अ स्ट्रेंज थिंग - दि सायरन कॉल्स (8)

८. ट्रॅप्ड्! (बट हू?) -

मिस्टर वाघ त्या फॉरेनरला एका आलिशान हॉटेल स्वीटमध्ये घेऊन आला. तिनं स्वीटमध्ये आधीच असलेली शॅम्पेन फोडून मिस्टर वाघला ग्लास मध्ये ओतून देऊ केली. मिस्टर वाघनं तिचा हात बाजूला केला. ती समजली काय समजायचं ते आणि तिनं एलसीडी त्याच्या शॅम्पेनमध्ये सोडली. मात्र स्वतः कोकेन घेतलं. मिस्टर वाघनं शॅम्पेनचे घुटते घेत रोमँटिक म्युसिक चालू केलं. दोघे पुन्हा बॉल डान्स करू लागले. नाचता-नाचता त्यानं डान्स स्टाईल बदलली व पोल्स्का हा सेंस्युअस स्वीडिश कपल डान्स प्रकार त्यानं चालू केला. तशी ती पुन्हा दचकली. पण कोणतेही आततायी पाऊल न उचलता ती शांत राहिली. डान्स मध्ये त्याला साथ देत होती. तिनं मिस्टर वाघचा ग्लास पुन्हा भरून एलएसडीचा डोस वाढवला.
मिस्टर वाघवर एलसीडीचा परिणाम होऊ लागला होता. तशातही त्यानं त्या फॉरेनरला किस करण्याचा प्रयत्न केला, पण तत्पूर्वीच अनुषानं मागून येऊन फॉरेनरच्या डोक्यात ग्लॉकने जोराचा वारा केला. ती बेशुद्ध झाली.
"तू नेहमी असं का करतेस?" मिस्टर वाघ झिटलून ओरडला.
"थरकी!" मिस्टर वाघला बेडवर ढकलत ती रागानं बोलली.
आणि तिनं 'डायझेपाम' हे अँटीडोट ड्रग मिस्टर वाघला इंजेक्ट केलं. यामुळं त्याच्यावरील एलसीडीचा परिणाम उतरू लागला. पण डायझेपाम हे सिडेटिव्ह असल्यानं मिस्टर वाघला गुंगी आली. काही काळ तो झोपून राहिला. 
दरम्यानच्या काळात अनुषानं त्या स्वीडिश मुलीला बांधून ठेवलं.


सहा तासांनी मिस्टर वाघ पूर्ण शुद्धीत आला.
"तिला इतकं हार्ड मारण्याची गरज नव्हती!" तो तिला म्हणाला. 
"जोरात नाही मारलंय! आलीये शुद्धीत!" ती ठसक्यानं म्हणाली.
पाच दहा मिनिटांतच ती स्वीडिश मुलगी शुद्धीवर आली होती. मिस्टर वाघ सावरून एका खुर्चीवर बसला. म्हणाला,
"नेम, एलिस निल्सन. एज, ट्वेन्टी फॉर. फ्रॉम स्वीडन. आराईव्हड् हियर एट ट्वेन्टी नाईन्थ ऑफ जॅनव्हरी!"  मिस्टर वाघ  तिच्याकडं रोखून पाहत म्हणाला, 
"सो मिस सायरन, व्हाय आर यू हियर? आयेम प्रीटी शोर नॉट टू किल रँडम गाईज!" 
स्वतःचा बचाव करण्यात असमर्थ जाणून ती तिच्या वागण्याचं स्पष्टीकरण देऊ लागली,
"सिक्स मंथ्स एगो, माय लिटल सिस्टर ओलिव्हिया केम हियर फॉर अ ट्रिप, अँड सम वुमनाईझ्ड् ड्रग एडिकट्स रेप्ड् हर! नो वन इव्हन द पोलीस अँड युअर गव्हर्नमेंट डिड नथिंग अबाऊट धिस! सो आय डिसाईडेड् तो टेक रिवेंज फ्रॉम एंटायर पर्वटेड् वुमनाईझर्स अँड ड्रग एडिक्ट्स. सो नो अदर गर्ल विल बिकम देअर प्रे! अँड आय केम हियर..." आणि ती हुंदके देऊन रडू लागली...
"नॉट एर्व्हीवन इन इंडिया इज सेक्सहॉलिक रेपिस्ट!" मिस्टर वाघ आवाजात कठोरता आणत बोलला.
"ओह प्लिज!" एलिस उपहासाने म्हणाली,
"द होल वर्ल्ड् नोज दॅट युअर कंट्री इज नॉट सेफ फॉर विमेन!" तिने राग व्यक्त केला.
"इज दॅट सो? देन हाऊ द हेल आर वी इंडियन विमेन लिविंग इन हिअर?" अनुषा झणक्यानं म्हणाली. 
एलिसनं भारताचा असा केलेला अपमान तिला सहन झाला नाही.
"हं!" एवढीच उपहासाची प्रतिक्रिया एलिसनं त्यावर दिली. ती अजूनही रागातच होती. 
हे पाहून मिस्टर वाघला रहावलं नाही. 
"यू ऑल आऊट साईडर्स आर ओन्ली टेकिंग द स्टॅटिस्टिक्स अँड द रेट डिजिट्स इन युअर माईंड! बट यू फरगॉट टू लूक अफ्टर द रेशो! आवर पॉप्युलेशन इज हायर, सो इट लुक्स लाईक हिअर आर लॉट्स ऑफ क्राइम्स अँड रेप इनसिडेंट्स हॅपेनिंग इन इंडिया. बट वेन यू लूक एट द रेशो, वी आर फार बिहाइंड दॅन यू, इन टर्म्स ऑफ रेप केसेस… युअर कंट्री स्वीडन, होल्ड्स द टायटल ऑफ सेकेंड मोस्ट हायस्ट रेपिस्ट कंट्री इन द वर्ल्ड आफ्टर साऊथ आफ्रिका! विथ ड्यु कन्सन अँड कोंडोलेंसेस आबाऊट व्हॉट हॅपेंड टू यू अँड युअर सिस्टर, स्टॉप जगिंग अस ऑन द नंबर्स!" मिस्टर वाघनं एलिसला खडसावलं.
आणि ती अधिकच मोठे हुंदके देत रडू लागली...

***

रेट करा आणि टिप्पणी द्या

Verified icon

Varsha Gayal 3 महिना पूर्वी

Verified icon

आशिष 4 महिना पूर्वी

Verified icon

Nilam 4 महिना पूर्वी