Dhukyataln chandan - 4 books and stories free download online pdf in Marathi

धुक्यातलं चांदणं .....भाग ४

आता रोजचं ते एकत्र घरी जाऊ लागले होते. सुवर्णा , विवेक आणि पूजा. पूजाने , सुवर्णाशी मैत्री केली होती दरम्यान. परंतु त्या इतक्या बोलायच्या नाहीत, एकमेकिंसोबत. विवेक तर जाम खुश असायचा आजकाल. त्याचं वागणं update झालं होते. कपडे टापटीप झाले होते, hair style बदलली होती.

सगळं पूजा आल्यापासून. पूजा होतीच तशी मनमिळावू एकदम. शिवाय आता chatting बंद झालं होतं त्यांचं. फोन करायचे आता. शिवाय whats app तर होतंच ना. msgs चालू असायचे सारखे. सुवर्णाला राग यायचा कधी कधी पूजाचा. विवेकची "Friend" होती म्हणून ती काही बोलायची नाही तिला. विवेक तिला कमी आणि पूजाला जास्त वेळ देत होता , तिला ते आवडायचं नाही. घरी जाताना सुद्धा तेच दोघे बोलत असायचे. सुवर्णा आपली गाणी ऐकत असायची.


काही दिवसांनी, सुवर्णाला ऑफिसच्या कामानिमित्त दिल्लीला पाठवले गेले. विवेक, पूजाबरोबर जरी बोलत असला तरी त्याला सुवर्णा जवळ हवी असायची. त्यामुळे आता ती नसल्याने त्याला खूप boring वाटत होतं. सारखी बडबड चालू असायची ना तिची, म्हणून त्याला करमत नव्हतं. काय करू… काय करू… त्याने पूजाला फोन लावला.
" Hello… पूजू " ,
" बोल… " ,
" काहीनाही असाच फोन केला. " ,
" OK, ठीक आहे. ",
" Boring झालं आहे गं. " ,
" का रे … काय झालं " ,
" सुवर्णा नाही आहे ना इकडे, तुला बोललो होते ते. ",
" मग आता काय ? " .
" काही नाही, विचार करत होतो, बाहेर जाऊया का कॉफ्फी घेयाला ? I mean…. तुला चालत असेल तर. ",
" हो ना… आणि का नाही चालणार मला. " ,
" मग तुला सोडतील का बँक मधून लवकर ? ",
" अरे, आज शनिवार ना, नाहीतरी हाफ- डे असतो आम्हाला. भेटूया आपण. " विवेकला ते ऐकून आनंद झाला.
" चालेल , चालेल… मी निघतो थोड्यावेळाने , आणि तुझ्या बँकच्या बाहेर तुझी वाट बघतो मी.",
" चालेल… तू बाहेर आलास कि call कर. " ," OK. bye. " म्हणत विवेकने फोन कट्ट केला आणि त्याचं काम आवरायला सुरुवात केली.


थोडयावेळाने दोघे भेटले आणि एका coffee shop मध्ये गेले. रोज सुवर्णा असताना ते गप्पा मारायचे. आज दोघेच होते तरी कोणीच बोलत नव्हते. विवेकला काय बोलावं ते सुचत नव्हते. पूजा त्याच्याकडे पाहत होती. कॉफी सुद्धा आली. शेवटी न राहवून पूजानेच विषय काढला.
" तुला काही विचारू का ? ",
"हं…. हो , चालेल ना… ",
" खूप दिवस मनात राहिलं होतं माझ्या, विसरायची मी सारखी, आज आठवलं म्हणून विचारते. तुझ्या ब्लॉगचं नावं " धुक्यातलं चांदणं " अस आहे ना, मग त्याचा अर्थ काय ?… म्हणजे धुक्यात चांदणं कसं दिसू शकते ना… धुकं पहाटे असते. आणि चांदणं तर रात्री. मग " धुक्यातलं चांदणं " means ? " . विवेकला गंमत वाटली.
" तसं मला हा प्रश्न जास्त कोणी विचारत नाही आणि ज्यांनी विचारलं त्यांना , ते असंच लिहिलं आहे अस म्हणलो. आता तू माझी चांगली friend आहेस म्हणून तुला सांगतो. " ,
" सांग ना मग ",
" त्याचे actually दोन अर्थ आहेत. एकदा , जेव्हा मी लहानपणी गावाला गेलेलो ना, तेव्हाची गोष्ट आहे, गावातून फिरता फिरता हातातले २ रुपये कधी पडले ते कळलंच नाही मला. ते कितीतरी वेळ मी शोधत होतो, सापडलेच नाहीत.तेव्हा तिकडून एक साधू जात होते. त्यांनी मला विचारलं, काय शोधतोस ? मी सांगितलं त्यांना, तेव्हा ते बोलले कि , त्यापेक्षा तुझा " तारा " शोध… मला तेव्हा ते कळलं नव्हतं. मी घरी येऊन माझ्या आजीला विचारलं होतं. तिने सांगितलं कि " जशी आपली माणस असतात ना जमिनीवर, तसा आपला एक तारा असतो आभाळात. तो जर आपल्याला भेटला तर आपण खूप सुखी होऊन जातो. "…तर तेव्हा पासून मी तो तारा शोधत आहे. मी जेव्हा जेव्हा तो शोधायचा प्रयन्त करतो ना, तेव्हा तेव्हा आभाळ ढगाळलेल असते. धुक्याचं जसं आपल्याला काही दिसत नाही, अगदी तसंच काहीसं. चांदण्या रात्री म्हणजे जेव्हा चंद्र आकाशात नसतो तेव्हा आभाळ भरून येते त्याला मी " धुक्यातलं चांदणं " म्हणतो. ",
" अच्च्या… अच्च्या, मग भेटला कि नाही तारा तुझा. " ,
" नाही अजून, पण भेटेल कधीतरी." ,
" आणि दुसरा अर्थ ? " , पूजा बोलली आणि बाहेर पावसाने सुरुवात केली. " मस्त…. पहिला पाऊस… " विवेक तसाच उठून खिडकीजवळ जाऊन उभा राहिला. पूजाही त्याच्या मागोमाग तिथे येऊन उभी राहिली.
" छान ना… मला एवढा आवडायचा नाही पाऊस पहिला… तुझा ब्लॉग वाचून तो आवडायला लागला." ,
" कधी भिजली आहेस का ,… पावसात ? ".
" नाही , भिजायला नाही आवडत, फक्त बघायला आवडतो पाऊस. "
" भिजायचं असते गं, मजा येते." ,
" तुम्हा मुलांचं ठीक असते, मुलींना कुठे तेव्हढ freedom असते. शिवाय आमच्या घरी चालत नाही अस काही.",
"अरे हो, तुझ्या घरचं विचारलंच नाही मी कधी .",
" घरी… भाऊ , आहे मोठा… आई- बाबा .",
" आणि बाबा कडक स्वभावाचे आहेत." विवेकने पूजाचं वाक्य मध्ये तोडलं.
" हो ना , तसे कडक नाहीत पण जुन्या विचारांचे आहेत. मुलांसोबत बोललेलं त्यांना आवडत नाही. " ,
" अच्च्या, म्हणून तू घरी असलीस कि फोन उचलत नाहीस ते. एवढं काय घाबरायचं त्यांना.",
" नको तरी सुद्धा, त्यांना आवडत नाही त्या गोष्टी मी नाही करत कधी.",
" OK बाबा, मग आता माझ्या सोबत आली आहेस ती. ",
" त्यांना माहित नाही म्हणून." विवेकला हसायला आलं. ते बघून पूजाने त्याच्या पाठीवर दोन-तीन चापट्या मारल्या. " गप रे ." विवेक हसत होता, मग तीही हसायला लागली. बाहेर पाऊस कोसळत होता.
" किती छान पाऊस आहे." ,
" तुला आवडतो ना पाऊस खूप.",
" खूप… जो गंध येतो ना मातीचा, तो माझ्या शरीरात भिनला कि वेडा होतो मी. भिजलो कि मन शांत होते माझं. पण एक मजा असते पावसात भिजण्याची. लोकं बघत असतात , हसत असतात. त्यांना कुठे ठाऊक , पावसात काय असते ते.",
" काय ? " ,
"पावसात खूप गोष्टी असतात, प्रत्येकाने ठरवायचं असते… कि कोसळणाऱ्या पावसातून काय घ्यायचं स्वतः साठी, आठवणी कि अनुभव… " दोघेही पावसाकडे पाहत होते,


" किती छान बोलतोस रे तू , मला नाही येत असं बोलता.",
" छान बोलायला कशाला पाहिजे ? तू आहेसच छान. ", पूजा लाजली.
" गप काहीही बोलतोस.".
"काहीही का… खर ते खर… मला वाटलं म्हणून बोललो.",
" हो का … बर … चल निघूया का घरी " ,
" हो… नाहीतर तुझ्या घरी राग येईल कोणाला तरी. " ,
"बघ… मस्करी करतोस ना. " ," sorry… असंच गं. ", पूजाने smile दिली हलकीशी. coffee shop मधून बाहेर आले दोघेही. पाऊस अजूनही पडत होता. पूजाला आठवण झाली. " अरे… तू दुसरा अर्थ सांगितला नाहीस." विवेकने शांत नजरेने पूजाकडे पाहिलं.
" तू कधी कोणावर प्रेम केलं आहेस का ? " ,
" नाही , आणि कुणाच्या प्रेमात सुद्धा पडायचं नाही मला. " ,
" का ? " ,
" त्या गोष्टींवर माझा विश्वास नाही आणि घरचे सांगतील त्याच्यासोबत मी लग्न करणार आहे. मग उगाच कोणाच्या प्रेमात कशाला पडायचं? " पूजा बोलली. विवेक हसला.
" तू जर कोणावर प्रेम केलं असतंस ना , तर तुला दुसरा अर्थ कळला असता. " ,.
" तो कसा ? " ,
" प्रेमसुद्धा तसंच असते… धुक्यातल्या चांदण्या सारखं. समोर असलं तरी कधी स्पष्ट दिसत नाही . आणि दिसते तेव्हा ते खूप दूर असते , त्या चांदण्यासारखं . " विवेक पावसाकडे पाहत म्हणाला,
" चल निघूया.",
" चालेल.",
" तू जा घरी. मी जरा पहिल्या पावसाचा आनंद घेतो." ,
" अरे पण सामान आहे तुझं , ते भिजेल ना.",
" काहीच tension नाही, सगळ waterproof आहे , मी सोडलो तर. तू जा …. Bye " म्हणत विवेक पावसात चालत गेला , भिजायला. पूजा त्याच्याकडे पाहत होती कधीची. तो गेला पुढे भिजत , तरी पूजा तशीच उभी अजून त्याला पाहत.

============ क्रमश: ===========

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED