A Virgin HIV positive books and stories free download online pdf in Marathi

A Virgin HIV positive


श्रेयस ने २१ ची कॅण्डल फुंकली आणि केक कापला. दोघांनी एकमेकांना केक भरवला.दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. थँक यू सो मच आई ! तू जगातली सगळ्यात बेस्ट आई आहेस. ' हो का ? ती मी आहेच पण असं समजू नकोस की अशी लाडी गोडी लावून तुला गिफ्ट वगैरे मिळणारय.' 'अरे यार आई.. असं नाही हा.. मला गिफ्ट पाहिजे म्हणजे पाहिजे.' ' नाही म्हणजे नाही.' 'आई प्लिज.. प्लिज.. दे ना.. ' इवलुसा चेहरा करून श्रेयस आईकडे बघू लागला. तशी आई म्हणाली, ' देवू म्हणतोस ? अम्म्म्म... ठिकय!

हे घे.' म्हणत आई ने गाडी ची चावी श्रेयस समोर धरली. ते पाहून श्रेयस भयंकर खुश झाला. ' नवी गाडी माझ्यासाठी ? आई तू ग्रेटयस.. आई थँक यु.. लव्ह यु.. ' म्हणत त्याने पुन्हा एकदा आईला मिठी मारली. आई ने मायेने त्याची पाठ थोपटली. ' खूप मोठा हो.. यशस्वी हो.. गॉड ब्लेस यु!' म्हणत आई थोडी भावनिक झाली. 'काय झालं आई, बाबांची आठवण येतेय का ?' 'नाही रे.. actually मला तुला थोडं बोलायचंय..बस ना.' म्हणत दोघेही गच्चीच्या दुसऱ्या टोकाला आले. जिथून शांत निजलेलं मिणमिणत्या दिव्यांचं शहरं दिसत होतं. थंड हवा सुटली होती. ' बोल ना आई.. काय बोलायचंय.'आई थोडी विचलित वाटत होती. काय बोलावं कसं बोलावं हे तिला समजत नव्हतं. तरीही बळ एकवटून तिने सुरुवात केली. ' श्रेयस.. आता तू मोठा झालास. समजूतदार झालास. चांगलं वाईट यातलं तुला कळतं.एक गोष्ट मी तुझ्यापासून लपवलीय.'

' कुठली गोष्ट आई ?' 'अम्म्म्म.. नीट ऐक..शांतपणे..मला चुकीचं समजू नकोस..' 'नाही आई तू सांग बिनधास्त. मी तुला कधी चुकीचं समजेन का ?' आईने श्रेयस चा हात हातात घेतला. आणि हळुवार आवाजात ती बोलली, ' श्रेयस मी एच आय व्ही पॉझिटिव्ह आहे.' श्रेयसला एक सेकंद काही कळलंच नाही.आपण काहीतरी वेगळंच ऐकतोय असं त्याला वाटलं. ' सॉरी ? मला कळलं नाही.' ' श्रेयस मी एच आय व्ही पॉझिटिव्ह आहे.' श्रेयसला खूप मोठा धक्का बसला.'काय? तुला वेड लागलंय का?' ' श्रेयस हेच सत्य आहे. ' तसा श्रेयस ने झटकन आईच्या हातातून आपला हात काढून घेतला. पुढील कित्येक क्षण दोघेही फक्त डोळ्याने बोलत होते. दोघांच्याही तोंडून शब्द निघत नव्हते. वातावरणात अचानक भयाण शांतता पसरली होती. इतकावेळ टवटवीत वाटणारा केकही आता निरस दिसत होता.

श्रेयस काय बोलेल, कसा वागेल याचा रात्रभर विचार करून आई झोपलीच नाही. तशाच थकल्या चेहऱ्याने ती श्रेयस साठी नाश्ता वाढून टेबलवर ठेवू लागली. तेवढ्यात श्रेयस बेडरूम मधून बाहेर आला. ' अरे कधीची वाट बघतेय तुझी चल लवकर नाश्ता थंड होतोय.' पण आईच्या या वाक्यावर काहीही उत्तर न देता आणि तिच्याकडे साधं वळूनही न बघता तो ऑफिस साठी निघून गेला. आई च्या मनात मात्र हजार गोष्टी गोंगू लागल्या. काय करावं काही कळेना. थोड्या वेळाने त्याला फोन करून बोलू असा विचार करून आई बसल्या जागीच झोपी गेली.

जाग आली तेव्हा दुपारचे २ वाजले होते. हिम्मत करून तिने श्रेयसला फोन केला. पण श्रेयसने फोन घेतलाच नाही. ती उदास झाली. तीचं मन तिला खायला उठलं. ती उदासपणे खिडकी बाहेर पाहू लागली.

रात्रीच्या जेवणावेळी तरी त्याच्याशी बोलूच असा विचार करून आई श्रेयस ची वाट पाहू लागली.वाट बघून बघून तिला झोप लागली. फार उशिरा श्रेयस आला आणि डायरेक्ट बेडरूम मध्ये गेला आणि जोरात दरवाजा आपटून बंद केला. तशी आई उठली. आणि दरवाज्याजवळ जाऊन दरवाजा वाजवू लागली. पण आतून श्रेयस काहीच बोलत नव्हता. ' अरे बाळा दरवाजा उघड.. माझा राग जेवणावर का काढतोस ?जेवून घे मग आपण निवांत बोलू.. उघड ना रे दरवाजा..' पण आतून कसलाच प्रतिसाद नाही.शेवटी आईचा बांध सुटला. आणि तिने अश्रुंना वाट मोकळी करून दिली.

आईने न राहून त्यांच्या फॅमिली डॉक्टरला फोन केला. ' हॅल्लो.. मी बोलतेय. ' ' बोल गं कशी आहेस ?' ' मी बरीय तू ?' 'काय राव कसली मैत्रीण आहेस ?१५ दिवस झाले तुझी भेट नाही फोन नाही म्हणल्यावर मी कसा असणारंय ?' 'बरं ते सोड.. मला तुझी मदत हवीये..... ' 'ओके.. मी बोलतो श्रेयस शी. तू काळजी करू नको.'

डॉक्टर ने श्रेयस ला भेटायला केबिनवर बोलवलं. श्रेयसने केबिन चा दरवाजा उघडतंच विचारलं, ' येवू का डॉक्टर?' 'अरे ये ये श्रेयस..तुझीच वाट बघत होतो. बस !' श्रेयस येवून बसला. 'तुम्ही बोलावलंत मला ?' त्याच्या या प्रश्नावर डॉक्टरने डायरेक्ट मुद्द्याला हात घातला. 'हो काम आहे तुझ्याकडे. आम्ही ग्रामीण भागात एच आय व्ही awareness चा कॅम्पorganise करतोय.' एच आय व्ही हा शब्द ऐकताच श्रेयस शॉक झाला. ' तू designerआहेस सो तुझ्याकडून आम्हालाpresentation आणि पोस्टर्स बनवून हवेत.देशील ना ?' 'हो देईल ना.' आता श्रेयस थोडा रिलॅक्स झाला. 'बरं त्याआधी एक काम कर.असं समज की तू एक गावाकडील असा मुलगा आहेस ज्याला एच आय व्ही बद्दल काहीच माहित नाही. आणि तू या कॅम्पला आला आहेस.आता एच आय व्ही बद्दल तुझ्या मनात जे प्रश्न येतील ते विचार, मी त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे माझी प्रॅक्टिसही होईल.' श्रेयस डॉक्टर कडे बघतो आणि विचार करतो आणि मान हलवतो.

'डॉक्टर एच आय व्ही म्हणजे काय ?' त्यावर डॉक्टर उत्तर देतात, 'एचआयव्ही म्हणजे human immunodeficiency virus.'

'डॉक्टर एचआयव्ही आणि एड्स एकच का ?' 'नाही दोन्ही वेगळे आहेत. HIV is a virus. AIDS is a syndrome. डॉक्टर च्या मागे भिंतीवर लावलेल्या HIV पोस्टरवर श्रेयस ची नजर पडते. आणि श्रेयस शून्यात हरवतो.तेवढ्यात आईचा फोन येतो. ते पाहून तो पुन्हा चिडतो आणि 'मी नंतर येतो' म्हणून क्लिनिक मधून निघून जातो.

श्रेयस स्मोक करत एकटाच एका बंद दुकानाच्या पायऱ्यांवर बसला आहे. डॉक्टरचे बोलणे त्याच्या कानात घुमत आहे. तो डॉक्टरला फोन लावतो,' डॉक्टर आणखी एक प्रश्न विचारू शकतो का ?' 'हो बिनधास्त विचार.' ' अअ..एचआयव्ही पेशंट सोबत एकाच घरात राहणाऱ्या, खाणाऱ्या,फिरणाऱ्यांना पण त्याचा प्रादुर्भाव होतो का?' ' एचआयव्ही हा ९९.%एचआयव्ही पॉझिटिव्ह व्यक्तीशी सेक्स केल्यानेच होतो. या पेशंट सोबत एकाच घरात,सोसायटीत राहिल्याने, जेवल्याने, मिठी मारल्याने, तो पसरत नाही.' हे ऐकून श्रेयसला बर वाटतं. आणि त्याची नजर बाजूच्या भिंतीवरील अर्धवट फाटलेल्या एचआयव्ही awarenessपोस्टरवर स्थिर होते.

श्रेयसच्या मनात आता फक्त हा आजार आणि आजाराचे प्रश्न इतकंच घोळत होतं. श्रेयसने अजूनही आईशी संवाद केला नव्हता. श्रेयस टीव्ही पाहत बसला असताना परत एक प्रश्न त्याच्या मनात येतो आणि तो डॉक्टर ला फोन लावतो. ' डॉक्टर अजून एक प्रश्न आहे. ' 'तू बिनधास्त विचारत जा रे..घाबरू नकोस. ' 'आपल्याला एचआयव्ही झालाय हे कसं कळतं?' तेवढ्यात टीव्ही वर जाहिरात येते,'तुमचं एचआयव्ही स्टेटस जाणून घेण्यासाठी जवळच्या आरोग्य केंद्रात जावून तपासणी करा.'

श्रेयस रोडच्या कडेला बाईक लावून विचारात गुंतला आहे. तो विषय सोडून त्याला हल्ली काहीच सुचेनासं झाल्यामुळे त्याने परत डॉक्टरला फोन लावला. 'डॉक्टर.. ' पुढे काही बोलणार तेवढ्यात डॉक्टरच म्हणाले 'विचार विचार' 'डॉक्टर एचआयव्ही वर उपाय काय ?'तेवढ्यात श्रेयसची नजर बाजूने जाणाऱ्या एका ऑटोवर पडते ज्याच्यावर एक पोस्टर चिटकवलेलं आहे ' use condome & be safe'. डॉक्टर श्रेयसला उत्तर देतात, ' यावर पर्मनंट उपाय तर अजून अस्तित्वात नाही. पण औषधं, सोबत हिरव्या पालेभाज्या, सकस फळं,योग्य व्यायाम, वाचन चालू ठेवलं तर हे लोक दिर्घायुष्य जगू शकतात.'

इतके दिवस इतके प्रश्न विचारून झाल्यावर श्रेयसला डॉक्टरांना समोरासमोर भेटण्याची इच्छा होते,आणि तो डॉक्टरांना भेटायला जातो.श्रेयस डॉक्टरांना विचारतो, ' डॉक्टर, माझा एक मित्र आहे. त्याच्या आई.. आईला एचआयव्ही झालाय. पण हे पचायला जड जातंय.. मित्राला !काय करावं कळत नाहीये. तो आईशी खूप विचित्र वागतोय. त्याला आईचा तिरस्कार वाटतोय. तो जे वागतोय ते योग्य आहे का ?श्रेयसने थोडं चाचपडतंच डॉक्टरला विचारलं.डॉक्टरांनी मुद्दाम विचारलं, ' काय करतो तुझा मित्र ?' यावर श्रेयसने उत्तर दिलं , ' इंजिनीअर आहे. ' यावर डॉक्टरांनी मुद्दाम टोला मारला, 'एवढा सुशिक्षित असूनही असे विचार ?' यावर श्रेयस थोडा नरमला पण लगेच बोलला,'कुठला मुलगा आपल्या आईच्या बाबतीत हे असं सहन करेल ?' ' का नाही करू शकत ते सांग ?' तसा श्रेयस चिडून बोलला, ' नाही सहन होत हा विचार.. घृणा वाटतेय.' 'कुणाची ? मित्राच्या आईची कि तुझ्या आईची ?' श्रेयस शॉक होत म्हणाला, ' डॉक्टर ?' ' हो श्रेयस मला सर्व माहीत आहे.' ' काय ? आणि तरीही तुम्ही मला.. ?' ' हो माहिती आहे म्हणूनच सांगतोय, एच आय व्ही का झाला ? कसा झाला हे महत्वाचं नाही.यापेक्षा महत्वाचं आहे तू तिला सपोर्ट करणं.समजून घेणं. एच आय व्ही हा इतर आजारांसारखाच एक आजार आहे. तुला कळायला हवं. चुकली असेल ती. पण त्याची शिक्षा ती या रोगाच्या निमित्ताने आधीच भोगत आहे. तिला औषधांसोबत तुझं प्रेम, काळजी आणि सहानुभूतीची गरज आहे. तू तिला समजून घेणार नाहीस तर कोण घेईल? be mature ..शेवटी निर्णय तुझा आहे.' एवढं बोलून डॉक्टर श्रेयसला एकट्याला सोडून बाहेर निघून गेले आणि श्रेयस विचार करू लागला.

श्रेयसचे पुढचे एक दोन दिवस विचार करण्यातच जातात. जितकी जास्त माहिती मिळू लागते आणि विचार करू लागतो तितका जास्त तो अस्वस्थ होत जातो. आख्खी सायंकाळ तळ्याकाठी विचार करण्यात आणि सिगारेट फुकण्यात घालवल्यावर श्रेयस घराकडे निघतो.दारात येताच हॉल मध्ये सोफ्यावर अंग टाकून उदास बसलेली आई दिसते. तशी त्याची पावलं आणि कंठ अचानक जड वाटू लागतात. आईच्या जवळ जावून तिच्या खांद्यावर हात टेकवत, जड अंतःकरणाने हाक देतो, 'आई..' तशी चटदिशी आई त्याच्याकडे आनंदाने पाहते, ' आलास ? थांब हं जेवायला वाढते.' आईला मध्येच थांबवतो.' सॉरी आई.. ' 'कशासाठी ?' हे ऐकून श्रेयस भावनीक होतो. ' मला माफ कर आई.. मी खूप चुकीचं वागलो.सॉरी.. खरंच सॉरी !.' आई खूप खंबीर होण्याचा प्रयत्न करते पण जमत नाही. दोघांच्याही डोळ्यात पाणी येतं. क्षणभर एकमेकांकडे बघून अश्रू गाळू लागतात. ' वेडा आहेस का तू ?' 'हो वेडाच झालो होतो.एचआयव्ही बद्दल काहीच जाणून न घेता डायरेक्ट टोकाची भूमिका घेतली. पण आता एचआयव्ही हा इतर आजारांसारखाच एक आजार आहे, हे कळलंय मला. माझ्या मनातील सगळ्या शंका कुशंका सगळं सगळं क्लिअर झालंय. तू एचआयव्ही पॉझिटिव्ह आहेस हे मी स्वीकारलंय. याचा आपल्या नात्यावर कसलाच फरक पडणार नाही.' ' काय ? खरं सांगतोयस श्रेयस ? मला विश्वास बसत नाहीये.' अगणित आनंदाने ती श्रेयसकडे पाहू लागते. ' मी एचआयव्ही पॉझिटिव्ह आहे याचा तुला काहीच प्रॉब्लेम नाही ?' श्रेयस विश्वासाने ' नाही' म्हणतो. ' म्हणजे आता तुझ्या मनात कसलेच प्रश्न शंका नाहीत ?' ' नाही.' ' तुला माझा राग, तिरस्कार,घृणा वाटत नाही?' अगदी जीव एकवटून विचारलं. श्रेयसने परत तितक्याच उत्साहाने उत्तर दिलं, 'नाही.' त्याने आईला घट्ट मिठी मारली. दोघेही मायलेक बराचवेळ रडत राहिले.दाटलेलं आभाळं बराचवेळ बरसावं तसंच. श्रेयसने आईचे डोळे पुसले , तशी आई खुश झाली. आणि श्रेयसचा हात हातात घेत म्हणाली,आता खरंच माझा मुलगा समजूतदार झाला आहे. यावर श्रेयसने ओल्या डोळ्यानेsmile दिली. ' आता नीट ऐक , एचआयव्ही पॉझी टीव्ह मी नाही तू आहेस.' आईच्या या बोलण्यावर आता मात्र श्रेयस खळखळून हसला. ' आता फसणार नाही मी तुझ्या थट्टेला. ' ' अरे मी खरं सांगतेय.'

' कसं शक्यय आई ? मी तर virgin आहे.' ' हो पण तू जन्मतः च एचआयव्ही पॉझिटिव्ह आहेस.' ' काय ? आत्ताच तर तू म्हणालीस की  तू एचआयव्ही पॉझिटिव्ह नाहीयेस. तू पॉझिटिव्ह नाहीस तर मी जन्मतः कसा पॉझिटिव्ह असेल ?' 'कारण मी तुझी खरी आई नाहीये. एचआयव्ही पॉझिटिव्ह मुलांच्या अनाथ आश्रमातून मी तुला दत्तक घेतलं. आज तुला हे सत्य पचवणं जड जात आहे. समजू शकते. तू जन्मतः च एच आय व्ही पॉझिटिव्ह असणं यात तुझी काहीच चूक नाही. मला एकच वाटलं  की  तुलाही इतरांसारखच सामान्य आयुष्य जगण्याचा अधिकार आहे. म्हणून  ही गोष्ट मी सर्वांपासून लपवली, तुझ्यापासूनही. म्हणून तुझी औषध सुद्धा जेवणात मिक्स करून.. (नकळत कंठ दाटून येतो) म्हणून कधी तुला ट्रिप ला, गावाला जाऊ दिलं नाही. सतत डोळ्यासमोर ठेवत राहिले. कारण हा धक्का सहन करण्यासाठी आधी तुझं मोठं होणं गरजेचं होतं. एका विशिष्ट पद्धतीने ते तुझ्यासमोर आणणं महत्वाचं होतं.त्यासाठी डॉक्टरांची मदत घेतली.' हे सर्व ऐकून श्रेयस सुन्न झाला. आपल्याला हा आजार आहे याच दुःख करावं कि इतकी चांगली आई मिळाली याचा आनंद करावा? की आपण तिच्यासोबत विचित्र वागलो आणि तिने आपल्यासाठी इतकं केलं याचा पश्चात्ताप करावा? तेच त्याला कळेना. त्याने आईला मिठी मारली. आणि पुन्हा एकदा अश्रुना वाट मोकळी करून दिली. पण यावेळी अश्रू दुःखाचे नाही आईबद्दल असलेल्या अभिमानाचे होते. आईने त्याच्या पाठीवर हात फिरवला आणि म्हणाली, 'बाळा ,मी शेवटपर्यंत तुझ्या सोबत आहे.'

HIV PATIENT NEED OUR LOVE , CARE MORE THAN MEDICINES !

- साधना वालचंद कस्पटे (copyrights regd .)

(हि कथा काल्पनिक आहे. पण एचआयव्ही बद्दल यात लिहिलेली सर्व माहिती हि गुप्तरोग तज्ञ यांच्याशी चर्चा करूनच लिहिली आहे.)

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED