परमेश्वराचे अस्तित्व - ४ (1) 65 113 "मल्लिङगमदभक्त जनादर्शन स्पर्शनचि नम परिचर्या स्तुती:प्रव्हगुण कर्मानु किर्तनम ।।अर्थ:- माझ्या मूर्ती आणि माझे भक्त यांचे दर्शनस्पर्श,पूजा सेवा,स्तुती,वंदन इत्यादी करावे तसेच माझे गुण आणि कर्म यांचे सतत चिंतन कारावे.(श्रीमदभागवत) परमेश्वराची पूजा करावी,भक्ती करावी पण हे सर्व करीत असतांना अभिमान धरू नये स्वतः केलेल्या कामाचा गवगवा करू नये. संसार सागरातून पार होण्यासाठी सत्संग व भक्ती महत्वाची आहे.परमात्मा एकच आहे पण अनेक असल्या सारखे वाटते.जमिनीत बी पेरल्यानंतर जसे अनेकरुपात विस्तार पाऊन प्रकट होते किंव्हाकपड्यामध्ये जसे धागेच ओतप्रोत भरलेले आहे. बुद्धीच्या साहयाने मनाच्या द्वारा इंद्रियांना त्यांच्या विषया पासून परावृत्त करावे.कर्म वासनांनी चंचल झालेल्या मनाला काबूत ठेऊन ते भगवंताच्या मंगल रुपाकडेवळवावे.मनाला पूर्ण रूपाने भावंतामध्येअसे विलीन करावे की ते पुन्हा दुसऱ्या कोणत्याही विषयाचे चिंतन करणार नाही. आपले ब्रह्मांडरूपी शरीर जल,अग्नी आकाश,वायू,अहंकार ,महतत्व आणि प्रकृती या सात आवरणांनी वेढलेलाजो विराट पुरुष तोच भगवान आहे. उपनिशिदात एक उल्लेख आहे,जो साधक आपले पार्थिव शरीर विसरून अंत:कारणाचा विकास करून मन बुद्धीअहंकार समाप्त करतो त्यालाच परमेश्वरप्राप्ती होते.उपनिशिदात भगवंताची साधनाआहार शुद्धी सांगितली आहे.आहार म्हणजेनुसते अन्न नाही तर--१) कानाचा आहार ध्वनी आहे.२) त्वचेचा आहार स्पर्श आहे.३) नेत्रांचा आहार दृश्य जगत आहे.४) जिव्हेचा आहार रस आहे.५)मानाचा आहार उत्तम विचार आणि ध्यान. आपला आहार सात्विक असेल तर आपले विचार चांगले असतात ,आचरणशुध्द व पवित्र असते. गणपती अथर्वशीर्षात एक मंत्रआलेलाआहे. "ऊँ भद्रं कर्णेभि:शृणूयाम देवा:भद्रम पश्येमाक्षभिर्यजत्रा:" हे देवांनो,आम्ही कानांनी मंगल ऐकावे, ईश्वरोपासना करणारे आम्ही डोळ्यांनीमंगल कारक गोष्टी पाहाव्यात. म्हणून भगवंत ,साधनेसाठी या पाचहीगोष्टी महत्वाच्या आहेत.यांचा सर्वांचा चांगलाउपयोग करता आला पाहिजे. परमेश्वर सर्वांच्या हृदयात आहे.आपलेशरीर हे ईश्वरी शक्तीनेच चालते,आपला श्वास,आपला विचार,शरीरातील रक्त प्रवाह या सर्वक्रियांचे संचलन परमेश्वर द्वारा होत असते.वृक्षाचे पान सुद्धा परमेश्वराच्या शक्ती शिवायहलू शकत नाही.पण आपल्याला हे समजतनाही की,हा भगवंत आपल्या अंतर्यामी आहे. भक्ती सूत्रात नारद म्हणतात,भक्तीचाएक महान गुण असा आहे की,आपली बुद्धीपवित्र करते, अनुचित विचाराला स्थान राहात नाही.ईश्वरीय प्रेम निर्माण होते. जीवनातील उच्चतम लक्ष प्राप्त करण्या करता आपली पात्रता वाढविली पाहिजे.आंतरिक बदल केला पाहिजे.जो नित्य नेमाने परमेश्वराचे एकचित्त मन करूनस्मरण पूजन करतो त्याच्या कल्याणाचे उत्तरदायित्व परमेश्वर घेतो. ज्याने मन जिंकले त्याला परमात्मा प्राप्त झालेलाच असतो.,त्याने शांती प्राप्तकेलेली असते "जितात्मान प्रशांतस्य परामात्मा समाहित:" आशा मनुष्यासाठीसुख,दुःख,शीत,उष्ण,मान,अपमान सर्वचसारखे भौतिक अस्तित्वाच्या द्वंद्वाचा मनुष्यावर परिणाम होत नाही.भक्ती अगरसाधना दृढ निश्चयाने केली पाहिजे.विचलितहोता कामा नये. "उत्साहनिश्चयाद्वैर्यातत्तकर्मप्रवर्तनात । समत्यागात्सतोवृत्तेषडभिर्भक्ति:प्रसिध्यति।। "अंतःकरण पूर्वकबउत्साह निश्चय आणि धैर्याने भक्तांच्या सत्संगामध्ये विहित कार्याचेपालन करून व पूर्णपणे सत्व गुणांनी युक्तहोऊन कार्य केल्यामुळे मनुष्य यशस्वीपणेभक्ती योगाचे अनुसरण करू शकतो.(उपदेशामृत) परमेश्वराचा निर्गुण विस्तार ज्या प्रमाणे दूध जरी सहज थिजले तरी तेदही असते.बीजाचा वृक्ष होतो,सुवर्णाचे अलंकार होतात,तसाच निर्गुणाचा विस्तार होतो. "जे सातत्याने हरी नाम घेतात,हरी कीर्तनात रमतात,त्यांच्यात पापाचे नाव सुद्धा राहात नाही.यम म्हणजे मनो निग्रह,दम म्हणजेइंद्रिय निग्रह,याना निकृष्ट दशा आणली,तीर्थे आपल्या जाग्यावरून उठून लावली,यमलोकांचे सर्व व्यापार बंद पडले,यम म्हणालाकोणाचे नियमन करावे?दम म्हणाला जिंकावे? तीर्थे म्हणाली आम्ही कशाचे क्षालन करावे?कारण दोष औषधालाहीउरलेनाहींत" "या प्रमाणे माझ्या नाम घोषानेजगातील सर्व प्राण्यांची दुःखें नाहीशी होतात. व सर्व जग दुमदुमून जाते.(ज्ञानेश्वरी)एवढे परमेश्वराच्या नामात सामर्थ्य आहे. अनन्याश्चिंतयंतो मां ये जनःपर्युपासते । तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम ।। (भगवदगीता)अर्थ:-जे लोक एकनिष्ठ होऊन माझे चिंतनकरून माझी उपासना करतात,त्या सर्वदामाझ्याशी युक्त असलेल्या निष्काम भक्तांचायोगक्षेम मी चालवतो.ज्यांनी मनापासूनसर्व भार माजवर टाकला आहे,त्यांचे इच्छितमीच पूर्ण करतो. *** ‹ पूर्वीचा प्रकरणपरमेश्वराचे अस्तित्व - ३ › पुढील प्रकरण परमेश्वराचे अस्तित्व - ५ Download Our App रेट करा आणि टिप्पणी द्या टिपण्णी पाठवा Sudhakar Katekar 4 महिना पूर्वी उपयुक्त इतर रसदार पर्याय लघुकथा आध्यात्मिक कथा कादंबरी भाग प्रेरणादायी कथा क्लासिक कथा बाल कथा हास्य कथा नियतकालिक कविता प्रवास विशेष महिला विशेष नाटक प्रेम कथा गुप्तचर कथा सामाजिक कथा साहसी कथा मानवी विज्ञान तत्त्वज्ञान आरोग्य जीवनी अन्न आणि कृती पत्र भयपट गोष्टी मूव्ही पुनरावलोकने पौराणिक कथा पुस्तक पुनरावलोकने Sudhakar Katekar फॉलो करा शेअर करा तुम्हाला हे पण आवडेल परमेश्वराचे अस्तित्व द्वारा Sudhakar Katekar परमेश्वराचे अस्तित्व - २ द्वारा Sudhakar Katekar परमेश्वराचे अस्तित्व - ३ द्वारा Sudhakar Katekar परमेश्वराचे अस्तित्व - ५ द्वारा Sudhakar Katekar