प्यार मे.. कधी कधी (भाग-११) Aniket Samudra द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

प्यार मे.. कधी कधी (भाग-११)

“वन्नक्कम थरुन..” आमच्या टीमचा बॅंगलोरचा लिड, स्वामी, मला वेलकम करत होता
“अं.. स्वामी, इट्स तरुण, नॉट थरुन..”
“येस्स येस्स.. थरुण..प्लिज कम.. प्लिज कम..”

ह्या लोकांना ‘त’ शब्दाचा उच्चार जमतच नाही बहुतेक, ‘नितीन’ चं ‘निथीन’, ‘रोहीत’चं ‘रोहीथ’ करतात तसं माझं ‘थरुन’ करुन टाकलं होतं. मी लगेचच त्याला करेक्ट करण्याचा नाद सोडुन दिला.

पुढचा बराच वेळ फ्रेशर्सशी इंट्रो, जुन्या प्रोजेक्ट्सवरील कलीग्ज, स्किप-लेव्हल मॅनेजर्स ह्यांच्याशी मिटींग्जमध्येच गेले. सकाळी प्रितीशी बोलण्याच्या नादात फ्लाईटमध्येही काही खाल्ले नव्हते, त्यामुळे भयंकर भुक लागली होती. मग १२.३०लाच लंचब्रेक घेतला.

कंपनीचा कॅफेटेरीया सॉल्लीड होता, जणु काही एखादा लाऊंजच. फुट-थंपींग गाणी चालु होती, गेम-एरीया ओसंडुन वाहात होता. वेगवेगळ्या प्रकारच्या खाण्याच्या प्रकारचे सेक्शन्स होते.

“व्हॉट विल यु हॅव थरुन?”, स्वामीने विचारले, “ट्राय आऊट धिस कन्नडा स्पेशल सेक्शन, यु विल लव्ह इट..”
“नो, इट्स ओके, आय विल हॅव पंजाबी..”

अहुजा नामक सपोर्ट-स्टाफने पंजाबी काऊंटरवर माझं स्वागत केलं.

“व्हॉट विल यु हॅव् सर?”
“आप बताओ, क्या स्पेशल है..?”
“वैसे तो पंजाबी खाने मै ना, बहोत व्हरायटी है जी, बट आपने अगर कभी खाया ना हो तो, मै जी बोलुंगा आप ‘सरसो दा साग’ और ‘मक्की दी रोटी’ खांके देखो…”
“जो आप कहे.. खिलाईये..”

काही मिनीटांमध्येच ऑर्डर सर्व्ह झाली.. दिसायला तरी मस्त दिसत होतं. मी लगेच एक फोटो काढुन प्रितीला व्हॉट्स-अ‍ॅप वर पाठवला.

“वॉव्व.. माऊथ-वॉटरींग.. आज काय स्पेशल एकदम? मला वाटलं तु बॅंगलोरला म्हणजे डोसा / इडलीच खातं असशील..”, प्रितीचा थोड्याच वेळात रिप्लाय आला

“आय लव्ह पंजाबी….. फुड.. “, पंजाबी आणि फुडच्या मध्ये मुद्दाम स्पेस देत मी म्हणालो..
” गेस व्हॉट”
“व्हॉट?”
“आय एम हॅवींग पुरण-पोळी, आज नागपंचमी ना.. आय लव्ह महाराष्ट्रीयन….. फुड.. ”

माझ्या चेहर्‍यावर आपसुकच हास्य उमटलं कारण माझ्यासारखंच प्रितीने महाराष्ट्रीयन आणि फुड मध्ये स्पेस दिली होती..

“दॅट वॉज रिअली स्मार्ट..” मी विचार केला

“अनीथींग फनी थरुन?”, मला हसताना बघुन स्वामीने विचारलं
“नो नथींग.. जस्ट अ व्हॉट्स-अ‍ॅप फ़ॉरवर्ड..”

नंतर अजुन दोन-चार जणं ऑफीसमधले लंचला जॉईन झाले आणि प्रितीशी बोलणं तेथेच खुंटलं. बाकीची लोकं समोर असताना मी व्हॉट्स-अ‍ॅपवर बोलत बसणं ठिक दिसलं नसतं.

जेवणानंतर लगेचच काही मिटींग्ज प्लॅन होत्या आणि संध्याकाळपर्यंत मी पुरता त्यात अडकुन गेलो.


संध्याकाळी हॉटेलमध्ये चेक-इन केले तेंव्हा दिवसभराची बक-बक करुन पूर्ण थकून गेलो होतो, पण तरीही मनातून कुठेतरी फ्रेश वाटत होते. गरम पाण्याने मस्त अंघोळ करून आलो तेंव्हा बाहेर अंधारून आले होते आणि पावसाला सुरुवात झाली होती.

खिडकीच्या काचा लावून घेतल्या आणि हिटर चालू केला. पाच मिनिटांत खोली मस्त उबदार होऊन गेली. खिडकीच्या काचांवर बाष्प जमा झाल्याने बाहेरचे दिवे आणि पावसाचे काचेवर साठलेले थेंब धुसर दिसत होते.

घड्याळात साडे-आठ होऊन गेले होते. रूम सर्व्हिसला फोन करून चायनीजची ऑर्डर देऊन टाकली.

बेडवरच्या थंडगार पडलेल्या पांढर्‍या शुभ्र दुलईत शिरलो आणि प्रितीला मेसेज केला, “आहेस का?”
“किचन मध्ये , ९.३० ला येते, ओके?”
“ओके”

९.३० पर्यंत एक एक मिनिटं मोजत वेळ काढला. मधल्या वेळात चायनीज येउन गेले. थंडीत एक मस्त स्कॉच मारायची इच्छा होती, तसेही सगळे एकस्पेन्सेस कंपनी पेड होते, पण प्रितीची नशा मनावर एव्हढी चढली होती, कि बाकी कुठल्याही गोष्टीचा काहीच उपयोग नव्हता. पटकन चायनीज खाऊन टाकले, बिल्स साईन केली आणि प्रितीच्या रिप्लायची वाट बघत बसुन राहीलो.

“सॉरी, आय एम लेट..”, ९.४५ ला प्रितीचा मेसेज आला..”आय होप तु झोपला नाहीस..”
“इतक्या लवकर? नाही.. टी.व्ही बघतोय.. तु काय करते आहेस?”
“विशेष काही नाही.. जस्ट आवरुन झालं घरातलं, माझ्या रुम मध्येच आहे..”
“ओके”
“सो? हाऊ वॉज द डे? हाऊ इज बॅंगलोर..”
“डे इज ओके, नथींग स्पेशल..”
“का रे? एव्हढा का डाऊन?”
“डाऊन नाही गं.. असंच…”

मध्ये काही क्षण शांततेत गेले..

“तरुण.. एक विचारु?”
“येस प्लिज.. विचारु का काय? विचार ना सरळ..”
“तु असा अचानक, काहीच न सांगता बॅंगलोरला.. आय मीन, एक मेसेज तरी करायचास..”
“अगं, खरंच असं अचानकच ठरलं काल..”

“खरं तर, मी आज दिवसभर त्याचाच विचार करत होेते..”
“मी पण… काल दिवसभर तु त्या दिवशी जे म्हणालीस ना… त्याचाच विचार करत होतो..”

“डु यु लाईक मी तरुण?”, प्रितीने अनपेक्षीतपणे, एकदमच हा प्रश्न विचारला..
“म्हणजे?”
“डु यु लाईक मी? सरळ साधा प्रश्न आहे”

“व्हॉट एक्झाक्टली यु मीन बाय लाईक? त्याची डेफीनेशन काय?”
“डेफीनेशन मला माहीत नाही तरुण, बट आय कॅन सी इट इन युअर आईज, अ‍ॅन्ड आय एम नॉट शुअर अबाऊट माईन..”

“मला तुझ्याशी बोलायला खुप आवडतं प्रिती.. का? माहीत नाही.. पण खुप मस्त वाटतं तुझ्याशी बोलल्यावर. वाटतं, आपण एकमेकांना गेली कित्तेक वर्ष ओळखतो..”

“बास्सं? एव्हढंच वाटतं? पण तरुण, तुझे डोळे तर वेगळंच सांगतात… आणि माझं म्हणशील तर.. तर ती एक प्रकारची विलक्षण ओढ, एक प्रकारची हुरहुर? हे काय आहे तरुण? का मला सारखं वाटतं की तु कुठे आहेस ते मला माहीती असावं? का असं वाटतं की सारखा तु माझ्या संपर्कात असावास? का घडणारी प्रत्येक गोष्ट, मग ती किती का क्षुल्लक असेना, तुझ्याशीच शेअर करावीशी वाटते?”

“….”

“तुला नाही असं वाटंत तरुण?”

“तुझ्याशी सकाळी बोलताना मी एकटीच हसत होते.. वेड लागल्यासारखी..”
“…”

“मी एकटीच का बोलते आहे? बोल ना तरुण काही तरी, मला खरंच काहीच कळत नाहीये..”

“काय बोलु मी तरी प्रिती, खरं सांगु तर माझी अवस्था पण काही तुझ्याहुन वेगळी नाहीए. माझी मलाच आता भिती वाटु लागली आहे. वाटतं, मी इतका थिल्लर.. ठरकी आहे का? पहीली गेली की लगेच दुसरी आवडू लागली.. लगेच दुसरीच्या प्रेमात…”

“प्रेम? वेडा आहेस का तरुण? प्रेम काय असं दोन-चार दिवसांत होतं का? आपण दोघं असं कितीसं ओळखतो एकमेकांना?”
“पण प्रिती.. मग लव्ह अ‍ॅट फर्स्ट साईट..”
“ओह कमॉन.. बी प्रॅक्टीकल.. असल्या गोष्टी फक्त सिनेमांतच असतात तरुण..”

“नो..मला नाही वाटतं ह्या फक्त सिनेमांतल्याच गोष्टी आहेत, मी कित्तेक उदाहरणं बघीतली आहेत, फक्त आजच्याच काळातली नाहीत तर पुर्वीच्या काळात सुध्दा.. प्रिती, मला वाटतं प्रेम हा काही वेगळाच प्रकार आहे, त्याचा साक्षात्कार कुणाला एका नजरेने होईल, तर कुणाला महीने लागतात..”

“तुला माहीते तरुण, तु आज इथे नाहीस ह्या विचारानेच मला कसं तरी होतं होतं. पोटात असं गुडगुडल्यासारखं.. लाईक बटरफ्लाईज इन स्टमक.. मनामध्ये एक प्रकारची बैचैनी होती. साध्या साध्या गोष्टींमध्ये उगाचच चिडचीड होत होती..”

” सेम हिअर प्रिती..”, मला मनातल्या मनात प्रचंड गुदगुल्या होत होत्या. असं वाटत होतं, उगाचच केस उपटत बेड वर नाचावं, जोर जोरात ओरडावं, गडाबडा लोळावं.. पण मी समहाऊ स्वतःला कंट्रोल केलं.

“बिन तेरे, बिन तेरे, बिन तेरे… कोई खलीश है हवाओ मै … बिन तेरे ”

“आपण उद्यापासुन नकोच बोलुयात का? तु.. व्हॉट्स-अ‍ॅपमध्ये ब्लॉक करुन टाक मला..”
“ओके.. गुड आयडीया ”

“गुड आयडीया काय? गप्प बस तु? कश्याला गेलास तिकडे बॅगलोरला तडमडायला.. आणि म्हणे गुड आयडीया..”
“मला तर काय बोलायचं तेच सुचत नाहीयेत.. तु असं अनपेक्षीतपणे एकदम ह्या विषयावर येशील असं वाटलं नव्हतं..”

“पण मग आता काय करायचं? रेडीओवर कुठलं तरी ‘दर्दे तनहाई’ गाणं लागलं आहे.. आय एम लव्हींग धिस फिलींग तरुण.. त्या गाण्यातला प्रत्येक शब्दं शब्द असा अगदी मनाला भिडतो आहे.. वाटतंय बस्स्म् हे माझ्यासाठीच गाणं आहे…

आय एम नॉट एबल टु कंट्रोल.. फक्त टाईप.. टाईप.. टाईप…
बोल काही तरी तरुण, असा गप्प नको राहुस..”

“सॉल्लीड केमीकल लोचा झालाय डोक्यात प्रिती.. माय माइंड सेज वन थिंग अ‍ॅन्ड हार्ट सेज अनदर..”
“म्हणजे..”

“म्हणजे प्रिती.. तु जे म्हणते आहेस ना.. माझं मन अगदी तस्संच आहे.. फक्त आणि फक्त तुच आहेस त्यात..”
“अ‍ॅन्ड ब्रेन?”
“डोक्यात फक्त नेहा आहे..”

“व्हॉट? नेहा कुठुन आली मध्येच..?”
“आय मीन.. हे बघ.. आपल्याला नक्की माहीत नाही की आपल्या फिलींग्स नक्की कसल्या आहेत? वाटतं, लेट्स गिव्ह इट अ ट्राय.. मे बी हे फक्त एक अ‍ॅटरॅक्शन असेल.. मे बी महीन्याभरात आपल्याला एकमेकांबद्दल जे आत्ता वाटतं तसं वाटणार पण नाही.. मे बी.. लाईफ़ विल बी नॉर्मल अगेन. होतंय काय की, लाइक यु सेड, यु-डोन्ट-वॉन्ट-टु-बी-अनदर-नेहा. माझंच पण तेच मत आहे. मला उगाच कुणाला फसवायचं नाहीये, आणि स्वतःही फसायचं नाहीये..”

“काय फसायचं, फसवायचं? काय बोलतो आहेस, मला काहीच कळत नाहीये तरुण..”
“प्रिती, हे बघ.. आपण जरं खरंच एकमेकांच्या प्रेमात पडलो असु!, किंवा पुढे जाऊन एकमेकांच्या प्रेमात पडलो.. तर.. तर नंतर काय? शेवटी परत माझा आणि नेहाचा जो प्रॉब्लेम होता तो तर कायम आहेच ना. माझे घरचे कध्धीच ह्या लग्नाला परवानगी देणार नाहीत.”

” ‘तु.. बिन बताये.. मुझे ले चल कही..’ मस्त गाणं लागलंय तरुण..”
“प्रिती.. मी काय बोलतोय.. तु काय बोलते आहेस..? प्लिज बी सिरीयस..”

“कमॉन तरुण, मला तर वाटलं होतं की मी असं काही बोलले तर तु डोळे झाकुन म्हणशील.. लेट्स गो अहेड.. तु कधी पासुन सिरीयस..”
“शट-अप प्रिती.. तुझ्या जागी दुसरी कोणी असती तर, कदाचीत मी नसता विचार केला.. बट रिअली.. आय-डोन्ट वॉन्ट टु हर्ट यु बाय एनी मिन्स..”

“ओके, आय एम सॉरी.. बरं मग तुच सांग काय करायचं?”

“डु यु लव्ह मी प्रिती?”

प्रिती बर्‍याच वेळ “टायपिंग.. टायपिंग” येत होतं..

“काय लिहीती आहेस इतक्या वेळ? बोल ना? काय लिहीलं होतंस आणि परत डिलीट केलंस?”
“काही नाही.. असंच..”
“काय असंच. यु लव्ह मी ऑर नॉट?”
“आय डोन्ट नो?”
“व्हॉट आय डोन्ट नो? मग कश्याला मगाशी बोंबलत होतीस.. ‘तु बिन बताये ले चल..’ वगैरे..”
“मी साईन-आऊट करते तरुण..”

“अरे काय चाल्लंय काय? आपण काय सि-सॉ खेळतो आहे का? कधी तु ह्या बाजुला, तर कधी मी..”
“तो माझा मुर्खपणा समज हवं तर तरुण. तुझं नेहावर प्रेम नव्हतं.. आय मीन, तुझ्या म्हणण्याप्रमाणे.. ‘तसं’ प्रेम नव्हतं.. पण तरीही.. तिच्याबरोबरचा विरह सहन करायला तुला किती कष्ट पडले ते पाहीलं मी.. आणि तु सुध्दा ते जाणतोस. मग उद्या.. आपल्या नशीबी सुध्दा असंच वेगळं होणं लिहीलं असेल तर?. मला पण तुला परत हर्ट झालेलं नाही पहावणार तरुण..”

“आज स्वतःला थांबवशील, कदाचित मी पण, पण उद्याचं काय? कश्यावरून आपली मैत्री हि फक्त मैत्रीच राहील?”
” , शिट्ट तरुण व्हॉट हैव वूई डन?”

“तू स्वतःला नको दोष देऊस प्रिती. आपण दोघही इक्वली इंव्होल्व्ह आहोत”
“हम्म”

“सो, वुई आर नॉट इन लव्ह”
“विचारतो आहेस? का सांगतो आहेस?”
“ही ही, सांगतो आहे, विथ अ क्वेश्चन “.

“प्रिती, मी तुला फ्लर्ट वगैरे वाटत नाहीये ना? आय रिअली, रिअली लाइक यु यार”
“अरे व्वा, गुड टू नो दैट, मग मगाशी कश्याला डेफिनेशन विचारात होतास?”
” ”

“लेट्स नॉट हरी थिंग्ज..निट विचार करु.. आपल्याला घाई कसलीच नाहीए.. तु परत आलास की भेटुन बोलु.. ओके?”
” … ”
“धिस विल हर्ट अस तरुण. मला अशी टाईमपास कमीटमेंट नाही आवडत. एक तर इस पार या उस पार. जे काही आपण दोघ मिळून ठरवू ते फायनल असेल.”

“आणि तो पर्यंत? निदान व्हॉट्स-अ‍ॅपवर तरी आपण बोलु शकतोय ना? का ते पण नाही?”
” ”
“थॅंक गॉड प्रिती.. मला वाटलं उद्यापासुन तु व्हॉट्स-अ‍ॅपवर पण भेटणार नाहीस…”
“गुड नाईट तरुण.. स्विट-ड्रीम्स..”
“गुड नाईट..”, मोठ्या कष्टाने मी गुड-नाईट लिहीलं आणि त्याहुन मोठ्या कष्टाने पुढे काही्ही न बोलता संवाद तेथेच संपवला..

बाहेर पावसाची रटरट वाढली होती. बाल्कनीच्या खिडकीच्या काचांवर पाण्याचे टप्पोरे थेंब आपटुन घरंगळत खाली घसरत होते. मनात विचार आला, आत्ताच्या आत्ता घरी फोन करुन प्रितीबद्दल सांगुन टाकावं, एक तर प्रितीला अ‍ॅक्सेप्ट करा नाही तर मी चाललो घर सोडुन. इथे बॅंगलोरला एक शब्द टाकायचा अवकाश, मला आनंदाने इथे ट्रान्स्फर करुन घेतलं असतं.. मी आणी प्रिती.. दोघंच.. आनंदाने इथे बॅंगलोरला राहीलो असतो..

मला प्रथमच माझ्या घरच्यांचा इतका प्रचंड राग आला होता.


[क्रमशः]