फिरून नवी जन्मेन मी - भाग १ Sanjay Kamble द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

फिरून नवी जन्मेन मी - भाग १


फिरूनी, नवी जन्मेन मी...  भाग १ 

By sanjay kamble



                 आज तब्बल पाच वर्षानी मी माझ्या मामाच्या गावी जाणार होतो. शेवट वर्षाच्या परीक्षा संपल्या होत्या आणि आठ दिवसावर माझ्या मामेभावाचे लग्न होते... college चे मित्र आता पुन्हा भेटतील न भेटतील, पन what's app वर सगळ्यांचे नंबर मात्र आठवणीने घेऊन ठेवलेले...सर्व मित्राची भेट घेऊन घरी परतलो.. आणि प्रवासाची आवराआवर सुरु केली.
मामाच्या घरच्यांसाठी खाऊचा डबा माझ्या bag मधे ठेवत आई सांगु लागली.. 
" मामाला सांग, बाबांना सुट्टी भेटलेली नाही त्यामुळे आम्ही लग्नाच्या दोन दिवस आधी येतो म्हणून. "
" आई माझी इस्त्री केलेली कपडे....?" 
अस थोडस आईवर ओरडत मी डबा निट ठेवला आणि Bag हातात घेऊन आई बाबा आणी लहान बहीणीचा निरोप घेऊन बाहेर पडलो...

सायंकाळचे सहा साडेसहा वाजलेले.. महाराष्ट्र शासनाच्या S.T. ने माझा प्रवास सुरू झाला...  शहराचे कोंदट वातावरण हळू हळू मागे पडू लागले. डोंगराळ भागातील वेड्यावाकड्या वळणावरून s.t धावत होती. गर्द झाडीतून सूटटेला मंद, गार वारा माझ्या शहरी मनावरचा ताण कमी करत होता. रस्ता तसा कच्चाच, अशाच खडकाळ रस्त्यातून मार्ग काढणा-या S.T. च्या खिडकीवरीला काचांचा खडखडणारा आवाज आणि त्या आवाजातही खिडक्यांमधुन येणा-या थंड वा-याची एखादी लहर मनाला सुखावून जायची. अशातही शांत झोपलेले काही लोक हे मला पंचतारांकीत हॉटेल मधल्या A.C. मधेही झोप न लागणा-या लोकांपेक्षा जास्त सुखी वाटत होते.
पण गावी जाण्यास मी इतक उतावळ असण्याच आणखी एक कारण होत...
माझी मैत्रिण.......
हो ....... मैत्रीणच.....
मैत्रीण की.....आणखी काही.....?

 आणी मघाशा बैगेत डबा ठेवताना आईवर हलकेच का ओरडलो...?    कारण काहीतरी होत बैगेत तीच्यासाठी......


       लहान पणापासुनच, 
जेव्हा मी गावी जायचो ती मला भेटायला खुप आतुर असायची. इतकीशी गोरी नव्हती पन साजरी,  हसताना उजव्या गालावर पडणारी ती खळी,  कपाळावर हिरव गोंदण, हनुवटीवर बारीकसा तीळ, टपोरे पाणीदार निष्पाप डोळे अशी ती..... 'गौरी'....

" पाव्हण... गाव आल तुमच...." 
कंडक्टर ने आपल्या हातातील तिकीटावर होल पाडायचे लोखंडी पंचींग खाडकन लोखंडी पाईप वर आपटले तसा मी तीच्या गोड आठवणीतुन बाहेर आलो ... एस.टी. च्या त्या खिडकीतुन बाहेर डोकावुन पहात मी माझी bag उचलुन हातात घेत खाली उतरलो. मोबाइल पाहीला तर रात्रिचे 10.30 वाजुन गेलेले. 
'टिन टिन' कंडक्टरने बेल मारली तशी खडखड आवाज करत धुळ उडवीत S.T. आपल्या मुक्कामाला निघाली...
माझ गाव अजुन बरच दुर होत.... आणि तिथपर्यन्त मला पायीच जाव लागणार होत... bag पाठीवर अडकवून एका चिंचोळ्या पायवाटेने माझा प्रवास सुरु झाला ... मामेभावाला फोन लावला पन network......

      पांढरशुभ्र चांदण्यात सगळ काही स्पष्ट आणि स्वच्छ दिसत होत... मामाच गाव यापेक्षा ते गौरीच गांव म्हणुन मला जरा जास्तच प्रिय होत.. असच असत ना.... म्हणजे आपल्या आवडत्या व्यक्तिची प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी सोन्यापेक्षा मौल्यवान असते... 
गर्द दाट जंगल, वा-याच्या प्रत्येक झोक्यावर डोलणारी आंब्या, फणसाची झाडे, त्यांवर चमचमणारी आणी प्रकाशाचा खेळ करणारी लखलखणारी काजव्यांची माळ, किर्र्र किर्रर्रर्र किर्रर्रर्रर असे आपापसात संवाद साधणारे रातकिडे, आणि अशातच वाळलेला पालापाचोळ्यातुन सळसळत जाणारा एखादा काळाकुट्ट साप दिसताच काळजात धस्स्स्स्स व्हायच... आणी मनात 'गौरी' ला भेटायची उत्सुकता....... अशा या निर्जन वाटेवर आज हेच माझे सोबती होते...  पायाखालची त्या चिंचोळ्या पायवाटेने चालत मी एका नाल्यावर तयार केलेल्या लाकडी पुलावर आलो.. उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाणी खुप कमी झाल होत. मी आणी 'गौरी या पाण्यात तासंतास पाय बुडवुन बाजुच्या दगडावर बसुन असायचो....  नितळ स्वच्छ आकाशातले ते तेजस्वी चंद्रबिंबाच्या प्रकाशाने चमचमणारे ते संथ पाणी पाहताना न रहावून मी एक छोटासा खडा त्या पाण्यात टाकला, तशी त्या संथ पाण्यात क्षणात असंख्या वर्तुळे तयार होत किन-याकडे धाऊ लागली. ते मोहक दृष्य डोळ्यात साठवत आपली वाट चालु लागलो, पुन्हा भावाला फोन ट्राय केला पन network...
sshyyy....

पाठीवर आडकवलेली bag निट करत मोबाइल खिशात ठेवला.. आजुबाजूचा परिसर न्याहाळत पायपीट सुरू होती..  कमी अधीक उंचीची तर लहान मोठ्या आकाराची ती झाडांची गर्दी जशी चांदण्यात न्हाऊन निघालेली... अशातच माझी नजर काही अंतरावर असलेल्या एका ऊंच, दाट झाडाकडे  गेली. जस त्या झाडाच्या पलिकडे उभ कोणीतरी मला पहात होत.. तो अस्पष्ट माणसाचा आकार होता की माझ मन या परिसरात गुंतल्यान अशा आकृत्याना तयार करत होत हे उमगत नव्हत... दुर्लक्ष कराव तर जीथे नजर पडेल तीथ असच काहीसा गुढ आकार उमटत होता... असतात मनाचे खेळ... मी दुर्लक्ष करत चालु लागलो तशी समोरच्या झाडावर काजव्यांच्या लपंडावातच थोडी हलचाल जाणवली. मी आपल्या चालण्याची गती कमी करत निरखून पाहु लागलो.  जंगली माकडे किंवा तसेच एखादे जनावर असेल अशी मनाची समजुत काढत तसाच पुढे आलो. तोच पुन्हा त्या झाडावर हलचाल वाढली, मी मागे वळून पाहिल तस माझ्या पासुन पन्नस ते साठ फुटावर असलेल्या त्या झाडावरून काही तरी खाली पडल्याचे , नाही अंतराळी खाली येत असल्यासारख दिसले... अगदी एखाद्या पक्षान पंखांची फडफड करताना निसटुन हवेत झेपावलेला पंख हवेवर तरंगत खाली यावा तसे ते खाली आले. जशी एक गडद्द सावली.. जागेवरच उभ रहात ते नेमक काय आहे ते पाहू लागलो.. ते तसेच पडून होते, निपचिप. 
त्याकडे दुर्लक्ष करतच मी आपल्या मार्गाला लागलो.. पन न रहावून एक विलक्षण भिती वाटु लागली... जस कोणीतरी माझ्या आजुबाजूला आहे ... मला पहातय..... या चंद्राच्या नितळ सावल्यांमधे दुरच्या गर्द झाडांमधुन... आणी दुस-याच क्षणी मला एक चाहुल जाणवली.... न रहावुन मी मागे वळून पहील तसा काळजात धस्स झाल... मी आलेल्या त्या वाटेवर मागे चंद्रप्रकाशात कोणीतरी उभ होत... एक काळी माणवी आकृति, जशी पारदर्शक सावली भासत होती... ते तसच उभ होत, कोणतीच हलचाल न करता फक्त पहात होत, मझ्याकडे... कोण असेल......?  मी नजर चोरून तसाच माझ्या वाटेला लागलो...
अचानक हवेत गारवा जाणवू लागला... सगळ काही शांत होत, तोच मागुन एका मुलीची हाक ऐकु आली.....
" ये संजु........" 
मी दचकून जागेवरच ऊभा राहीलो .. तसा पुन्हा आवाज आला 
"कित्ती वर्सान आलास र इकड....तुला माजी आटवन बीटवन यत् हुती का न्हाय र.."
आवाज मी ओळखला होता...थोड हसलो पन थोडी गम्मत करायची ठरवुन मागे न पहाता मी म्हणालो.... 
" कोण हो आपन..... मी नाही ओळखले तुम्हाला..." 
तशी ती थोडी रागात म्हणाली..
" शेरातली मानस तुमी...आमची आटवन कशाला यईल तुमास्नी..."
तीचा राग जाणवत होता, तसा मागे वळुन पहात मी म्हणालो....
"गौरी........गौरी........ अजून नाही बदललीस.. आणि इतक्या रात्रिची इथ काय करतेस....."
ती ही उगाच घाबरेल म्हणून काही वेळ आधी घडलेल्या प्रकाराबद्दल काहीच सांगितल नाही. 
ती माझ्यासोबत चालत म्हणाली ..
"तुझ्या भावाच लगिन हाय न्हव... मला ठाव हुत, तु यनार ते, म्हणून तुजी वाट बघत होते." 
" हो का..." मी ही फिरकी घेऊ लागलो
बोलत बोलत आम्ही गावाच्या दिशेने चालु लागलो... दूर काही अंतरावरुन एक दुचाकी येताना दिसली तशी गौरी म्हणाली...
" चल कोनतरी येतय आपल्याला बगून नग ते समजायचे...आन तुज्या भावाच लगीन हाय तवा आपन रातच्यालाच भेटुया... न्हायतर परत लोक आपल्यावर नग त्यो संशय घेत्याली..."
बर म्हणत तीच्यकडे पहील तशी ती त्या काळोखात कुठेतरी नाहीशी झाली ....
समोरून येणारी दूचाकी माझ्या जवळ येऊन थांबली.
"काय र...? फोन तर करायचा...? तु पोचलास का इचारायला आत्तीन फोन केला व्हता..."
भिकाजी आजुबाजूला पहात पुन्हा म्हणाला
" बस लवकर....."

" नेटवर्क नाही आणी फोन काय घंटा करणार..."
बोलता बोलता मी गाडीवर बसलो तशी टर्रर्रर्रर्रर टर्रर्रर्रर्रर आवाज करत सायलेंसर निखळून खडखडणा-या जुन्या M80 गाडीवरून दोघे घरी जायला निघालो... गावचा रस्ता खााच खळग्यांंनी भरलेला आणि त्यात भर म्हणजे  बाबा आझमच्या  काळातील या M 80 चे हेडलाईट पेक्षा घरात लावलेली मेणबत्ती पन जास्त प्रकाश देेत असावी.. आम्ही घरी 
पोहोचलो हे गाडी मुळ आख्ख्या गावाला समजलं होतं.. घरातील सर्व मंडळी जेवण आवरून सर्व अंगणात गप्पा मारत बसलेले... 

घरी पोहोचताच हे कसे आहेत, ते कसे आहेत वगैरे.... नेहमीच्या formality...

जेवण आवरून रात्रि अंथरुनावर पडलो,  बाहेरच नितळ चांदण खिडकीतुन किंचीत आत डोकावत होत... काही वेळ आधी येताना इतकी भयावह घटना घडलेली असताना देखील फक्त दोन पावले सोबत चाललेल्या गौरीचा विचार मनातून जात नव्हता...ती अजून ही बदलली नव्हती.
तीच पाच वर्षा पुर्वीची गौरी..  मनातील तीच्या आठवणी अचानक उमलुन डोळ्यांसमोर तरंगू लागल्या.....


क्रमशः