परमेश्वराचे अस्तित्व - २ Sudhakar Katekar द्वारा आध्यात्मिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

परमेश्वराचे अस्तित्व - २

"व्यक्त मन व अव्यक्त मन"
व्यक्त मन म्हणजे स्वतः विषयीचे विचार,
व अव्यक्त मना मध्ये अनेक स्मृती,संस्कार,
भावना,किंवा अतृप्त इच्छा साठविलेल्या
असतात.मन सर्व व्यापी तसेच सर्व शक्ती मान आहे.मानवी शरीरावर मनाचा प्रभाव
पडत असतो.तसेच मन चंचल आहे.
"चंचल हि मन:कृष्ण प्रमाथि बलवत दृढम
यस्याह निग्रहं मन्ये वायोरीव सुदुष्करम"
अर्थ:-मन चंचल असून कोणताही निग्रह
तडीस जाऊ देत नाही.बलवान व अभेद्य आहे.वायू प्रमाणे दुसाह्य आहे.मन विचाराला
चकविते,एक ठिकाणी बसले तर दाही दिशा
हिंडविते,मनाची वृत्ती बेहमी चंचल असते.
कोणी म्हणतात विचारांचा प्रवाह म्हणजे मन. पण मन आणि विचार भिन्न असतात,आपण
म्हणतो माझ्या मनात विचार आला याचा
अर्थ मन आणि विचार भिन्न आहेत.मन हे
एकाच वेळी अनेक ठिकाणी कार्यरत असत.
आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्ट
मनाशी संबंधित असते.म्हणून आपण मन:,शांती लाभावी म्हणून प्रयत्न करीत असतो.कारण जेथे मन:,शांती तेथे सुख.
माणसाची प्रगती,उन्नती,उत्कर्ष हा
मनाने केलेल्या दृढनिश्चया वर अवलंबून
असतो.ज्या वेळेस आपण दृढनिश्चय करतो
त्या वेळेस तो साध्य करण्याचा प्रयत्न करतो.
व त्यात यशस्वी होतो आपल्या व्यवहारी
जीवनात अनुभव येतो.मनाचा संबंध मानवी
जीवनाशी असल्यामुळे सकारात्मक विचार
केला तर चांगले होईल.व नकारात्मक विचाराने वाईट घडेल
मन व्यक्त व अव्यक्त स्वरूपात आहे.
आपल्या व्यक्त मनात येणारा विचार अव्यक्त
मनात स्थिर होतो.तो स्थिर झाल्यावर तो
साध्य होण्याकरिता अव्यक्त मन मार्ग सुचविते.
समजा तुम्ही नोकरी करीत आहात
व तुम्हाला व्यवसाय करावयाचा आहे हा व्यक्त मनातला विचार अव्यक्त,सुप्त मनात
स्थिर होतो व अव्यक्त मन अनेक मार्ग दाखविते,त्या दृष्टीने प्रयत्न करून तुम्ही
प्रयत्न करून यशस्वी होता
आपले मन शरीरातून अधिक जवळ आहे
शोक,चिंता,भय,मोह यांनी मनाची प्रकृती
बिघडते.
आपले संत नेहमी सांगतात,परमेश्वराचे चिंतन करावयाचे असेल
तर मन नेहमी ताब्यात पाहिजे.ज्या वेळेस
मनुष्य एकाग्र होण्याचा प्रयत्न करतो,त्या
वेळेस मनात असंख्य विचार येतात काही
चांगले काही वाईट.
" मने ब्रह्मदीका केलीस थोकडी ।
तेथे परवडी कोण मानवाची ।।
इंद्रिय न चाले मनावीण देखा ।
मनाची मानरेखा नूउल्लंघवे।।(संत एकनाथ महाराज)
जप करीत असतांना किंवा नामस्मरण करीत असतांना जो विचार मनात
येतो त्या विचारा बरोबर वाहत न जाता तो
विचार तेथेच सोडून द्यावा,व परत मन जपात
नामस्मरणात गुंतवावे.
जागृत मानापेक्षा सुप्त मनाची ताकत
अनेक पटीने जास्त असते.म्हणून आपल्या
मनात मी सुखी आहे,मी समृद्ध आहे,मी
आनंदी आहे असे सकारात्मक विचार मनात
ठेवावे.परमेश्वराची साधना करतांना सुद्धा
हाच विचार ठेवा.मनाला गीतेत सहावे इंद्रिय
म्हंटले आहे,"मन:षष्टानि इंद्रियांनी,प्रकृती
स्थानी कर्षति" असे गीतेत सांगितले आहे.
परमेश्वर प्राप्तीसाठी नाम ,जप याचे
महत्व आहे.परामेश्वर सर्व व्यापी आहे म्हणजे
तो हृदयात सुद्धाआहे.नुसत्या चक्षुने नाही
तर तो ज्ञान चक्षूंनी पाहता येतो.संतांनी परमेवश्वराची भक्ती करतांना संसार सोडा असे कधीच सांगितले,तर संसार करतांना
परमार्थ करा असे सांगितले.
आत्मा हा अनंत,अपार,मायातीत व
पूर्ण असा आहे.तोच मायेचे अधिष्ठान होतो,
म्हणून त्याला अंतरात्मा म्हणतात.तो मायेला
व्यापून अपार आहे म्हणून त्याला परमेश्वर
म्हणतात तोच मायेचा निर्माता आहे म्हणून
त्याला ईश्वर असे म्हणतात.मन,बुद्धी,चित्त,
अहंकार हे सत्व गुणांचे विकार आहेत.मनाच्या आत बाहेर आत्मा आहे,
पण मनाला जाणता येत नाही.
"माझे नाम कीर्तीचे पवाडे । ज्याची
वाचा अखंड पढे । विघ्ने न येती तया कडे ।
जेवी सूर्या पुढे अंधार ।
अर्थ:-ज्याची वाणी नामाचे अखंड पोवाडे
गाते,त्याच्या कडे,ज्या प्रमाणे सूर्या पुढे अंधार
येत नाही,त्या प्रणाने विघ्नेही येत नाहींत.
" उध्दरेदात्मनात्मानं नात्मानम वसादयेत ।
आत्मैय ह्यात्मनो बंन्धूरात्मैव रिपुरात्मन: ।।(गीता)
अर्थ:-मनुष्याने आपल्या मानाद्वारे स्वात:ची
अधोगती होऊ न देता,स्वतः चा उद्धार केला
पाहिजे.मन हे बद्ध जिवाचा मित्र तसेच शत्रूही
आहे.

सुधाकर काटेकर
9653210353