तू माझा सांगाती...! - 3 Suraj Gatade द्वारा मानवी विज्ञान मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

तू माझा सांगाती...! - 3

खरं तर पुरावे मिळाले नाहीत, तर तो तसाही मुक्तच होईल... हा विक्टर खूप धूर्त असला पाहिजे असा निष्कर्ष कौन्सिलने काढला. भारतीय संविधानातील आर्टिकल 20 नुसार कोणत्याही आरोपीला त्याच्याविरुद्ध साक्ष देण्यास सक्ती केली जाऊ शकत नाही. याचा अर्थ शांत राहण्याचा पूर्ण अधिकार संविधानानेच विक्टरला दिला आहे. आणि सर्व देशाच्या कॉन्स्टिट्युशनचा मान राखणं हे इंटरनॅशनल कोर्टला भाग असल्याने त्यांना विक्टरवर काही सक्ती करता येत नव्हती. त्यामुळे चौकशी समितीही विक्टरवर बोलण्यासाठी दबाव टाकू शकत नव्हती... के करायचं ते त्यांचं त्यांनाच करावं लागणार होतं... बहुदा संविधानाची सर्व माहिती विक्टरला असावी आणि तो त्या तरतुदीचा पुरेपूर वापर करून घेतोय असे इन्वेस्टीगेशन कौन्सिलला वाटत होते... शिवाय या सर्व संस्थांना भीती अशी होती, की...
बाकीचे जाऊ देत, उद्या यानेच आपल्या विरुद्ध युद्ध पुकारले, तर इतर रोबोट्स त्याच्या आवाहनाखाली एकत्र येतील आणि असे झाले, तर आपली काही खैर नाही ही भीती सर्वांनाच भेडसावत होती.
विक्टरनेच खून केलाय हे सिद्ध करता येत नसले, तरी खून तर झाला होता. आणि तो पण वेळेत नोंदवण्यातही आला होता... जनार्दन सारंग यांच्या एका शेजाऱ्याने जनार्दन सारंग यांना मरून पडलेले व त्यांच्या बाजूला विक्टर विळा घेऊन उभा हे दृश्य सर्वांत आधी पाहिले होते. आणि त्यानेच पोलिसांना बोलावले होते. जनार्दन सारंग मरून खूप वेळ झाला होता. नक्कीच सांगायचं झालं, तर दहा तास! तरी तेवढा वेळ विक्टर त्यांच्या मृतदेहाच्या समोर तो रक्तालेला विळा घेऊन उभा होता. जमिनीवरचं व गवतावर साचलेलं रक्त वाळलं होतं. आणि तसं ते विक्टरच्या हातातील विळा वरचं सुद्धा...
पण खून करून देखील विक्टर इतका वेळ तो तितेच का उभा होता? का नाही तो पळून गेला? कोणती गोष्ट होती, जी त्याला तेथे थांबवून ठेवण्यास बाध्य करत होती...?

जनार्दन सारंग यांच्या शेजाऱ्याने ती घटना पाहिली त्यावेळी विक्टरची नजर त्याच्यावर पडली होती. आपल्याही जीवाला धोका होईल म्हणून तो जीव तोडून तेथून पळाला होता.
पण नंतर स्वतःच्या जीवाची भीती न बाळगता जनार्दन सारंग यांच्या शेजाऱ्याकडून वेळेत गुन्हा नोंदवला गेला होता, म्हणून मग झालेल्या गुन्ह्याकडे स्वतः कोर्टच कसं काय दुर्लक्ष करणार होतं? आणि तेही इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टीस...
कारण ही घटना दिसते तितकी साधी नक्कीच नव्हती. एका रोबोटने आपल्या नियमांचं उल्लंघन केलं होतं. त्यामुळे हा एक जागतिक प्रश्न होऊन बसला होता... कुणी सांगावं; उद्या हेच रोबोट्स कायदे, नियम उलढवून लावतील आणि हा मानव जातीसाठी मोठा धोका ठरेल. आधीच ते माणसासारखे बनत चालले आहेत, त्यात माणसाचे दूर्व्यवहार देखील त्यांच्यात आले व ते मॅलफन्गशन झाले, तर आज आपण त्यांना नोकर म्हणून वागवतोय, उद्या ते आपल्याला गुलाम बनवतील...!
माणसाला आधीच हयात असलेल्या इतर प्रजातींसोबत कधी जुळवून घेता आलेलं नाही, आणि त्यावर आता हे संकट...
विक्टर सारखं उद्या सर्वच रोबोट्स वागू लागले, तर क्राईम रेट्स मोठ्या प्रमाणात वाढतील... ही पण एक भीती... माणसानं रोबोट्सना आर्टिफिशियल इंटेलिजन्स देऊन व कायद्यामध्ये आपल्या सोबतचं स्थान देऊन हे 'मॅन मेड डिजास्टर' तर ओढवून घेतलं नाही ना...?
पण रोबोट्स खोटं वागत नाहीत! खोटं बोलत नाहीत! त्यांना तसंच बनवलं गेलंय. म्हणून तर विक्टरने गप्प बसण्याचा मार्ग अवलंबला होता...

माणसांकडून कोणी मारलं गेलं, तर त्याला 'सेंटन्स टू डेथ' ही शिक्षा सुनावली जाते. पण रोबोट्स?... त्यांना कुठली शिक्षा देणार?... रोबोट्ससाठी तशी तर काही तरतूदच नाहीए! तसा काही कायदाच नाही. कारण रोबोट्स कोणाला मारण्यासाठी बनवलेच गेलेले नाहीत...
केस लगेचच न्यायालयासमोर उभी राहिली होती, आणि संपूर्ण जगाचे लक्ष या घटनेकडे लागून राहिले होते...
ही प्रस्तुत बातमी समजताच काही आततायी लोकांनी विनाकारण आणि अनाठायी भीती पोटी काही रोबोट्सना फोडून टाकले होते. यात काही समाज विघातक घटक होतेच. म्हणजे या लोकांना समाजाशी काही देणं घेणं नसतं. फक्त तोडफोड करून आणि दुसऱ्याला इजा करून यांना असुरी आनंद घ्यायचा असतो. अशाही बऱ्याच लोकांनी मानवतेच्या रक्षकांचा बुरखा ओढून निष्पाप रोबोट्सना तोडून टाकले होते. रोबोट्सच्या डेव्हलपमेंट व इफिशियन्सीमुळे नोकऱ्या गेलेले लोकही आपला राग या घटनेच्या आडून रोबोट्सवर काढू लागले.