ऑफीसमध्ये सगळ्यांचा मुडच एकदम वेगळा होता. प्रचंड तापदायक, कष्टदायक प्रयत्नांनंतर अखेर आमचं रिलिज झालं होतं. बॅंगलोरहुन आमचे डायरेक्टर खास आमच्या टिमला भेटायला आले होते आणि संध्याकाळी एका पॉश रेस्टॉरंटमध्ये पार्टी होती. कामाचं सोडा, सकाळपासुन कुणी ई-मेल्सलाही -हात लावला नव्हता. आणि माझा मुड खराब असण्याचं तर कारणंच नव्हतं. नुकत्याच प्रेमात पडलेल्या कुणाला तुम्ही दुःखी-कष्टी पाहीलं आहे का कधी?
संध्याकाळी पार्टीमध्ये काही तरी भारी अनाऊंन्समेंट होणार ह्याची सर्वांना कुणकुण लागली होती आणि त्यामुळे सगळे सुपर एक्साईटेड होते. मे बी प्रमोशन्स.. मे बी पगारवाढ.. बोनस.. तर्कवितर्कांना नुसते उधाण आले होते.
‘स्टोन-वॉटर-ग्रिल्स’ आमच्या टिमने पार्टीला दणाणुन सोडलं होतं. डि.जे. पण जाम मुड मध्ये होता.. ड्रिंक्स, लाजवाब स्टार्टर्स, डान्स-फ्लोअरवर धिंगाणा आणि वन-लास्ट.. वन-लास्ट करत अर्धा-पाऊण तास डि.जे.ला तंगवल्यावर शेवटी सगळे मेन-कोर्स घेऊन गार्डनवर गप्पा मारत बसले. सर्वचजण पुर्ण एक्झॉस्ट झाले होते पण तरीही एका यशस्वी रिलिजचा आनंद सगळ्यांच्याच चेहर्यावर होता.
चापुन हादडल्यावर शेवटी डेझर्ट्स हातात घेउन डायरेक्टरसाहेब उठले तसा टाळ्यांचा एकच कडकडाट झाला..
वेल डन, ग्रेट एफ़र्ट्स, हाय-एफ़ीशीयंट टीम वगैरे गुणगान गाऊन झाल्यावर शेवटी त्यांनी मुद्याला हात घातला.
“सो टीम, मॅनेजमेंट बोर्ड इज रिअली हॅप्पी अबाऊट युअर एफर्ट्स, अॅन्ड वुई वॉन्ट टु अॅप्रीशीएट इट इन सम-ऑर-द आदर वे…”
त्यांनी एक मोठ्ठा पॉज घेतला.
“सो.. टेल मी व्हॉट इज द वन थिंग दॅट बॉदर्स यु द मोस्ट..”
“मिटींग्स..”
“क्लायंट कॉल्स…”
“येस्स.. राईट सर.. क्लायंट कॉल्स..”
“मॅनेजर्स कॉलींग लेट नाईट फॉर पी.वन इश्युज..”
“येस्स सर.. पी.टी.ओ असो नाही तर सिक लिव्ह्ज.. फोन कॉल्स काही संपत नाहीत.. कधी लोकल ऑफीस, कधी बॅंगलोर तर कधी सातासमुद्रापलिकडुन.. सतत आमचे फोन कानाला चिकटलेले…”
“ऑलराईट.. ऑलराईट.. कुल डाऊन.. आय अंडरस्टॅन्ड युअर कन्सर्न्स.. बर्याच वेळेला आम्हाला माहीत असतं तुम्हाला सुध्दा प्रायव्हेट आयुष्य आहे, पण खरंच नाईलाज होतो आमचा.. शेवटी कस्टमर-इज-द-किंग नाही का?”
“तर.. मी तुम्हाला ह्या कॉल्सपासुन.. एक आठवड्यासाठी का होईना.. पुर्णपणे सुट्टी देऊ शकतो.. आय प्रॉमीस.. कुणाचाही तुम्हाला फोन येणार नाही..”, डेझर्ट्सचा एक मोठ्ठा तुकडा घश्यात कोंबत डायरेक्टर साहेब म्हणाले
“पण कसं?”
“आय एम टेकींग यु.. ऑल-ऑफ-यु..” सगळ्यांकडे बोट दाखवत ते म्हणाले.. “.. टु अ ऑल एस्पेंन्सेस पेड, सेव्हन डेज ट्रीप टु.. अ फॉरेस्ट रिसॉर्ट निअर कर्नाटका बॉर्डर.. बाय फ्लाईट…”
सगळीकडे टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला..
“आय नो.. तुम्हाला.. मला.. एक स्वतःचा ‘मी’ टाईम हवा असतो.. स्वतःसाठी वेळ.. ह्या ट्रीप मध्ये मी तो तुम्हाला मिळवुन देईल..”
“पण सर.. कसं शक्य आहे.. ठिक आहे.. एक वेळ मॅनेजर्स नाही कॉल करणार.. पण सपोर्ट? त्यांचा फोन येणारच..”
“आणि सर बायको.. फ़्रेंन्ड्स.. इतर क्रेडीट-कार्ड, इंन्शोरन्स कॉल्स..?”
“आय एम टेलींग यु.. नाही येणार.. कारण त्या रिसॉटमध्ये कुठल्याही टेलीफोन-ऑपरेटरची रेंजच येत नाही.. सो कुणीही कितीही प्रयत्न केला तरी फोन लागणारच नाहीत.. आय टोल्ड यु.. इट्स अ फ़ॉरेस्ट रिसॉर्ट…”
“पण सर.. काही इमर्जंन्सी असेल तर.. आय मीन नॉट जस्ट ऑफीस, पण घरुन सुध्दा..?”
“डोन्ट वरी, रिसॉर्टला लॅन्डलाईन फोन्स आहेत.. तुम्ही तिथले नंबर्स तुमच्या फॅमीली बरोबर शेअर करु शकता.. बट रिमेंबर.. जस्ट फ़ॉर इमर्जंन्सी.. अॅन्ड आय विल किप अ वॉच ऑन इट…”
“वॉव्व.. खरंच किती सुखःद विचार होता, एक आठवडा फोन बंद.. इतरवेळी आयुष्य सतत त्या फोनला चिकटलेलं. बर्डे-पार्टीज, मुव्हीज, डिनर्स, गेट-टुगेदर्स.. कधीही..कुठेही फोन आला की सगळं सोडुन ट्रबलशुटींग चालु.. पण आत्ता, हे सगळ्यांसाठी ठिक होतं, फॉर समवन लाईक मी, हु वॉज इन लव्ह विथ अ गर्ल लाईक प्रिती.. जिच्याशिवाय एक क्षणही घालवणं अवघड होतं.. जिथे फोनवर संपर्क असुनही दुरावा जाणवायचा.. तेथे एक आठवडा दुर रहायचं म्हणजे…”
मी डोक्याला हात लावुन खालीच बसलो.
“वन विक.. इज इट?”, प्रिती चेहरा पाडून विचारत होती..
खरं तर तिला सांगताना मलाच कसं तरी होत होतं आणि तिचा पडलेला चेहरा बघुन मलाच गिल्टी वाटायला लागलं होतं.
“.. आणि तु तुझ्या आईला फोन करु शकतोस.. पण मला नाही का?”
“आई आणि वडीलांना.. ते सुध्दा अगदीच अर्जंन्सी असेल तर..”, मी समजावणीच्या स्वरात म्हणालो..
“राईट.. आय एम नॉट युअर फॅमीली.. अॅन्ड आय डोन्ट केअर अबाऊट यु.. किंवा.. अर्जंन्सी मला असु शकत नाही.. हो ना..?”
“प्रिती… प्लिज.. डोन्ट गेट अपसेट.. मला काय आनंद होतो आहे का? हे बघ.. आय प्रॉमीस.. जर जमत असेल ना.. तर मी नक्की फोन करेन तुला.. प्रॉमीस..”
आमची ती संध्याकाळ तशी सो-सोच गेली.. प्रिती वॉज डिसअपॉंंईटेड. सो वॉज आय..
रिसॉर्ट बाकी खरंच उत्तम होतं. दाट जंगलाच्या आत, छोट्याश्या धबधब्याशेजारी वसलेलं ते रिसॉर्ट बघताच सगळे आनंदाने बेभान झाले. वृक्षांची जास्ती तोड न करता फांद्यांच्या आधारेच कॉटेजेस बांधल्या होत्या त्यामुळे त्याला अगदीच नॅचरल फिल आला होता. रेस्टॉरंट दगड आणि लाकडाच्या सहाह्याने गुहेच्या आकारात बनवले होते. बसायला सुध्दा दगडी..लाकडी गोष्टीच वापरल्या होत्या. कॉटेजेस आणि रेस्ट्रॉरंट लाकडी पुलाने जोडले होते आणि पुलाच्या खालुन धबधब्याचं निळंशार पाणी वाहत होतं.
एकुणच आऊट-ऑफ़-द-वल्ड वाटत होते. पब्लिकने बॅगा ठेवुन सरळ धबधब्याच्या पाण्यात उड्या घेतल्या. नॅचरल स्विमींग पूल. सगळं काही छान होतं, पण तरीही काही तरी चुकल्यासारखं. जणू अलिबाबाच्या गुहेत, गुहेचा पासवर्ड विसरल्यावर कासिमला झालं होतं तसं. आजुबाजुला इतकं सोन, हिरे-माणके, पैसे सर्व होतं, पण त्याला मात्र त्या कळीच्या शब्दाशिवाय दुसरं काहीच सुचत नव्हतं. मला हसवणारा, माझा मुड सेट करणारा माझा कळीचा शब्द माझी डार्लिंग प्रिती, माझ्यापासुन कित्तेक किलोमीटर दुर होती.
संध्याकाळी सगळेच जण घरी पोहोचल्याचं कळवायला फोन करत होते म्हणुन मी पण लावला.
जनरल आईशी बोलुन झाल्यावर आई म्हणाली. “अरे तरुण, तुझी कलीग येऊन गेली मगाशी..”
माझी कलीग? मला क्षणभर आश्चर्यच वाटलं. आमची जवळ जवळ अख्खी टीम इकडेच होते आणि जे नव्हते आले, त्यातलं कोणी माझ्या घरी जाऊ शकेल अश्यातले नव्हते.
“माझी कलीग? कोण?”
“अरे कोण काय? तुमच्या ऑफीसमध्ये ती प्रिती आहे ना? ती आली होती…”
“प्रिती !”, मी क्षणभर शॉकच झालो.. “ती कश्याला आली होती?” मी उगाचच त्रासीक सुरात म्हणालो
“अरे असं काय करतो आहेस? तुच म्हणलास ना तिला, तुमच्या प्रोजेक्टच्या कुठल्यातरी फाईल्स कॉपी करुन घ्यायला, काल उशीर झाला तर विसरलास म्हणुन म्हणली ती घरी तुझा लॅपटॉप आहे त्यावरुन कॉपी करुन घ्यायला सांगीतल्यात ते…”
“ओह.. हा आठवलं.. हो.. सांगीतलं होतं मी.. पण इतकं पण काही अर्जंट नव्हतं, काही तरी तोडुन ठेवेल त्या लॅपटॉपमधलं.. “, मी उगाचच माझी नापसंती दाखवत म्हणालो..
“ए काय रे.. मुलगी असली म्हणुन काय झालं.. उगाच का तुमच्या ऑफीसमध्ये काम करतेय.. काही तोडत बिडत नाही ती.. किती गोड मुलगी आहे..”
आईच्या तोंडुन प्रितीचा ‘गोड मुलगी’ उल्लेख ऐकुन उगाचच अंगावर मुठभर मास चढलं. प्रितीने अशी काय जादु केली आईवर कोण जाणे असा एक विचार डोक्यात येऊन गेला..
“बरं ठिके घेऊ देत तिला कॉपी करुन.. पण उगाच इकडच्या तिकडच्या फाईल्सना हात लावु नको म्हणाव..”
“बर, बरं.. सांगते मी.. उद्या येते म्हणाली संध्याकाळी…, साधारण ७.३० ला येईल. तेंव्हा फोन कर मग, म्हणजे तुला फाईल्स कुठे आहेत ते सांगता येईल..”
“बरं बरं.. पण मला नाही फोन करता येणार.. तुच कर फोन, आईचा फोन आहे म्हणल्यावर देतील ते फोन ओके?”
“ओके.. ७.३० ला ती आली की करते मग फोन..”, आई म्हणाली
“बरं.. चल मग ठेवतो फोन..”, असं म्हणुन फोन ठेउन दिला .
अचानक दहा हत्तींच बळ संचारल्यासारखं झालं होतं मला. आय वॉज सो.. सो प्राऊड ऑफ़ माय लव्ह.. शी वॉज डूईंग एव्हरीथींग टु गेट इन टच विथ मी..
“प्रितु.. यु यार सच अ डार्लींग यार..”, मी स्वतःशीच पुटपुटलो..
आश्चर्य घडलं होतं.. कासिमला त्याचा कळीचा शब्द सापडला होता.
दुसर्या दिवशीच्या संध्याकाळची मी आतुरतेने वाट बघत होतो. साधारणपणे ७.४० ला वेटर कॉर्डलेस फोन घेऊन बारपाशी आला. मी मुद्दाम आमच्या डायरेक्टर साहेबांबरोबरच बसलो होतो.
“तरुण.. तुमच्या आईचा फोन..”, वेटर म्हणाला..
“काय त्रास आहे.. आई पण ना.. उगाचच फोन करत बसते..” उगाचच डायरेक्टर साहेबांकडे बघत मी पुटपुटलो आणि फोन घेउन थोडं दुर गेलो..
दिवसभर काय केलं, काय खाल्ल वगैरे बोलुन झाल्यावर मी म्हणालो.. “बर चल मग ठेवतो फोन..”
हृदय सॉल्लीड धडधडत होतं.
“अरे थांब.. प्रिती आलीय ना, तिला सांग बाबा काय ते कामाचं..”
मला आई प्रितीच्या हातात फोन देताना डोळ्यासमोर दिसत होती.
“हॅल्लो!”, पलीकडुन तो मधाळ आवाज कानावर पडला
“हाय डार्लींग.. लव्ह यु.. लव्ह यु.. लव्ह यु यार.. यु आर जिनीअस…”
“येस्स सर.. हो सर.. फोल्डर माहीते मला..”, पलिकडुन प्रिती म्हणाली
“यु आर सच अ स्विटहार्ट यार.. मिस्ड यु सो मच.. थॅक्यु सोsssss मच..”
“सर, माझ्या लॅपटॉपला प्रॉब्लेम येतोय.. आणि आय.टी.चं पण कोणी नाहीये, मला २ दिवस लागेल काम संपवायला.. मी तुमचा लॅपटॉप घेऊन जाऊ का?”
“कशी आहेस डार्लींग? मिस्सींग मी ना?”
“येस सर.. डिलीट नाही करणार काही.. पण सर.. ओके.. पण तुमच्या घरी चालेल का मी उद्या पण आले तर..??”
“तुझंच तर घर आहे ते येडु.. चालेल का काय विचारतेस? नक्की ये..”
“थॅक्यु सर.. बाय सर…”
“आणि काय गं? आईला काय इंप्रेस वगैरे करायचा विचार आहे की काय? एकाच भेटीत आई तुला गोड मुलगी वगैरे म्हणाली?”
“येस्स सर..तेच करायचंय मला.. बाय सर..”
“बरं,ऐक लॅपटॉपचा पासवर्ड आहे…”
“आय नो द पासवर्ड..”, प्रिती हळु आवाजात म्हणाली..
ऑफकोर्स.. व्हॉट एल्स कुड बी द पासवर्ड, दॅन द नेम ऑफ़ द लेडी आय वॉज मॅडली इन लव्ह विथ..
प्रितीने फोन आईकडे दिला..
“हे बघ आई.. तिला वापरु दे कंम्युटर माझा.. ती उद्या पण येईल बहुतेक.. मी टाळायचा प्रयत्न केला पण..”
“येऊ दे रे.. तेव्हढाच वेळ जातो संध्याकाळचा.. काही हरकत नाही.. चल ठेवते फोन..”
“हे डबल-ओ-सेव्हन मि.जेम्स बॉन्ड..”, माझ्या डोक्यात विचार आला.. “यु आर नॉट द ओन्ली वन विथ अ ब्युटीफुल, यट ब्रेनी सिक्रेट एजंट..”
मी स्वतःशीच हसत परत पार्टी जॉईन केली.
दिवस खुपच हळु हळु जात होते.. जणु काही कित्तेक वर्ष मी त्या जंगलात अडकुन पडलो होतो. निघायच्या आदल्या रात्री मी घरी फोन केला तेंव्हा आईने सांगीतलं की प्रितीने निरोप दिलाय.. एअरपोर्टवरुन निघताना तिच्या मोबाईलवर फोन कर म्हणुन.
मी उगाचच चाक.. चुक केलं आणि फोन ठेऊन दिला.
दुसर्या दिवशी रिसॉर्ट सोडताना मला कोण आनंद झाला होता. एअरपोर्टला पोचताच, चेकीन्स झाल्यावर मी पहीली एस.टी.डी. बुथ कडे धाव घेतली.
“पायलागु प्रिती मॅम..”, प्रितीने फोन उचलताच मी म्हणालो.. “आपली आज्ञा मिळाली, म्हणुन तात्काळ फोन केला.. बोला काय हुकुम आहे..”
“किती वाजतो पोचतो आहेस?”, प्रितीने विचारलं..
“अं..१०.३० ची फ्लाईट आहे, बहुतेक १२.४५ – १ पर्यंत पोहोचेन..”
“बरं.. आणि तेथुन घरी कसा जाणार आहेस?”
“कंपनीची बस आहे ना.. सगळे त्यातुन जाणार आहोत..”
“कॅन्सल कर ती.. तु त्यातुन जायचं नाहीस..”
“अं? म्हणजे? मग कसं जाऊ? एअरपोर्ट ३० कि.मी. दुर आहे घरापासुन, आणि ऑटो पण मिळत नाही तेथुन..”
“मी सांगीतलं ना.. कॅन्सल कर.. मग कॅन्सल..”
“अरे पण! मी घरी कसं जाऊ ते तर सांग..”
“तुझ्यासाठी उद्या रॉयल-सफारीची व्यवस्था झालेली आहे..”, प्रिती खिदळत म्हणाली..
“काय बोलते आहेस तु प्रिती.. हे बघ पट्कन बोल.. आत्ता बोर्डींग सुरु होईल..”
“चक.. मी येणारे तुला एअरपोर्टवर रिसीव्ह करायला..”
“तु? पण तुझ्याकडे कुठे कार आहे..?”
“कार कश्याला? स्कुटी आहे ना माझी?”
“अगं..स्कुटी वर कसं येणार आपण.. एक तर आठवड्याचं लगेच आहे माझं ती बॅग, आपण दोघं.. त्यात एअरपोर्ट इतकं लांब.. कश्याला उगाच उन्हाचं.. मी येतो ना बसं ने..”
“गप्प बसं.. मी सांगीतलंय ना मी येतेय.. म्हणजे मी येतेय.. मला माहीत नाही..”
एव्हाना बोर्डींगची अनाऊंन्समेंट सुरु झाली होती..
“प्रिती.. ऐक ना..”
“तु आता बडबड बंद करतोस का?.. फोन वर आहेस म्हणुन.. नाही तर तुझं तोंड कसं बंद करायचं ते मला माहीती आहे..”, हसत प्रिती म्हणाली..
“ओह रिअली? कसं?”
आय कुड फ़िल हर ब्लशींग..
“तरुण.. मी नविन बांगड्या घेतल्यात.. आणि नविन बिंदी.. आणि नविन सॅन्डल्स.. आणि..”.. प्रितीची लिस्ट एन्डलेस होती.
“पण कश्यासाठी?”
“कारण एक आठवड्य़ानंतर तुला भेटणारे ना म्हणुन.. एक आठवडा.. तरुण…”
तिच्या आवाजात ती व्याकुळता होती.. तो आवेग होता.. ती पहिल्यांदा भेटतानासारखी ओढ होती.. मला पोटात बटरफ्लाय असल्यासारखं झालं..
“प्रिती.. पण..”
“तरुण.. मी येतेय..”, मला काही बोलायची संधी न देताच प्रिती ने फोन बंद केला
पुढचे दोन तास मी प्रितीबरोबरचं बोलणं आणि प्रितीशिवाय घालवलेला गेला आख्खा आठवडा आठवत होता आणि मिनिटांगणीक प्रितीला भेटण्याची ओढ अधीकच वाढत होती. अगदी अंत पाहील्यावर शेवटी कॅप्टनने लॅंन्डीग प्रोसीजर सुरु केली. हवेत दोनचार घिरट्या घातल्यावर शेवटी विमानाला उतरायला जागा मिळाली आणि एकदाचे आम्ही धावपट्टीवर उतरलो..
लगेज क्लिअरंन्सला बॅग मिळवली आणि बाहेर पडलो.
कॉरीडॉअर क्रॉस केला आणि बाहेरच्या गर्दीत मला प्रिती दिसली. ऑलीव्ह रंगाचा फुल स्लिव्ह्ज पंजाबी.. फिक्कट हिरव्या रंगाची ओढणी, दोन्ही हातात अर्धा-अर्धा डझन तरी बांगड्या, चंदेरी रंगाचे किंचीत हाय-हिल्स सॅन्ड्ल्स आणि सिल्ह्वर रंगाची चमकी. सॉल्लीड क्युट दिसत होती. ऑफीसमधल्या कुणालाच ती माहीत नसल्याने सगळेच तिच्याकडे बघत चालले होते.
तिला बघताच मला माणसांत आल्यासारखं वाटलं..
मला बघताच प्रिती पुढे आली आणि आजुबाजुच्या कुणाचीही पर्वा न करता तिने मला घट्ट मिठी मारली.
साप चावल्यासारखे ऑफिसमधले सगळे जागच्याजागी थिजले होते.
“प्रिती.. ऑफीसमधले सगळे बघत आहेत.. सोड..”
“मग काय झालं? बघु देत की.. जळतील सगळे तुझ्यावर..”, हसत हसत प्रिती म्हणाली
तिने माझी बॅग काढुन घेतली आणि आम्ही दोघं एअरपोर्टच्या बाहेर पडलो. अख्खी टीम अजुनही आमच्याकडेच बघत होती..
“थॅक्स प्रिती..”, मनातल्या मनात मी म्हणालो.. “एव्हरीबडी ड्रिम्स ऑफ़ अ गर्लफ्रेंड लाईक यु… ऑफीससमोर, मित्रांसमोर इंप्रेशन मारण्यात जी मज्जा आहे ती अजुन कश्यातच नाही.”
“प्रिती.. मी धरतो बॅग ती.. तु कश्याला उगाच..”
“आठवडाभर होती ना ती तुझ्याबरोबर.. आता रहा म्हणाव जरा लांब..”, चिडुन प्रिती म्हणाली..
“ओह माय माय. तु जेलस वगैरे होती आहेस की काय त्या बॅग वर..?”
“आय एम. तुला काय करायचं ते कर..”, नाकावरचा राग अजुनच गोंजारत प्रिती म्हणाली
मी माझा हात प्रितीच्या कमरेभोवती गुंफला आणि तिला जवळ ओढले..
“मिस्टर तरुण.. तुम्ही तुमच्या होम-टाऊनमध्ये आला आहात.. आणि ही पब्लीक प्लेस आहे.. जरा सांभाळुन..”
“अच्छा.. आणि मगाशी आपण..”
“बास.. ”
“पब्लिक प्लेसची एव्हढी काळजी आहे तर मग एखाद्या प्रायव्हेट प्लेसला जाऊ ना.. आय एम स्टारव्हींग..”, तिचे गाल ओढत मी म्हणालो
“आय नो व्हॉट काईंड ऑफ़ स्टारव्हींग यु हॅव.. मी कुठेही न्हेणार नाहीये तुला.. आपण हॉटेलला जाऊ, जेऊ आणि मग तु घरी जा.. यु लुक टायर्ड.. आपण संध्याकाळी भेटू ओके?”
हॉटेलपर्यंतची आमची राईट फारच मजेशीर होती. एक तर तिची मरतुकडी स्कुटी, त्यात माझी मोठ्ठी ट्रॅव्हल बॅग.. प्रितीची पर्स.. त्यात हायवेवरुन वेगाने जाणार्या गाड्या. बर मी चालवतो म्हणलं गाडी तर ते तिला पटलं पाहीजे, जबरदस्तीने मला मागे बसवलं होतं त्यामुळे तर फारच कसरत होत होती. आधीच दोन तास फ्लाईटमध्ये बसुन अंग आखडलं होतं.. त्यात हा अत्याचार.. पण शेवटी प्रिती असल्याने, मनोमन सुखावलो सुध्दा होतो. एक आठवड्याच्या त्या ‘लंबी जुदाई’ अत्याचारापेक्षा हा अत्याचार खुपच सुखःद होता.
शेवटी एकदाचे आम्ही हॉटेलपाशी पोहोचलो. प्रिती ऑर्डर करत होती तोपर्यंत मी वॉशरुमला जाऊन हात-पाय-तोंड धुवुन फ्रेश होऊन आलो.
“आय मिस्ड यु शोनु..”, अगदी गरीब चेहरा करत प्रिती म्हणाली.. “डोन्ट एव्हर लिव्ह मी फॉर सो लॉंग…”
ह्या पोरी पण ना फार मजेशीर असतात. कुठली कुठली नावं शोधुन काढतात.. शोनु नाव ऐकुन मी मनोमन देवाचे आभारच मानले.. “पप्पु.. बबलु.. चिंट्या” वगैरेंपेक्षा शोनु ठिकच होते..
ऑर्डर आली आणि आम्ही न बोलताच जेवत होतो.. खरं तर मनामध्ये खुप काही भावना होत्या.. पण सगळं असं मनात दाटून आलं होतं.. खरंच तो एक आठवडा मी कसा घालवला होता.. मलाच माहीती.. आणि प्रितीसाठीही तो आठवडा काही फार चांगला नव्हता हेही सत्यच होतं.
“शांत का झालास? बोल ना काही तरी..”, प्रिती म्हणाली
मला पण काय बोलावं सुचतच नव्हतं. मग अचानक एक कल्पना सुचली. मी मोबाईल काढला आणि त्यातलं एक गाणं सुरु केल.. आणि हेडफोन्स प्रितीच्या कानाला लावले..
गाण्याचे बोल थोडेफार असे होते..
I love the way you love me
Strong and wild, slow and easy
Heart and soul so completely
I love the way you love me
And you roll your eyes when I’m slightly off key
And I like the innocent way that you cry
I like the feel of your name on my lips
And I like the sound of your sweet gentle kiss
The way that your fingers run through my hair
And how your scent lingers even when you’re not there
And I like the way your eyes dance when you laugh
खूप सेन्टी गाणं होतं ते.. प्रितीच्या डोळ्याच्या कडा ओलावलेल्या मी पाहील्या..
तिने टेबलावरचा पेपर टीश्यु घेतला, पर्समधुन पेन काढलं आणि त्यावर लिहीलं.. “आय वॉन्ट टु स्पेंन्ड माय लाईफ़ विथ यु..आय वॉन्ट टु लव्ह यु टिल आय टेक माय लास्ट ब्रेथ..लव्ह यु फ्रॉम डिप बॉटम ऑफ़ माय हार्ट..”
त्याच्याखाली तिने एक हार्ट काढलं आणि आमची इनीशीअल्स त्यात लिहीली.. टी अॅन्ड पी..
ह्यावेळी डोळ्याच्या कडा ओलावण्याची माझी वेळ होती.
आम्ही दोघं एकमेकांचा हात हातात घेऊन कित्ती वेळ बसुन राहीलो कुणास ठाऊक…
[क्रमशः]