परमेश्वराचे अस्तित्व - ३ Sudhakar Katekar द्वारा आध्यात्मिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

परमेश्वराचे अस्तित्व - ३

भौतिक जीवनात मनुष्य मन आणि इंद्रिय यांच्या आधीन होतो.भौतिक अस्तित्वात
गुरफटून जातो.
" मन एवं मनुष्याणां कारण बंधन मोक्षयो।
बंधाय विषयासंगो मुक्तै निर्विषय मन:।।
अर्थ:-मन हे मनुष्यासाठी बंधनाचे तसेच मुक्तीचेही साधन आहे,कारण आहे.इंद्रिया विषयी
संलग्न झालेले मन मुक्तीस कारणीभूत होते.
म्हणून परमेश्वर चिंतनाला महत्व आहे.
ज्याने मनाला जिंकले त्याच्या साठी मन हे
सर्वोत्तम मित्र आहे.परंतु जो असे करण्यास
अपयशी झाला त्याच्या साठी तेच मन परम शत्रू
होय.
शरीर,मन आणि क्रिया यांचा नित्य
नियमाने अभ्यास करून संयमित होऊन,कोणत्याही प्रकाराच्या भौतिक सुविधा
प्राप्त करण्यासाठी साधना न करता परमेश्वर
प्राप्तीसाठी कारावी.
भौतिक विश्वातील सुर्याप्रमाणे अध्यात्मिक जगातील सर्व ग्राहलोक स्वयंप्रकाशित आहेत म्हणून त्याला परमधान
म्हणतात.
" ईश्वर सर्व भुतानाम ह्रद्देष्येSर्जून तिष्टती ।
भ्रामसर्व भूतानी यंत्र रुढाणी मायया ।।
अर्थ:-परमेश्वर प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे
आणि तो सर्व जीवांचे भ्रमण निश्चित करतो.
सर्व जीव मायेने बनविलेल्या यंत्रावर आरूढ
आहेत.सर्व भूतांचे अंतःकरण हेच कोणी महा
आकाश आहे.त्यात ज्ञानरुपी वृत्ती हीच ज्याची
सहस्त्र किरणे आहेत,त्या किरणांनी तो उदयास
आला आहे,त्या ईश्वररूप सूर्याने जागृती,स्वप्न व
सुषुप्ती हेच कोणी तीन लोक त्यास प्रकाशित
करतो.
सर्वस्य चाहं हृदी संनि विष्टो.मत्त:स्मृतिर्ज्ञानम
मोहानं च ।
वेदश्चसर्वरहमेव वेद्यो वेदांतकृद विदेव चाहम:।।
अर्थ:--मी सर्वांच्या हृदयात प्रवेश करून राहतो.
मज पासून सर्वांना स्मृति, ज्ञान हे दोहोचा आभाव
(विस्मरण अज्ञान) उत्पन्न होतात.सर्व वेदांना
जाणण्यास मीच योग्य आहे.वेदांताचा सिद्धांत
करणारा व ज्ञाताही मीच आहे.
परमेश्वराचे चिंतन करीत असतांना ज्यामुळे
मन विचलित होते किंवा मन:शांती नष्ट होते ते
काम,क्रोध,लोभ,मोह हे दूर केले पाहिजेत,जरा
विचारे केला तर आपल्या लक्षात येई की,आपल्या क्रोधाला कारणीभूत आपणच असतो.आणि क्रोधामुळे आपल्या मन:शक्तीचा
ऱ्हास होतो.मानसिक तर्कामुळे निर्माण झालेल्या
भौतिक कामानांचा मानाद्वारे त्याग केला पाहिजे.
मनुष्याचे मन परमेश्वर चिंतनात स्थिर झाले म्हणजे त्याला निश्चितच दिव्य सुखाची अनुभूती
येते.
बुद्धीच्या साहायाने मनाच्या द्वारा इंद्रियांना
त्यांच्या विषया पासून परावृत्त करावे आणि चंचल झालेल्या मनाला,मनाच्या विचाराने
काबूत ठेऊन,भगवंताच्या मंगलमय रुपाकडे
लावावे.
भारतीय ऋषी मुनींनी मनाचा अभ्यास केला व मन:शक्तीचा बहिर्मुख प्रवाह आत वळवला. हा प्रवाह अंतर्मुख झाल्यावर ऋषी
मुनींना जे ज्ञान प्राप्त झाले ते विज्ञाना पेक्षाही
अद्भुत होते.
जे विचार अगर इच्छा सफल झाल्या नाहीत
त्या कायमच्या नाहीशा होत नाहीत तर संस्कार
रूपाने त्या मनाच्या गर्भागारात बिजावस्थेत
राहतात आणि योग्य वातावरण उपलब्ध होताच
त्या पुन:अंकुरीत होऊ लागतात.
कुविचार मनात कधीही येऊ देऊ नयेत.कारण
आज ना उद्या कुविचाराचे बीज,अंकुरीत झाल्या
शिवाय राहात नाही.म्हणून त्याला ज्ञानाग्निने
भस्मसात करा.विचारांची अडगळ मनातून काढून
टाका.मन स्वच्छ करा.मोकळे करा. शक्य तेवढे
आपले मन विचारांपासून निर्लेप राखण्याचा
प्रयत्न करा.
परा, पष्यती,मध्यमा व वैखरी या चार वाणी
आहेत.वाणीचा मनाशी आणि मनाचा आत्म्याशी
संबंध आहे.
आपण ओठातून जो उच्चार करतो,अगर बोलतो त्याला वैखरी वाणी म्हणतात.
ज्या वेळेस घशापासून उच्चार करतो त्याला मध्यमा वाणी म्हणतात.
हृदयातून मनात म्हणणे पष्यंती वाणी म्हणतात.
नाभी पासून उच्चार करणे परा वाणी म्हणतात.
नाभी पासून उच्चार करण्याची अवस्था
येण्या करिता बरीच साधना करावी लागते. त्या
एकाग्र अवस्थेत योगी ब्रह्मरूप होतो.
सर्व संतांनी नाम,जप याचे महत्व सांगितले असून,भगवंताचे नाम जपण्याचा संदेश
दिला आहे.
"नामची चांगले,नामची चांगले । जड जीवे
उद्धरिले नेणो किती (संत नरहरी सोनार)
कोटी कुळ्या होती पावन । वैकुंठी त्याचे पण । एका जनार्दनीं सांगतो प्रसन्न । नाम श्रेष्ठ
पतित पावन (संत एकनाथ महाराज)
"सर्वकाळे उच्चारीत हरी । तया सुखा सारी
पाड नाही. (संत तुकाराम महाराज)
" हरिचिया भक्ता नाही भय चिंता ।
दुःख निवारण नारायण ।।
"काया वाचा मने पुजावे वैष्णव । म्हणउनी
भाव धरूनिया ।।
संतांनी जो संदेश दिला तो म्हणजे भगवंताचे चिंतन करा,नाम जप करा.चिंतन केल्याने चिंतेचा नाश होतो, आधी व्याधी तुटतात
काया वाचा मने चिंतन करावे.
"चिंतन आवनी शयनी । भिजनी आणि गमना गमनी सर्व काळ कारावे"नुसते स्मरण जरी केले
तरी तो कृपाळू परमेश्वर भक्तांसाठी धावून येतो
नाम घेता घेता मी नाम घेतो हेही स्मरण
जेंव्हा राहात नाही तेंव्हाच त्या नामात मग्न झालेल्या साधकाचे पर्यावसन एकांत होते.एकांत
म्हणजे नाम घेणारा मी एक व एकाचाही अंत होणे.म्हणजे देह बुद्धीचा विसर पडणे.नाम घेताना कोणती बैठक असावी,कसे बसावे याला
महत्व नाही.आपल्या प्रकृतीला मानवेल असे
बसावे.भगवंताच्या नामाला शरीराचे बंधन नाही.
नामस्मरण करीत असतांना ते आपण कानांनी ऐकावे म्हणजे एकाग्र होण्यास मदत होईल.जिथे आपली आवड असेल तिथे आपण
एकाग्र होतो म्हणून परमेश्वर प्राप्तीसाठी आवड
पाहीजे.