अव्यक्त ( भाग - 3) Komal Mankar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

अव्यक्त ( भाग - 3)


मेंदू लुळा पडावा असचं झालं .... काल रात्रभर झोपेतही विचाराची कालवकालव सुरूच 

होती .. मी तर झोपलेली होती पण झोपतही माझ्या मेंदूत विचाराचं गतीशील चक्रव्यूह भरवेगाने 

फिरतच होतं आणि त्यात मी पिसल्या जाते भरडल्या जाते आहे हे प्रत्यक्षाने मात्र दुसर्या दिवशी उठून 

तोंडावर थंड्या पाण्याचे शिंतोडे मारल्यावर कळलं ...

कसं बस्स त्या प्रश्नाच्या गर्दीतून स्वतः ला दुर सारतं उत्तम कांबळे ह्याचं पुस्तक " आई समजून घेतांना " वाचलं .... 

गॉर्कीची आई कादंबरी साने गुरूजीचे श्यामची आई आणि उत्तम कांबळे लिखित आई समजून 

घेतांना ह्या लेखकांनी नवा इतिहास रचून ठेवलाय बालमनावर तरूणमनावर संस्कार घडवण्यासाठी

पण तो जोपासला कोणी ? कोणीच नाही का ?

प्रश्नाच वलय तयार होतं आणि उत्तर शोधण्याच्या आहारी आपणच गुरफटून जातो ...

काल ते आज अशा दोन दिवसात ती पुस्तक मी वाचून काढली ... वाचतांना किती तरी प्रसंग

डोळ्यासमोरून जातं रडवलं शेवटी ...

ती पुस्तक वाचून कोणी रडला नसेल असा एकही वाचक भेटणार नाही हे मात्र पुरेपुर खरं ...

तरीसुद्धा आई नावाच्या पवित्र नात्यालाच दोषाच काळ फासल्या जाते ... तो दिवस तो प्रसंग 

आणि माणसाची जडणघडण त्या दिवशी झोपू देत नव्हती मला ... विकृताची शोक कथा 

मन हेलावून घेत होती प्रत्यक्षाने जानवू लागलं मुली बलात्कारला बळी का पडतात ?? आणि ... आणि

बरचं काही !

तो दिवस तुमच्या कल्पनाशक्तीला भेदत सुटू नये म्हणून मी जसाचा तसा दाखल करते 

खबरदारी काय घ्यायची ते तुम्ही ठरवा मी निसटता निसटता शेवटी थांबा घेतला ....

मैत्रीणीला लास्टइअरला अँडमिश्न घ्यायचं होतं म्हणून मला म्हणाली चलते का सोबत ? 

फार काही विचार न करता मी ही हो म्हणून दिलं तिला ... माझं इंडियन पॉलिटी चार पाच बुक्सटॉल 

धुडाळत मिळालं म्हणून धन्य ते बुकस्टॉल म्हणतं आमची पाऊलं कॉलेजच्या दिशेने झेपावली ...

कॉलेज मध्ये जाते तर बाहेर गेटवर चेअर टाकून बसलेले सेक्युरिटी गार्ड म्हणतात ,

" अॉफीस मध्ये कोणीच नाही आहे सर आज सुट्टीवर गेले काम काय आहे ? "

तिने सांगितलं लास्ट इअरला अँडमिश्न घ्यायचं आहे . सर कधी येतील आता ? तर त्यांनी त्यांच्या

अॉफिसच्या टेबलाकडे इशारा केला . बोटाने खुणावतच ते म्हणाले तिथे त्या सरांचा नंबर आहे

त्यावर 

कॉल करून लास्टडेट विचारुन घे आणि कॉलेज फी पण ....

एवढचं विचारायचं म्हणून तिने कॉल केला .. विचारू लागली तर तिला जे सांगायचं ते न सांगता 

भलतचं विचित्र बोलणं लावलं त्यांनी ... ते सर तिला म्हणाले, " मी तुझं काम करील अँडमिशन फॉर्म

भरून ठेवील तू माझं काम करशील का ?? " तिला त्याचं बोलण जरा विचित्रच वाटलं .... तो तिनदा

तिला माझं काम करशील का म्हणून गळ घालू लागला ... 

ती : सर कोणतं काम ते तर सांगा आधी .

तो : आधी करशील म्हणून प्रोमिस कर .

ती : सर तुम्ही विहीरत ढकलण्याचा विचारात आहात का मला ?

तो : तू समजते तेवढा characterless नाही आहो मी ....

फोन जरा काणाच्या खाली घेत ...

ती : तू कसा आहे हे माहिती आहेन डुकरा 

त्याला ऐकायला गेलं असावं ...

तो : काय म्हटलं ?

ती : काही नाही सर , अॉफीस मध्ये कधी राहणार तुम्ही सांगा मला बाहेर गाववरून ट्रेनने यावं लागतं ,

अँडमिश्न करायची आहे ...

तो : हो पण माझं काम करा लागेल आधी प्रोमिस कर हो म्हणून .....

तिने रिसिव्हर काटलाच ...

त्या नंतरही त्याने चारदा तिला कॉल केलेच केले ... 

ती नंतर मला सांगू लागली खुप निच प्रवृतिचा हा माणूस आहे ... तिचीच एक मैत्रीण आहे

तिच्याकडे

ह्यांनी शरीरसुखाची मागणी करत तिला भेटायला बोलवलं होतं म्हणे ....

मी म्हटलं बापरे !

कॉलेजच्या गेट बाहेर पडताना ती म्हणाली , " काय खाऊन पैदा केलं होतं ह्याच्या आईनं

ह्याला ...अस्स

डुकर निपजलं ..."

मी तिला म्हटलं अरे त्याच्या आईला का दोष देते ? तेव्हा ती म्हणाली ,

" अगं मुलांना चांगले संस्कार तर द्यायचे बघं ना मुलीकडे बघण्याचा दृष्टिकोण किती बद्दलत

चालला 

आणि आपल्याला त्यांचा वागणुकीचा किती त्रास होतो ...."

आता तिचं वाक्य छळतं मेंदूत विचाराचं थैमाण घालतं गोर्की आणि श्यामची आई डोळ्यापुढे येत 

माझ्या आईचे बोललेले शब्द आठवतात मला " मुलांना कोणतीच आई वाईट संस्कार नसते देत गं ती सांगेल का 

मुलीसोबत वाईट वागायला ते वयच तसं असतं शिवाय मित्र संगत ....."

हे आईने बोललेल वाक्य कितपत शक्य आहे मला नाही सांगता येणार पण ,

झपाट्याने समोर वाढत चाललेल्या प्रदिर्घ लोकसंख्येत गटारात वळवळणारी गलिच्छ किडे 

जन्माला येऊ लागली ... मुलीचं कसं होईल ह्या अशा जालीम दुनियेत स्वतः ची इज्जत अब्रु आणि 

मुठीत जीव कोंडून घेत कशी जगेल ती ह्या दुनियेत हाच मला सातत्याने सतावणारा प्रश्न 

कधी कधी झोपेतून जागा करतो ...

मुलीकडे बघण्याचा दृष्टिकोण .... एक भोगवस्तू म्हणून !

खांद्यावरची ओढणी सरकली म्हणजे ह्याच्यातील राक्षस जागला तिला भस्म करायला ...

ह्याच्या उत्तेजनेला आमंत्रण ती .... 

कॉलेज मध्ये शिक्षक नावाला कंलक ठरलेले हे सुरक्षितच असतात ... ती घरातून कॉलेज मध्ये

शिक्षणासाठी बाहेर पडली 

तरी असुरक्षितचं .... 

एक त्या दिवशी मैत्रीणीला फुकटचा सल्ला देऊन बघितला .... आता त्या नालायकाचा फोन

आला 

आणि परत तसं काही विचित्र बोलू लागला की सरळ कॉल रेकॉर्डला टाकायचा आणि पोलिसाच्या 

टेबलावर नेऊन आपटायचं .....

मुली कितीही त्यांच्या जागी चरित्र्यवान हुशार आईबाबाचा विचार करणार्या असल्या तरी 

पुरुषांच्या नजरेत त्यांची वैचारीक पात्रता कधीच खुपत नाही तर कामुकता दिसते तिच्यात ...

नजरेतली घाण दिसत नाही स्वत: च्या ... एकटी स्त्री परक्या एखाद्या स्त्री जवळ जेवढी सुरक्षित 

राहू शकते तेवढी ती सख्ख्या पुरूष असलेल्या नात्याच्या छत्रात सुरक्षित नसते ... आणि हीच विकृती

आता 

माणसाची प्रवृति झाली .... ही शोकांतिका ! 

स्त्री जन्म एवढा सोपा नसतो ......