Love After Breakup - Part - 6 books and stories free download online pdf in Marathi

ब्रेकअप नंतरच प्रेम - Part - 6

क्रमशः

त्या सर्वांचे मिळून मग महाबळेश्वरला जायचं ठरते पण नेमके त्याच दिवसात प्रीतीच्या कॉलेज परीक्षेचे फॉर्म भरण्याची तारीख येते आणि त्यामुळे त्यांचे महाबळेश्वरला जाणे थोडे लांबणीवर पडते. प्रीती पुण्याला जाऊन तिचे परीक्षेचा फॉर्म भरून आलेवर त्यांची फॅमिली पिकनिकची महाबळेश्वरला जाण्याची तारीख अखेर निश्चीत होते ती म्हणजे २६ डिसेंबर.

कॉलेजचे शेवटचे वर्षाचे परीक्षेचा फॉर्म भरलेनंतर प्रीतीची अक्षरशः कसरतच चालू होते. लहान मुलीला प्रतीक्षाला सांभाळून तिला तिचे कॉलेजचे शेवटचे वर्षाचे परीक्षेचा अभ्यास पूर्ण करायचा असतो. पण आशा परिस्थितीतही ती न खचता, न डगमगता, स्वतःचे मनाशी खंबीर राहून जोमाने तिचे परीक्षेची तयारी चालूच ठेवते. कॉलेजचे परीक्षेच्या अभ्यासासाठी तिच्याकडे आता फक्त तीनच महिने शिल्लक असतात आणि त्यात तिचे घरच्यांनी प्रतिक्षाचे वाढदिवसानिमित्त ठरवलेली ती महाबळेश्वर पिकनिकची तारीख २६ डिसेंबर जवळच आलेली. ती महाबळेश्वरची पिकनिक तिला टाळताही येत नसते कारण तिचेही मन तिला त्या महाबळेश्वरच्या गोड गुलाबी थंडीकडे आकर्षित करीतच असते. तिलाही डिसेंबरमधील त्या दिवसात महाबळेश्वरला जायचेच असते. मग ती इंटरनेट वरून त्याच हॉटेलचा नंबर शोधून काढते जिथे ते कॉलेजचे पिकनिकचे वेळी राहिलेले असतात.

किती धावू सारखा

आठवणीत तुझ्या

एकटाच मी सखे..

माझ्या या आठवणींना

कधी भेटशील तू

सांग ना सखे..

इकडे आर्यन प्रशासकीय सेवेत रुजू झालेनंतर देखील आपल्या ऑफिसचे कामातून डिसेंबर मधील ते तीन दिवस पहिल्या सारखेच स्वतःसाठी राखून ठेवतो आणि मुंबईमधून हॉटेल बुकिंग करण्यासाठी पुन्हा महाबळेश्वर मधील त्या हॉटेलला फोन करतो आणि "हा सर.. तुम्ही मागेच आम्हाला कल्पना दिलेनुसार आम्ही २५, २६ आणि २७ डिसेंबरला तुमचे रूम नं ५०२ चे बुकिंग ठेवले आहे.. तुम्ही निश्चितं रहा सर.. तुम्ही मागच्यावर्षी सांगितले नुसार दरवर्षी न चुकता तुमचे रूम नं ५०२ चे बुकिंग ठेवले जाईल.." त्या हॉटेलचे व्यवस्थापक आर्यनला लगेचच फोनवर सांगतात. तिकडे प्रीती आणि तिचे फॅमिलीची महाबळेश्वरला जाण्याची आवरा आवर चालू असते दोन दिवस आधीपासूनच ते सर्वजण पिकनिकचे तयारीला लागलेले असतात. प्रीतीलाही खूप उत्सुकता लागलेली असते महाबळेश्वरचे त्यांचे फॅमिली पिकनिकची. कारण तिलाही त्या बहाण्याने पुन्हा महाबळेश्वरमधील कॉलेज पिकनिकमधील त्या गोड आठवणींना उजाळा द्यायला मिळणार असतो.२५ डिसेंबरला सकाळी ठरलेप्रमाणे आर्यन महाबळेश्वरचे त्या हॉटेलमध्ये येतो आणि नेहमीप्रमाणेच त्याचा पुन्हा त्या गुलाबी थंडीत प्रीतीचे आठवणींचा फेरफटका चालू असतो. काही वेळानी महाबळेश्वरचे त्या हॉटेलवर एक फोन येतो रूम बुकिंग करण्यासाठी. तो फोन प्रीतीनेच केलेला असतो त्या हॉटेल मधील रूम नं ५०२ चे बुकिंग करण्यासाठी.. पण "माफ करा मॅडम.. रूम नं ५०२ साठी आम्ही आता नाही घेऊ शकत तुमचे बुकिंग.. सॉरी ती रूम अगोदरच आरक्षित आहे.. दुसऱ्या कोणत्या रूमचे बुकिंग घेऊ का??.." प्रीतीला समोरून फोनवरून उत्तर मिळते. ती रूम न मिळालेने प्रीती थोडीशी नाराज होते, मग प्रीती त्या कॉलेज पिकनिकचे वेळची तिच्या रूमचे शेजारचीच रूम म्हणजेच रूम नं ५०१ ज्या रूममध्ये तेव्हा आर्यन राहिलेला असतो ती रूम बुक करण्यास तेथील हॉटेल व्यवस्थापकास सांगते.

"प्रीती.. हे बघ आम्ही आमचे दोघांचे सगळे साहित्य कालच बॅगेत भरून ठेवलेले आहे. आमच्या दोघांच्याही बॅग्स भरून तयार आहेत.. तू देखील तुझी बॅग भरून घे सकाळी उगाच गडबड नको.. उद्या सकाळी ७:०० वाजता तो ड्राइवर गाडी घेऊन येणार आहे.. तेव्हा तू तुझी तयारी आताच करून घे हा.. म्हणजे सकाळी लवकर निघायला उशीर नको व्हायला.." प्रीतीची आई प्रीतीला सांगत असते. २६ डिसेंबरला सकाळी लवकर महाबळेश्वरला निघण्यासाठी प्रीती मग आदल्यादिवशी रात्री प्रतिक्षाला झोपवून तिची बॅग भरायला घेते. बॅग भरत असताना प्रीती तिचे कपाटात काहीतरी शोधत असते आणि अचानक कपाटातील एक बॉक्स खाली पडतो व त्या बॉक्समधील खूप दिवसांपासून तिने खूप जपून ठेवलेला आर्यनने तिला महाबळेश्वर पिकनिकमध्ये गिफ्ट दिलेला तो गुलाबी रंगाचा नाईट ड्रेस खाली पडतो. असे वाटत होते की, तो गुलाबी नाईट ड्रेस जणू तिला ती २५ डिसेंबरची महाबळेश्वरची त्यांची कॉलेजची पिकनिक आणि त्या रात्री तिने आर्यन सोबत व्यथित केलेल्या त्या गुलाबी थंडीतील त्या अविस्मरणीय गुलाबी रात्रीचीच आठवण करून द्यायला त्या बॉक्स मधून नकळत खाली पडला होता की काय.. प्रीती तो खाली पडलेला गुलाबी नाईट ड्रेस उचलते आणि आपल्या बाहुपाशात घट्ट पकडून अलगद हळुवार तिचे बेडरूममधील बेडवर आडवी पडते..

गुलाबी स्वप्नात तुझ्या

मला आज हरवू दे ..

तुझ्या आठवणींच्या मिठीत

मला पुन्हा जखडू दे ..

दोन मनातील अंतर

आज थोडे मिटू दे ..

बेडवर आडवी पडलेवर प्रीती तिचे मोबाईलमधील तिचे आणि आर्यनचे त्या महाबळेश्वरच्या कॉलेज पिकनिकचे फोटो शोधून-शोधून पुन्हा-पुन्हा पहात असते आणि ते सर्व फोटो पाहता पाहता तिचे मनात विचार येतो "काश .. काश ते सगळे क्षण मला पुन्हा अनुभवता येतील.. काश आज आर्यन माझ्या सोबत माझ्या जवळ असता.. आणि.. महाबळेश्वरच्या गोड गुलाबी थंडीतील ही पिकनिक मला त्याच्यासोबत पुन्हा तशीच अनुभवता आली असती.. काश.." तिची ती सर्व रात्र ते कॉलेजच्या पिकनिकचे महाबळेश्वर मधील फोटो आणि आर्यनचे आठवणीतच जाते. या गोड आठवणीतच ती आर्यनचे गुलाबी स्वप्नात कधी स्वतःला हरवून जाते आणि कधी तिला झोप लागते हे तिचे तिलाच कळत नाही. "अगं प्रीती उठ लवकर.. आवरायला घे.. तो ड्रायव्हर येईलच इतकेत.." तिचे आईच्या या हाकेनीच ती तिचे गोड गुलाबी स्वप्नातून उठते आणि महाबळेश्वरला निघण्यासाठी तयार व्हायला लागते..

रात्री बेडवर विस्कटलेले सर्व साहित्य गोळा करून प्रीती पुन्हा आपली राहिलेली बॅग भरायला घेते. महाबळेश्वरला जाताना ती आर्यनने तिला गिफ्ट दिलेला तो गुलाबी रंगाचं नाईट ड्रेसही आपल्या बॅगमध्ये सोबत घ्यायला विसरत नाही. प्रीतीचे बाबांनी महाबळेश्वर पिकनिकसाठी ठरवलेली गाडी बरोबर सकाळी ७:०० वाजता त्यांना न्यायला त्यांचे दारात येते. मग प्रीती आणि तिची फॅमिली सर्वजण सगळे आवरून महाबळेश्वरला जाण्यासाठी त्या गाडीमध्ये आपले साहित्य भरून साताऱ्यावरून निघतात. प्रीतीचे एक मन तर केव्हाच त्या महाबळेश्वरचे गोड गुलाबी थंडीत पोहोचलेलं असते आणि तिच्या दुसऱ्या मनाला तो सातारा वरून महाबळेश्वरचा अवघ्या दीड-दोनच तासांचाच प्रवास खूप लांब पल्ल्याचा असले सारखा वाटू लागलेला असतो. त्या महाबळेश्वरच्या पहिल्या प्रेमाचे गोड गुलाबी आठवणींचे ओढीनेच प्रीती त्या गाडीचे ड्रॉयव्हरला अधुन-मधून सारखी त्यांच्या गाडीचे स्पीड वाढवायला सांगत असते. असेच ते महाबळेश्वरपासून जवळ जवळ अर्ध्या तासांचे अंतरावर घाटातील एका वळणावर असताना प्रीती पुन्हा त्यांचे गाडीचे ड्रायव्हरला "भाऊ तुम्ही गाडीचे थोडं स्पीड अजून वाढवाल का ओ..??.." असे सांगत असते आणि तिचे ते बोलणे ऐकून तो गाडीचा ड्रायव्हर प्रीतीकडे मागे वळून बोलणार तोच समोरून एक पांढऱ्या रंगाची गाडी भरधाव घाट उतरत असते. त्या घाटातील त्या वळणावर अचानक प्रीती आणि तिची फॅमिली बसलेली असते त्या गाडीच्या ड्रायव्हरचा क्षणिक गाडीचे स्टेरिंग वरचा ताबा सुटतो आणि त्यांची गाडी त्या वळणावर त्या समोरून भरधाव येणाऱ्या त्या पांढऱ्या गाडीला किंचितशी घासते..

काही क्षणांचीच ही वाट

पण वाटे कित्येक मैलांची..

सांग ना का सतावे आज अशी

भेट हि जुन्या आठवणींची..

ती समोरून आलेली पांढऱ्या रंगाची गाडी त्यांचे गाडीला घासून त्यांचे आहे त्याच स्पीडमध्ये तशीच सुसाट पुढे निघून जाते आणि प्रीती व तिची फॅमिली ज्या गाडीत बसलेले असतात ती गाडी मात्र घाटातील त्या वळणावर असणाऱ्या कठड्याला जाऊन धडकते.पण सुदैवानं तेव्हा त्यांचे गाडीचे स्पीड कमी असते त्यामुळे ते सगळे होणाऱ्या एका मोठ्या अपघातातून वाचतात आणि त्या धक्क्यामुळे प्रीतीही थोडी तिचे त्या जुन्या आठवणींना भेटण्याच्या स्वप्न घाईतून बाहेर पडते. तिला जाणीव होते की आपली आठवणींचे भेटीची स्वप्न घाई ही आपल्या परिवाराचे जीवावर बेतली असती आज. मग पुढील महाबळेश्वरला पोहोचेपर्यंतचा प्रवास प्रीती कोणाशी काहीही न बोलता शांत आपल्या मुलीला प्रतिक्षाला आपल्या छातीशी घट्ट कवटाळूनच करते.

क्रमशः भाग ७

- विशाल पाटील, "Vishu.." कोल्हापूर

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED