Love After Breakup - Part 8 books and stories free download online pdf in Marathi

ब्रेकअप नंतरच प्रेम - Part - 8

क्रमशः

रात बाकी, बात बाकी

होना है जो.. हो जाने दो..

सोचो ना.. देखो तो..

देखो हाँ.. जाने-जां..

मुझे प्यार से..

प्रीती मोबाईल वरील लागलेले नमक हलाल या फिल्म मधील हे रोमँटिक गाणे ऐकतच आपल्या अंगाभोवती लपेटलेली ती शाल खाली पडलेमुळे तिने ते लाईटचे बटन लावण्यासाठी वर केलेला हात ते लाईटचे बटन न चालू करताच ती खाली घेते आणि अचानक तिचे लक्ष समोर जाते. समोर पाहिलेवर तिचे डोळ्यासमोर पुन्हा त्या रूममध्ये आर्यन सोबत व्यथित केलेल्या त्या गोड गुलाबी आठवणींचा झरा वाहू लागतो आणि त्या मंद वाहणाऱ्या आठवणींच्या झऱ्यात तिचे मन तिला पुन्हा भिजवू पहात होते. तिचे डोळे बराच वेळ ते समोर दिसणारे मनमोहक रूप न्याहरीत होते. त्या रूमचे खिडकीतून वाहणारा तो थंडगार वारा, खिडकीतून हळूच डोकावणारा मंद चंद्र प्रकाश आणि त्या मंद चंद्रप्रकाशात प्रीतीला समोरील भिंतीवर असणाऱ्या आरश्यात दिसलेले स्वतःचेच त्या गुलाबी नाईट ड्रेस मधील ते मनमोहक प्रतिबिंब.. ते आरश्यातील स्वतःचेच प्रतिबिबं पाहण्यातच प्रीती स्वतःला हरवून जाते आणि ती संपूर्ण रात्र प्रीती त्या रूम नं ५०२ मधील बेडवरच त्या गोड गुलाबी थंडीत त्या रात्रीच्या गुलाबी आठवणींच्या रोमँटिक वातावरणातच घालवते.

प्रेमाच्या झऱ्यात

आठवणींच्या डोहात

पुन्हा चिंब भिजू दे ..

तुझ्या प्रेम रंगात

गुलाबी त्या प्रेम वर्षांत

पुन्हा आज रंगू दे ..

प्रीतीला तिच्या आठवणींच्या गोड गुलाबी स्वप्नातून जाग येते ती सकाळीच.. जाग आलेवर तिला समजते की, आपलेला रात्री याच रूम नं ५०२ मध्ये झोप लागली. हे समजताच ती त्या रूम नं ५०२ मधील बेड वरून पटकन उठते आणि बेडचे बाजूलाच पडलेली तिची शाल अंगा भोवती लपेटून त्या रूमचे दार उघडून शेजारच्या म्हणजेच त्यांनी बुक केलेल्या रूम नं ५०१ मध्ये जात असते तोच रूमचा दरवाजा उघडल्या उघडल्या तिचे समोर त्या हॉटेलचा एक कर्मचारी तिला त्या रूम नं ५०२ मधून बाहेर पडताना पाहतो. प्रीती त्या हॉटेलचे कर्मचाऱ्याला अचानक असे समोर पाहून गोंधळते आणि "सॉरी हा.. मी तुमची परवानगी न घेताच रात्री या रूममध्ये झोपली.. रूम मोकळीच होती आणि गाणी ऐकत बसल्या बसल्या मला या रूममध्ये कधी झोप लागली काहीच नाही कळले.. आय एम सॉरी.." असे ती त्या हॉटेलचे कर्मचाऱ्याला बोलते. यावर तो कर्मचारी "इट्स ओके मॅडम.. काहीच प्रॉब्लेम नाही.. आहो ती रूम ३ दिवसांसाठी आरक्षित होती पण त्या रूममधील सरांना काल सकाळी अचानक काहीतरी महत्वाचे काम निघालेमुळे त्यांना अर्जंट जावं लागले.. तुम्हाला तुमचे रूम नं ५०१ मध्ये अडचण होत असेल तर तुम्ही हवे तर आजचा दिवस हि रूम नं ५०२ वापरू शकता.. काहीच प्रॉब्लेम नाही." असे बोलून तो निघून जातो आणि प्रीतीही आपल्या रूममध्ये निघून जाते. नंतर आवरून मग ठरल्याप्रमाणे २७ डिसेंबरला प्रीती आणि तिची फॅमिली बोटींग करण्यासाठी महाबळेश्वर मधील तलावावर जातात. तिथे गेलेवर प्रीतीची बोटींगला जाण्याची इच्छाच होत नाही कारण तिकडेही आर्यनसोबाचे त्या गोड आठवणी तिचा पिच्छा सोडतच नाहीत. मग प्रीती आपल्या मुलीला प्रतिक्षाला घेऊन बाजूलाच थांबते आणि तिचे आई बाबा बोटींगची सफर करून येतात. बोटींगनंतर दुपारचे जेवण करून हॉटेलवर आलेवर ते सगळे पुन्हा साताऱ्याला परतीचे प्रवासाला निघण्याचे तयारीला लागतात.

इकडे आर्यन २६ तारखेला मुंबईत पोहोचलेवर घाई घाईत आपल्या ड्रायव्हरला "अरे चल लवकर.. लगेच मला एअरपोर्टवर सोड.. मला दिल्लीला जायचं आहे.. सकाळीच आईचा दिल्ली वरून फोन आला होता.. बाबांची तब्येत अचानक बिघडली आहे.. मला लवकर पोहोचायला हवे दिल्लीला.. चल चल लवकर.. आणि हो इकडे येण्याच्या गडबडीत माझी कार वाटेत एका कारला थोडीशी घासली होती उजव्या बाजूला.. मी दिल्लीला गेलेवर ती नीट करून घे तेवढी.." असे बोलून दुपारचे फ्लाईटने आपल्या बाबांना पाहण्यासाठी मुंबईहुन आर्यन दिल्लीला निघून जातो. पण आर्यनला इतके घाई गडबडीत दिल्लीत पोहचून सुध्दा अखेर यायला उशीरच होतो.. आर्यन दिल्लीला पोहोचण्या आधीच त्याचे पितृछत्र हरविलेले असते. आर्यांच्या बाबांना जोरदार हार्ट अटॅक आल्यामुळे काही तासातच आपला जीव गमवावा लागला होता. आर्यनला समोर पाहून आर्यनचे आईच्या आश्रुंचा बांध फुटतो आणि ती आर्यनचे खांद्यावर डोके ठेवून रडू लागते. आर्यनला अजूनही विश्वास बसत नसतो की आपले बाबा गेले..

आयुष्याला वाट दिलीत

पावलो-पावली साथ दिलीत

सुख दुखांच्या वाट्या मध्ये

दुःखाची बाजू नेहमीच उचललीत

अपार कष्ट करुनी तुम्ही

नेहमीच सुखाचा वर्षाव केलात

आता वेळ माझी होती

कष्ट करण्याची,

दुःखाचा वाटा उचलण्याची

पण आता ही,

तुम्ही मला हरवलात

सर्व दुःखाचा, कष्टाचा वाटा उचलुनी

मला पोरकं करून गेलात..

मला पोरकं करून गेलात..

बाबांना गमावल्यामुळे आर्यन तर पूर्णच खचून जातो. पण तो स्वतःचे दुःख गिळून आईला आधार देण्याचा प्रयत्न करीत असतो. बाबा गेल्याचे दुःखामध्ये आर्यनचे आईचीही तब्येत खूप खालावलेली असते. आपले पती गेल्याचा तो धक्का त्यांना सहन नसतो झालेला. त्याला जबाबदारीचे पदावरील जॉबमुळे फार दिवस दिल्लीला राहणे शक्य नसते मग आर्यन आपलेसोबत आपल्या आईला देखील कायमचेच मुंबईत राहायला घेऊन येतो.

पहिल्या प्रेमाला उजाळा देणारी ती महाबळेश्वरची पिकनिक झालेवर प्रीती देखील स्वतःशी दर वर्षी २५ डिसेंबरला महाबळेश्वर मधील त्या हॉटेलला जाण्याचा संकल्प करते. पिकनिक वरून आलेवर प्रीतीचे आता एकच ध्येय असते ते म्हणजे कॉलेजची शेवटचे वर्षाची परीक्षा पास होऊन स्पर्धा परीक्षेचे तयारीला लागणे. प्रीतीची परीक्षा आता तीनच महिन्यांवर आलेली असते त्यामुळे ती तिचे कॉलेजचे परीक्षेचे अभ्यासाला लागते. आपल्या मुलीला प्रतिक्षाला सांभाळत वेळ मिळेल तसा ती तिचा अभ्यास पूर्ण करत असते. प्रीतीचे बाबांची नोकरीही आता फक्त एक वर्षच शिल्लक राहिलेली असते आणि तिचे बाबा रिटायर्ड होण्या अगोदरच तिला आपले शिक्षण पूर्ण करून स्पर्धा परीक्षेचे तयारीला लागायचे असते.

आर्यन बाबांना असे अचानक गमावल्यामुळे खूपच खचून गेलेला असतो. त्याचे कोणत्याच गोष्टीत मन लागत नसते. तो खूपदा एकटाच त्याचे खोलीत रात्र रात्र जागून काढीत असे कोणाशी काहीच बोलत नसे.. काय करावं पुढे त्याला काहीच सुचत नसते. बाबांना गमावल्यामुळे त्याची आई देखील खूप खचून गेलेली आणि त्यामुळे त्याचे आईचेही वरचेवर तब्येतीचे प्रॉब्लेम्स चालू होतात, सारखं औषध पाणी चालूच असते. तब्येत साथ देत नसलेमुळे आई देखील सारखी लग्नासाठी आर्यनचे मागे लागली होती. आशा परिस्थितीत काय करावं त्याला काहीच सुचत नसते. असेच एका रात्री दुःखाच्या छायेत, बाबांच्या जुन्या आठवणी आठवून आपल्या खोलीत रडत बसलेल्या आर्यनला सोबत मिळते ती त्याच्या डायरीची.. आपली सारी दुःख, स्वप्न, भावना मग तो आपल्या डायरीत शब्दात उतारू लागतो आणि आपले दुःख विसरण्यासाठी तो मग शब्दांशी मैत्री करतो व त्या रात्री तो आपल्या डायरीत आपली पहिली वहिली कविता लिहितो ती पण आपल्या बाबांच्या आठवणीतच..

"माझे बाबा.."


हात तुमचा हातात पुन्हा

तुम्ही द्याल ना ओ मला..

अजून थोडसं चालायला

तुम्ही पुन्हा शिकवाल ना ओ मला..

रडलेवर कडेवर उचलून

तुम्ही पुन्हा घ्याल ना ओ मला..

संध्याकाळी चौपाटीवर फिरायला

तुम्ही न्याल ना ओ मला..

उंचच उंच झोके झुलवर

पुन्हा द्याल ना ओ मला..

बागेतील भेलपुरी खायला

तुम्ही आणाल ना ओ मला..

सायकलवरची फेरी रोज

तुम्ही माराल ना ओ मला..

गाडीवरून शाळेत सोडायला

परत तुम्ही याल ना ओ मला..

अभ्यास नाही केला तर

पाठीवर फटके तुम्ही द्याल ना ओ मला..

रुसलेवर पुन्हा मायेचा हात

पाठीवरून तुम्ही फिरवाल ना ओ मला..

कॉलेजे साठी नवीन कपडे

नवीन गाडी तुम्ही द्याल ना ओ मला..

तुमची प्रेमाची सावली

आज पुन्हा तुम्ही द्याल ना ओ मला..

तुमची मायेची हाक पुन्हा

ऐकायला मिळेल ना ओ मला..

माझे पप्पा मला परत

बप्पा तुम्ही द्याल ना ओ मला..

- शब्दप्रेमी..

क्रमशः भाग ९

- विशाल पाटील, "Vishu.." कोल्हापूर

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED