५. फाऊंड अ स्ट्रेंज थिंग -
अनुषाच्या घरी परतली. आणि मिस्टर वाघ त्याच्या नव्यानं बुक केलेल्या एका फाईव्ह स्टार हॉटेल स्वीट मध्ये...
अनुषाच्या घरी, लॅबमध्ये अनुषानं ते रक्त टेस्ट केलं.
रिजल्ट पाहून ती शॉक्ट होती. तिने लगबगीने मिस्टर वाघला तिच्या घरी बोलावून घेतलं आणि तिने तो रिपोर्ट मिस्टर वाघला दाखवला. तो रिपोर्ट नीट पाहून...
"ऍज आय थॉट!" मिस्टर वाघ उद्गारला.
"काय?" अनुषानं गोंधळून विचारलं,
"म्हणजे तुम्हाला याचा अंदाज होता?"
"येस! तुझ्या टेस्टिंग मध्ये काही चूक नाही. द ब्लड कंटेन्स 'एल.एस. डी.!"
"यु मिन, लायसेर्जिक एसिड डायथेलॅमाईड!?"
"येस!"
"बरं झालं बारा तासांच्या आधी आपल्याला त्याच्या रक्ताचं सॅम्पल मिळालं. नाही तर त्याची केसं मिळवावी लागली असती. जे आता तितकं पॉसिबल नाही. पण हेअर फोलिकल टेस्टच्या माध्यमातनं ९० दिवसांपर्यंत आपल्याला बरेच ड्रग्स डिटेक्ट करता येतात."
"त्याची केसं मी त्याच्या रक्ताचं सॅम्पल घेतानाच घेतली होती. कारण त्याला मरून किती वेळ झालाय हे आपल्याला कुठं माहीत होतं. तू ब्लड टेस्ट करत होतीस तेवढ्यात मी त्याच्या केसांची टेस्ट पण केली आहे." मिस्टर वाघ म्हणाला,
"रक्त आणि केस दोन्हीच्या टेस्ट मध्ये एलएसडीच आहे. एस पर माय डिडक्शन, दे ऑल हॅड् बिन ड्रग्ड् बिफोर देअर डेथ्स विथ एलएसडी!"
"या एलएसडीनं होतं काय?" मी मिस्टर वाघला मध्येच थांबवत विचारलं.
"भूक मंदावणं, मळमळणं, खूप झोप येणं. इ. कॉमन इफेक्ट्स आहेत. यामुळं डोळ्यांची बुबूळं फैलावतात, कमजोरी येते, हायपोथर्मियाचा त्रास होतो. रक्तातली शुगर व हृदयाची गती वाढते. ब्लडप्रेशर व बॉडी टेम्प्रेचर वाढतं आणि यामुळं तोंड सुखून शरीर घामानं थबथबतं. पण सर्वांत महत्त्वाचं म्हणजे आपल्या सभोवतालच्या जगाची व स्वतःच्या भावनांची जाणीव बदलते. हे घेणाऱ्या व्यक्तीला हल्युसिनेशन्स होतात. म्हणजे वेगवेगळे भास होऊ लागतात. भूतकाळातील काही घटना आठवतात. आणि हा परिणाम एलसीडी घेतल्यानंतरही बरेच दिवस टिकू शकतो. हे होतं कारण हे ड्रग 'सेसोटोनिन' नांवाच्या मेंदूच्या रासायनिक संदेशवाहकाची नक्कल करते. सेसोटोनिन सामान्यपणे 'फिल् गुड' केमिकल म्हणून पण ओळखलं जातं."
"मग काय एलएसडीनं लोकांना मॅनिपुलेट केलं जाऊ शकतं?" मी उत्सुकतेनं विचारलं.
"नाही! पण त्या मुलीनं या ड्रगमुळं होणाऱ्या हल्युसिनेशन्सचा योग्य पद्धतीनं उपयोग करून त्या - त्या व्यक्तींना त्यांच्या इच्छेनुसार आत्महत्या करण्यासाठी भाग पाडलं. कोणाला त्याची अत्युच्च भीती वाटत असलेली घटना समोर ठेऊन, तर कोणाला एखाद्या गोष्टीची अभिलाषा आहे हे ओळखून त्या प्रमाणं तसं चित्र तयार करून."
थोडावेळ थांबून पुढं तो बोलला,
"ते ड्रग मॅनिपुलेटीव्ह नव्हतं; ती मुलगी होती. तिनं फक्त त्या ड्रगच्या गुणवत्तेचा वापर करून घेतला होता!" मिस्टर वाघ शांतपणे बोलला.
अशी घटना एखादी मुलगी घडवून आणू शकते? केवढी आहे ही मुलगी?! माझ्याच तर वयाची आहे! इतक्या लहान वयात असून ती हे का करते आहे? तेही इतक्या प्रभावीपणे! हीच गोष्ट मला अविश्वनिय होती... मी तसं मिस्टर वाघ समोर बोललो देखील. त्यावर तो म्हणाला,
"एव्हरी वुमन इज मॅनिप्युलेटिव्ह! डोन्ट अंडरेस्टिमेट हर! शी कॅन मेक यू ऑर डिस्ट्रॉय यू! इट्स अप टू हर! विमेन आर सो डेंजरस! डोन्ट यू नो?!" आणि तो गूढ हसला.
आज तो भेटायला आल्यापासून पहिल्यांदा त्याला मी असं हसताना पाहिलं होतं.
"हो!" मी गंभीर होत एवढंच उत्तर दिलं.
कारण त्याचा हा प्रश्न मला माझा भूतकाळ समोर आणून गेला होता... माझ्या प्रियसी पासून दूर राहणं हा माझा वैयक्तिक निर्णय होता यात तिचा काहीच दोष नव्हता. आणि हे मिस्टर वाघ पण जाणून होता... तरी एलसीडी सारखं त्याला इथं काम करायचं होतं...
पण त्याच्या या प्रश्नानं एवढं मात्र मी समजून गेलो, की याचा हा प्रश्न म्हणजे पुढं काहीतरी भयंकर वाढून ठेवलंय याची ती खूण होती...
पण भूतकाळाची पटलं बाजूला सारत मी पुन्हा मिस्टर वाघ सांगत असलेल्या घटनेवर विचार करू लागलो आणि,
"हॉरीबल आहे हे...!" मी बोलून गेलो.