फिरून नवी जन्मेन मी - भाग ४ Sanjay Kamble द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

फिरून नवी जन्मेन मी - भाग ४

ती माणवी आकृति आता झाडामागून पुर्ण बाहेर येऊन उभी माझ्याकडे पहात होती... मी पन त्याच्या कडे पाहू लागलो, तसा मनात एक विचार चमकुन गेला की काल रात्रि हीच आकृति माझ्या मागे होती.. आणि सर्रर्रर्रर्रर्र कन अंगावर काटा आला... ते कोणतीही हलचाल करत नव्हते तरी माझ्या डोळयाच्या लवणा-या पापणीसोबत ते पुढ येत असल्यासारख वाटु लागल. पापणी मिटुन उघडली की अंतर कमी होऊ लागले... खुपच विचित्र वाटू लागल तसा मी तीथुन जायच ठरवल. तोच मागुन एक हाक ऐकु आली... आणि माझ अंग शहारल
"संजु...... " थंड वा-याची एक लहर अंगाला स्पर्श करून गेल्यासारख वाटल..
तो गौरीचा आवाज होता... मी मागे वळतच म्हणालो...
"गौरी ........ किती उशीर ग......."
म्हणत मी मागे वळुन पाहील तस धक्काच बसला.....
तो गौरीचा आवाज होता... मी मागे वळतच म्हणालो...
"गौरी ........ किती उशीर ग......."
म्हणत मी मागे वळुन पाहील तस धक्काच बसला, मागे कोणीच नव्हत.. मग तो आवाज कोणाचा होता... आता मात्र भीती वाटु लागली होती... मनात नको नको ते विचार येऊ लागलो... तीथुन निघुन जायचा विचार केला, पन मी गेल्या वर गौरी आली तर .... नको थोड़ा वेळ वाट पाहण्याचा निर्णय घेतला...
पन दुस-या क्षणी एक
काळीकुट्ट माणवी आकृति माझ्यापासुन थोड्याच अंतरावर कोणतीच हलचान न कारता तशीच उभी दिसली आणि काळजाचा ठोका चुकला .. चंद्रप्रकाशात ती काळीकुट्ट आकृति, लांब गुडघ्या पर्यन्त हात, लांब लालसर नख्या, मोठे रागिट आणि क्रुर पांढरे डोळे. त्याला पाहताच माझा मागे तोल गेला आणि खाली पडलो... एखाद्या काळ्या मांजराने घुरघूरताना आपला जबडा पसरावा तसा त्या पिशाच्च्याने माझ्या कडे पाहून आपला जबडा पसरला. त्याचे लाल पांढरे टोकदार रक्तळलेले दात पाहुन काळजाचा थरकाप उडाला... श्वास वाढला, काळीज जोरजोरात धडधडत होत... तोंडातून शब्दच फुटत नव्हते... जागेवरच उभे रहात त्याने आपली भयानक नजर माझ्यावर रोखली होती .. काय करावे सुचत नव्हते... इतक्यात मागुन एक भयानक किंकाळी ऐकु आली. आणी झपकन डोळे उघडले... पन अंग थरथर कापत होत....
मी त्या दगडावर तसाच पडून होतो कदाचीत डोळा लागला असावा.. पन ती किंकाळी......?
आणी पुन्हा तीच किंकाळी
दचकुन जगेवरून उठलो कारण तो आवाज गौरीचा होता... ती जिवाच्या आकांताने ओरडत मला हाक मारत होती... तीच्या आवाजात भयानक वेदना होत्या...
थरथरत उठून उभा राहीलो. तसाच मी गौरीच्या आवाजा मागे धाऊ लागलो... पडत झडत मी त्या गर्द दाट झाडीतून जाणा-या त्या बारीकशा पायवाटेने धावत निघालो..ती जोरजोरात ओरडत होती... एखाद्या निष्पाप जनावरास लाठीने, चाबकाने फोडताना जसे ते हंबरावे, ओरडावे तसा गौरीचा काळीज पिळवटून टाकणारा आवाज कानावर पडत होता, आणि काळजात धारधार कट्ट्यार उतरावी तशी मनाला यातना होत होती... धावता धावता डोळ्यातून पाणी कधी आल कळलच नाही... हूंदका आवरून जीवाच्या आकांताने घनदाट जंगलातुन धावत गौरीला साद घालत तीचा शोध घेऊ लागलो, पण तीचा आवाज आणखी दुर दूर जाऊ लागला... अर्धा पाऊण तास तसाच धावत राहीलो पण गौरी कुठच दिसत नव्हती... खुप दम भरला होत. अंगही घामान भिजल होत. तसाच एका झाडाला तक्या देऊन उभा राहीलो..गौरीला साद घालून घसा सुकला होता... काळीज जोरजोरात धडधडत होते...आणि डोळ्यातून एकसारखे अश्रु वहात होते.. स्वाता:ला सावरत चोहोबाजुला नजर फिरवून पाहील पन काजव्यांची लखलखनारी माळ आणि रातकिड्यांची किर्रर्रर्रर्रर किर्रर्रर्रर्रर किर्रर्रर्रर्रर असा कर्कश्य आवाज एवढ होत... गौरी कुठेच दिसत नव्हती...
डोळ्यातील अश्रु पुसत पुन्हा तीचा शोध घेऊ लागलो. तोच असह्य वेदनेन कण्हत असल्याचा गौरीचा आवाज आला...
"स..............स..............संजु........"
तो गौरीचा आवाज होता.
" गौरी..........गौरी.........कुठ आहेस तु......"
केवीलवाण्या आवाजात साद घालत मी तीचा शोध घेऊ लागलो... डोळ्यातून एकसारखे अश्रु वहात होते..तीचा आवाज येईल त्या दिशेने पुन्हा धावणे सुरू केले...
पुन्हा तीची हाक ऐकु आली... तसा जागेवरच थांबून तीच्या आवाजाचा वेध घेऊ लागलो... तोच उजवीकडे काही अंतरावर झाडाच्या वाळलेल्या पानांवरून कोणीतरी फरपटत जात असल्यासारख जाणवल.. मी नजर फिरवली आणि काळजाचा थरकाप उडाला...
गौरी खाली जखमी अवस्थेत विव्हळत होती.. तीच्या जखमातून रक्त एकसारख वहात होत... कपडे ठीक ठिकानी फाटलेले... सर्व अंगच रक्ताने भीजलेले होते... तीची ही अवस्था पाहुन अंग शहारल, मी तीच्याकडे धावणार इतक्यात ती काळी आकृति गौरी शेजारी उभी दिसली... ते गौरीचा हात पकडून फरपटत तीला घेऊन जाऊ लागले... ती रडत, विव्हळत होती.. माझ्याकडे पहुन कण्हतच बोलु लागली...
"स......स.......संजु.......तु जा इथुन... नाहीतर हे त....त....तुलापन ठार मारील...."
आता मात्र रागाने मी वेडा झालो होते... कमरेला लावलेला चामड्याचा बेल्ट काढला आणी अंगातली सारी शक्ति एकवटली..हाताच्या मुठीत बेल्ट करकचुन आवळतच मी त्या पिशाच्च्यावर ओरडलो...
"ए सैताना ............सोड तीला............" म्हणत रागातच चालू लागलो....
माझ्या कडे पाहून चेहरा आक्राळ विक्राळ करत ते भयान, भरड्या आवाजात हसु लागले... एखाद्या भुकेल्या हिंस्त्र श्वापदाच्या तोंडातुन कुणीतरी त्याच भक्ष हिसकावुन घेताना त्यान पहाव आशा नजरेन ते माझ्याकड पहात होत.. भीतीन मी पुरता थरारलो पन जख्मी गौरीकडे पहात मी रागातच त्याच्याकडे चालू लागलो...
तोच कोणीतरी मला मागुन पकडल आणी काही बोलणार इतक्यात आपल्या हाताने माझ तोंड दाबल, मी प्रतिकार करायच्या आत मागून बारीक आवाज कानावर आला...