Priti.. Tuzi ni Mazi - 3 books and stories free download online pdf in Marathi

प्रिती.. तुझी नी माझी – भाग ३

हाय निखिल, कसा आहेस?? चिडलास ना माझ्यावर न सांगता गेले म्हणून? एकदा तरी भेटायला पाहीजे होते ना?? मलाही असेच वाटत होते. खूप वाटलं तुला भेटावे, तुझ्याशी बोलावे. पण मनाला खूप समजावले आणि न भेटताच गेले. खूप प्रेम करतोस का रे माझ्यावर?? हो ना?? असा दचकू नकोस. मी न कळण्याइतपत बुद्दू नाहीये? खूप इच्छा होती तुझ्या तोंडून ऐकायची. पण आयुष्याने इतक्या जखमा दिल्यात की आता प्रत्येक गोष्ट करताना हात मागे होतो. प्रेम, नाती या गोष्टींमधला खरं सांग तर माझा विश्वासच उडाला आहे. अर्थात एक नातं खोटं निघालं म्हणजे सगळीच नाती खोटी, फसवी असतील असं नक्कीच नाही. आठवतं निखिल आपली भेट कशी झाली. एक छोटास्सा अपघातच नाही का? मग अश्या अपघातानेच झालेल्या भेटी, त्यामुळे निर्माण झालेले प्रेम यावर विश्वास कसा ठेवायचा? कसं म्हणायचं की नियतीने आपल्याला एकत्र आणले ते आयुष्यभर एकत्र राहण्यासाठीच?? आज एका अपघाताने आपण एकत्र आलो.. कशावरून उद्या दुसऱ्या एखाद्या कारणाने आपण वेगळे होणार नाही?? खु ss प दुःख होतं निखिल जेव्हा एखादं नातं तुटत, जेव्हा आपण एखाद्या “आपल्या” पासून दूर जातो.

Anyways, कदाचित तुला मी हे काय बडबडतीये हे पटणार नाही. कदाचित तू माझ्यावर प्रेम करतही नसशील. माझाच तसा गैरसमज झाला असेल. पण निखिल मी करते.. मी तुझ्यावर खूप प्रेम करते. मला तू खुssप आवडलास आणि आवडतोस. तुझी आयुष्यभराची साथ मला नक्कीच आवडेल. पण त्यासाठी आपल्याला एका परीक्षेतून जावे लागेल. त्यासाठी नियतीला परीक्षेतून जावे लागेल. जर खरंच आपण एकमेकांसाठी बनलेलो असलो, तर उद्या नियती परत आपली भेट नक्कीच घडवून आणेल. माझा विश्वास आहे, निखिल परत आपण नक्कीच भेटू. कधी, कुठे, केव्हा ते नाही सांगता येणार, पण भेटू हे नक्की.

परीक्षेत कॉपी करतात ना, तशीच एक कॉपी मी करते आहे. जाताना Reception वरच्या क्लार्क ला मी ५० रुपयाची टीप दिली आहे, आणि त्या नोटेच्या मागच्या बाजूस मी माझा मोबाईल नंबर लिहिला आहे. बघ. आपल्या नशिबात असेल तर ती नोट त्याच्याकडे असेलही. तुला माझा मोबाईल नंबर मिळेलही. आणी परत आपण एकदा, आणि कायमचेच भेटू शकू. काय माहीत आपल्या नशिबात काय आहे. पण तो पर्यंत आपल्याला दूर राहावेच लागेल.

युं तो कोई तनहा नहीं होता,
चाह कर भी कोई जुदा नही होता,
मोहब्बत को तो मजबुरीयां ही ले डुबती है,
वरना खुशीं से कोइ बेवफा नही होता.

बाय निखिल, काळजी घे. नशिबात असेल तर आपण परत भेटूच.

फक्त तुझीच,
श्रेया.

निखीलला हसावे का रडावे काहीच कळत नव्हते. श्रेया आपल्यावर प्रेम करते हे ऐकून आनंदी व्हावे का असल्या अगम्य परीक्षेबद्दल वाचून रडावे. अचानक त्याला ५० रु.ची आठवण झाली त्याने त्या क्लार्क ला विचारले की श्रेया ने दिलेली ५० रु.ची नोट आहे का?? पहिल्यांदा त्याला निखीलला टीप बद्दल कसे कळले आणी ती नोट त्याला का हवी आहे, हेच कळेना. मग त्याने आपले सगळे खिसे शोधले पण ती नोट कुठेच सापडेना. टेबलचे खण, कॅश-बॉक्स सगळे निखीलने शोधले, पण अशी ५० रु.ची नोट ज्याच्या मागे मोबाईल नंबर लिहिलेला आहे कशी कुठलीच नोट सापडली नाही. अचानक त्या क्लार्क ला आठवले की मगाशी एका customer ला १०० रु सुट्टे हवे होते तेव्हा त्याने ५०-५०रू दिले होते, त्यात त्याने एक नोट आपल्या खिशातून काढून दिली होती. झाले आता कुठल्या customer ला दिली, त्याने बाहेर जाऊन कुठे खर्च केले असतील, तिथून पुढे ती नोट कुठे गेली असेल?? निखिल ला आपण नशिबापुढे किती helpless आहोत याची प्रकर्षाने जाणीव झाली.

पहिल्या पावसाची नुकतीच सुरुवात झाली होती. मुसळधार पाऊस कोसळत होता. निखिल तिथेच एका दगडावर श्रेयाने लिहिलेला कागद छातीशी घट्ट कवटाळून बसला होता. त्याच्या चेहऱ्यावरून पाण्याचे थेंब ओघळत होते. आता ते थेंब पावसाचे होते का डोळ्यांतून वाहणाऱ्या पाण्याचे ते एक तर निखीललाच माहीत किंवा त्या नशिबाला.

तीन वर्षांनंतर………

“निखील ss, ए निखील. .”, अनुने निखीलला हाक मारली. “काय रे एवढी घाई आहे तुला? जरा हळु चाल की.”
“मी हळुच चालतोय. तुच शंभर ठिकाणी थांबतेस window shopping करायला.” निखील काहीश्या नाराजीच्या सुरात म्हणाला.
“How unromantic! तुझ्याबरोबर माझ्यासारखी एक सुंदर, सुशील मुलगी Shopping करायला आली आहे, आणी तु आहेस की त्याची तुला काही पर्वाच नाही. ए ss सवय करुन घे हा ss लग्नानंतर तुलाच घेउन मी shopping करणार आहे. तेव्हा तुझी ही कुरकुर चालणार नाही.” अनु लाडक्या रागाने म्हणाली. आज अनु खुप खुश होती. फारसे आढेवेढे न घेता निखील shopping ला तिच्याबरोबर आला होता. Shopping पेक्षा निखील तिच्याबरोबर आला होता हेच तिला खुप होते.

लग्नाचा विषय निघताच निखील म्हणाला, “Anu ! Please don’t start it again.”

“ठिक आहे बाबा !”, अनु समजुतीच्या स्वरात म्हणाली. “नाही काढत लग्नाचा विषय बाssस?. पण एकच प्रश्न. माझ्या घरच्यांना तु पसंत आहेस, तुझ्या घरच्यांना मी. मला तु.. आणी…I hope तुला मी. मग प्रॉब्लेम काय आहे. अजुन किती दिवस वाट पहाणार आहेस तु श्रेयाची? सगळेजण तुझ्याच होकाराची वाट पहात आहेत. माझ्याशी लग्न करं.. तुझ्यावर इतके प्रेम करीन की तुला परत कध्धीच श्रेयाची आठवण येणार नाही.”

“अनु..! तुला कसे समजवु तेच मला कळत नाही बघ.” निखील हताश स्वरात म्हणाला. “हे बघ अनु. आपण दोघेही एकमेकांना लहानपणापासुन ओळखतो. आपण एकमेकांचे चांगले मित्र होतो.. आहोत आणी यापुढेही राहुच. मग हे लग्न, प्रेम सगळे मध्ये कशाला? मला तु आवडतीस, नक्कीच आवडतीस. किंबहुना श्रेयापेक्षाही जास्ती. फक्त त्या आवडण्यामागच्या भावना वेगळ्या आहेत. तु म्हणतेस कदाचीत तसे होईलही. कदाचीत आपले लग्न होईलही. कदाचीत मी तुझ्यात इतका involve होईन की मला श्रेयाची आठवणही होणार नाही. पण हे सगळे कदाचीत आहे. तीन वर्ष झाली पण मी अजुनही श्रेया ला विसरू शकलो नाही. अजुनही प्रत्येक पन्नास रुपयाची नोट मी दहा वेळा उलटुन पालटुन बघतो. चार-पाच वेळा मी अलिबागलाही जाउन आलो. कदाचीत ती नोट अजुनही तिथेच कुणाकडे तरी असेल. तिथल्याच कुठल्यातरी दुकानात, रिक्षावाला, नारळ-पाणीवाला, घोडा-गाडी वाला, मंडई…!!”

“कशी होती रे श्रेया, माझ्यापेक्षाही सुंदर होती का?”, निखीलचे वाक्य तोडत अनु खिन्न मनाने म्हणाली.
“होती नाही अनु, आहे म्हण. श्रेया आहे.. जगाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात, कुठेतरी नक्कीच आहे, माझी वाट बघत आहे. आणी मी तिला शोधुन काढीन.” निखीलच्या मनातील आशावाद अजुनही तितकाच जागा होता. निखील तिथल्याच एका दुकानात घुसला. त्याने आपल्या खिशातील शंभराची नोट पुढे केली आणी दुकानदाराला म्हणला, “भैय्या, सौ का दो पचास छुट्टा है?” दुकानदाराने त्याला पन्नास च्या दोन नोटा दिल्या आणी निखील त्या नोटा उलट्यापालट्या करुन श्रेयाचा मोबाईल नंबर शोधु लागला.

“रेडीओ मिर्ची, ९८.३ FM”.
श्रेया बिछान्यावर पडल्यापडल्या रेडीओवर गाणी ऐकत होती. गेली तीन वर्ष तिच्या मनात चालु असलेला गोंधळ अजुनही संपला नव्हता. तिचे एक मन पश्चाताप करत होते. तिच्या मुर्खपणाबद्दल तिलाच नावं ठेवत होते, तर दुसरे मनं तिच्या वागण्याचे समर्थन करत होते. नशिबावर विश्वास ठेवायला भाग पाडत होते. हा तीन वर्षाचा काळ श्रेयासाठी फारच दुःखदायक होता. आई-वडील वेगळे झाल्यावर श्रेया एकटीच पडली होती. त्यातच निखीलचा विचार तिला तिच्या एकटेपणाची जाणीव करुन देत होता. श्रेयाने मुंबई सोडुन पुण्यातील एका कंपनीत नोकरी पत्करली होती आणी पुण्यातच ती एका मैत्रिणीबरोबर रुम शेअर करुन रहात होती.
“आप सुन रहे है Love-bytes, और मै हुं आपका मिर्ची man अनिरुध्द. मुझे कॉल किजीये और मुझे बताईये आपकी Love-life. कॉल किजीये ६६०२०९२९. सुनते रहीये, कानोंको मिर्ची लगाते रहीये. Radio Mirchi Its Hot.” रेडीओ वर गाणी लागत होती. निरनिराळे लोक आपले चित्र-विचित्र प्रश्न, प्रॉब्लेम्स फोन करुन सांगत होते. श्रेयाच्या मनात विचार आला, आपणही फोन केला तर. तेवढाच वेळ जाईल.
श्रेयाने आपला मोबाईल उचलला आणि नंबर फिरवला.
RJ अनिरुद्धने नविन फोन येतो आहे हे आपल्या पॅनलवर पाहीले आणि तो म्हणाला, “चलो देखते है Who is our next Caller. Hello?”

निखील अनुबरोबर shopping संपवुन कारमधुन घरी परतत होता. रेडीओ वर चाललेली कंटाळवाणी आणी निरर्थक बडबडीचा त्याला फार कंटाळा आला होता. अनिरुध्दचे, “चलो देखते है Who is our next Caller. Hello?” हे वाक्य त्याने ऐकले आणी म्हणाला, “आधीच आयुष्यात problems काय कमी आहेत, की यांचे problems ऐका. काय कंटाळवाणा कार्यक्रम चालु आहे” असे म्हणुन त्याने रेडीओ बंद केला आणी CDPlayer चालु केला.”

निखील काही सेकंद अजुन थांबला असता तर कदाचीत त्याने श्रेयाचा आवाज ऐकला असता, तिचा ठावठिकाणा त्याला कळला असता. पण कदाचीत नशीबाला अजुन हे मान्य नव्हते.

****************************************************

१२ नोव्हेंबर, निखील आणी अनुची Engagement ची तारीख ठरली होती. निखील च्या मागे लागुन-लागुन सगळ्यांनी त्याची संमती मिळवली होती. निखील पुर्णपणे खुश नव्हता, पण त्याच्यापुढे दुसरा पर्यायही उरला नव्हता. नशिबाचा कौलच नाही असे समजुन त्यानेही शेवटी होकार दिला होता.

आज निखील आणी अनु एका मोठ्या मॉल मध्ये Engagement ची खरेदी करायला गेले होते. X-mas जवळ आल्याने मॉलही पुर्ण सजले होते. विविध ठिकाणी Sale, Discounts लागले होते. अनुला तर काय घेउ आणी कित्ती घेउ असेच झाले होते. तिने स्वतःची खरेदी तर केलीच होती पण निखीलसाठीचे कपडे, वस्तु वगैरे पण तिनेच पसंत केले होते. निखील चेहऱ्याव आनंद आणायचा प्रयत्न करत होता. पण मनामध्ये मात्र त्याचा आक्रोश चालुच होता. मनातल्या मनातच निखीलचे मन म्हणत होते:


” अश्कोंको हमने कई बार रोका,
फिर भी जाने क्यों आंखे धोका दे गयी,
भरोंसा तो था हमें अपने आप पर मगर,
उनकी यांद आंतेही ना जाने क्युं पलकें नम हो गयी”.

[क्रमशः]

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED