाईज करत नाही! वेल्डिंगचे खूप प्रकार आहेत. प्रत्येक वेल्डिंगच्या कामात इलेक्ट्रोड्सची गरज लागत नाही. मला माहित होते, की फौंड्रीमध्ये प्रत्येकाचे काम ठरलेले होते. वेल्डिंगचे कामसुद्धा. शिवाय वेल्डिंगसाठी इलेक्ट्रोड्स वापरणाऱ्या प्रत्येक वेल्डरचा इलेक्ट्रोड्सचा स्टोक वेगवेगळा असायचा, कारण फौंड्रीचा मालक सुशांत निकमला प्रत्येक गोष्टीचा चोख हिशोब लागायचा.  असे नसते, तरी मी दुसरा मार्ग शोधलाच असता त्याला संपवण्याचा! असो, मी फक्त शेखरच्याच स्टॉकमध्ये माझे विशेष इलेक्ट्रोड्स मिसळले अँड रेस्ट इज ए हिस्ट्री!"
'किती सहज बोलतोय हा...' 
"तुम्ही माणसं मारताय याचे तुम्हाला काहीच कसे वाटत नाही?" मी विचलित झालो होतो...
"माणसं नाही!" तो ठणकावून बोलला,
"मी गुन्हेगारांना मारतो!"
"तीही माणसंच."
"म्हणून त्यांना सोडून द्यायचे?" त्याने कठोरतेने मला विचारले. 
"तसे नाही पण, त्यांचा जीव घेणं म्हणजे..." मी अडखळलो.
"तुम्ही लोक पूजा वगैरे करताना झाडांची पानं, फूलं, फळं ओरबाडून वापरता, प्राण्याचे जीव देता त्यावेळी विचार करत नाही, की आपण एका जीवाला मारतोय आणि हेच मी केलं की तुम्ही जजमेंटल होता. किती दोगला आहे हा समाज!" त्याच्या चेहऱ्यावर क्रूर भाव उत्पन्न झाले!
"हो पण ते देवाला अर्पण करण्यासाठी असते!" मीही धाडसाने बोललो.
"हाच जर तुमचा न्याय असेल, तर एक गोष्ट लक्षात घे; आय एम अल्सो ऑफरिंग दिज् क्रिमिनल्स् टू माय गॉड्स;  द ट्रूथ अँड द जस्टीस!"
"झाडे, प्राणी इनोसेंट असतात तरी त्यांचा बळी दिला जातो. इथे मी तर फक्त गिल्टी लोकांनाच पनिश करतोय!!!"
माझा चहा माझ्यासारखाच थंड झाला झालो होतो. त्याचा हा वॅलिड तर्क ऐकून मी पुढे काही बोलूच शकलो नाही... 
          पण या सगळ्यांचा असा काय मोठा गुन्हा होता हे मात्र अजूनही अनाकलनीयच होते...