Firuni navi janmen mi - 6 books and stories free download online pdf in Marathi

फिरून नवी जन्मेन मी - भाग ६

सर्व मित्राना फोन केला आणि जर घरचे लग्नाला नाही म्हणनार ठाऊकच होत त्यामुळे पुढची फिल्डिन्ग लावायला सांगितले, सगळे खुश होते... शेवटी मित्रच ते, सुखाता आणि दु:खात साथ देणारे..

*****

कधी सुर्यास्त होतो आणि कधी गौरीला हे सांगतो अस झालेल, रात्र झाली तस आणखी एक कारण दीलं आणि ती खटारा एम८० घेऊन मी बाहेर पडलो... टर्रर्रर्रर्रर्र आवाज करत रस्त्यावरून येताना कधी कधी लोक पहायचे पन मी लय हुशार . तोंडावर रूमाल बांधलेला... पन नंबर प्लेटवर काय बांधणार...? काही वेळातच आमच्या ठिकाणावर पोहोचलो . गाडी रस्त्याच्या कडेला जरा आडोसा बघूनच उभी केली आणी शर्टच्या वरच्या खिशात कागदात गुंडाळून ठेवलेला गजरा हातात घेऊन चालू लागलो.... ती वाट पहात बसलेली... मला पाहून लटक्या रागात परत आपल्या ओढणी सोबत खेळ करू लागली.. आज थोडी रागातच होती... तीच्या समोर उभं रहात मी ओंजळीत तो गजर घेऊन तीच्या समोर धरतच म्हणालो..

" तुझ्या आवडत्या रातराणीच्या फुलांचा गजरा आहे... गावभर फिरून आणलाय.."

तीनं एक कटाक्ष त्यावर टाकला आणि झटकन तो गजरा फेकुद देत म्हणाली....
" मला तुझ्या सोबत लग्न करायचे नाही... "
... तस मी म्हणालो,
" काय झालं..? सावकाराच्या मुलान घरात येऊन धमकी दिली काय घरच्याना..."
" तु कायपन समज..."
तसा मला राग आला ..
" तुला माझी शप्पथ... नाही सांगितलस तर माझ मेलेल तोंड पन तुला पाहायला भेटणार नाही..."
माझ बोलण ऐकताच गर्रर्रर्र कन मागे फिरली आणि माझ्या गालावर चपाट मारली...
" काही बोलू नगंं ? पण जे हाय ते पचवाच धाडस हााय का तुझ्यात..?"
ती काय बोलत होती काहीच समजत नव्हत. 'सुटल्या' म्हणून माझ्याकड पाहु लागली.. मी ही तीच्या गालांवर आलेली केसांची बट हळुवारपने तीच्या कानामागे सरकवत तीला जवळ ओढली आणी डोळ्यात पहात म्हणालो...
" तु आहेस माझ धाडस, माझी हिंम्मत, माझ सर्वस्व, माझ सुंदर गोजिरवाण जग.. तुच आहे गौरी..."
माझे शब्द ऐकताना तीच्या ओठांवर गोड हासु उमलताच गालावरची खळी अधिकच खुलून आली... हळुवारपणे तीच्या कमरेवर हात ठेवत अलगद तीला जवळ ओढले... तशी माझ्या डोळ्यात पहात म्हणालीी‌.

" ए. काय करतोयस..?"

" माझ्या काळजाच्या तुकड्याला डोळे भरून पहातोय.." माझ्या बोलण्यान तीन लाजुन अलगद पापण्या मिटल्या... रात्रीचा मंद गार वारा सर्वांगाला झोंबत असला तरी एकमेकांचा वेगाने होणा-या उष्ण श्वासाचा स्पर्श चेह-यावर जाणवु लागला... चंद्राच्या शितल प्रकाशान चिंब भिजलेल्या तीच्या रुपाच चांदण चंद्रालाही लाजवत होत... वा-याच्या झोक्याबरोबर चेह-यावर पसरणारे तीचे काळेभोर केस बाजुला करत मी अलगद माझे थरथरणारे ओठ तीच्या ओटांवर ठेवले तसा तीच्या अंगावर सरसरून शहारा आला..तिनेही माझ्या गळ्याभोवती घातलेला आपल्या हातांचा विळखा घट्ट केला.. माझ्या ओठांमधे गुंतलेल्या तीच्या नाजूक गुलाबी ओठांना सोडावस वाटतच नव्हतं.. त्या मधुर गुलाबी स्पर्शाने दोघही रोमांचीत होत चाललो.. माझ्या गळ्याभोवती तीच्या नाजूक हातांचा विळखा अधिकच घट्ट होत चाललेला. आणी मी ही तिला आपल्या मिठीत घट्ट आवळून धरलेल, पन तिच्या गालांवरून ओघळणा-या अश्रुंनी मी भानावर आलो...

" गौरी .... तुझ्या डोळ्यात पाणी.....?"
पण काहीच न बोलता ती माझ्या कुशीत शिरली.... मला घट्ट बिलगत होती...
"तुझ्यासोबतची ही रात आज संपु नये ...उद्याचा दिवस कधी उगवुुच नये असं वाटतंय..?"
बोलण्याचा अर्थ उमगत नव्हता... नितळ चांदण्याची ती रात पुढे सरकत होती आणि गौरी तशीच माझ्या कुशीत आपले डोळे मिटून पडून राहीली... मी ही तीच्या मोकळ्या केसामधून हात फिरवत तीला छातीशी कवटाळत आपल्या भावी आयुष्याची स्वप्न रंगवत होतो,
पन एक भयान सत्य आमचा पाठलाग करत होत...

*****

सकाळी माझ्या मामेभावासोबत त्याच्या room मधे बोलत बसलो होतो ...
"सावकाराच्या मुलाची नाटक वाढलेत...त्याला एक डोस द्यायलाच पाहीजे.."
मी आरशात केस निट करत म्हणालो... तसा भाऊ बाजूला चार्जींगला लावलेला मोबाइल हातात घेत म्हणाला..
" त्या सावकाराला पाच मुल हायत, तुला कनच्यान त्रास दीला.."


तस त्याच्याकडे न पहाता मी म्हणालो,
" ज्यासोबत आधी माझी कचकच झालेली..."


भावाने भुवया ऊंचवत माझ्याकडे पाहील, आणि म्हणाला...
" तु तयार हो... थोड बाहेर जायच आहे ..."


काही वेळातच फ्रेश होऊन दोघेही बाहेर पडलो, गाडीवरून पाच मिनीटात सावकाराच्या दारात आलो... गाडी वरुन उतरतच मी म्हणालो...
"अरे... आता लोचा नको...तुझ लग्न ठरलय.. नंतर बघू...."
मला काही उत्तर न देता तो आत गेला...आता मला ही जाण भाग होोंत ...मी ही मागे गेलो...
सावकाराचा मोठा मुलगा दारात बांधलेल्या गुरांसाठी आणलेली वैरण टाकतच भावाला म्हणाला..
" काय र भिकाजी .... सकाळ सकाळ....!"
" काय न्हाय.... आबाची तब्बेत कशी आहे विचाराव म्हटल...."
" आस व्हय.. आबा आत हायती .."


आम्ही दोघे आत सोफ्यावर येऊन बसलो
तसा भावाने मला खुनावत समोरच्या भिंतीवरचा फोटो दाखवला... तो हार घातलेला फोटो सावकाराच्या त्याच मुलाचा होता, मी दचकुन उभाच राहीलो आणि वेगात तीथुन बाहेर आलो...पाठोपाठ भाऊही आला...
मी आश्चर्यान भावाला म्हणालो..
" कसा आणि कधी मेला हा...?"


तसा भाऊ म्हणाला .

" दोन वरीस झालीत.. accident झालेला. याच्याच शेतातली उसाने भरलीली ट्राली पायावरून गेली..पायाचा चेंदामेंदा झाला... दोन्ही पाय गेलत... वरीसभर जीत्ता होता... रांगतच घरभर फिरायचा. जोरजोरात कण्हायचा, आरडायचा चार पाच वेळा आत्महत्या करायचा प्रयत्न केला पन वाचला.. मग एकदा शेतातल किटनाशक प्यायला. लय तळमळत, हात बोट घासत हुता.. दोगजन दोस्त मोटरसाइकिल वरन दवाखान्यात न्हेत व्हती... पन गावाबाहेरच्या नाल्यावर त्याला झटका आला तशी तिघबी खाली पडलीत... सावकाराच पोरग तीतच आरडून आरडून मेल..."


भावाच बोलन ऐकुन धक्काच बसला...सर्रर्र्रर्र कन अंगावर काटा आला... झटकन लक्षात आल म्हणजे त्या रात्रि मला दिसला तो सावकाराच्या मुलाचा आत्मा होता. मी भावाला म्हणालो ,
" मग ती मला खोट का बोलली...?"
भाऊ गाडी चालवत विचारु लागला..
"कोन ती...?"
"ती कोण म्हणजे ...? गौरी.... हा सावकाराचा मुलगा मला त्रास करतो म्हणाली..."
पन भावाला माझा खुप राग येतोय अस वाटत होत..
तो वैतागुन म्हणाला...
"अर..डोक बीक हाय ना जागेवर..."
त्यान गाडी सरळ गावात आणली ती गौरीच्या दारात...
मी त्याला म्हणालो
"अरे आता तुझ डोक ठिकाणावर आहे का...इथ कशाला आणलस...."
माझ्याकडे पहातच त्यान हाक दीली...
" मावशी....ये मावशी...."
तशी गौरीची आई बाहेर येतच आपले दोन्हा हात आमच्या समोर जोडत केविलवाण्या नजरेने बोलू लागली...
" या की र लेकरानु ... "
ती आम्हाला आत घेऊन गेली... गंज चढलेल्या जुन्या ट्रंगवर ठेवलेल लोकरीच घोंगडं जमिनीवर अंथरून म्हणाल्या...
"बसा लेकरानु..... 'चहा' ठेवते तुमास्नी..."
गौरीच घर खूपच छोट होत. एक छोटीशी पाल्याची झोपडी आणी आतुन पांढ-या मातीन सारवलेल्या भिंती.. लहान असताना यायचो या घरात... पण आता ते घरही खुप उदास वाटत होत.... डाव्या कोप-यात देवाची गाणी म्हणायचे साहीत्य चौंडक, टफ, तुणतूणा. लाकडाने विणलेल्या दुरडीत भंडारा लावलेली देवीची मुर्ती...
" बोला की र लेकरानू..काय काम हूत..."
भाऊ बोलू लागला..
" मावशी काल लग्नाची पत्रिका दीली ना... देवीला नमस्कार करायला आलोय..."
म्हणत त्यान देवीच्या मुर्तिपुढ डोक टेकवल.. गौरीच्या आईने तीथलाच थोडा भंडारा आम्हा दोघाच्या कपाळाला लावला.
मागे भिताडाला तक्या देत भाऊ म्हणाला,
" मावशी ..... गौरीचा काही फोन, वगैरे येतो का..."
आमच्या हाती को-या चहाचा कप ठेवत त्या म्हणाल्या
"न्हाय र लेका......तीन चार वरीस झाली, कायबी सुगावा न्हाय तीचा..कुठ हाय..कशी हाय..कायबी ठाव न्हाय..."
गौरीच्या आईन आपल्या देवीला हात जोडले आणि म्हणाल्या
"जीत बी हाय तीथ माज्या लेकीला सुखी ठेव ग आई.."
बोलता बोलता त्यांच्या डोळ्यात पाणी आल... त्यांच बोलन मला काहीच समजत नव्हत...आम्ही दोघे त्या माऊलीचा निरोप घेऊन बाहेर पडलो...


क्रमशः

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED