Priti.. Tuzi ni Mazi - 2 books and stories free download online pdf in Marathi

प्रिती.. तुझी नी माझी– भाग २

निखिल रूम वर परतला तेव्हा फार खुशीत होता. त्याने आल्या आल्या आपल्या मित्रांना ओळखीबद्दल आणी झालेल्या सगळ्या गप्पा सांगितल्या.

अंघोळी वगैरे उरकून निखिल आणि त्याची गॅग canteen मध्ये दाखल झाली. श्रेया आणि तिची मित्रमंडळी आधीच तिथे होती. आपल्या मित्रमंडळींसमोर आता आपण श्रेयाला ओळख देऊ वगैरे या विचारात निखीलने २-३दा श्रेयाच्या टेबलाकडे नजर टाकली पण तिचे लक्षच नव्हते. निखिल मात्र त्यामुळे फारच अस्वथ़ झाला. त्याची ही बैचैनी त्याच्या मित्रांच्या नजरेतून सुटली नव्हती. त्यांनी त्याची टर उडवायला सुरुवात केली. सगळेजण मुद्दामच श्रेयाला ऐकू जाईल अश्या आवाजात बोलू लागले.

“अर्रे निखिल.. हाय..! कधी आलास.. मी पाहिलेच नाही.”, एक
“काय निखिल Morning Walk ला एकटाच गेलास, आम्हाला उठवले पण नाहीस. आत्ता पासूनच दोस्तीत दरी पडायला लागलीये”, दुसरा
तिसराजण तर गाणंच म्हणत होता.. “कभी तो नजर मिलाओ, कभी तो करीब आओ….”
या सगळ्या गोंधळात चुकून एकाचा धक्का लागून काचेची डिश टेबलावरून खाली पडत होती, पण निखिलने ती पटकन झेलली. मग काय विचारता लगेच एक जण म्हणालाच “निखिल तुझे reflexes खूपच strong आहेत हां.. नाहीतर ती खाली पडलीच असती.. i mean डिश रे..” आणी सगळे हसायला लागले.

निखिल ला तर मेल्याहून मेल्यासारखे झाले होते. कुठून आपण सगळे मित्रांना बोललो असेच त्याला वाटत होते. तो आपला मान खाली घालून खात होता. सहजच त्याने तिरक्या डोळ्याने श्रेयाकडे पाहिले. ती टेबलावरून उठतच होती, जाताना तिनेही निखीलकडे एकदा पाहिले आणि एक cute smile देऊन निघून गेली. तिच्या त्या एका छोट्याश्या स्माईल ने निखीलला मनावरचे किलोभराचे दडपण उतरल्यासारखे वाटले.

त्यानंतरचे १-२ दिवस असेच गेले. चोरटे कटाक्ष, येता जाता हळूच “Hi”, भेटी-गाठी ,कधी सकाळी Morning Walk ला तर कधी मार्केट मध्ये. सगळे काही अनपेक्षित, तरीही ठरवल्यासारखे. एक दिवस निखीलने तो विषय काढलाच.

“श्रेया, what happened to you the other day? तब्येत ठीक नव्हती का?”, निखिल.
“No. Something else, Its personal”, श्रेया
“Oh. If you don’t want to tell, its fine”, निखिल depressed होऊन म्हणाला.

थोडा वेळ शांततेत गेल्यावर श्रेयाच म्हणाली, “Its not very easy when the relations break. Especially when you were tied to someone for more than years”
“Boyfriend?”, निखिल आपल्या मनातील उत्सुकता लपवू शकला नाही.
“No, I don’t have Boyfriend, Its my parents. They broke-off. I was going through tremendous pressure since last 10 years. They were having differences. That day Papa SMSsed’ me that they have decided to seperate. निखिल खरंच खूप अवघड आहे हे सगळे समजणे.

चल पडी है कश्तियां समंदर, दूर है किनारा
इन मझदार से पुछ लेना क्या हाल है हमारा
बिखर जाते उस्सी दिन हम़ कही
अगर साथ ना मिलता हमे तुम्हारा”

निखिल तिच्या शायरीचा पुर्णपणे फॅन झाला होता. शायरीच्याच काय तो पूर्णं तिचाच फॅन झाला होता. तिचे हसणे, बोलणे, चेहऱ्यावर आलेली केसांची बट सावरणे, तिच्या हातातले ब्रेसलेट, ear-rings, तिला आवडणारे सिनेमे, TV Shows, Cartoons, Books, Songs सगळे काही त्याला आवडू लागले होते. खरं तर तिचं त्याला मनापासून, अगदी मनापासून आवडू लागली होती. तिचं Reserved राहणं, दहा वेळा विचार करून बोलणं त्याला impressive वाटायचे.

शनिवार त्याचा अलिबाग मधला शेवटचा दिवस होता, आणि त्या आधीच तो आपल्या प्रेमाचा ‘ईझहार’ तिला करणार होता. पण त्याचे मन त्याला साथ देत नव्हते. चार दिवसाच्या भेटीत निर्माण झालेली ही भावना हे प्रेमच आहे का निव्वळ आकर्षण हेच त्याला कळत नव्हते. आणी ते खरोखरच प्रेम असेल तरी, जे तो स्वतःच्याच मनाला पटवु शकत नव्हता, ते तो श्रेयाला तरी कसे पटवुन देणार होता? पण त्याच वेळेला त्याचे दुसरे मन त्याला समजवायचे, “अरे वेड्या, तुला कळत कसे नाही. तिलाही तु आवडतोसच ना! तिचेही तुझ्यावर नक्कीच प्रेम असणार. आता कालचेच बघ ना, रात्री जेवायच्या वेळेला हॉटेलमध्ये कित्ती गर्दी होती आणी श्रेया आणी तिच्या मैत्रिणी तुमच्याच टेबल समोर जेवायला बसल्या. इथपर्यंत ठिक आहे रे,पण श्रेयाला बरोब्बर तुझ्यासमोरचीच जागा मिळाली हा काय निव्वळ योगायोग समजायचा? तुला असं नव्हतं वाटत का की जेवताना ती तुझ्याकडे बघती आहे? तिची ती अप्रतीम शायरी ती तिच्या मैत्रीणींनाच ऐकवत होती, का ते फक्त तुझ्याचसाठी होते? ह्या सगळ्या गोष्टींना काहीतरी अर्थ आहेच ना ! का त्याला फक्त मनाचे खेळ समजुन सोडुन द्यायचे?”

शुक्रवारी रात्रभर तो तिच्याशी काय बोलायचे, कसे बोलायचे याचाच विचार करत होता. मी असं म्हणंल तर ती काय म्हणेल, तिने असे म्हणलं तर आपण काय म्हणायचे याचा सगळा विचार त्याने आधीच करून ठेवला होता. दहा वेळा आरशात स्वतःच्याच छबी कडे बघत त्याने रंगीत तालीम केली होती आणि शेवटी त्याने श्रेयाच्याच Style मध्ये, तिला propose करायचे ठरवले होते. बस्स, त्याने एक कागद पेन ओढले आणि बराच विचार करून एक शायरी लिहिली:
” आंखे खुली हो तो चेहरा तुम्हारा हो,
आंखे बंद हो तो सपना तुम्हारा हो,
मुझे मौत का ड़र भी ना हो,
अगर कफन की जगह, दुपट्टा तुम्हारा हो.”

शनिवारी पहाटेच निखिल उठून बसला. बाहेर अजूनही अंधारच होता. निखिल अत्यंत आतुरतेने ६.३० वाजण्याची वाट बघत होता. कधी एकदा ६.३० वाजतील आणि आपण jogging ला जाऊ, तिथे ती भेटेल मग आपण तिथेच तिला विचारू असा सगळा plan त्याने करून ठेवला होता. प्रत्येक क्षण त्याला युगा-युगा सारखा वाटत होता. शेवटी ६.३० वाजलेच. निघताना त्याच्या मनात आले, न जाणो श्रेया आलीच नाही तर? त्यापेक्षा आपणच तिला फोन करून बोलावून घेऊ. लगेचच त्याने intercom वरून तिच्या रूमचा नंबर फिरवला. बऱ्याच वेळ फोन वाजत राहिला पण कुणीच उचलला नाही. निखीलच्या मनात क्षणभर विचार येऊन गेला, “श्रेया आधीच तर समुद्रावर पोहोचली नसेल? Gosh!! She is also desperate to see me”.

Positive thinking supresses your nervous feelings, and Nikhil was no exception to that. आनंदातच निखिल समुद्र किनारी पोहोचला. प्रत्येक क्षणाला त्याची नजर श्रेयाला शोधत होती. पण लांबलचक पसरलेल्या समुद्रकिनाऱ्यावर श्रेया त्याला कुठेच दिसली नाही. बऱ्याच वेळ त्याने तिची वाट पाहिली, आणि निराश मनाने तो परत हॉटेलवर परतला. Cafeteria, Lawns, Garden श्रेयाचा कुठेच पत्ता नव्हता. रूम मधून त्याने परत एकदा intercom वरून फोन लावून पाहिला.. but No Answer. कदाचित लवकर उठून मार्केट मध्ये गेली असेल असाही एक विचार त्याच्या मनात चमकून गेला. म्हणजे Reception वर रूमची चावी ठेवली असेल आणि कदाचित तिकडे कुणाला माहीत असेल म्हणून निखिल Reception वर गेला. आजूबाजूला कुणी नाही याची खात्री करून निखीलने दबक्या आवाजातच विचारले, “Room no. 602, May i Know if Miss Shreya is in?’. काउंटर वरच्या माणसाने आपल्या खणातील किल्ल्यांमध्ये शोधाशोध केली, पण त्याला काही किल्ली सापडली नाही. तेवढ्यात त्याला काहीतरी आठवले आणी त्याने संगणकावरील रेकॉर्ड बघितले आणी निखीलला म्हणाला, “Sir, Room No. 602, Shreya and her friends checked-out early in the morning.”

“What do you mean by checked-out???” निखिल जवळ-जवळ ओरडलाच.
“Sir, they checked-out !! Left the hotel. Any Problem??”, Reception वरचा क्लार्क शांतपणे म्हणाला.

निखीलला भोवतालाचे सगळे जग आपल्या भोवती फिरतेय की काय असेच वाटू लागले. “श्रेया असं जाऊच कसे शकते?? आपल्याला काही बोललीच कसे नाही. निदान जाताना एकदा तरी भेटून जायचे.” असे आणी अनेक प्रश्न निखिल च्या मनात घोटाळत होते. “आता?? पुढे काय?? ती कुठे भेटणार, कुठे राहते, फोन नं. काहीच कसे आपल्याला माहीत नाही.. श्शी.. आणी म्हणे मी प्रेम करतो.” निखिल ला आपल्या वेंधळेपणाची लाज वाटली.

तेवढ्यात निखीलला एक कल्पना सुचली. Reception च्या रजिस्टर मध्ये तर तिची माहिती असणारच. तिची नाही, तर निदान कुणाची तरी असेलच की. आपण कसेही करून तिला कॉन्टाक्ट करू शकू. निखीलचे डोके जरा ताळ्यावर यायला लागले होते. त्याने परत त्या क्लार्क ला विचारले.. “Any contact details??”

“No sir.”, तो क्लार्क शांत स्वरात म्हणाला.
“What do you mean by NO?? तुमच्याकडे सगळी नोंद असते ना, बुकींग केल्यावर?” निखीलने स्वतःवर ताबा ठेवत विचारले.
“Yes sir. पण आम्ही Customers ची माहिती शेअर करू शकत नाही. Its against the rules’, क्लार्क.
“ओह..! आले लक्षात’, असे म्हणून निखीलने आपल्या पाकिटातील शंभराच्या दोन नोटा काढून त्याच्या हातात कोंबल्या, आणी अर्थपूर्ण हास्य केले.
“Sorry sir, please take this back. Its against the ethics, and its against the rules. I can’t give you the information”, आणी क्लार्क ने त्या नोटा निखिल कडे परत केल्या.
निखीलने हात जोडले, पाया पडला, शांतपणे समजून बघितले, ओरडून भांडून पाहिले पण काही उपयोग झाला नाही. निखिल मान खाली घालून मागे वळला, तेवढ्यात त्या क्लार्क ने त्याला हाक मारली. निखिल मागे वळला तेव्हा त्या क्लार्क च्या हातात एक कागद होता.
“तुमच्यासाठी हा निरोप ठेवलाय”, कागद पुढे करून क्लार्क म्हणाला.
निखिल ने दोन ढांगांमध्येच धावत जाऊन तो कागद हिसकावून घेतला आणि वाचायला सुरुवात केली.

“दिन तो गुजर गये युं ही,
रात भी ढल गयी है..
कोशीश तो बहोत की दिल ने
पर जुबांपे बात रहे गयी युं ही.”

[क्रमशः]

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED