Priti.. Tuzi ni Mazi - 4 books and stories free download online pdf in Marathi

प्रिती.. तुझी नी माझी – भाग-४

खरेदी संपवुन निखील आणी अनु खाली पार्कीग मध्ये गाडीत सामान भरत होते, एवढ्यात, निखील ला कोणीतरी जोर-जोरात हाक मारतेय असा भास झाला. निखीलने मागे वळुन पाहिले तेंव्हा त्याच्या ऑफिस मधला मित्र- दिन्या – धावत येताना दिसला.

“अरे काय झाले.. कशाला बोंबलतो आहेस एवढा.. आणी तु इथे काय करतो आहेस?”, दिन्या जवळ येताच निखील ने त्याला विचारले.
“अरे माझे.. सोड.. “, दिन्याला पळाल्यामुळे प्रचंड धाप लागली होती, “श्रेया.. श्रेया..” कसा बसा धापा टाकत निखीलला म्हणाला.
श्रेयाचे नाव ऐकताच निखीलने हातातल्या पिशव्या खाली टाकल्या आणी दिन्याच्या खांद्यांना धरुन त्याला गदा गदा हलवत विचारले.. “अरे काय श्रेया.. काय झाले.. तु मला निट सांगणार आहेस का?”

दिन्या अजुनही धापाच टाकत होता.. “अरे श्रेया, तुझी श्रेया, आपल्याला अलिबागला भेटली होती ती.. वरती आहे. मॉलमध्ये. मी आत्ताच तीला पाहीले.”

प्रचंड शॉक बसावा तसा निखीलला धक्का बसला.. “कुठे.. कुठे आहे.. कुठल्या मजल्यावर??”. निखीलला आपली Engagement ठरली आहे, अनु आपल्या बरोबर आहे याचा जणु विसरच पडला होता. आपली excitement तो लपवु शकत नव्हता. “आणी तु तिला थांबवले का नाहीस??”

“अरे मला नक्की माहीत नाही तिच श्रेया आहे का ते. मी असं कसं कुणाशीही जाऊन बोलणार. तेवढ्यात तु मला दिसलास म्हणलं तुला सांगाव म्हणुन पळत पळत तुझ्या मागे आलो. ती आता नक्की कुठल्या मजल्यावर आहे ते नक्की नाही सांगु शकत. पण बहुदा ६ किंवा ७ वा मजला.”, दिन्या.

पुढचे काही न ऐकता, निखील वेड्यासारखा पळत सुटला. कशीबशी त्याने लिफ्ट गाठली. पण आता जावे कुठल्या मजल्यावर. शेवटी बराच विचार करुन त्याने ७ नंबर दाबला.

इकडे, दिन्या जे म्हणाला होता ते खरंच होते. श्रेया आपल्या मैत्रिणीबरोबर त्याच मॉलमध्ये shopping करायला आली होती, आणी नुकतीच खरेदी संपवुन घरी जायला निघाली होती. दोघींचे ही हात पिशव्यांमध्ये व्यापलेले होते आणी दोघीही ७ व्या मजल्यावरच्या लिफ्टच्या समोर लिफ्ट येण्याची वाट बघत उभ्या होत्या.

निखीलही त्याच लिफ्टने वरती येत होता. ७व्या मजल्यावर लिफ्ट थांबल्यावर दार उघडल्यावर दोघेही समोरासमोरच आले असते. एकमेकांची भेट झाली असती. पण नशीबाला हे ही कदाचीत मान्य नव्हते.

निखीलची लिफ्ट तिसऱ्या मजल्यावर थांबली. त्यात एक लहान, चेहऱ्यावरुनच उपद्रवी दिसणारा मुलगा आणी त्याचे आई-वडिल घुसले. त्या मुलाला लिफ्टचे फारच आकर्षण होते. आत घुसल्या घुसल्या त्याने लिफ्टची सगळी बटण दाबली. त्याचा परीणाम असा झाला की निखीलची लिफ्ट सरळ ७व्या मजल्यावर न थांबता ४-५-६ अश्या सगळ्या मजल्यांवर थांबत गेली. निखीलला तर त्या मुलाला खाऊ-का-गिळु असे झाले होते. वरती श्रेया आणी तिची मैत्रीण या सारख्या थांबत येणाऱ्या लिफ्ट ला बघुन वैतागल्या होत्या. तेवढ्यात शेजारची लिफ्ट आलेली पाहुन श्रेया आणी तिची मैत्रीण तिकडे गेल्या. श्रेया त्या लिफ्ट मध्ये जायला, आणी इकडे निखीलची लिफ्ट ७व्या मजल्यावर थांबायला एकच वेळ झाली. नशीबाने निखीलला पुन्हा एकदा हुलकावणी दिली होती. निखीलने पुर्ण ७वा मजला उलथुन काढला पण श्रेयाचा कुठेच पत्ता नव्हता. त्याने बाकीचे मजलेही सगळे पालथे घातले पण तोपर्यंत श्रेया निघुन गेली होती.

निखील तेथेच डोके धरुन खाली बसला.

इकडे श्रेया आणी तिची मैत्रीण पार्कींग मध्ये आले. आपले सगळे सामान गाडीमध्ये भरले आणी गेटपाशी आल्या. श्रेयाने Parking Charges देण्यासाठी पैसे दिले, पण तिथल्या watchman कडे सुट्टे पैसेच नव्हते. आणी श्रेयाकडे तर सगळे बंदेच होते. श्रेयाने वैतागुन इकडे-तिकडे पाहीले. तिला कोपऱ्यात एक मुलगी गाडीपाशी आपले सामान घेउन उभी असलेली दिसली. श्रेया आपल्या गाडीतुन खाली उतरली आणी तिच्याकडे गेली. आपल्या पर्स मधुन एक नोट काढुन तिला विचारले “You have change?”. समोरची मुलगी कुठेतरी शुन्यात नजर लावुन बसली होती. श्रेयाने आपला घसा साफ करुन पुन्हा विचारले..”Hello..!! You have change?” तशी ती मुलगी भानावर आली.

तिने आपल्या पर्स मध्ये हात घालुन दहा च्या ५ नोटा काढुन श्रेयाच्या हातात दिल्या. श्रेयाने आपली नोट काढुन तिला दिली आणी म्हणाली,
“मी श्रेया.”
समोरची मुलगी तिला जरा मंदच वाटली. किंवा कुठल्यातरी धक्यात असलेली. थोड्यावेळाने तिनेही आपला हात पुढे केला आणी म्हणाली. “अनु!!’
श्रेया फार काही तिच्या नादी लागली नाही.. जाताना, “Thanks Anu” असे म्हणुन आपल्या गाडीत जाउन बसली. Parking चे पैसे दिल्यावर श्रेया आणी तिची मैत्रीण निघुन गेल्या.

थोड्यावेळाने अनु भानावर आली. तिचा आता पुर्ण विश्वास बसला होता की निखील अजुनही श्रेयाला विसरू शकलेला नाही. आणी उद्या जरी आपले लग्न झाले तरीही तो कधीच श्रेयाला विसरू शकणार नाही. आणी समजा आत्ताच निखीलला श्रेया भेटली तर??? आणी अचानक तिला आठवण झाली त्या मुलीची जिला तिने सुट्टे पैसे दिले होते.. काय नाव सांगीतले तिने स्वतःचे?? नेहा कि श्रेया??

अनुनेचे लक्ष आपल्या हाताकडे गेले. तिच्या हातात अजुनही श्रेयाने दिलेली नोट होती. धकधकत्या अंतःकरणाने श्रेयाने ती नोट उलगडली, आणी तिला नोटेच्या मागच्या बाजुवर लिहीलेले दिसले: श्रेया – ९२९४२-२३४३६. अनुचे डोळे विस्फारले गेले. आपण जे बघतो आहे ते खरं आहे का भ्रम आहे, का दिवा स्वप्न हेच तिला कळेनासे झाले. निखीलचे आयुष्य, तिचे आयुष्य आणी श्रेयाचे आयुष्य सगळे अनुवर अवलंबुन झाले होते. श्रेयाच्या हातात ती नोट होती जी निखील गेली तीन वर्ष वेड्यासारखी शोधत होता. निखील, तिचा जिवाभावाचा निखील, तिचा होणारा नवरा, ज्याच्याबरोबर संसार करण्याची तिने स्वप्न पाहीली होती तोच निखील. अनुने ही नोट त्याला दिली तर?? तर त्याला कित्ती आनंद होईल. त्याची आणी श्रेयाची भेट होईल. अनुचे उपकार निखील कध्धीच विसरू शकणार नाही. पण.. पण अनुचे काय? श्रेयाची भेट झाल्यावर निखील अनुशी लग्न करेल? मग तिच्या स्वप्नांचे काय? ती स्वप्न काय अशीच विखरुन द्यायची. काय झालं जर मी ही नोट निखीलला दाखवलीच नाही तरं. त्याला कसं कळणार आहे? १०-१२ दिवसांत आपली engagement तर होईलच, लग्नही होउन जाईल.

अनुच्या मनात कालवाकालव झाली होती. काय करावे, काय करु नये हेच ठरत नव्हते. आपल्या स्वार्थासाठी ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याला मिळवण्यासाठी असा खोटेपणाचा आधार घ्यायचा.. नाही. अनुला हे पटत नव्हते. जेव्हा आपण निखीलवर प्रेम करायला लागलो, तेव्हा निखीलनेही आपल्यावर प्रेम करावे असा आपला आग्रह कधीच नव्हता. श्रेया निघुन गेल्यावर तो तुटुन जाउ नये, कोलमोडुन जाउ नये म्हणुनच आपले प्रेम आपण त्याच्याकडे व्यक्त केले, त्याला आपला आधार देउ केला. मग जेंव्हा श्रेया त्याच्या आयुष्यात येउ शकते आहे, तर नशीबाचा हा निर्णय बदलणारी मी कोण??

निखील पार्कींग मध्ये आला तेंव्हा त्याला अनु कुठेच दिसली नाही. त्याला आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला. अनु असताना आपण जे वागलो तसे वागायला नको होते. पण श्रेया भेटणार म्हणल्यावर आपला आपल्या मनावर ताबाच राहीला नाही त्याला तरी कोण काय करणार. आता घरी गेल्यावर अनुला भेटुन तिची माफी मागायची असेच निखीलने मनोमन ठरवुन टाकले. तेवढ्यात तेथील watchman निखील पाशी आला आणी म्हणाला. “वो मेमशाब ने आपके लिये ये लिफाफा छोडा है.”

निखीलने तो लिफाफा उघडला. आत मध्ये एक चिठ्ठी होती :
“साथ हमारा पल भर का सही,
पर वोह पल जैसे कोई कल ही नही,
रहे जिंदगी मै शायद फिर मिलना हमारा,
लेकीन महकता रहेगा दिल मै हमेशा प्यार तुम्हारा”

चिठ्ठीच्या मागे एक ५०रू.ची नोट होती. निखीलला याचा काहीच अर्थ कळेना. त्याने सहजच सवयीने ती नोट उलटी केली आणी त्याला सगळा अर्थ उमगला. श्रेयाचा नंबर त्या नोटेच्या मागे लिहीलेला होता.
****************************************************

श्रेया नुकतीच घरी परतली होती. जेवण करुन एक डुलकी काढावी असा विचार करत असतानाच तिचा मोबाईल वाजला.

“Hello?”, श्रेया.
” आंखे खुली हो तो चेहरा तुम्हारा हो,
आंखे बंद हो तो सपना तुम्हारा हो,
मुझे मौत का ड़र भी ना हो,
अगर कफन की जगह, दुपट्टा तुम्हारा हो.”, निखीलने तेव्हा ठरवलेला तो शेर म्हणला.
“Who is it?”, श्रेया.
“निखील.”, निखील

श्रेयाला काही क्षण सगळे जग आपल्या भोवती फिरते आहे असेच वाटले. तिला काही क्षण विश्वासच बसेना. दोघेही काही क्षण फोन वर स्तब्ध होते. पण दोघांचे मन, आणी ती शांतताच कित्ती तरी शब्द एकमेकांशी बोलत होते.

पुढे काय झाले?? सगळं जसं सिनेमात दाखवतात तसंच. दोघेही जण एकमेकांना भेटले. गळ्यात गळे घालुन आनंदाश्रुंमध्ये भिजले, अनु पुढील शिक्षणाचे कारण सांगुन अमेरीकेला निघुन गेली. निखील-श्रेयाचे लग्न झाले आणी त्यांनी पुढील अनेक वर्ष सुखाने संसार केला.

आता तुम्ही म्हणाल ही कसली गोष्ट. असं कसं शक्य आहे, जी नोट श्रेयाने अलिबागला दिली होती तीच नोट पुण्यात परत श्रेया कडे कशी आली. हा तर सगळा फिल्मी योगायोग मसाला वाटतोय. अहो.. प्रेम हे अंधळे असते आणी वेडेही. प्रेमात पडलेला माणुस कधी काय करेल सांगता येत नाही. त्यातुनच तर ताजमहाल बनला, त्यातुनच तर Romeo-Juliet च्या गोष्टी बनल्या, आणी त्यातुनच तर प्रेमाच्या असंख्य अजरामर कथा समोर आल्या.

आता खरं काय झाले होते ते मी सांगतो. श्रेयासाठी निखील जसा वेडा पिसा झाला होता, तशीच श्रेया ही. तिचा नशीबावर विश्वास होताच, पण त्याच वेळेस तिला कल्पना होती की एकच ती नोट मिळणे म्हणजे जरा जास्तच नशीबाचा खेळ आहे. तिने काय केले माहीती आहे? त्यानंतर तिच्याकडे असणाऱ्या आणी तिला मिळणाऱ्या प्रत्येक नोटेवर तिने तिचा नंबर लिहीला. अशाप्रकारे देशात जी आधी एकच नोट होती ज्यावर श्रेयाचा नंबर होता, त्याऐवजी अश्या कित्तीतरी नोटा चलनात आल्या. अशीच एक नोट श्रेयाने आपल्या पर्स मधुन काढुन अनुला दिली.

मित्रांनो-आणी मैत्रिणींनो, निखील-श्रेयाला एकमेकांना भेटायला तीन वर्ष लागली. नुसते नशीबावर विसंबुन राहु नका. तुमच्या मनातील भावना तुमच्या आवडत्या व्यक्तिसमोर नक्की व्यक्त करा. नशीब नेहमी प्रयत्न करणाऱ्यांचीच साथ देते.

All the BEST.

[समाप्त]

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED