Pathlag - 23 books and stories free download online pdf in Marathi

पाठलाग (भाग – २३)

दुसऱ्या दिवशी सकाळी पेपर बघितल्यावर दिपकला पहिला धक्का बसला. आदल्या रात्री ज्याचा खून झाला होता तो शेखावत साधा सुधा इन्स्पेक्टर नव्हता तर तो होता डी.सी.पी.शेखावत – डेप्युटी कमिशनर ऑफ पोलिस. मधल्या काळात त्याचे प्रमोशन झाले होते. साधा सुधा कोणी इन्स्पेक्टर असता तर कदाचित इतकी हवा झाली नसती, पण मुंबई सारख्या शहराचा डीसीपी आणि त्याच्या आपल्या इथे झालेला खून, त्यामुळेच ही बातमी मिडीयाने उचलून धरली होती.

आणि दीपकच्या दृष्टीने मजेशीर गोष्ट म्हणजे अख्या बातमीत कुठेही एका दाढीवाल्या दारुड्याचा आणि शेखावतशी झालेल्या त्याच्या हातापाईचा उल्लेख नव्हता. उलटपक्षी त्याला झालेल्या मारहाणी वरून आणि नंतर गोळी झाडून झालेल्या म्रुत्युवरुन हा एखादा नियोजीत कट होता आणि कश्याचा तरी बदला घ्यायला हा खून घडवला गेलेला आहे असा निष्कर्ष पोलिस आणि मिडीयाने काढला होता.

ज्यासाठी त्याने इतका आटापिटा केला, वेषांतर करून धावत पळत तो त्या बारपाशी पोचला त्याच्या काहीच उपयोग झाला नव्हता. शेखावतचा झालेला मृत्यू हा नियोजित खून वाटू नये म्हणून केलेले प्लॅनिंग व्यर्थ ठरले होते. थोडक्यात म्हणजे जे व्हायला नको होते, तेच घडले होते .

दीपक कश्याचीही पर्वा न करता सरळ मायाच्या बेडरूममध्ये घुसला आणि हातातला पेपर तिच्यासमोर आपटत म्हणाला,

“तू मला आधी सांगितले का नाहीस शेखावत डी.सी.पी आहे ते ? आपण काहीतरी वेगळा प्लॅन केला असता.”

“मला पण हि न्यूज आहे दिपक. मला पण माहीत नव्हते!! “, माया

“डॅम माया, पण पहिल्यांदा तुला गोळी मारायची आवश्यकताच काय होती? आपल्या प्लॅनची पूर्ण वाट लागलीय. कुणालाही वाटत नाहीये कि हा चुकून झालेला मृत्यू आहे. सगळे जण ह्याला पूर्वनियोजित खुनच म्हणत आहेत “, दीपक वैतागून म्हणाला

“मी नसते मारले तर तू त्याला जिवंत सोडलं असतस आणि कदाचित त्याच वेळी त्याने तुला मारले असते. मी आधीच सांगितलेय तुला दीपक, परत परत तू मला तेंतेच काय विचारतो आहेस?”, माया

“नो माया, देअर इज समथिंग एल्स, तू आधी पासूनच तेथे असतीस आणि मग तू गोळी झाडली असतीस तर गोष्ट वेगळी होती. आपल्या प्लॅन मध्ये तू तेथेच काय, जवळपास कुठेच असण्याचा प्रश्न नव्हता. मग सगळ्यात प्रथम तू तेथे आलीसच का?”, दिपक

“बिकॉज आय केअर्ड फॉर यु दिपक.”, जवळ जवळ ओरडतच माया म्हणाला
“मला तुझी काळजी वाटली. तो शेखावत किती क्रूर आहे हे मला माहिते. आय जस्ट वॉन्टेड यु टु बी सेफ…. ऐण्ड शेखावत टू बी डेड”

मायाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.

“तू तुझ्या आयुष्यात खूप सहन केले आहेस, खूप भोगले आहेस, आणि मी सुद्धा. आपले दोघांचेही पार्टनर्स ह्या निर्दयी लोकांनी आपल्या पासून हिरावून घेतले आहेत. तुला काही झाल असत तर मी तो धक्का सहन नसते करू शकले”, हताश होऊन माया बोलत होती.

नेहमी कठोर भासणाऱ्या मायाचे हे रूप दीपक प्रथमच पाहत होता.

काही क्षण शांततेत गेले.

“यु लव्ह मी दीपक, डोन्ट यु?”, अचानक माया म्हणाली

मायाच्या ह्या अनपेक्षित प्रश्नाने दीपक गोंधळून गेला.

माया दीपकच्या जवळ आली आणि तिने आपले ओठ दीपकच्या ओठांवर टेकवले.

काही क्षण … काही क्षण दीपक सर्व काही विसरून गेला. अनंत पसरलेल्या आसमंतात तरंगल्यासारखे त्याचे मन मुक्त विहार करत राहिले

“देव मयत शेखावतच्या आत्म्यास शांती देओ!!” दीपकच्या मानेभोवतीचा हातांचा विळखा काढत माया म्हणाली ..

“लेट्स सेलेब्रेट हिज डेथ !!” अस म्हणून मायाने दीपकच्या शर्टची बटण काढायला सुरुवात केली.

मुंबईच्या पोलिस हेड-क्वार्टरमध्ये पोलिस-डिपार्टमेंटची एक मिटींग भरली होती. स्वतः कमीशनर साहेब जातीने हजर होते.

“तुमच्यापैकी जर कुणालाच माहीत नाही शेखावत दमणला कश्यासाठी गेला होता.. म्हणजे ऑफीसच्या कामासाठी तो नक्कीच तिकडे गेला नसणार. पण मग असं अचानक तडकाफडकी एका रात्रीत उठुन तो तिकडं जाण्याचं कारणंच काय???”, कमीशनर
…..

“एकेकाळी अख्खं गुन्हेगारी जगं आपल्या डिपार्टमेंटला घाबरुन होतं. एन्कॉंन्टर स्पेशालिस्टची फौज आपल्या ए.टी.एस कडे होती आणि आज आपलेच ऑफीसर्स कुत्र्यासारखे मारले जात आहेत! जनतेने कसा विश्वास ठेवायचा आपल्यावर..”

एवढ्यात टेबलावरचा इंटरकॉम वाजतो..

“हम्म.. हम्म.. हो…, द्या त्यांना पाठवुन आत…”, कमीशनर रिसीव्हर खाली ठेवतात, तोच कॉन्फर्रंन्स रुमचे दार उघडुन साधारण चाळीशीतील एक माणुस आत येतो.

थोडासा घट्टच झालेला राखाडी रंगाचा कोट, एक काळ्या रंगाचा टाय, चेहर्‍यावर खवल्या-खवल्यांचे जाळं आणि कपाळावर आठ्या..

“या ऑफीसर डिसुझा.. प्लिज कम इन…”, कमीशनर साहेब त्या इसमाला शेजारच्या खुर्चीकडे बोट दाखवत म्हणतात.

“टीम.. मिट सि.आय.डी. ऑफीसर डिसुझा.. शेखावतच्या केसवर हेच काम पहातील…”, कमीशनर

रेग्युलर पोलिस सोडुन ही केस कमीशनर साहेबांनी सरळ सि.आय.डी. कडे दिलेली पाहुन थोडी चुळबुळ चालु होते..

“पण सर…”
“आय नो.. आय नो..”, कमीशनर मध्येच वाक्य तोडत म्हणतात.. “हे बघा.. मला ह्या केस मध्ये कोणतीही दिरंगाई नको आहे.. वरुन प्रेशर आहे.. आय वॉन्ट फास्ट रिझल्ट्स म्हणुन ही केस सि.आय.डीच हॅन्डल करेल.

मि. डिसुझा, तुम्ही ही केस स्टडी केलीच असेल.. तुमचं काही मत, काही फाईंडींग्स?”

डीसुझा हातातली फाईल टेबलावर ठेवतो आणि उठुन उभा रहातो. एकवार कॉन्फरंन्स रुममधील सर्वांवरुन नजर फिरवुन तो म्हणतो, “धिस इज श्युअरली ए प्लॅन्ड मर्डर.. सर!

शेखावतला नक्कीच कसलीतरी टिप मिळाली होती. तो दमणला जाण्याच्या तिन दिवस आधी त्याला दमणवरुन एक फोन कॉल येऊन गेला होता. तो तेथे जायच्या आधीच त्याच्या नावाचं एका हॉटेलमध्ये बुकींग झालं होतं.. हे त्याचे फोन चे रेकॉर्ड्स आणि हि त्या हॉटेलच्या बुकिंगची स्कॅन कॉपी.”

डिसुझा आपल्या फाईलमधुन काही पेपर्स काढुन कमीशनर साहेबांच्या समोर ठेवतो.

“दमण मध्ये …”

“तो फोन कॉल ज्या नंबरवरुन आला होता तो कुणाचा होता? त्याचे काही डीटेल्स?”, एक पोलिस डिसुझाचं वाक्य मध्येच तोडत विचारतो..

डिसुझा काही क्षण त्याच्याकडे रागानं बघतो..

“ऑफकोर्स.. तुम्ही ते तपासलं असेलच आणि नेहमीप्रमाणे ते सिम फर्जी असणार.. ऑफकोर्स..”, खजील होत तो इन्स्पेक्टर म्हणतो..

“दमण मध्ये नक्की कोणीतरी आहे ज्याने शेखावतला बोलावुन घेतलं आणि त्याचा खुन केला. मला वाटतं शेखावतच्या खुनामध्ये कमीत कमी दोन व्यक्तींचा सहभाग आहे. किंवा स्पष्टच बोलायचं झालं, तर त्याचा खुन झाला तेंव्हा तेथे दोन व्यक्ती हजर होत्या.

हे शेखावतचे पोस्ट-मार्टम रिपोर्ट्स आणि बॉडीचे फोटो..”, डिसुझा पुन्हा आपल्या फाईलमधुन अजून काही पेपर्स काढुन कमीशनर साहेबांच्या समोर ठेवतो.

“त्याच्या संपुर्ण अंगावर मारहाणीचे निशाण आहेत.. कुणीतरी त्याला चांगला बदडुन काढला आहे. आणि नुसतंच मारलं नाही तर जिवे-मारण्याचीच त्याची तयारी होती. हा फोटो बघा.. “, फोटोच्या गठ्यांमधील एका फोटोकडे बोट दाखवत डिसुझा म्हणतो..

“पंचनामा झाला तेंव्हा शेखावतच्या बॉडी शेजारी ही लोखंडी सळई सापडली. परंतु त्यावर शेखावतला मारल्याचे.. किंवा इव्हन शेखावतच्या बॉडीवर सळईच्या मारहाणीच्या खुणा नाहीत. ह्याचा अर्थ बहुदा शेवटी ही सळई त्याच्या डोक्यात घालुन त्याला मारण्याचा प्लॅन होता.. पण…”

एव्हाना सगळे पोलिस मती गुंग झाल्याप्रमाणे डिसुझाचं बोलणं कान देऊन ऐकत असतात..

डिसुझा पुन्हा एकदा सर्वांवरुन नजर फिरवुन पुढे म्हणतो.. “…पण काही तरी नक्की घडलं त्यावेळेस आणि नंतर कुणीतरी दुसर्‍या व्यक्तीने गोळी झाडुन शेखावतचा खुन केला. फायरींग रेंज साधारण १५-२० फुटांची असावी.”

“पण कश्यावरुन, मारहाण करणार्‍या त्याच व्यक्तीने लांब जाऊन शेखावतला गोळी मारली नसेल?” पुन्हा एक शंका उपस्थीत झाली.

“शक्य आहे.. पण हे स्केच बघा..”, डिसुझा अजुन एक पेपर सर्वांसमोर धरतो.. “ज्या पध्दतीने .. किंवा ज्या कोनातुन गोळी शेखावतच्या डोक्यात शिरली ती पहाता शेखावतच्या शरीराची स्थितिती साधारण अशी असावी”

स्केचप्रमाणे डिसुझा पोज करुन दाखवतो.

“म्हणजे.. ना उभा, ना बसलेला.. जणु काही कोणीतरी त्याला उठुन उभं करत होतं.. शिवाय असं लांब जाऊन गोळी मारण्याचं प्रयोजन काय? आणि ती सळई?”

सर्वत्र शांतता पसरते. सर्व जण विचार करू लागतात

“..तुम्ही म्हणता तेही शक्य असेल, पण एकुण परिस्थीतीजन्य पुरावे बघता, माझं तरी हेच मत आहे.. सो कमीशनर सर.. मला अधीक तपास करायला दमणला जावं लागेल. तेथे तपास केल्यावरच मी अधीक माहीती देऊ शकेन…”

“गुड वर्क डिसुझा…”, अभिमानाने कमीशनर म्हणाले..”प्लिज गो अहेड अ‍ॅन्ड फाईंड दॅट बास्टर्ड…”

“येस सर..”, डिसुझाने कमीशनरला एक खणखणीत सलाम ठोकला आणि तो बाहेर पडला..

“व्हॉट नेक्स्ट?”, बेड मध्ये पड्ल्या पडल्या दिपकने विचारले..
“नेक्स्ट?, नेक्स्ट इज जॉनी चिकना, दी शार्प शुटर ऑफ माफीया.”, माया बेडमधुन उठुन बसली.

“पण काही म्हण माया, त्या दिवशी माझ्या हातात सळई बघीतल्यावर भितीचे जे भाव शेखावतच्या चेहर्‍यावर उमटले होते ना!! युसुफ पाहीजे होता त्या वेळी…”, दिपक

“युसुफ??? कोण? तो जो तुझ्याबरोबर तुरुंगातुन पळाला होता???”, हसत हसत माया म्हणाली..

“हो तोच.. का? हसायला काय झालं???”, दिपक

“ओह माय गॉड.. मी तुला सांगीतचं नाही का? अरे त्यानेच तर तुझ्या हॉटेलचा पत्ता माफियाला दिला होता. तुझा आणि स्टेफनीचा. नाही तर तु कुठे आहेस इतक्या सहजी माफीयाला कळलंच नसतं…”, माया

“व्हॉट?? आर यु मॅड..”, दिपक
“ऑफकोर्स नॉट माय डिअर.. अरे इथं कोणी कोणासाठी नसतं. तुझ्या पत्याच्या मोबदल्यात लाख्खो रुपये त्याने कमावले असतील..”, माया

“नाही, शक्यच नाही. युसुफ असं करणारच नाही.. काहीतरी गडबड होतं असेल.. गैरसमज झाला असेल तुझा..”, अविश्वासाने दिपक म्हणाला..
“ओके.. अ‍ॅज यु विश..”, माया बेडमधुन उठली आणि ड्रेसिंग टेबलाच्या आरश्यासमोर जाऊन उभी राहीली…
“जरं तसं असेल तर मग युसुफ माझं टार्गेट आहे.. त्यालाच आधी संपवायचं..”, दिपक
“ओह..डोन्ट बी सिली… ही इज जस्ट अ स्मॉल फिश.. तो असला काय आणि नसला काय.. आपल्याला हे मोठ्ठे फिश उडवायचे आहेत..”, माया

“नाही.. युसुफने जर गद्दारी केली असेल तर तो मेलाच पाहीजे..”, संतापुन दिपक म्हणाला..
“ठिक आहे.. पण तु त्याची काळजी करु नकोस.. युसुफला संपवायची जबाबदारी माझी. तु जॉनी वर लक्ष केंद्रीत कर. साप आहे तो.. भयानक चपळ आणि तितकाच हुशार. त्याला मारणं इतकं सोप्प नाही. निट प्लॅन करावा लागेल.. युसुफ इज माय बेबी, आय विल टेक केअर ऑफ हीम. ओके??”

दीपक काही न बोलता नुसती मन हलवली.

टेबलावरच्या एका महागड्या परफ्युमचा मोठ्ठा स्प्रे केअरलेस्ली मायाने सर्वांगावर मारला आणि मग ती अंघोळ करायला बाथरुममध्ये निघुन गेली.

जॉनी चिकना.. एक अंधुक असा चेहरा दिपकसमोर तरळत होता. त्या दिवशी हॉटेलमध्ये पोलिसांच्या मागोमाग घुसलेला तो हडकुळा पण तरीही नावाप्रमाणेच चिकना दिसणारा एक तरुण.. जॉनी चिकना…!!! पुन्हा एकदा स्टेफनीची प्रबळतेने दिपकला आठवण झाली आणि त्याने आवेगाने आपले डोळे घट्ट मिटुन घेतले..

थोड्या वेळाने त्याने डोळे उघडले तेंव्हा डोळ्यातील दुःखाची जागा संतापाने घेतली होती. त्याच्या हाताच्या मुठी वळल्या होत्या.

“स्टेफनीच्या खुनाचा बदला मी घेतल्याशिवाय राहणार नाही जॉनी, तू कुठेही लपलेला असशील, तुला शोधून काढीन आणि स्टेफनीकडे पाठवून देईन. यु गो देअर एन्ड से सॉरी टू हर!!!”

[क्रमशः]

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED