A Strange Thing - The Siren Calls - 11 books and stories free download online pdf in Marathi

अ स्ट्रेंज थिंग - दि सायरन कॉल्स (11)


११. अनादर डेविल गॉट दि पनिशमेन्ट -

रात्रीचे दोन वाजता मिस्टर वाघनं नैनी तलावा जवळ इन्स्पेक्टर केदार बिश्तसाठी मोठा थाट मांडला होता.
"फायनली सुसाईड केसेस का सिलसिला खत्म हुआ!" मिस्टर वाघ केदारच्या ग्लासात व्होडका ओतत म्हणाला.
"हा भाई, नाक मैं दम कर रखा था लोगों ने ओर गव्हर्नमेंट ने भी! बट ऑल थँक्स टू यू!" झिंगलेला केदार ग्लास हवेत उंचावत म्हणाला.
आधीच तो घेऊन आला होता, त्यात मिस्टर वाघ अजून त्याला ट्रीट देत होता.
"पर मैंने सुना हैं, की आप पहले से उस लड़की को जानते थे!" मिस्टर वाघनं बॉम्ब फोडला.
केदार प्यायचं थांबला. त्यानं मिस्टर वाघकडं कटाक्ष टाकला,
"आप ऐसा कैसे कह सकते हैं?" त्यानं शंकीत स्वरात पण दरडावल्या सारखं विचारलं.
वातावरण निवांत करण्यासाठी मिस्टर वाघ हसला,
"बस मैंने सुना था! अब जो लोग कहते हैं वो सबकुछ तो सही नहीं होता. इतना तो मैं भी जानता हूँ।"
त्यानं अर्धा झालेला केदारचा ग्लास काठोकाठ भरला.
"हा. हा।" म्हणत केदारनं ग्लास ओठाला लावला.
दारूची नशा वाढली तसा केदार पाण्यात पडला. मिस्टर वाघनं त्याला पोटावर वळवला व त्याचं तोंड पाण्यात बुडवून ठेऊन तेथून काढता पाय घेतला.

मग काय?!
अटॉप्सी रिपोर्ट; दारूच्या नशेत पाण्यात बुडून मृत्यू! मिस्टर वाघनं केदारला घोटाभर पाण्यात बुडवून मारला होता...

"आत्तापर्यंत त्याला निर्वाण प्राप्त पण झालं असेल!" तो मस्करीत बोलला, पण अचानक त्यानं विषय बदलला,
"मला सांग सूरज, नैनितालच्या आख्यायिकेनुसार तिथल्या लोकांना निर्वाण म्हण किंवा मोक्ष म्हण मिळवणं किती सोपं आहे, तरी कोणीच अजून निर्वाण कसं मिळवलं नाही?"
मी उत्तर देणार तेवढ्यात त्यानंच त्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. म्हणाला,
"कारण मृत्यूची भीती. गंम्मत बघ हं; एकंदरीत सगळ्यांनाच स्वर्ग तर हवा असतो, पण त्यासाठी मरायची इच्छा मात्र कोणाची नसते. व्यवहारी जगात पण बघ, श्रीमंत तर सगळ्यांना व्हायचं असतं, पण त्यासाठी धाडस आणि कष्ट करण्याची तयारी मात्र कोणाची नसते!
"हो! स्वर्ग आणि मोक्ष वेगवेगळ्या संज्ञा आहेत, पण लोकांसाठी त्या एकच. म्हणून तुलना केली. स्वर्गात भूक आहे. त्या भुकेला शमवणाऱ्या सुविधा आहेत, पण मात्र पुण्य संचय संपला, की पुन्हा जन्म! भुकेचं व त्यातून निर्माण होणारं दुःखाचं चक्र काही संपत नाही...
तर मोक्ष प्राप्ती नंतर जन्म नाही. म्हणून भूकच नाहीशी होते. त्यामुळं दुःख आपोआपच मिटतं. तरी लोक मोक्षासाठी प्रयत्न करत नाहीत. ते भुकेमध्ये बरबटलेलेच राहतात..." कोठेतरी हरवल्यासारखं बोलत त्यानं पुन्हा एकदा मला प्रश्न केला,
"तुला काय वाटतं, खरं निर्वाण कशात आहे?"
पण पुन्हा त्यांनंच उत्तर दिलं,
"फलाशारहित कर्म करणं हेच तर निर्वाण आहे! हाच मोक्ष! हं! लोकांना वाटतं मोक्ष मेल्यानंतर मिळवायची गोष्ट आहे..."
हा मिस्टर वाघ मी पहिल्यांदाच पाहत होतो. त्याच्या बोलण्यावरून लक्षात आलं, की तो सुरुवातीपासूनच किती स्थितप्रज्ञ आहे. जितका कर्मयोगी; तितकाच ज्ञानी...!
तो बोलतच होता,
"माणूस आपल्या सत्कर्माने इथंच स्वर्ग तयार करू शकतो. आणि त्या स्वर्गापासून अलिप्त राहून मोक्षही इथंच प्राप्त करू शकतो. स्वर्ग व मोक्ष दोन्हीच तर आपल्या हाती आहे. पण इतकी साधी गोष्ट कोणाच्याच लक्षात येत नाही! अडाणी लेकाचे!"
मिस्टर वाघला मी नेहमीच दोषी ठरवू पाहत असतो, पण त्याच्या या बोलण्याने माझ्या लक्षात आले, की तो नि:स्वार्थी कर्म करतो. समाजाला संतुलित ठेवण्यासाठी, लोक कल्याणासाठी तो कर्म करत असतो. कोणत्याही व्यक्तिगत लाभ हानीला डोक्यात ठेऊन तो कर्म करत नाही. तो निस्वार्थपणे सत्यासाठी त्याचं कर्तव्यपालन करतोय. सत्य हाच त्यांचा धर्म!
तो फक्त सत्यान्वेषी नाही, तर तो सत्य संरक्षक आहे! तो कर्मवादी आहे आणि कर्मसंयासीही! आणि म्हणूनच तो सर्व पापमुक्त आहे!
एलिसनंही तेच केलं. आणि म्हणूनच एलिस मिस्टर वाघच्या नजरेत निष्पाप आहे!!!

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED