फिरून नवी जन्मेन मी - भाग ७ - अंतिम भाग Sanjay Kamble द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

फिरून नवी जन्मेन मी - भाग ७ - अंतिम भाग



****

" गौरी इथच आहे, या जंगलात रहाते. लोक त्रास देतील म्हणून ती गावात येत नाही...आज तु सोबत चल... आणि हो... मी लग्न करणार आहे तीच्या सोबत....वाट्टेल ते झाल तरी..." अस म्हणत त्याच्या पाठीवर थाप दिली... माझ बोलन ऐकुन तो मात्र अस्वस्थ झाल्यासारखा वाटला...

*****

रात्र झाली तस आम्ही दोघेही त्याच्या गाडीवरून बाहेर पडलो..
मी खुपच उतावळा होतो...मागे बसुन माझ बडबडन भाऊ मात्र शांत बसुन ऐकत होता....
आम्ही नेहमीच्या ठीकाणी आलो तस भावाला गाडी लावायला सांगुन मी धावतच वर गेलो... गाडी लाऊन तो ही माझ्या मागे आला...
गौरी अजुन आली नव्हती. त्या दगडाला तक्या देत मी भावाला सांगु लागलो..
"हे बघ आम्ही इथच भेटतो पन इथ एक भयानक अनुभव पन आला, एक भयानक आकृति दिसलेली रे.. पन आता तु घाबरू नको, तुझ्या सोबत मी आहे ना...."
आणि मी त्याला माझ्या जवळचा धारधार चाकू दाखवत म्हणालो.....
"हा बघ चाकु... त्या घटने नंतर या जंगलात तर हत्यार पाहीजे अस वाटल..."
वेड्यासारखा मी एकटाच बडबडत होतो भाऊ मात्र माझ बोलन ऐकत शांत उभा होता...
कदाचित आज पौर्णिमा असेल... चंद्र आज भरात आला होता...रात्र पुढे सरकत होती पन अजुन गौरी आली नव्हती. मला खुप अस्वस्थ वाटत होत.. खुप वेळ वाट पाहिली पन तीचा पत्तच नव्हता तेव्हा भाऊ म्हणाला, "चल.....निघुया आता....कदाचित आज ती येणार नाही...."
त्याच बोलन मधेच थांबवत हसुन त्याच्याकडे पहात मी म्हणालो...
"तीचा जीव आहे माझ्यावर, ती बघ मागे......गौरी उभी आहे..."
भावाचा हात दबत मी गौरी जवळ जातच तीला म्हणालो...
" काय madam... किती हा उशीर... कोणाला वेळेची कदर नाही म्हणून आपला देश मागे आहे ..."
गौरी तशीच शांत उभी होती...तीच्याकडे पहात मी पुन्हा बोलू लागलो..
" आपण लग्न करणार आहोत.. भावाला सांगितलय... तुला कोणाला घाबरायची गरज नाही...कोण काही म्हणाल तर मी तीथच उसाच्या पेरा सारख कंडक करतो त्याच.."
मी भावाकडे पाहिल तर त्याच्या चेह-याचा रंग उडाला होता... तो पुढ येत म्हणाला
" स....संजु...कोणाशी बोलतोयस..... काय झालय तुला..."
त्याच्या आवाजात थोडी भिती जाणवत होती.
" कोणाशी काय, गौरी सोबत बोलतोय..."
समोर शांतपणे उभ्या गौरीकडे हात करत मी म्हणालो... तसा भाऊ माझ्या जवळ येऊन म्हणाला...
"संजु .. तुला भास होतोय, ती इथ नाही आणि कधी येणारही नाही...."
मला मात्र हसु फुटल.. हसतच मी म्हणालो....
" ये गौरी, ह्याला बघ चश्मा लागलाय...तु दिसत नाहीस याला.."
अस म्हणत मी तीचा हात आपल्या हाती घेतला तस काळजात चर्रर्रर्रर्रर्र कन झालं ... सर्वांग शहारल...
तीचा हात माझ्या हातात येत नव्हता. ती जवळ होती पन तीला स्पर्श करता येत नव्हता.. तीला स्पर्श करताना माझा हात हवेतच फिरत होता...
"ग.................ग...... गौरी............."
माझे शब्दही आता थरथरत होते...
तसा भाऊ माझ्यावर रागावत जोरात ओरडला.....
"मेली तुझी गौरी...हालहाल करून ठार मारल तीला त्यानी..."
भावाचे शब्द कानावर पडताच अंगावर सर्रर्रर्रर्रर्र कन काटा आला, कोणीतरी गरम गरम वितळलेल शिस कानात ओताव अस वाटल... शरीरातून प्राण निघून गेल्या सारखा मी खालीच बसलो... समोर ऊभ्या गौरी कडे पहाताच माझे डोळे भरून आले, तसे माझ्याकडे पहात तीचेही डोळे पाणावले,
भाऊ आपल डोक दोन्हा हातानी पकडून खाली बसला आणि ढसाढसा रडत मला सांगु लागला...
" तुझ्यावर खुप जिव होता तीचा... पन ती देवदासीची मुलगी म्हणून बाबाना तुमच लग्न होऊ द्यायच नव्हत.".......
हूंदका आवरत भाऊ पुन्हा बोलु लागला..
" तीची दाहवीतूनच शाळा बंद करून गावच्या प्रथेनुसार तीलाही लोकानी जबरदस्ती देवदासी बनवल..खुप रडली..ओरडली... उपाशी राहीली... पन शेवटी नाईलाजान घरोघरी जोगवा मागु लागली.सावकाराच पोरग येता जाता तीची छेड काढायच...'हीला मीच कुस्करणार ' अस चारचौघात ओरडायचा, ती या रोजच्या त्रासाला वैतागली होती. एक दीवस तीन चारचौघातच त्याच्या मुस्काटात हाणली. आणि पुन्हानादाला लागु नको म्हणून दम भरला..."
शांतपने चालत गौरी माझ्या जवळ बसली... आणी डोळ्यातील अश्रु पुसत भाऊ माझ्याकडे पहात पुन्हा बोलु लागला...
" चारचौघात गौरीन केलेल्या या अपमानान सावकाराच पोरग जबर चिडल होत. पावसाळ्याच दिवस होते ते...अशीच एक दिवस शेजारच्या गावातुन ती देवीच्या गाण्याचा कार्यक्रम करुन घरी निघालेली.. वाटेत सावकाराच पोरग आणि त्याचे दोस्त तीची वाटच बघत बसलेले...तीला बघताच तीच तोंड दाबून जबरदस्तीन पळवून नेल... वर डोंगरत त्याच्या शेतात बांधलेल्या पाल्याच्या छप्परात नेऊन सगळ्यांनी तीच्यावर बलात्कार केला..."

भावाचा एक एक शब्द माझ काळीच चिरत होता.. दगडाला डोक टेकुन मी ऐकू लागलो, डोळ्यातुन एकसारख पाणी वहात होत...तीला ही गहीवरून आल होत. माझ्या खांद्यावर आपल डोक टेकवून गौरी शांतपने ऐकत तशीच रडत होती..पुन्हा भाऊ बोलु लागला..
" त्या नराधमाच एवढ्यावर समाधान झालं नाही, तीला त्याच ठिकानी बांधून ठेऊन ते परतले आणि ज्यांच्या समोर तीन सावकाराच्या पोराचा अपमान केला त्या आपल्या मित्रांना पन तीच्यावर बलात्कार करायला सांगितल..."

भावाच बोलण ऐकुन कंठ दाटून यायचा...... "तुझ्या गौरीला जीवंत रहाण्यापुरत खायला द्यायचे रे आणि पुन्हा आपली वासना शमवाचे...कुणालाच तीच्या कोवळ्या मनाशी तीच्या भावनाशी काही घेणदेण नव्हत...ती त्यांच्यापैकी कुणाचीच बहिण, मुलगी नव्हती.. त्यांच्या मते गावातल्या कुत्र्या मांजरालाही तीच्या शरीराचे लचके तोडायचा अधिकार होता... कारण ती 'देवदासी' होती..."
भावाचा एक एक शब्द माझ काळीज फाडत होता...मोठ्यान ओरडाव, रडाव वाटत होत पन आवंढा गिळून पुन्हा ऐकू लागलो...तसाच हूँदका आवरत भाऊ बोलु लागला...
"गौरी गावातून गायब होऊन आठवडा झाला असेल... ती शहरातील एका मुलाबरोबर पळुन गेली अशी अफवा त्याच नराधमानी उठवली.. मला संशय आला तसा एक दिवस त्यांचा पाठलाग करत जंगलात गेलो. त्या जागेवर आधीच तीघे चौघे होते. ... ते तीथून जायची वाट पाहत एका झाडामागे लपुन बसलो. सर्वजण तिथुन परत गेले तसा मी त्या झोपडीत गेलो..आणि समोर द्रुष्य बघुन काळजाच्या चिंधड्या चिंधड्या झाल्यासारख वाटल रे......"
म्हणत त्याला हूंदका आवरण कठिन झाल होत...तो ढसाढसा रडु लागला... माझी ही तीच अवस्था झालेली...स्वताला सावरत भाऊ बोलु लागला..
" एखाद्या उमलचलेल्या फुलासारखी तुझी गौरी निश्तेज, निपचीप पडली होती, पार सुकून गेलेली.. अंगावर कपडे पन नावापुरतेच... तोंडातून किंचीतसा आवाज यायचा... आई......आई........पाणी .......... .....पाणी........ माझी चाहूल लागली तसे हळू हळू डोळे उघडून पाहू लागली... मला बघीतल तस आपल उघड शरीर झाकायचा केवीलवाणा प्रयत्न करु लागली... पन तीला साधा हात ही वर उचलता येत नव्हते... इतक्या यातना सहन करून आता तीच्या डोळ्यातील पाणीही आटल होत...तीच्यापाशी जात बाजुला पडलेल्या कापडाच्या चिंध्यानी तीच थोड शरीर झाकू लागलो... तशी मला म्हणाली,
"संजु कसा आहे रे..."
भावाचे शब्द ऐकताच माझ्या काळजाचा बांध फुटल... ढसढसा रडत मी अश्रुना वाट करून दिली...आपले डोळे पुसत भाऊ सांगु लागला... "मी तीला सोडवणार तोच ते सर्व परत आले... मला ठार मारायची धमकी देत म्हणाले की 'गप गुमान चालाय लागायच हीतन....तुला पन एक बहीन आहे...' हात्यार दाखवून मला तीथून धमकी देऊन घालवल रे.. पुन्हा माझ तिथ जायच धाडस नाही झाल...तुला फोन करून सांगावस वाटल पन काय सांगु, आण कस सांगु... पन मला माहिती आहे एवढ करून त्यांनी गौरीला जीवंत ठेवली नसणार...."
बोलत भाऊ माझ्या जवळ आला
"चल घरी जाऊया."
मी तसाच सुन्न मनाने बसुन होतो..
" निघ तु.... मी नंतर येईन.."
पाणावलेले डोळे पुसत मी त्याला परतायला सांगितल... तो माघारी नीघु लागला तस माझ्या खांद्यावर आपल डोक टेकवून मघापासुन फक्त ऐकणारी गौरी जड आवाजात शांतपणे म्हणाली...
" आठवडाभर माझ्या शरीराच लचक तोडत व्हती, त्यांच्यात एक शेरातला पोरगा बी व्हता त्यान तर माझ लचक तोडायला पैस दिल व्हत... तुझा भाऊ तिथवर पोहोचला तसे ते घाबरले...त्या राती म्या डोळ मिटीन पडुन
आत कण्हत पडलेली.. घसा कोरडा पडलेला थोड पाणी प्यावस वाटल पन जागच हालता येईना की बोलता येईना , पन ते परत आले प्रत्येकान पुन्हा स्वताच्या शरीराची भुक भागवली आणी............ हळु हळू ते माझ्या भवती वाळलेली लाकड रचत आसल्याच जाणीवल... लाकडाचा खच पडला व्हता, मी पुर्ण झाकुन गेले... जिते पणीच ते माझी चिता रचत व्हते.... कुणीतरी गाडीतल पेट्रोल त्या लाकडांवर शिंपडल आणी आग लावली तसा आगीचा भडका उडाला. चर्रर्रर्रर चर्रर्रर्रर करत माझ्या अंगावरची लाकड पेटत व्हती.. .....पर म्या मनापासुन देवाकड एक प्रार्थना केली 'देवा तुज लय उपकार झालत, आज तुला माजी दया आली र...आज तु ह्या नरकातून मला सोडवस पन देवा संजु ला भेटल्याबिगार मला मुक्ति देऊ नग र .'.. आगीच चटक अंगाला बसत व्हत पर जोरात आरडायची पन ताकत माज्यात नव्हती र... कण्हत कण्हतच मी त्या आगीत होरपळुन राख झाले... .त्यांनी मला जीवंतच जाळली आन परतून गावात गेले.. पर जे मरण त्यानी मला दिलं त्यापरास कितीतरी भायन मरणान मी त्यास्नी मारल....."
गौरीच शब्द ऐकले तसे तीला आपल्या मीठीत घेतल, एका देवदासी ची काही राक्षसानी जीवंत होळी केली होती... अश्रु पुसत मी खिशातला चाकू काढून गळ्यावर ठेवला आणि खस्स्स्स्स कन ओढणार तोच गौरी अगदी शांतपणे माझ्या डोळ्यात पहात म्हणाली ...
"तुला ठार मारुन आपल करायच असत तर दोन वेळा त्या पिशाच्चा च्या तावडीतन वाचीवल नसत. मरायला हिम्मत लागत न्हाय, दु:ख पाठीवर टाकुन जगायला हिम्मत लागतीया... तु किडा मुंगीसारख मेलल मला आवडायच न्हाय... एक गौरी मेली म्हणून जग थांबल न्हाय. या देसात आज कितीतरी गौरी देवदाशी बनुन रोज मरत्यात आन मरण भोगत जगत्यात... तुला भेटयलाच जीव तळमळत व्हता... पन आता म्या मुक्त झाले रे.... "
तीच्या बोलण्याने मी स्तब्ध होऊन तीला छातीशी कवटाळले पन...... तीच शरीर हवेसारख तरल झालं होत... ती माझ्या पासुन दूर जात होती... दटलेल्या कंठातुन गौरी म्हाणुन तीला साद घालू लागलो तशी माझ्याकडे पहात म्हणाली...
"या जन्मात नाही रे, पन पुढाचा जन्म तुझ्यासाठीच घेईन. फक्त तुझ्यासाठी..."
तीने आपले दोन्ही हात पसरले, मी जमीनीवर गुडघे टेकुन भरल्या डोळ्यानी हात जोडून पाहु लागलो..
तिची पांढरट आकृति आकाशात विरून गेली, आणी तीच्यासोबत पाहीलेली स्वप्नही . काळीज फाटत होत तीच्या विरहाने, तीच्या जाण्याने.. पन तीचा आत्मा रोज हे सहन करत माझ्या वाटेकडे डोळे लाऊन असायचा... आज तीची प्रतीक्षा संपली आणी मुक्त झाली, मी मात्र त्या रात्री भरलेल्या अंत:करणाने घरी परतलो..

******

आज मी माझ्या शहरातल्या घरी निघालोय... येताना कोणाच्या नाही पन गौरीच्या घरी आठवणीने गेलो... तीची आई घरीच होती.. चुलीसाठी जळण गोळा करत होती...

" निघालास व्हय र संजु...''

" हो... जायला हवं.."

बोलतच मी आईच्या पायावर डोक टेकवल... आणि त्यांचे डोळे पाणावले... आपले दोन्हा हात माझ्यासमोर जुळवून त्या म्हणाल्या..


" संजु र...तु गौरीचा लहानपनापासुनचा जीवलग मैतर हाईस. ती

कुणाचा तरी हात धरून पळून शेरात गेली अस गावातली माणस म्हंत्यात... तुलाबी ठाव हाय माजी गौरी असं न्हाय करनार,,, पर तरीबी माजी गौरी कधी तुला शेरात भेटली तर तीला एवढंच सांग की, तुझी आय तुझ्यावर रागवली न्हाय ... आईच काळीज हाय, तुजी आटवन काढून डोळ भरून येत्याती म्हणाव.."
गौरीच्या आईने कंबरेला खोवलेली एक चुरघळलेली दहा रूपयांची नोट उलगडून माझ्या हाती दीली आणि म्हणाल्या...
" हे पैस माझ्या लेकीला दे... आन .. काळजी घे म्हणाव स्वताची .."
बोलताना त्यांच्या डोळ्यातुन आसवे ओघळू लागली..
" मला ठाव हाय लेकरा ,की जीव गेला तरी माझी लेक परत या गावात पाऊल न्हाय ठेवायची... तीला लय , लय तरास दीला र या गावान..."

बोलताना त्यांच काळीज तुटत होत.. आवंढा गिळत त्या क्षणभर थांबल्या आणि पदराने डोळ्यातील अश्रू पुसत म्हणाल्या

" लय दिसांनी कुणाम्होर तरी मन मोकळं केलं बघ... काय करू... माझ्या मनातन तीचा हासरा चेहरा जाईत न्हाय र ., तीच हासण, बोलन, रागावन, तसच नजरवर येतय र.....'"
यापुढ त्यांच्यासमोर थांबण्याची हिंम्मत होईना
त्या माऊलीच बोलण ऐकुन गहीवरुन आल... डोळ्यातुन पाणी ओघळतच होत.. एक वेळ वाटल की त्यांच्या गळ्यात पडून खुप रडाव.. मन मोकळ कराव..
पन आवंढा गिळला आणि खाली पहातच मान डोलावली.. खडखड आवाज करत s.t. येऊन थांबली... आता त्याांच्या डोळ्यात पहायचची हिम्मत नव्हती.. तसाच S.T. मधे चढलो..

त्या कच्च्या रस्त्यावरून धुळ उडवत एस.टी. धावत होती.... बाजुच्या खडखडणा-या खिडकीतुन दिसणा-या दुर टेकडीवरच्या त्या उंच झाडाखालील दगडावर माझी नजर गेली... माझी गौरी..... जेव्हा मी शहरात जायला निघायचो तेव्हा तिथेच उभी मला पहायची... जाताना हात उंचावुन मुक्यापनेच 'काळजी घे' म्हणुन खुणवायची.....आणी क्षणभर वाटल ती माझ्या जवळ आहे, अजुनही .... आणी एस.टी. मधे रेडिओ वर लावलेल एक सुरेख गाण ऐकु येऊ लागल...

'एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी

आशा, उद्याच्या, डोळ्यांत माझ्या,
फुलतील कोमेजल्यावाचुनी
माझ्या , मनीचे , गूज घ्या जाणूनी .
या वाहणार्‍या गाण्यातुनी
लहरेन मी, बहरेन मी शिशिरातुनी उगवेन मी...

एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी...'

'गौरी'.... जीनं मला प्रेमाचा खरा अर्थ शिकवला , ती गेली पन माझ्या आयुष्यातली तीची पोकळी कायम राहील.. तीचा आत्मा मुक्त झाला असला तरी गौरीसारख्या हजारों मुली 'देवदासी' प्रथेच्या बळी ठरत आहेत...
आज आयुष्याला एक नवी दिशा मिळाली..... गौरीच्या आठवणी मनात साठवुन आता पुढच्या प्रवासाला निघालोय...

समाप्त....