तू माझा सांगाती...! - 5 Suraj Gatade द्वारा मानवी विज्ञान मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

तू माझा सांगाती...! - 5

माणूस मेल्यानंतर त्याची मेमरी प्रिजर्व करून ठेवली, तर आपण अमर होऊ हा त्यामागील विचार होता. नंतर व्हर्च्युअल रिएलिटी व होलोग्रामच्या माध्यमातून ती व्यक्ती पुन्हा रिक्रिएट करता येते. किंवा मग ती मेमरी एखाद्या रोबोट मध्ये इन्सर्ट करून त्या माणसाला रिवाईव्ह केले जाते.
२१ व्या शतकातच क्लोनिंगवर बंदी घातली आहे. ती अजूनही तशीच आहे. त्यामुळे अमर होण्यासाठी हा पर्याय लोकांनी शोधून काढला होता. पण या मार्गातून अनेक कुख्यात गुन्हेगार सुद्धा मेल्यानंतर पुन्हा जिवंत होऊन आपापली कुकर्मे चालू ठेवत आहेत हे समोर आल्यावर मग जगभरातील सर्व सरकारनी यावर आपला अंकुश आणला होता.
सर्व देशांनी यूनाईटेड नेशन्सच्या अध्यक्षतेखाली या संदर्भात आपापल्या देशांत नवीन विभाग तयार करून कोणाला रिवाईव्ह होण्यास परवानगी द्यावी व कोणास नाही हे या अंतर्गत पाहिले जाऊ लागले. जनार्दन सारंग यांचा रेकॉर्ड चांगला होता. त्यामुळे त्यांना परवानगी मिळायला तशी काहीच हरकत नव्हती. आणि म्हणून हा धागा आपल्याला लीड करेल असे वाटून या पर्यायाचा विचार व त्या विचारावर अंमलबजावणी झाली होती...
पण यासाठी जनार्दन सारंगनी कधीच आपलं नांव नोंदवलं नव्हतं हे तपासाअंती समोर आलं. कदाचित अमर होण्यात जनार्दन सारंग यांना काही रस नसावा... त्यामुळे कौन्सिलचा तो प्रयत्न निष्फळ ठरला होता. सर्वच पुन्हा शून्यावर येऊन पडले होते... काय करावे कोणालाच सुचत नव्हते... नॅशनल कोर्ट ऑफ जस्टीसने दिलेला वेळ संपत आला होता. म्हणून नाराजी सोबतच वैतागाची भावना देखील इन्वेस्टीगेशन कौन्सिल मध्ये निर्माण झाली होती...
दुसऱ्या बाजूने विचार चालू झाला. विक्टरला हिप्नॉटाईझ करून कोणी त्याच्या कडून हे घडवून आणलं नसेल ना? असा विचार घेऊन शोध चालू झाला. विक्टर एक रोबोट असल्याने एखादा वायरस त्याच्यात इंप्लान्ट करून हे करता येणं शक्य होतं... आणि हे सत्य असेल, तर... तर मग संपूर्ण जगाला खरंच धोका होता. त्यामुळे तर सगळ्यांच्या पोटात अजूनच गोळा आला. आणि इन्वेस्टीगेशन कौन्सिलच्या हालचाली अजूनच गतीने वाढल्या...

तिकडे बाहेरील जगात, बंधने असून देखील लोक रोबोट्स विरुद्ध उठाव करतच होते. परिस्थिती हाताबाहेर जात होती. रोबोट पोलीस लोकांना काही करू शकत नव्हते. तसेच मानव पुलिस देखील... कारण परिस्थिती अधिकच चिघळण्याची भीती सर्वांनाच वाटत होती. म्हणून इंटरनॅशनल कोर्टकडून आदेश असून देखील या लोकांना आळा घालता येत नव्हता...
पण विश्वन्यायालयाने ज्या भीतीपोटी जगभरात आचारसंहिता लागू केली होती, ती देखील अनाठायी नक्कीच नव्हती. ऍडव्हान्स्ड् 'एआई'मुळे रोबोट्समध्ये भावना निर्माण झाल्या होत्या. सर्व रोबोट्स आता मानवासारखेच प्रत्येक गोष्टीला रिएक्ट करू शकत होते. त्यामुळे जर का एकदा या सर्व रोबोट्सनी आपला संयम सोडला, तर मानव आणि यंत्रमानव यांच्यात युद्ध व्हायला वेळ लागणार नव्हता. आणि विजयी कोणीही होवो, पण नुकसान मानवजातीचेच झाले असते आणि ही पृथ्वी व या भूतलावरील सर्वच जीव यात होरपळून गेले असते... पण हा विचार प्रशासन करत नव्हते. कारण त्यांचीही भीती दुसऱ्या टोकाची असली, तरी तीही काही खोटी ठरत नव्हती... काय होणार हे कोणालाच समजत नव्हते...
......................................…………………………........................................................................................

आणि तिकडे जेल मध्ये ठेवलेला विक्टर, आपलं मौन तोडायला काही तयार नव्हता... त्याचं स्वतःचंच चिंतन चालू होतं... आणि त्याच्या स्मृती पटलावरील चित्र होतं, ते फक्त त्याच्या एम्प्लॉयरचं; जनार्दन सारंग यांचं... दोघांनी सोबत घालवलेले महत्त्वाचे क्षण त्याला दिसत होते...
.
.
.

"साहेब, मी आपला नवीन नोकर."
जनार्दन सारंग तयांच्या वनराईत बागकाम करत असताना एक मानव सदृश्य रोबोट त्यांच्या समोर येऊन उभा राहिला होता,
"आपण रोबोट्स एट युअर सर्व्हिसच्या आमच्या वेबसाईटवर रिक्वायरमेन्ट एप्लाय केल्यानंतर आपल्या त्या इच्छेनुसार मला बनवून आपल्याकडे पाठवण्यात आले आहे!" त्या रोबोटने जनार्दन सारंगनी त्याच्याकडे पाहिल्यावर आपलं वाक्य पूर्ण केलं.