जत्रा - एक भयकथा - भाग - ६ Shubham S Rokade द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

जत्रा - एक भयकथा - भाग - ६


        " गणेश लक्ष देऊन ऐक तुझं नि तुझ्या मित्रांचं आयुष्य तुझ्या वरती अवलंबून आहे .  तुला जर जगायचं असेल तर मी सांगते तसं कर....

   " कोण ,  कोण ? आहात तुम्ही आणि कुठे आहात ...?

   " ते सांगायला माझ्याकडे वेळ नाही . मी सांगत आहे तेवढं एक ,  नाही ऐकलं तर तुझा मृत्यू निश्चित आहे .

   "   हे जे तू पाहत आहे ते स्वप्न आहे .;जेव्हा तू जागा होशील तेव्हा त्याच घरात असशील .तुझ्या मित्रांना तुला शुद्धीवर आणावं लागेल . आणि जेवढं लवकर शक्य होईल त्या घरातून बाहेर पडावं लागेल . घरातून बाहेर पडताना तेथील भांड्यावर झाकण ठेवायला विसरू नको . आणि बाहेर पडल्या नंतर पिवळ्या कंदिलाच्या मागे जा .तो कंदील तुला जंगला बाहेर जाण्याची वाट दाखवील . जर तु घाइ केली नाहिस तर तुझा मृत्यू निश्चित आहे "
 
 
     मृत्यू निश्चित आहे .... हेच वाक्य त्याच्या कानात मध्ये घुमत राहिले नि तो  शुद्धीवर आला . एक भयानक दुर्गंधी त्याच्या सभोवताली भरून राहिली होती . कुजलेल्या मासाची . त्याला ठसका लागला . तो उठू लागला तसं त्याला चक्कर आल्यासारखं जाणवलं .  त्याच्या हातातून संततधार लहानसा रक्तप्रवाह सुरूच होता . तो प्रवाह विचित्रपणे वाहत होता . हातातून ठिबकणारा रक्ताचा थेंब जमिनीवरती पडतच नव्हता . तो थेंब हवेतूनच वाहत जात , तिथेच ठेवलेल्या एका भांड्यामध्ये जमा होत होता , त्याने खिशातून रुमाल काढून हाता भोवती बांधला . मन्या व राम्या बेशुद्ध होते . त्यांच्या हातातून तो रक्तप्रवाह तसाच वाहत होता .
 
          
             त्याने मन्याला व राम्याला उठवायचा प्रयत्न केला पण दोघेही शुद्धीवर येत नव्हते . त्याने पाण्यासाठी शोधाशोध सुरु केली तिथे कुठेच पाणी नव्हते . मग तो बाहेर गेला आणि त्याला पाण्याचे डबके सापडले . त्याने तेथील पाणी आणून त्याच्या तोंडावर शिंपडले आणि मन्या शुद्धीवर येत हलचाल करू . पण राम्या अजूनही बेशुद्ध होता .
 
" काय झालं गण्या एवढा कसं काय
भेलेला आहे ? "  शुद्धीवर येत मन्या म्हणाला

गण्याने घडलेला सर्व वृत्तांत मन्याला सांगितला.

" म्हणजे पाद्री आपल्याशी खोटं बोलला की काय  ..?
पण खोटं बोलून त्याला काय मिळणार आहे . मारायचं असतं तर त्याने आपल्याला तेव्हाच मारलं नसतं का .? " मन्या गण्याला म्हणाला.

     " जरा तुझ्या हातात कडे बघ रक्त कसं उडत आहे . ही काही तरी बेकारच भुताटकी दिसत आहे . पटकन काहीतरी बांध हाताला ." गण्या म्हणाला

  "  हाताला बांधून काही उपयोग नाही गण्या . बघ जरा तुझ्या हातात कडे बांधलेल्या रुमालामधून सुद्धा रक्ताचे थेंब त्या भांड्याकडे जात आहेत ... .."
       गण्याने हाताला रुमाल बांधून देखील त्या रूमलातुन रक्त ठिपकत होते व त्या भांड्याकडे जातच होते .जरी रूमलातुन रक्त ठिपकत होते तरीही त्या रुमालाला एक थेंबही रक्त लागलेले नव्हते . तो पांढरा शुभ्र होता .

  आठव तिने अजून काहीतरी सांगितलं असेल . गण्याने आठवून पाहिलं तरीही त्याला काहीच आठवेना .

" काय सुद्धा आठवत नाही लागा ..."
   
     तेव्हाच एक विचित्र आवाज तिथे घुमू लागला .
घुं ss घुंss ..... दोघांच्याही पोटात भीतीने गोळा आला . राम्या अजून बेशुद्धच होता . काहीतरी करायलाच पाहिजे होतं . मन्या तावातावाने त्या भांड्याकडे गेला . ते भांड त्याने आदळून आपटलं . ते काचेचं असल्याने तुकडे झाले आणि रक्ताचे शिंतोडे सर्वत्र उडाले .  एका भयानक दुर्गंधीबरोबर एकाच वेळी कितीतरी जणांची रडल्याचे , ओरडण्याचे , प्राणांतिक किंकाळ्यांचे आवाज येऊ लागले , आणि या साऱ्यांच्या पार्श्वभूमीला मघाशीचा घुं घुं घुत्कार होताच .
 
     2 सेकंदात असं काहीतरी घडून गेलं की ते दोघालाही कळालं नाही . ते भांड होतं तिथेच होतं . तुकडे झालेलं भांडण पुन्हा जुळालं कसं?  सर्वत्र उडालेले रक्ताचे शिंतोडे गायब झाले होते .  ते रक्त आहे तसं भांड्यात जमा झालो होतं . घुं ss घुंss चा घुत्कार सोडला तर बाकी सारे आवाज बंद झाले होते . गण्याला व मण्याला अजून बऱ्याच ठिकाणी अजून जखमा झाल्या होत्या .

  गण्या मधूनच ओरडला " आठवलं "
  
      व त्याने तिथेच ठेवलेल्या झाकण भांड्यावर ती झाकून टाकले . तेव्हा त्यांच्या हातातून ठिबकणारे रक्त बंद झाले . कोणीतरी त्यांच्या शिकारीला आलं होतं घुंss घुंss चा आवाज कानाचे पडदे फाडत होता . त्यांनी दोघांनी राम्याला उचललं . ते पटकन घराबाहेर पडले . पण घरातून येताना राम्याच्या हाताचा धक्का लागून ते झाकण खाली पडले . मात्र त्या दोघांनाही ते  कळालं नाही .

          
      घरा बाहेर पडल्यानंतर त्यांना समोरच पिवळी मशाल दिसली त्या मशालीच्या मागे ते दोघेही निघाले . पण गन्या विसरला की त्याला कंदिलाच्या मागे जायचे होते जो उजव्या बाजूला थोड्या लांब अंतरावर होता .
.
.
.
.

    आता ते नक्की कुठे निघाले होते . ती मशाल त्यांना कुठे घेऊन जाणार होती . तुम्हाला काय वाटतं की मशाल कुणी पाठवली असेल ..... . .?

क्रमशः.....