मुलांना बाहेर ठेवताना.. Sadhana v. kaspate द्वारा नियतकालिक मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मुलांना बाहेर ठेवताना..

मुलांना बाहेर ठेवताना..

सुमिञा ऊर्फ सुमी ७ वी ला शाळेतुन पहिली आली पण गावात पुढिल शिक्षणाची सोय नव्हती. म्हणुन सुमी आणि तिचा छोटा भाऊ संतोष या दोघांनां जिल्ह्याच्या ठिकाणी ठेवण्याचा निर्णय त्यांच्या आई वडिलांनी घेतला. काही ओळखीच्या माणसांच्या मदतीने ओळखीच्या ठिकाणी एक दहा बाय दहा ची रुम भाड्याने घेण्यात आली. शाळेपासुन रुम जवळच असल्याने जाण्या येण्याचे टेंशन नव्हते. डाव्या बाजुला दहा बाय दहा च्या , सुमिची रुम पकडुन , सलग तीन रुम होत्या. सर्वात पहिली रुम सुमिची. दुसर्या रुममध्ये घराची मालकीण , ज्यांना प्रेमाने सर्व माय म्हणत ,तिची होती. तिसरी रुम त्यांचा मुलगा आणि सुन यांची होती. या सर्व रुमच्या समोर एक भला मोठा हाँल होता. हाँल चा दरवाजा आणि सुमीच्या रुमचा दरवाजा समोरा समोर होते. हाँल आणि सुमीची रुम जिथे संपते तिथुन दोन फुटवर भल मोठ लोखंडी गेट. गेट उघडल्याशिवाय कोणी आत येवुच शकत नव्हत.

आई - वडिल सुमी- संतोष सोबत आठ दिवस राहिले. त्यांना वातावरणात रुळत करुन ते गावी निघुन गेले. कारण शेती , जनावरं होती आणि करणार दुसर कोणी नव्हत. घरमालकीणीला मुलांकडे लक्ष द्या , काळजी घ्या अस जड अंतःकरणाने सांगुन ते गेले.

सुमी आणि संतोष दोघेही वातावरणात छान रुळले. साधारण एक महिन्यानंतर संतोष आजारी पडला. त्यामुळे ती त्याला गावी सोडुन वापस आली. तिला आज फारच एकट एकट वाटत होत. काही केल्या झोप लागत नव्हती. घड्याळात पाहिल तर १२ वाजलेले. पञ्याची रुम असल्याने थोड गरम होत होतं. म्हणुन ती दरवाजा उघडा ठेवण्यासाठी गेली पण मनात काय वाटल कुणास ठाऊक तिने दरवाज्याला परत कडी लावली, आणि खिडकी उघडी ठेवली. बेअरिंग गेलेल्या हळुहळु फिरणार्या फँनकडे बघत ती झोपण्याचा प्रयत्न ती करु लागली. पण पाच मिनीटातच लाईट गेली. आणि रुममध्ये काळाकुट्ट अंधार पडला. सुमी कंटाळुन तशीच काँटवर पडुन राहीली. खिडकीतुन बाहेर चंद्राचा लख्ख प्रकाश दिसत होता. तेवढयात तिला अचानक " खर्र..खर्र.." असा आवाज ऐकु येवु लागला. सुमी ताडकन् उठुन बसली. ती दरवाजाकडे बघु लागली. कोणीतरी दरवाज्यावर धारधार नखाने ओरखडे ओढत असल्याची जाणीव तीला झाली. सुमी खुप घाबरली. लगेच तो आवाज थांबला आणि खिडकी जवळ एक पुरुषी आकृती दिसु लागली. तो माणुस खिडकीतुन आत डोकावुन बघु लागला पण लाईट नसल्याने आतील काहीच दिसत नव्हत. तो माणुस खिडकीचा राँड उपसण्याचा प्रयत्न करु लागला. तस सुमीच्या काळजात धस्स झाल. हा माणुस काय करतोय आणि कशासाठी ? आता काय करु ? सुमी फक्त १४ वर्षाची होती. तिला फार काही माहित नसल तरी हे जे काही होत आहे ते चुकीच आहे , भितीदायक आहे. हे तिला जाणवत होत. सुमी तशी खुप हुशार होती. तिच्या लगेच लक्षात आल की तिच्या रुमची भिंत आणि माईंच्या रुमची भिंत एकच आहे. आणि लाईटचे कनेक्शन घेण्यासाठी , भिंतींच्या वरच्या बाजुला एक भल मोठ छिद्र पाडलेल आहे. ती पटकन काँटवर उभी राहीली आणि त्या छिद्रातुन जोरात ओरडली ,

" माय...लवकर उठा चोर आलाय ." तसा तो माणुस गायब झाला. आणि माय पटकन बँटरी घेऊन बाहेर आल्या . सगळीकडे पाहिल पण कोणीच नव्हत.

" झोप बाळा संत्या नाही म्हणुन स्वप्न पडल असेल तुला" म्हणत माईने तिला झोपवल आणि त्याही झोपायला निघुन गेल्या.

दुसर्या दिवशी सुमी खिडकी आणि लाईट दोन्ही बंद करुन झोपली. बरोबर कालच्या वेळेलाच तो माणुस पुन्हा आला. सुमी झोपेतच बाथरुमला जावुन आली होती आणि दरवाजा बंद न करताच झोपली होती. तो दरवाज्या जवळ आला आणि दरवाजा ढकलु लागला. दरवाजा उघडाच असल्याने तो आत आला आणि आतुन कडी घातली. डायरेक्ट काँटजवळ गेला. आणि झोपलेल्या सुमीच्या अंगाला अधाशासारखा स्पर्श करु लागला. आणि दुसर्याच क्षणाला कोपऱ्यात उभी असलेल्या सुमीने लाईट चालु केली. सुमी समजुन जिला तो स्पर्श करत होता ती ' माय ' होती. आणि स्पर्श करणारा दुसरा कोणी नसुन माईंचा मुलगा होता. तो माईला बघुन गोंधळला. माईने खाडखाड ४-५ चापटा त्याच्या थोबाडीत हाणल्या.

माय - आर जरा तरी लाज वाटु दे. तिच्या बापाच्या वयाचा आहेस की ? माय रागाने बरच काही बोलत राहील्या , त्याला मारत राहील्या. आवाजाने त्याची बायको पण आली, सर्व प्रकार बघुन तुच्छतेने नवर्याकडे बघुन रुममध्ये निघुन गेली.

सुमिने काल अंधारात त्याला ओळखल होत. पण डायरेक्ट माईंना सांगाव तर त्या स्वतः चा मुलगा सोडुन एका अनोळखी मुलीवर का विश्वास ठेवतील ? त्याची बायको कसा विश्वास ठेवेल असा विचार करुन तीने शक्कल लढवली. सर्वजण १० वाजता झोपायचे . शेवटी माय बाहेरच्या सर्व लाईटस बंद करुन गेटला लाँक लावायच्या . लाँक लावताना सुमी त्यांना म्हणाली की संत्या येईपर्यंत माझ्या सोबत झोपा ना. मुलगा व सुन आधीच झोपले होते. माय सुमीसोबत येवुन झोपल्या. सुमी बाथरुमला जावुन आली आणि मुद्दाम दरवाजा बंद न करता फक्त पुढे लोटला.आणि आतली लाईट बंद केली.

माय आणि त्याच्या बायकोने स्वतःच्या डोळ्याने सर्व पाहिल त्यामुळे खोट वाटण्याच कारणच नव्हत. सुमी दुसर्या दिवशी सकाळीच रुम बदलण्याचा निर्णय करुन गावी निघुन गेली.

आजच्या जगात जवळच्या व्यक्तींचाही याबाबतीत भरोसा नसतो . अशावेळी बाहेरच्यांवर किती विश्वास ठेवायचा ? "घराला गेट आणि दाराला भक्कम कडी असली म्हणजे आपली मुलं सुरक्षित असतातच अस नाही. मुलांनां बाहेर ठेवताना तिथली आणि आजुबाजुची माणस पारखुन घेण आई - वडिलांच कर्तव्य आहे. वेळ कधीच सांगुन येत नाही त्यामुळे मुलांना तश्या गोष्टींची कल्पना देणं, त्या प्रसंगी आम्ही सोबत असु अथवा नसु पण त्याला न घाबरता सामोर जायला शिकवण गरजेच आहे. कारण प्रत्येक सुमी एवढी हुशार , तत्पर आणि नशिबवान असेलच अस नाही. " प्रिकाँशन इज आँलवेज बेटर दँन मेडिसीन ".