Kavale - 6 books and stories free download online pdf in Marathi

कावळे - 6

कावळे

पांडुरंग सदाशिव साने

६. देवाच्या दरबारी

जाता जाता मंडळी आत शिरली. देवाचे अफाट राज्य. तेथे हवा खाऊनच तृप्ती होत होती. तेथे मुंग्या, चिमण्या, मोर, कोकिळा, गाई, बैल दिसू लागले, परमेश्वराच्या मांडीवरही ती जाऊन बसत. देव त्यांना कुरवाळी. विचारी, “पुन्हा भूतलावर? माझा मनुष्य बाळ अजून सुधरत नाही. तुमचाच तो भाऊ. तो सुधरेपर्यंत त्याच्या साहाय्याला तुम्ही जायला हवे. तुम्ही जाता का?”

“हो देवा, हो, तुझी इच्छा प्रमाण. कसे झाले तरी तो आमचा भाऊ. त्याचाही उद्धार झाला पाहिजे. ईश्वरी इच्छेप्रमाणे वागावयास तो शिकला नाही तोपर्यंत आम्ही पुन्हापुन्हा खाली जाऊ, आणि एक दिवस आम्ही सारे तुझ्याजवळ येऊ.”

यमधर्माने ते सहा कावळे ईश्वराजवळ नेले. ते प्रभूच्या पाया पडले. देवाने त्यांचे पंख कुरवळले. विचारले, “का रे लौकर आलात?”

“देवा तुला पाहण्यासाठी. मनाची शंका फेडण्यासाठी. परंतु शंका नाहीशी झाली. आम्ही जातो. आमच्यावर सोपवलेली कामगिरी करतो. प्रभू, तुझी इच्छा प्रमाण.”

“जा बाळांनो, मी तुमच्या हृदयात प्रेरणा ठेवली आहे. त्याप्रमाणे वागा. मोहात पडू नका. दमलात म्हणजे मी परत बोलवीन हो. जा.” असे म्हणून प्रभूने त्यांना निरोप दिला.

यमधर्माचा निरोप घेऊन आमचे सहा दूत परत आले व त्यांनी पाहिलेले दृष्य आम्हांस निवेदन केले. आम्ही सर्वांनी, माणूस नाचतो म्हणून आपण नाचायचे, ह्या धोरणाचा स्पष्ट शब्दांत निषेध केला. तरुणांनाही सारे पटले. मनुष्य कितीही नालस्ती करो, आपण प्रभूमय जीवन कंठावे, आपले काम करावे, असे आम्ही ठरवले. आम्ही सारे आपापल्या प्रांती गेलो. पूर्वीप्रमाणे वागू लागलो. समजलास मुला. मी आता जातो. माझे ते दोन वृद्ध मित्र आजारी आहेत अजून.” तो कावळा म्हणाला.

“कावळोबा, हा भाकरीचा तुकडा जा घेऊन त्या वृद्ध मित्रांसाठी!” मी त्याला भाकरीचा तुकडा देत म्हणालो.

“ठीक आहे, नेतो. त्या वृद्ध काकांना आनंद होईल. तू नीट वाग. ईश्वराच्या इच्छेप्रमाणे वाग.” तो म्हणाला.

“पाहिलेत हे चित्र. पाहिलीत ही मानवाची दैना?

भाग्यानेच एखादा यांतून पलीकडे जातो.” यमधर्म म्हणाला.

“परंतु आमचे भाईबंधू कोठे आहेत? चिमण्या, मुंग्या व इतर जीवजंतू कोठे आहेत?” तरुणांच्या नायकाने विचारले.

“अरे, ते आत देवाच्या राज्यात आहेत. त्यांनी ईश्वराने सांगितल्याप्रमाणे काम बजावले आहे. ज्यांनी कामात अळंटळं केली नाही, त्यांना आत प्रवेश आहे. ते त्या बाजूला काही बैल आहेत. शक्ती असून ते चालत ना, ढोंग करीत. परंतु ते अपवादच. मानवसृष्टीत कायदा न मोडणारा तर मानवेतर सृष्टीत कायदा न पाळणारा अपवादात्मक. तुम्ही बंड वगैरे करू नका. तुम्ही देवाला प्रिय आहात.”

“ते काही तेजस्वी लोक रडत आहेत. ते एकाच्या अंगातून रक्त येत आहे. कोण आहे ते? कावळ्याने विचारले.“ते सारे संत आणि धर्मसंस्थापक आहेत. तिकडे थोर महंमद पैगंबरांच्या अंगातून रक्त येत आहे. कारण त्यांच्या एका वेड्या अनुयायाने काल दुस-या धर्मीयाच्या अंगात सुरा भोकसला, तो त्यांना येथे लागला. आपल्या अनुयायांचे पातक इथे धर्मसंस्थापकांना भोगावे लागते. ते पहा; श्रीकृष्ण रडत आहेत. त्यांची मान खाली आहे. त्यांच्या अंगावरही ठायी ठायी जखमा आहेत. गायीला मारलेली प्रत्येक काठी त्यांच्या अंगावर बसते. आणि ते सारखे रडणारे भगवान बुद्ध! आपण केवढा थोर धर्म दिला; पण त्याचे अनुयायी सर्वभक्षक आहेत. त्यामुळे ते रडत आहेत. आणि ते भगवान ख्रिस्त! युरोप-अमेरिकेतील ख्रिश्चनांचा नंगा नाच पाहून काय करावे त्यांना समजत नाही. हे थोर पुरुष रात्रंदिवस तळमळत असतात. मधून मधून काही संत जगात जातात, परंतु काही जमत नाही. त्यांचा विचार चालला आहे की, ईश्वराला सांगावे, ‘आम्हा मानवांना नष्ट कर. आम्ही नालायक आहोत. आमचे नाव पुसून टाक.’ परंतु सर्वाचे अकमत होत नाही. पुन्हा पुन्हा आपण जाऊन दिवा पेटवू, असे ते म्हणत आहेत.”

***

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED