"हाताला विळा टाक आणि शरण ये! आय रिपीट! थ्रो दि वेपन अँड सरंडर!"
...
"ऑफिसर्स, सिन्स द नॉन-ह्यूमन डजन्ट ओबे! मेक एन ओपन फायर!"
"फाय्...!"
........................................………………………….....................................................................................
"होल्ड द फायर! इफ यू फायर ऑन इट! इट विल बी द वायलेशन ऑफ दि युनिव्हर्सल लॉ ऑफ नॉन-ह्यूमन बिईंग्स!"
"स्टॉप! सुपिरिअर्स डोन्ट वॉन्ट अस टू शूट इट!"
...
"नॉन-ह्यूमन थ्र्यू द वेपन. अरेस्ट इट अमिडीएट्ली!"
.
.
.
वर्ल्ड्स क्रिमिनल कोर्ट ऑफ नॉन-ह्यूमन -
"जेव्हा आम्ही जनार्दन सारंग याच्या घरी पोहोचलो, तेव्हा ते त्यांच्या वनराईत पडले होते आणि हा रोबोट त्यांच्या समोर उभा होता, हातात विळा घेऊन. त्याचे हात व हातातील विळा जनार्दन सारंग यांच्या रक्ताने माखला होता. आपण हे समोरील स्क्रिनवर पाहू शकता..."
खूनाचा आरोप असणाऱ्या रोबोट विरुद्ध जबानी देताना त्याला कॅप्चर करणाऱ्या ऑफिसर्सचा टीम कमांडर जजना सांगत होता. लँग्वेज कन्व्हर्टींग डिव्हाईसच्या माध्यमातून कोर्टात उपस्थित सर्वांना त्यांच्या-त्यांच्या भाषेत त्या लोकांना ऑफिसर काय बोलतोय ते त्याच क्षणी अनुवादित होऊन ऐकू येत होतं.
त्याचं बोलणं थांबल्यावर जजसहित त्या कोर्टात उपस्थित सर्वांच्या नजरा त्या व्हर्च्युअल स्क्रिनवर स्थिरावल्या.
ऑफिसर्सच्या प्रोटेक्टिंग सूट्समध्ये असणाऱ्या मिनी कॅमेराज मध्ये जे-जे काही रेकॉर्ड झाले होते, ते त्या फिरत्या स्क्रिनवर सगळ्यांना पहायला मिळत होते...
स्क्रिनवर -
एक माणसा सारखा दिसणारा साधारण साडे पाच फूट उंचीचा डॅमेज झालेला रोबोट (ह्युमनॉईड) हातात विळा घेऊन उभा होता.
खाली पासष्ट वर्षांचे जनार्दन सारंग रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.
आपल्या कमांडरच्या आदेशानुसार त्याच्या सह इतर नऊ ऑफिसर्सनी आपल्या गन्स समोरील रोबोटवर ताणल्या...
त्याचवेळी वायरलेस वरून वरिष्ठांचे आदेश आल्यावर फायरिंग हॉल्ट करण्यात आले. रोबोटने हातातील शस्त्र त्यागले होते. विळा खाली असलेल्या फावड्यावर पडलेला स्पष्ट आवाज झाला. इतक्या तणावपूर्ण वातावरणात सुद्धा इतकी शांतता होती, की विळाचा व फावड्याचा टण्णकार सर्व ऑफिसरच्या कानात घुमला.
कमांडरने त्याच्यातील एका ऑफिसरला पुढं जाण्याची खूण केली. तसा तो ऑफिसर पुढं झाला आणि त्याने त्याच्या इलेक्ट्रॉशॉक वेपनने रोबोटच्या चार्जिंग पॉईंटवर ओव्हर चार्जड् शॉक दिला आणि तो रोबोट डिसफन्गशन होऊन खाली कोसळला.
"जसं की मान्यवर जज व ज्युरी मेम्बर्सनी पाहिलं, हा रोबोट आपल्या मालकाला मारताना दिसत आहे..." जबानी देणाऱ्या कमांडरला मध्येच थांबवत एक ज्युरी मेंबर मध्येच थांबवले. तो म्हणाला,
"यावरून या रोबोटने त्यांना मारले आहे हे सिद्ध होत नाही!" तो त्याच्या भाषेत बोलला होता.
"यावर एकच उपाय आहे, माननीय जज साहेबांनी रोबोटच्या इंटेरोगेशनची व त्याची मेमरी चिप स्कॅन करण्याची परवानगी द्यावी." कमांडर म्हणाला.
"इंटरनॅशनल रोबोट राईट्स लॉ नुसार रोबोटच्या इच्छेविरुद्ध आपण त्याची मेमरी नाही चेक करू शकत!" रोबोट राईट्सची सुरक्षा पाहणाऱ्या व विक्टरची केस लढत असलेल्या रोबोट प्रोसिक्युटरने रोबोट्स लॉ आर्टिकल 26 ची सर्वांना आठवण करून दिली.
कोर्ट कडूनच विक्टरला हा वकील दिला गेला होता. आज या जगात माणसासोबतच रोबोट्ससाठी देखील समान नागरी कायदे तयार केले गेले आहेत. एका माणसाला जे अधिकार आहेत, ते सर्व रोबोट्सना देखील लागू असल्याने कोणत्याही रोबोटला मनमानी शिक्षा करता येत नाही...
आणि म्हणूनच ही साधारणशी केस इतकी जटिल होऊन बसली होती. विक्टरने खून केला आहे हे समोर होतं, पण ते सिद्ध करता येत नव्हतं...