परमेश्वराचे अस्तित्व Sudhakar Katekar द्वारा आध्यात्मिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

परमेश्वराचे अस्तित्व

प्रत्येकाच्या मनात पुष्कळ वेळेस असा प्रश्न निर्माण होतो की,परमेश्वर आहेका? असलास तर तो सगूण आहे ,की निर्गुण आहे,साकार आहे की निराकार आहे.
संत नामदेव यांचे वडील ,पांडुरंगाचे
भक्त होते व नित्य नेमाने पांडुरंगाची
पूजा करीत असत.एक दिवस त्यांना
गावी जाण्याचा प्रसंग आला.त्यावेळी त्यांनी
नामदेवाला सांगितले की,मी येई पर्यंत तू
पांडुरंगाची पूजा कर व नैवैद्य दाखव असे सांगितले.पहिल्या दिवशी नामदेव यांनी
पांडुरंगाची पूजा केली,नैवेद्य दाखविला व
विठ्ठलाने खाण्याची वाट पाहू लागला.पण
विट्ठल काही नैवैद्य खाईना. त्यांनी
पांडुरंगास संगीतले की तू नैवैद्य खाल्ल्याशिवाय मी येथून घरी जाणार नाही.
त्याचा दृढ निश्चय पाहून पांडुरंगाने नैवैद्य
खाल्ला.घरी आल्यावर आईने विचारले
उशीर का झाला.नामदेवांनी उत्तर
दिले,पांडुरंग नैवैद्य खाई पर्यंत थांबलो.

आईचा विश्वास बसला नाही,वडील आल्यावर आईने ही गोष्ट वडिलांना सांगितली.वडील आल्यावर ते दोघेही नामदेवाच्य पाठोपाठ मंदिरात गेले.तेथे
प्रत्यक्ष पांडुरंग नामदेवांच्या हस्ते नैवैद्य
खातांना दिसले.
संत एकनाथ महाराज शंकाराचे मंदिरात ध्यानस्थ बसले असतांना, देवगिरी
येथे जाऊन,जनार्दन स्वामी कडून गुरू मंत्र
घेण्याची प्रेरणा दिली.घरी न सांगता ते जनार्दन स्वामी कडे निघून गेले,त्यांची तेजस्वी मूर्ती पाहून शिष्य म्हणून जवळ
ठेऊन घेतले.जनार्दन स्वामी ने
हमी एका
जंगलात जाऊन,श्री दत्तात्रेयाचे दर्शन घेत
असत.एक दिवस ते संत एकनाथ महाराजांना घेऊन जंगलात गेले व तेथे त्यांना
श्री दत्तात्रेयाचे दर्शन दिले. एकनाथ महाराजांना प्रत्यक्ष श्री दत्तात्रेयाचे दर्शन
झाले व त्यांच्या पासून अनुग्रह मिळाला.
द्वारकेत मदनराय शर्मा नावाचा
ब्राम्हण श्रीकृष्ण दर्शनाकरिता तप करीत
होता.रुक्मिणी मातेने त्याला स्वप्नात येऊन
सांगितले की,भगवान पैठण येथे,एकनाथ
महाराजांच्या घरी श्री खंड्याच्या रूपाने
सेवा करीत आहेत.तू पैठण येथे जा. तो
पैठण येथे आला व संतएकनाथ महाराजांना
,
म्हणाला,मला रुक्मिणी मातेने स्वप्नात येऊन
सांगितले की,भगवान श्रीकृष्ण श्रीखंड्याच्या
रूपाने आपले कडे काम करीत आहेत.
हे ऐकुन नाथांचे हृदय भरून आले.त्यांनी
टाहो फोडला.'देवा,तू हे काय केलेस,धिक्कार
असो माझा.मला अपराधाची क्षमा करा व
दर्शन द्या.तसा तो,शंख,चक्र,गदा पद्मधारी
शामसुंदर प्रकट झाला व त्यांना दर्शन दिले.
या घटना कलियुगातील आहेत,परमेश्वराचे
दर्शन घडू शकते हे सिद्ध होते.
आपल्या व्यवहारात आशा असंख्य
गोष्टी आहेत की,आपण त्याचे अस्तित्व
मानतो पण त्या दिसत नाहीत.पण त्यांचे
कार्य वेगळ्या स्वरूपात पाहू शकतो.वीज
दिसत नाही पण तीच अस्तित्व मानतो.
प्रकाश देण्याचे,पंखा फिरविण्याचे,किंवा
अन्य उपकरणा मध्ये कार्य दिसत.म्हणून
आपण विजेचे अस्तित्व मान्य करतो.
आपल्या व्यवहारात आशा असंख्य
गोष्टी आहेत की,आपण त्याचे अस्तित्व
मानतो पण त्या दिसत नाहीत.पण त्यांचे
कार्य वेगळ्या स्वरूपात पाहू शकतो.वीज
दिसत नाही पण तीच अस्तित्व मानतो.
प्रकाश देण्याचे,पंखा फिरविण्याचे,किंवा
अन्य उपकरणा मध्ये कार्य दिसत.म्हणून
आपण विजेचे अस्तित्व मान्य करतो.
तुकाराम महाराजांनी म्हंटले आहे,"नाही आकार विकार । चराचर भरलेसे
नव्हे सगुण निर्गुण जाणे कोण तयासी ।।
परमेश्वराला रूपही नाही नावही नाही.
घडा करणाऱ्या कुंभराला आपण घडा
पाहू शकतो. म्हणजे निर्मात्याला पाहू शकतो.
कारण तो लहान आहे.प्रत्येक वस्तूचा
कोणी तरी निर्माता असतो.सृष्टी विराट आहे
अर्थात तिचा निर्माताही विराट आहे म्हणून
भगवंत सर्वव्यापी आहे.परमेश्वर सगुण साकार आहे तसाच तो निर्गुण निराकार
आहे.
तर मग त्याची अनुभूती,प्रचिती काशी
येणार, त्यासाठी अंतःकरण शुद्धी पाहिजे,त्या
विषयी भाव असला पाहिजे,आपले चित्त
शुद्ध केले पाहिजे,चित्त शुद्धी म्हणजे काय,
"ते विषयां सक्ती ज्याची उडे । त्या नाव
चित्त शुद् जोडे । ते हृदयी आतुडे सर्व
सापडे परमात्मा.(श्री संत एकनाथ महाराज)
भावेविण देव न कळे निःसंदेह ।
गुरू वीण अनुभव कैसा मिळे ।।
( श्री संत ज्ञानेश्वर)
भावे भाव राहे पायी । देव तै सन्निध ।
(श्री संत तुकाराम महाराज)
म्हणून परमेश्वर प्राप्तीसाठी चित्त शुद्धी
पाहिजे,दृढ भाव पाहिजे.परमेश्वराचे नित्य
चिंतन जप केला पाहिजे.जो नामस्मरण
करेल,अनुसंधान करील,भगवंताशी तादात्म्य
होईल त्यालाच भगवत प्राप्ती होईल.
भक्त,भगवंत,नाम हे तीनही एकरूपच
आहेत.जिथे नाम, तिथे भक्त,जिथे भक्त
तिथे भगवंत.
एक ज्वारीचा दाणा असतो,आपण जर सांगितले की,यात हजार दाणे आहेत तर
यावर कोणी विश्वास ठेवणार नाही,करण ते
दिसत नाही,दृश्य स्वरूपात नाहीत. एक
ज्वारीचा दाणा जेव्हा जमिनीत पेरला जातो,त्याला खत पाणी घालून मशागत
केली जाते, त्या वेळेस त्याचे कणीस तयार
होते व त्या कणसात हजार दाणे असतात,
दिसतात.म्हणजे मुळात एका दाण्यात हजार
दाणे होते,हे मान्यच करावे लागेल.
तासाच परमार्थाचा मार्ग आहे.जपाचे
पाणी घालून,भावाचे खत घाला,भक्तीचा
मळा फुलवा,परमेश्वर तुमच्या जवळ आहे,
याची अनुभूती येईल प्रचिती येईल.

सुधाकर काटेकर
मो.न.9653210353