"अपवाद "
राञीचे ९ वाजले होते. नंदिनी ने बाळाला झोपवले. आणि बर्याच दिवसानंतर स्वतः ला आरशात निरखुन पाहु लागली . आज मुड काही वेगळाच होता. गालातल्या गालात हसत ती छान तयार झाली. जेवणाची ताट तयार केली. तेवढयात पुरुषोत्तम आला. दिवसभर काम करुन खुप थकला होता आणि भुकही लागली होती. दोघेही लगेच जेवायला बसले. नंदिनी , पुरुषोत्तम काहीतरी कमेंट देईल म्हणुन वाट पाहत होती पण , तो जेवण्यात मग्न होता. ती थोडीशी हिरमुसली. जेवण करुन उठताना पुरुषोत्तम तिच्याकडे बघुन बोलला.
पुरु - छान दिसतेस..
तशी तिच्या गालावरची खळी खुलली. तिने वर पाहिलं तोवर पुरु बेडरूममध्ये निघुन गेला होता. काम आवरुन ती रुममध्ये गेली पण पुरुही बाळाशेजारी शांत झोपला होता.त्या दोघांना शांत झोपलेल पाहत ती बराचवेळ दरवाजाला टेकून उभी होती.
काही महिने असेच गेले . पुरु कामात व्यस्त राहु लागला. नंदिनीला ही गोष्ट खटकु लागली. अस नव्हत की त्याच तिच्यावर प्रेम नव्हतं. प्रेम होत..तो काळजीही घ्यायचा. बाळावर तर जीव ओवाळुन टाकायचा. पण नंदिनी आणि पुरु मध्ये पूर्वीसारखी जवळीक राहिली नव्हती. तो पूर्वीसारखा वागत नव्हता. त्यामुळे नंदिनी जास्तच अस्वस्थ झाली होती. डोक्यात असंख्य विचार घोळत होते. शेवटी तिच्या मनात संशय बळावलाच . वाईट साईट गोष्टी तिच्या मनात पिंगा घालू लागल्या. बरीच आदळआपट करुन थोडा राग कंट्रोल केला. काहीही झालं तरी आज पुरु शी या विषयावर बोलायचच हे ठरवुन ती पुरु ची वाट बघत बसली. काही वेळाने पुरु आला. पुरु आज खुश दिसत होता. येताच त्याने बँग टेकवली. आणि फ्रेश होण्यासाठी बाथरुम कडे निघाला.
पुरु - नंदु लवकर आवर आज आपल्याला जेवायला बाहेर जायचय. आणि हो तुझा फेव. परफ्युम आणलाय. बँगमध्ये आहे बघ.. आलोच फ्रेश होऊन..
म्हणत शर्टच्या बाह्या मागे सारत तो बोलला.
नंदिनी - मला तुझ्याशी बोलायचय
पुरु - हो थोड्या वेळाने बोलु ना..
नंदिनी - आत्ता लगेच बोलायचय..' आवाज वाढवत ती बोलली.
पुरु बाथरुम मध्ये जाता जाता मागे फिरला आणि नंदिनी कडे बघु लागला. ती रागात होती.
पुरु - काय झाल ? सगळ ठिकय ना ?
नंदिनी - काय झालय तुला माहीत नाही ? सगळ ठीक कस असेल ? माहितच नाही ना काय झालय ते ?
पुरु - काय झाल निट सांगशिल का ?
नंदिनी - कोण आहे ती ? जिच्यामुळे माझी आठवण सुद्धा होत नाही ?
पुरु - काय ? वेड लागलय का तुला ? काहीही काय बोलतेस ?
नंदिनी - हो वेडच लागायच बाकी आहे..कुणासोबत अफेअर्स चालुये ?
पुरु - काय मुर्खासारख बोलतेस.. कळतय का काही ?
नंदिनी - हो तोच प्राँब्लेम आहे की काहीच कळत नाहिये. आधी प्रेग्नेंट होते म्हणुन जवळीक नव्हती हे कळु शकत. नंतर डिलीव्हरी झाली म्हणुन ही कळु शकतं. पण बाळ आता ८ महिन्यांच झालयं..तरीही तु माझ्यापासुन दुर का आहेस हेच कळत नाहीये ? सांग एकदाच कोण आहे ती ? मी नकोय का तुझ्या आयुष्यात ? की माझ काही चुकलय ? सांग..
पुरु - नंदु अगं.. अस बोलण्या आधी एकदा माझा विचार करायचास...मी..मी अस वागेन का तुझ्याशी ? तु माझ्यावर शंका घेतेस ? तस काहीही नाहीये...
नंदिनी - मग कसयं ?
पुरु - तुला कसं सांगु ? तुला विश्वास बसणार नाही नंदु.
नंदिनी - का विश्वास बसणार नाही..आजवर तुझ्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवत आलेय..मग आता ठेवणार नाही अस काय आहे ?
पुरु - नंदु..मी जे सांगेल ते तुला किंवा इतर कुणालाही पटणार नाही गं..
नंदिनी - ते तु सांगितल्या शिवाय मला कस कळणार ? प्लिज जे असेल ते सांग. पण खरं सांग.आजवर आपण एकमेकांना समजुन घेतलय. मग आताही घेवु. पुरु टेंशन भरल्या नजरेने तिच्याकडे बघतो. ती ही डोळ्याने त्याला विश्वासाची खाञी देते. आणि तो बोलु लागतो.
पुरु - लग्नाच्या दहा वर्षानंतर आपल्याला बाळ होणारय हे जेव्हा कळालं तेव्हा तुझ्या इतकाच मी ही आनंदी होतो. तुझी गरजेपेक्षा जास्त काळजी घ्यायला लागलो. डिलीव्हरीच्या वेळेस मी स्वतः पाहिलं की तुला किती ञास होत होता. तेव्हा आयुष्यात पहिल्यांदा मी एका बाळाला जन्म घेताना पाहिल होतं. बाळाला जन्म दिल्यावर तुझी तब्येत बिघडली होती.त्यामुळे आपल्या बाळाला पहिला स्पर्श मी केला. ते कापसासारख एवढस छोटस पिल्लु , मुठ्या आवळत माझ्या हातांच्या तळव्यावर निपचीत पडल होतं. त्याला डोळे भरुन पाहणं, त्याचा तो उबदार मऊ स्पर्श अनुभवण्याचा आनंद मी शब्दात व्यक्त करु शकत नाही. बाळाला दुध पाजवण्यासाठी तु निट शुद्धीत नव्हतीस. तेव्हा डाँक्टरांनी मला बाळाला दुध पाजवायला सांगितलेल. भुकेने व्याकुळ आपल पिल्लु रडत होत. आणि पहिला दुधाचा थेंब ओठात पडताच ते खुदकन गालातल्या गालात हसल. दुध पिऊन शांत झोपलेल बाळ पाहुन , माझ्या डोळ्यात पाणी आल होत.बाळाची भुक भागवणारे स्तन मला क्षणात पविञ वाटु लागले. जिथुन बाळाचा जन्म झाला , ती जागा मला क्षणात पविञ वाटु लागली. एक नविन जीव जन्माला घालणाऱ्या आणि त्याची भुक भागवणार्या शरिराला दुसर्या हेतुने स्पर्श करण मला अचानक चुक वाटु लागलं. लग्नाआधी मुलींच्या बाँडीवर घाणेरड्या कमेंट करायचो मी त्याची लाज वाटु लागली. त्या क्षणापासुन माझी स्ञीच्या शरिराकडे बघण्याची नजर कायमची बदलली. मला तुझ शरीर एका मंदिरासारख पविञ वाटु लागल. त्या पुजनीय शरिराला आता दुसर्या नजरेने बघण मला जमणार नाही. माझं मत तुला किंवा इतरांना पटावच अस नाही. कारण मला माहितीये हे कोणालाच खर वाटणार नाही..पटणारही नाही. पण तुझी शप्पथ हेच कारण आहे की मी स्वतः ला तुझ्यापासुन दुर ठेवतोय. माझ बाहेर तस काहिच नाही. प्रत्येकाची प्रेमाची व्याख्या वेगळी असते. माझ्या व्याख्येत शरिराचा अर्थ बदललाय इतकच.
हे सर्व ऐकुन नंदिनी शाँक होती. आणि पुरुला समजायला आपण कमी पडलो याची खंतही.
नंदिनी - नाण्याला नेहमी दोनच बाजु असतात अस नाही. कधीकधी तिसरी बाजु पण असते. ती म्हणजे अपवाद . आणि तो अपवाद तु आहेस ! असही कोणी असु शकतं...? यावर विश्वासच बसतच नाहीये. एक स्ञी असुन मी कधीच माझ्या शरिराबद्दल असा विचार केला नव्हता. पण तु एक पुरुष असुन असा विचार केलास . मलाच माझ्याच शरिराकडे बघण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन दिलास. थँक्यू अँण्ड साँरी.. आय लव्ह यु..पुरु..
म्हणत दोघांनी एकमेकांना मिठी मारली.
पुरु - आय लव्ह यु टु.. साँरी मी तुला आधीच विश्वासात घेवुन सांगायला हव होत.
मानवी विश्वासाला , मुल्यांना , तत्वांना मोडित काढणार्या , निसर्ग निर्मित किंवा खुद्द मानव निर्मित गोष्टींला आपण अपवाद किंवा आश्चर्य म्हणतो. त्यापैकीच हा एक खराखुरा अपवाद .