Love After Breakup - Part - 1 books and stories free download online pdf in Marathi

ब्रेकअप नंतरच प्रेम - Part - 1

ब्रेकअप नंतरच प्रेम - Part - 1

पुण्यामधील कॉलेजचे त्यांचे ते शेवटचे वर्ष होते म्हणून कॉजेज मधील वेगवेगळ्या शहरातून शिकण्यासाठी पुण्यामध्ये एकत्र आलेल्या मुला-मुलींचा एक ग्रुप महाबळेश्वरला पिकनिकसाठी गेलेला असतो.. साधारण २०-२५ मुला मुलींचा ग्रुप आणि त्या ग्रुपमध्ये काहींचे कॉलेजमध्येच एकमेकांशी सुत जुळलेले असते.. त्या जोड्यांमधीलच एक जोडी म्हणजे प्रीती आणि आर्यन. कॉलेजच्या पहिल्या दिवशीच आर्यन प्रीतीचे प्रेमात पडलेला असतो आणि प्रीतीलाही तो आवडत असतोच.. त्याच कॉलेजचे पहिल्या वर्षातच व्हॅलेंटाईन डे ला आर्यन प्रीतीला प्रपोझ करतो आणि आर्यन प्रीतीच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झालेले असते. दोघांची जोडी कॉलेजवर खूपच फेमस झालेली असते. दोघेही दिसायला खूप सुंदर, आकर्षक आणि एकमेकांना अनुरूप असेच असतात. महाबळेश्वरचे त्या पिकनिकमध्ये ज्या चार-पाच लव्हर्सच्या जोड्या आणि बाकीचे सिंगल्सचा ग्रुप वेगळं वेगळंच फिरत होते.

डिसेंबर मधील हिवाळ्याचे ते दिवस आणि त्या दिवसातील ती महाबळेश्वरची पिकनिक. अंगावर शहारे आणणारा थंड गार वारा, वर लपेटलेले धुक्याचे हलकसं पांघरून आणि सकाळचे त्या कोवळे सोनेरी किरणात दवबिंदूंनी आच्छादलेली चमचमणारी वृक्षांची ती हिरवीगार पाने आशा गुलाबी वातावरणात हाताची पाची बोटे एकमेकांचे अलगद गुंतवून हात हातात घट्ट पकडून फिरणारी ती प्रेमी युगल. सगळेच वातावरण असे गुलाबी गुलाबी झालेलं आणि सर्वजण खूप खुश होते. सर्वानाच ते अनमोल क्षण आयुष्यभरासाठी आपल्या कॅमेरात कैद करून आयुष्यभर जपायचे होते. प्रीती आणि आर्यनही तेच करत होते त्यांचे ते एकमेकांसोबतचे अनमोल क्षण त्यांचे मोबाईलच्या सेल्फी कॅमेऱ्यामध्ये टिपण्यात गुंग झाले होते.

या गुलाबी क्षणी

दे हात हाती तुझा..

रंगू दे प्रेम रंगी

क्षण हा माझा तुझा..

प्रीती आणि आर्यन तर पिकनिकला आलेपासून अगदी पहाटे पासून दोघेच मनमुराद भटकत होते त्या गुलाबी वातावरणात एकमेकांचा हात हातात घेऊन. खूप दिवसांनी त्यांना असा निवांत एकांत लाभला होता. हिच संधी होती त्यांना एकमेकांबद्दल अजून जाणून घेण्याची आणि एकमेकांना समजून घेण्याची. ग्रुपमधील सर्वजण मस्त गार गार थंडीत भटकत, मजा करत पिकनिकचा आनंद घेत असतात. नंतर दुपारी पुन्हा सगळे मित्र-मैत्रिणी जेवणासाठी एकत्र भेटतात हॉटेलवर. मग दुपारचे जेवण झालेवर सगळेजण नाच, गाणी, दंगा मस्ती आणि गप्पांमध्ये हरवून जातात. पण प्रीती आणि आर्यन मात्र पुन्हा एकमेकांचे हात हातात पकडून त्यांचे त्या गुलाबी क्षणात भटकायला गेलेले असतात. त्याच दिवशी आर्यन प्रीतीला कॉलेज पूर्ण झाले की आपण घरच्यांशी बोलून लगेचच लग्न करू असे सांगतो. प्रीतीला आर्यनचे ते बोलणे ऐकून खूप आनंद होतो आणि त्या आनंदात दोघेही एकमेकांचे डोळ्यात हरवून इतके जवळ येतात की क्षणातच त्यांचे ओठ पहिल्यांदाच त्यांच्या पहिल्यावहिल्या चुंबनात गोड गुलाबी रंगात रंगुनी जातात...

तुझ्या ओठांची लाली

माझ्या ओठांना रंगवू दे..

माझ्या ओठांच्या पाकळ्या

तुझ्या ओठांवर बरसू दे..

इकडे हॉटेलवर सर्व मित्र मैत्रीण संध्याकाळचे चहासाठी प्रीती आणि आर्यनची वाट पहात बसलेले असतात. बराच वेळ झाला तरी ते न आल्याने ते आर्यनचे मोबाईल वर फोन करतात आणि त्या फोन चे आवाजाने त्या दोघांचे एकमेकांत गुंतलेल्या ओठांच्या पाकळ्या एकमेकांचा निरोप घेतात व ते दोघे हॉटेलवर मित्र मैत्रिणीनं सोबत चहा घ्यायला जायला निघतात. हॉटेलवर त्यांचे मित्र मैत्रिणीत त्यांचेच लव्ह स्टोरीची चर्चा चालू असते कारण पिकनिकला आल्या पासून सर्व पहात असतात पिकनिकला आल्यापासून ते दोघे लव्हर्स ग्रुपमध्ये मिक्स न होता एकटेच फिरत असतात. चहा नंतर काही वेळातच सर्वजण फ्रेश होऊन रात्रीचे जेवणासाठी हॉटेलचे डायनिंग विभागात जमतात. तिथे सगळे मित्र मैत्रिणी मिळून प्रीती आणि आर्यनला एकमेकांचे नावावरून चिडवून चेष्टा मस्करी करू लागतात. आर्यन आणि प्रीतीला देखील एकमेकांचे नावाने चिडवून घेण्यास आता मजा येत असते. त्या मित्र मैत्रिणींचे मैफिलीतही त्यांचे डोळ्यांनी एकमेकांना खाणा-खुणा करणे तिकडे चालूच असते. रात्री बराच वेळ त्यांचे गप्पा रंगलेल्या असतात. मग साधारणतः रात्रीचे ११:४५ ते १२:०० वाजण्याचे दरम्यान ते सगळे आपापल्या रूममध्ये झोपण्यासाठी जातात..

प्रीती आणि आर्यन ही त्यांचे त्यांचे रूम मध्ये जातात त्या दोघांचीही रूम अगदी शेजारी शेजारीच असते. रात्री त्या दोघांनाही झोपच येत नसते दोघांच्याही नजरे समोर सारखं सारखं ते आजचे त्यांनी व्यथित केलेले गुलाबी क्षण येत असतात.. त्या गोड गुलाबी थंडीतील त्यांचे ओठांनी घेतलेलं ते पहिलेवहिले चुंबन, त्या प्रेमळ आठवणीत प्रीती रमलेली असते इतक्यात तिचे मोबाइलवर एक मेसेज येतो.. "miss you dear.." पहाते तर तो मेसेज आर्यनने पाठवलेला असतो ती त्याला "miss you too dear.." असा रिप्लाय देते आणि लगेचच त्याचा दुसरा मेसेज येतो.. "dear may i come there.. i want to talk with you.." तो मेसेज प्रीती वाचते न वाचते तोच तिचे रूम दरवाजा कोण तर ठोठावते. प्रीती त्याचा मेसेज वाचत वाचत उठून दरवाजा उघडते आणि पहाते तर बाहेर आर्यन उभा असतो व त्याचे हातात एक बॉक्स असतो. आर्यन प्रीतीचे रूममध्ये जातो आणि तिचे हातात तो बॉक्स ठेवतो. तो बॉक्स पाहून प्रीती आर्यनला विचारते "अरे काय आहे रे या बॉक्स मध्ये??" आर्यन तिला बोलतो "माझ्याकडून एक खास गिफ्ट तुझ्यासाठी.." प्रीती तो बॉक्स उघडून पहाते तर त्यामध्ये आर्यनने प्रीती साठी एक गुलाबी रंगाचा ड्रेस तिला गिफ्ट आणलेला असतो. आर्यन प्रीतीला तो ड्रेस घालण्यास सांगतो आणि मग प्रीती त्याने गिफ्ट दिलेला तो गुलाबी रंगाचा नाईट ड्रेस घालून त्याचे समोर येते..

ती जशी तो नाईट ड्रेस घालून त्याचे समोर येते आर्यन तिचे सौदर्यात स्वतःला हरवूनच जातो .. तिचे मोकळे सोडलेले ते काळेभोर लांब केस, त्यातून चेहऱ्यावर रेंगाळणारी एक केसांची बट खिडकीतील थंडगार मंद वाऱ्याच्या झोक्याने तिचे नाजूक ओठांचे गुलाब पाकळीत अधून मधून अडकत होती.. तिचे डोळे आर्यनकडे हळूच चोरून चोरून पाहत होते.. रात्रीचे गुलाबी थंडीत त्या गुलाबी नाईट ड्रेसमध्ये चंद्र प्रकाशाचे मंद प्रकाशात तिचे ते रूप आणखीनच खुलून दिसत होते.. आपल्या कोमल हातांनी तो थोडासा काहीसा अखूडसा असणारा नाईट ड्रेस खाली ओढत ओढत आपले गोरेपान पाय झाकण्याचा प्रयत्न करीत ती लाजत लाजत त्याचे समोर येऊन उभी राहते..

प्रीतीच्या त्या मनमोहक रूपामध्ये आर्यन स्वतःला हरवून जातो.. "अरे हॅलो.. आर्यन.. अरे तुझाशी बोलती आहे मी.. काय रे.. काय पहातो आहेस असे माझेकडे तू... सांग ना कशी दिसते मी?.. अरे सांग ना.." त्याचे समोर उभी असलेली प्रीती त्याला विचारते. आर्यन आपले हाताचे बोट प्रीतीचे बोलणारे तिचे गुलाब कळी सारखे नाजूक ओठांवर ठेवतो आणि त्याच्या बोटांनी प्रीतीचे ओठांना केलेला तो स्पर्श प्रीतीला त्याचे मिठीत घेऊन जातो. आर्यन आणि प्रीती एकमेकांना घट्ट मिठी मारतात आणि काही क्षणाच्या दुराव्या नंतर पुन्हा त्यांच्या ओठांचं एका दीर्घ चुंबनात मिलन होते. हॉटेलच्या त्या रूम मध्ये गुलाबी थंडीत दोघांचेही शरीर एकमेकांच्या हातांचे साखळीत घट्ट बिलगलेल असते. मग दोघेही एकमेकांचे बाहुपाशात स्वतःला एकमेकांच्या स्वाधीन करत एकमेकांना सावरत सावरत हॉटेलच्या त्या रूम मधील बेडबर गुलाबी थंडीत एकमेकांचे प्रेम रंगात अक्षरशः रंगून जातात..

हि गोड गुलाबी थंडी

तुझी उबदार मिठी..

सावरू कसे स्वतःला मी

ओठांची अबोल मिठी..

हरवुनी आज स्वतःला

प्रेम रंगी रंगू दे तुझ्या मिठी..

दुसरे दिवशी पुन्हा सगळे मित्र मैत्रिणी सकाळी चहा घेण्यासाठी एकत्र जमतात आणि चहा घेत घेत सगळेजण मिळून तेथून हॉटेलचे जवळच असणाऱ्या एका तलावात बोटिंगसाठी जायचं ठरवतात. ते सर्व आवरून मग ठरल्याप्रमाणे त्या तलावाजवळ बोटींगचे इथे पोहोचतात.

क्रमशः - भाग २

- विशाल पाटील, कोल्हापूर

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED