Love After Breakup - Part 2 books and stories free download online pdf in Marathi

ब्रेकअप नंतरच प्रेम - Part - 2

ब्रेकअप नंतरच प्रेम - PART - 2

क्रमशः

इथे परत पुन्हा तेच होते त्यांचे ग्रुपमधील असणारे लव्हर्स आपल्या आपल्या जोडीदार सोबत बोटिंगसाठी जातात आणि बाकी सगळे सिंगल्सचा ग्रुप एकत्र जातो. आर्यन आणि प्रीतीही त्यांचे ते दोघेच एका छोट्या बोटीतून फिरण्यासाठी जातात. बोटीत बसलेवर प्रीती आर्यनला बोलते "आर्यन.. काल रात्री.. काल रात्री.. आपण फारच जवळ आलोत एकमेकांच्या.. कालचा दिवस मी कधीच नाही विसरणार आयुष्यात.. माझेसाठी हे सारे क्षण खूप खास आहेत.. मी आयुष्भर जपून ठेवेन या आपल्या गोड आठवणी.. ये आर्यन आपण लग्न झाले की हानीमुन पुन्हा इकडेच येऊयात का?.. ये रे सांग ना.. बोल ना.. आपण खरचं कॉलेजची परीक्षा झालेवर लगेचच लग्न करायचं ना घरच्यांशी बोलून.. तू बोललास का तुझे आई बाबांशी आपल्या प्रेमाबद्दल?" आर्यन तिचा हात हातात घेतो आणि बोलतो "हो डिअर नक्की.. मलाही आवडेल लग्नानंतर पुन्हा इकडे तुझ्यासोबत फिरायला यायला.. नक्की येऊ आणि अगं मी तुला कालच सांगितले होते ना.. आपली परीक्षा झाली की लगेचच मी घरी मुंबईला जाऊन माझे घरच्यांशी बोलणार आहे आपले प्रेमाबद्दल आणि आपल्या लग्नाबद्दल." मग प्रीती आपले डोके आर्यनचे खांद्यावर ठेवून त्याचा हात हातात घेऊन बोटिंगचा आनंद घेते. बोटिंग वरून आलेनंतर सगळेजण फ्रेश होऊन संध्याकाळी हॉटेलचे आवारात क्रिकेट खेळतात आणि रात्रीच्या जेवणानंतर सगळे थोडा वेळ शतपावली करून आपापल्या रूममध्ये जाऊन उद्या सकाळी पुन्हा रिटर्न पुण्याला निघण्यासाठी त्याचे साहित्य पॅकिंग करायला सुरवात करतात..

तुझ्या प्रेमाचा सुगंध

दरवळतो आस-पासच..

तुझ्या गोड आठवणीही

अजूनही सुखावतात मनाला..

प्रीती आणि आर्यन दोघेही एकमेकांना गुड नाईट बोलून त्यांचे त्यांचे रूममध्ये बॅग भरण्यासाठी जातात.. बॅग भरताना प्रीतीचे हातात तो काल रात्री तिने घातलेला आर्यनने तिला गिफ्ट दिलेला गुलाबी नाईट ड्रेस येतो आणि तो पाहून पुन्हा तिचे डोळ्यासमोर त्या रात्रीचे गोड आठवणी येतात.. ती तो गुलाबी रंगाचा नाईट ड्रेस आपल्या अंगाशी घट्ट लपेटून घेते तिचे बेडवर आडवी होते.. गुलाबी थंडीतील त्याचे सोबतची ती गुलाबी रात्र, त्या रात्रीत एकत्र घालवलेला तो खास क्षण सगळेच खूप खास होते तिच्यासाठी.. त्या रात्री त्या दोघांचेही मनात त्यांनी एकत्र व्यथित केल्या त्या गोड आठवणी रेंगाळत असतात. दोघांनाही झोप लागत नसते शेवटी न रहावलेने प्रीती आर्यनला मेसेज पाठवते.. "miss you dear.." आणि लगेचच त्याचा तिचे मेसेजला रिप्लाय येतो "miss you too dear.." असे त्यांचे रात्रभर एकमेकांशी चॅटिंग करणे चालूच असते.

दुसरे दिवशी सकाळी महाबळेश्वरचा निरोप घेण्याची वेळ येते.. सकाळी लवकर सर्वजण आवरून परतीच्या प्रवासाला सुरवात करण्याआधी महाबळेश्वरच्या त्या हॉटेलमध्ये चहा घेण्यासाठी एकत्र जमतात. चहा व नाश्ता करून सर्वजण मिळून एक ग्रुप फोटो घेऊन त्या पिकनिकच्या आठवणी त्यांचे कॅमेरात क्लीक करून ते पुण्याला निघण्यासाठी त्यांचे पिकनिकचे बसमध्ये जाऊन बसतात. परतीच्या त्या प्रवासातही प्रीती आणि आर्यनची हातांची बोटे एकमेकांना घट्ट आलिंगन देऊनच बसलेली होती. दोघेही परतीचे प्रवासाचा तो वेळ फक्त एकमेकांसोबतच घालवितात. ते त्यांचे त्या गुलाबी थंडीतील गुलाबी प्रेमाचे गुलाबी आठवणींबद्दलच एकमेकांशी गप्पा मारण्यात हरविलेले असतात. नंतर काही तासातच त्यांची पिकनिकची बस पुण्यामध्ये येऊन पोहचते व प्रीती आणि आर्यनसह त्यांचे सर्वच मित्र-मैत्रिणी एकमेकांचा निरोप घेऊन आपापल्या हॉस्टेल रूमवर जातात. दुसरे दिवशी पासून पुन्हा त्या सर्वांचेच कॉलेज आणि क्लासचे नेहमीचे रुटीन चालू होते. कॉलेजचे पहिले काही दिवस तर कॉलेजमध्ये सर्वत्र त्यांचे महाबळेश्वरचे पिकनिकचीच चर्चा सुरु होती आणि त्या पिकनिकमधील लव्हर्स प्रीती व आर्यनची. पुन्हा कॉलेज जॉईन केलेनंतर प्रीती आणि आर्यन मात्र आता कॉलेजचे लेक्चरला कमीच आणि कॅन्टीनमध्येच सर्वांना जास्त दिसू लागले होते. पाहता पाहता जानेवारी महिना देखील संपतो. त्या सर्वांची कॉलेजच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा मार्च मध्ये असते आणि परीक्षेला आता फक्त एकच महिना शिल्लक राहिलेला असतो त्या सर्वांना अभ्यासासाठी.

"आर्यन.. अरे डिअर.. ऐक ना रे.. हे बघ आता फक्त एकच महिना उरला आहे आपल्या कॉलेजचे शेवटचे वर्षाचे परीक्षेचे अभ्यासाचे तयारीसाठी.. आपण रोज जर असेच फिरत राहिलो ना, तर डिअर आपण दोघेही परीक्षेत नापास होऊ हा.. आता आपल्यालाही कॉलेजमध्ये रेगुलर लेक्चरला हजर राहून अभ्यासाला सुरवात केली पाहिजे.." कॉलेजचे लेक्चर चुकवून बागेमध्ये एका झाडाखाली आर्यनसोबत बसलेली प्रीती आर्यनला सांगत असते. "अरे डिअर काय तू?? आपल्या मस्त छान रोमांसचे मुडमध्ये हे काय मधेच आणलीस गं.. डोन्ट वरी डिअर.. अगं होईल गं पास आपण नको टेन्शन घेऊ तू इतके परीक्षेचं.. ठीक आहे डिअर करू आपण उद्यापासून कॉलेजचे लेक्चर अटेंड आणि अभ्यासालाही सुरवात करूया..ओक माय डारलींग.." आर्यन प्रीतीला सांगत तिला आपल्या अजून जवळ खेचतो.. प्रीती आणि आर्यन तसे अभ्यासात दोघेही ठीकच होते. कायम परीक्षेत ते दोघेही फर्स्ट क्लास मधेच पास होत असत. मग त्यांच्यात ठरल्याप्रमाणे ते दोघेही कॉलेजचे लेक्चर अटेंड करण्यास सुरवात करतात. पण कॉलेजमध्ये आर्यांचे लक्ष कॉलेजचे लेक्चर आणि अभ्यासात कमीच व प्रीतीकडेच जास्त असायचे.

त्या दोघात ठरले प्रमाणे प्रीतीने आता रेगुलर कॉलेजमध्ये लेक्चरला हजर राहून अभ्यासाला सुरवात केली. प्रीतीचे अधीच ठरले होते तिला ग्रॅज्युएशन नंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून आपल्या बाबांप्रमाणे प्रशासकीक अधिकारी व्हायचं होते. ती मन लावून अभ्यासाला सुरवात करते आणि इकडे आर्यन मात्र तिचेच मागे मागे फिरत असतो, त्याला जणू तिचे हातात हात घालून तिचे सोबत इकडे तिकडे फिरण्याची सवयच लागली होती. कॉलेजचे त्या ट्रिपनंतर आर्यनचे मन अभ्यासात तर कधीच लागले नाही तो पूर्वीसारखा आर्यन राहिलाच नव्हता. प्रीतीने खूपदा आर्यनला सजवून सांगितले पण तो मात्र नेहमी प्रीतीला कोणता ना कोणता बहाणा काढून कॉलेज चुकवून तिला त्याला भेटण्यासाठी बोलवत असायचा. एक दिवस असेच तो बागेमध्ये त्यांचे नेहमीचे ठरलेल्या ठिकाणी प्रीतीची वाट पाहत बसलेला असतो. प्रीती बराच वेळ झाला तरी न आल्याने शेवटी तो तिला मोबाईल वर फोन करतो, मेसेज करतो पण तरीही प्रीती त्याचे फोन कॉल आणि मेसेजला काहीच प्रतिसाद देत नाही. इथूनच सुरवात होते ती म्हणजे त्यांचे नात्यातील दुराव्याची त्यांचे ब्रेकअपची.. प्रीतीला आपण इतके बोलवूनही ती आपल्याला भेटायला येत नसल्याने, तसेच त्याचे फोन, मेसेजला पूर्वी सारखा प्रतिसाद देत नसल्याने आणि आता ती त्याला हवा तेव्हा हवा तसा वेळ देत नसल्याने दोघांच्यात वारंवार खटके उडू लागतात व दोघांच्यात हळू हळू दुरावा निर्माण होत जातो..

रोज रोज तुला भेटणं

म्हणजेच का रे प्रेम....?

तुझ्या हो ला हो म्हणणं

असेच असते का रे प्रेम....?

नेहमी तुलाच खुश ठेवणं

इतकेच असते का रे प्रेम....?

अरे वेड्या.. प्रेम तर मी पण केलयं..

प्रेम म्हणजे संयम..

प्रेम म्हणजे आदर..

प्रेम म्हणजे विश्वास..

प्रीती बऱ्याचदा आर्यनला समजावण्याचा प्रयत्न करीत असते पण आर्यन मात्र काहीच समजण्याचे मनस्थितीत नसतो. त्या जणू तिचे प्रेमाचं वेड लागलेलं असते. तो मग वेड्या सारखाच तिचे मागे मागे करू लागतो. प्रीती जिथे जाईल तिथे तिथे तो तिचे मागे मागे जात असत. प्रीतीलाही त्याचे ते वागणं आता थोडं इरिटेटिंग थोडं अस्वस्थ वाटू लागलं होते. कारण ती कोठे जाईल तिकडे तो प्रीतीचे मागून जाऊन तिचा हात पकडू लागला.. तिला त्याला भेटण्यासाठी आग्रह धरू लागला.. एक दिवस प्रीती तिचे कॉलेजमधील काही मैत्रिणींचे सोबत अभ्यासाकरीता स्टडीरूम कडे चाललेली असते आणि इतकेतच आर्यन तिचे मागे मागे येतो आणि तिचा हात पकडतो. तो तिला तिथे सर्वांसमोर त्याच्यासोबत बागेत फिरायला येण्यास आग्रह धरत तिचा हात पकडून खेचत खेचत तिला ओढतो तोच..... प्रीतीला त्याच हे वेड्या सारखं वागणं खूप खटकते तिला आर्यनचा खूप राग येतो आणि त्या रागाचे भरातच ती त्याचे हातातील आपला हात झटकून.. त्याला सर्वांसमोर जोरात एक कानाखाली लावते आणि पुन्हा मला भेटण्याचाही प्रयत्न नको करू तू असे त्याला सुनावते... त्या घटनेनंतर त्यांचे एकमेकांना भेटणे, बोलणे, फोन कॉल, मेसेज, चॅटिंग सगळेच बंद होते. त्यांचेमधील चालू असणाऱ्या दोन-तीन वर्षांपासूनचे प्रेमाचे गोड नात्याला मग कायमचाच ब्रेक लागतो आणि त्यांचे ब्रेकअप होते..

क्रमशः - भाग ३

- विशाल पाटील, "Vishu.." कोल्हापूर

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED