Stri badlachi garaj books and stories free download online pdf in Marathi

स्ञी बदलाची गरज..

स्ञी बदलाची गरज..

स्ञी..नावातच सर्वकाही आहे. स्ञी एक शक्ती आहे. स्ञी एक प्रेरणा आहे. स्ञी घराच घरपण आहे. स्ञी नात्यांची गुंफण आहे. म्हणटल तर स्ञी सर्वकाही आहे. अशी स्ञी पुर्वीच्या काळापासुन ते आजपर्यंत रहस्यमयच आहे. तिच्या अंतरमनाचा शोध कोणीच घेवु शकत नाही. स्ञी मध्ये आजवर अनेक बदल झालेत. पुर्वी नवारीत राहणारी स्ञी.. साडीत आली. साडीची आज जीन्सवर आली. लाजरी बुजरी आज चारचौघात बोलायला / व्यक्त व्हायला शिकली. इतरांवर अवलंबून असणारी आता स्वतःच्या पायावर उभी राहु लागली. वरखर्च स्वतः करु लागली. नवर्याच्या मागेमागे फिरणारी स्ञी आज मुलांसाठी दुचाकी शिकु लागली आहे. गाडी आवरत नसतानाही दोन पायावर बँलन्स करत मुलांना घरी सुखरुप पोहचवण्याचे कामही सांभाळु लागली आहे. सकाळी उठल्यापासुन सर्वांचे आवरणं, आँफिसला जाणं..दिवसभर काम करुन पुन्हा राञी झोपेपर्यंत काम करणं.. कस काय जमत असेल हे स्ञीला ? सर्व व्यवस्थित करणं..हे पाहिल की वाटत ' शी इज परफेक्ट !' . पण नवर्याच्या कपड्यांना व्यवस्थित इस्ञी करणारी स्ञी, जेव्हा कुठेतरी गर्दीच्या ठिकाणी न शोभणारे कपडे घालुन जाते तेव्हा वाटतं की स्ञीला अजुन बदलाची गरज आहे. एवढ सर्व निटनेटक करणारी स्ञी, आपण जे घातल आहे ते आपणास शोभतय का ? हे पहायला विसरते तेव्हा वाटतं की अजुन बदलाची गरज आहे.

स्ञीला ईश्वराचे वरदान म्हणजे ' ममता..माया..प्रेम' स्ञी आपल्या मुलीवर , बहिणीवर , आईवर , मैञिणीवर जीवापाड प्रेम करते. पण, जेव्हा हीच स्ञी बसमध्ये अनोळखी स्ञी ला बसायला जागा देत नाही , तेव्हा वाटतं स्ञीला अजुन बदलाची गरज आहे. कारण ; जोपर्यंत प्रत्येक स्ञी स्ञीचा आदर करणार नाही तोपर्यंत जग तिचा आदर करणार नाही. प्रत्येक आई स्वतःच्या मुलीचे गोडवे गाते पण ; शेजार्याच्या मुलीबद्दल जेव्हा रंगवुन रंगवुन इतरांना सांगते तेव्हा वाटतं की स्ञीला अजुन बदलाची खुप गरज आहे. कारण ; चुगली करणं , इतरांविषयी वाईट बोलण यातच ती वेळ वाया घालवते. अजुनही तिची मानसिकता बदललेली नाही. आज प्रत्येक क्षेञात मुली / स्ञिया प्रगती पथावर आहेत. अंतराळापासुन ते शेतीपर्यंत प्रत्येक क्षेञात मुली चमकत आहेत पण प्रमाण फारच कमी आहे. कारण क्षमतेचा अयोग्य वापर. आई वडिलांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी मुली काँलेज ला अँडमिशन घेतात. शहरात जातात. पण त्याच मुली अभ्यास सोडुन रिलेशनशिप - बाँयफ्रेंड या गोष्टीत अडकुन पडतात. क्षमता असतानाही करिअर घडवु शकत नाहीत. त्यावेळी वाटतं की स्ञियांना अजुन बदलाची गरज आहे. मुलांनां संस्कार देणाऱ्या आया आणि देशाचे नाव उज्ज्वल करु शकणाऱ्या तरुणी जेव्हा तासनतास ' सास - बहुच्या ' पांचट मालिका बघत बसतात तेव्हा प्रकर्षाने वाटतं की स्ञीयांना बदलाची गरज आहे. कारण ; लता मंगेशकर , किरण बेदी कल्पना चावला , सुनिता विल्यम्स या महान स्ञीया कधीच त्यांच्या आयुष्यातील वेळ चुकीच्या गोष्टीसाठी वाया घालत नसत.

बदलत्या जगाबरोबर स्ञीयाही बदलल्या आहेत. प्रत्येक स्ञी जास्तीत जास्त सुंदर दिसण्याचा प्रयत्न करते. प्रत्येकेची एक वेगळी स्टाईल असते. कोणाला हाय टेल पोनी आवडते तर कोणाला खुले केस. प्रत्येकीची आवडती हिरोईन रोल माँडेल असते. मग तिलाच फाँलो केल जातं. कोणी आयकाँनीक काजळ वापरत तर कोण लँक्मेची लिप्स्टिक . सर्व महागड्या न परवडणार्या वस्तु वापरल्या जातात. जेव्हा आवडत्या हिरोईन सारखी फिगर करण्यासाठी मुली दिवसभर उपाशी राहतात तेव्हा वाटत स्ञियांना अजुन बदलाची गरज आहे. सर्व ब्रँण्डेड वापरणार्या टापटिप राहणाऱ्या १०० मधील ९५ स्ञिया अँनिमियाच्या शिकार होतात , लो हिमोग्लोबीन मुळे हाँस्पिटल मध्ये अँडमिट होतात तेव्हा वाटत स्ञियांना अजुन बदलाची गरज आहे. जेव्हा १०० पैकी ९०% डिलीवरीज नाँर्मल न होता कृञिमरित्या कराव्या लागतात , तेव्हा वाटत स्ञियांना अजुन बदलाची गरज आहे. जेव्हा सुंदर दिसण्यासाठी गरजेपेक्षा जास्त मेकअप स्ञीया करतात तेव्हा वाटत की अजुन बदलाची गरज आहे. चेहऱ्याच्या सौंदयापेक्षा निरोगी शरिराचे सौंदर्य स्ञियांना जोपर्यंत भुरळ घालणार नाही तोपर्यंत वाटेल की स्ञियांना अजुन बदलाची गरज आहे. स्वतः ची तुलना इतर स्ञी शी करण सोडुन ती जशी आहे तशीच राहुन जोवर प्रत्येक स्ञी स्वतः ची वेगळी ओळख बनवण्याचा प्रयत्न करणार नाही तोपर्यंत वाटेल की स्ञियांना अजुन बदलाची गरज आहे.

स्ञी - पुरुष समानता आली. स्ञी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावुन काम करते हे फक्त बोलण्यापुरतच आहे. खरं पाहायला गेल तर आजही स्ञी मिञांसोबत बाहेर गेल्यावर वाँशरुम ला जायला लाजते. किंवा तिला वाँशरुम ला जायच आहे हे सांगण्यासाठी तिला कमीपणा वाटतो. कित्येक वेळा मेडिकल स्टोअर मध्ये पाहिल आहे की स्ञी , विस्पर , प्रेग्नेन्सी कीट , प्रिकाँशन वस्तु मागायला ती लाजते.. किंवा चाचरते. बाजुला पुरुष असतील तर ते जाईपर्यंत दुसर्याच वस्तु पाहण्यात वेळ घालवते. पिरेड्स किंवा प्रेग्नेन्सी या स्ञिचे स्ञित्व सिद्ध करणाऱ्या गोष्टी आहेत. त्यांचा अभिमान बाळगायला हवा. त्यात कमीपणा व लाज कशासाठी ? जोपर्यंत स्ञी स्ञित्वाचा अभिमान बाळगायला शिकणार नाही व हक्क स्पष्टपणे मागायला शिकणार नाही तोपर्यंतची बदलाची गरज आहे.

लोक म्हणतात स्ञी बदलली आहे. बोल्ड आणि काँन्फिडन्ट , इंडिपेंन्डन्ट झाली आहे. पण खर पाहायला गेल तर आजही बर्याच मुली सुरक्षिततेसाठी दुसर्यावरच अवलंबून आहेत. स्ञी बदलली स्ञीची मानसिकता बदलली म्हणतात पण ; रेप झालेल्या मुलींकडे स्ञिया पिडित , शोषित , लाचारी , अत्याचारित म्हणुनच बघतात. तिला तिचं आयुष्य संपल्याची जाणिव करुन देतात. पण तिला नाँर्मल ट्रिट करत नाहीत. तिला नव्याने आयुष्य जगण्यासाठी प्रेरित करत नाहीत. जेव्हा त्या मुलिकडे / स्ञिकडे इतर स्ञिया तिने सर्वकाही गमावल आहे या भावनेने बघतात तेव्हा वाटत की अजुन बदलाची गरज आहे.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED