अपूर्ण बदला ( भाग १ ) Dipak Ringe ।बोलका स्पर्श। द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • नियती - भाग 24

    भाग -24पण एक दिवस सुंदर तिला म्हणाला...."मिरा.... आपण लग्न क...

  • लोभी

          "लोभी आधुनिक माणूस" प्रस्तावनाआजचा आधुनिक माणूस एकीकडे...

  • चंद्रासारखा तो

     चंद्र आणि चंद्रासारखा तो ,जवळ नाहीत पण जवळ असल्यासारखे....च...

  • दिवाळी आनंदाचीच आहे

    दिवाळी ........आनंदाचीच आहे?           दिवाळी आनंदाचीच आहे अ...

  • कोण? - 22

         आईने आतून कुंकू आणि हळदची कुहिरी आणून सावलीचा कपाळाला ट...

श्रेणी
शेयर करा

अपूर्ण बदला ( भाग १ )

हरी......हरी...... आवाज ऐकताच हरी त्या आवाजाच्या दिशेने जाऊ लागला, त्याला अचानक आलेल्या आवाजाची शहानिशा करायचीच होती, रोजच्या आवाजाने तोही त्रासलेला पण मनात असून सुद्धा तो बाहेर जाऊ शकत नव्हता. रात्रीचे ११ वाजून गेले होते, हा झोपेतून उठून त्या आवाजाच्या दिशेने चालू लागला,आकाशात चांदणं टिमटिमत होत त्या टिमटिमत्या चांदण्यामध्ये चंद्राचा लक्ख प्रकाशात हरी एकटाच चालत होता. त्याला बाजूने मोठमोठ्याने आवाज येत होत, नको जाऊ, नको जाऊ पण ते आवाज त्याच्या कानाजवळ पोहचत नव्हते.

तो भेटेल त्या वाटेने चंद्राच्या प्रकाशात झपाझप पाऊले टाकत होता.गावामध्ये कुत्रांचे विचित्र रडणे स्पष्ट ऐकू येत होत. तरीही हरी आपल्या कपाळावरचा आलेला घाम पुसत त्या आवाजाच्या दिशेने आगेकूच करू लागला. जसजसा हरी जवळ पोहोचू लागला तसतसा आवाजामध्ये क्रूरता आणि बदल जाणवू लागला, बघता बघता हरी नदीच्या जवळ पोहचला. आवाज जोरजोरात येऊ लागला, आवाज त्याच आंब्याच्या झाडावरून येत होता, जो नदीच्या पलीकडे थोडा दूरवर भला मोठा पण विचित्र दिसत होता, अचानक त्या आंब्याच्या झाडावरून विचित्र सावली हरीच्या दिशेने झेप घालत येताना दिसली. हरी ती आक्राळविक्राळ आणि किळसवाणी आकृती बघून चांगलाच थबकला होता.

आलास.....मी तुझीच वाट बघत होतो. गुरगुरत्या आवाजात ती किलसवाणी आकृती बोलू लागली, मला तुला घरातून बाहेर काढायचं होत, आणि मी त्यामध्ये सफल झालो आहे ,त्या आकृतीच्या चेहऱ्यावर विचित्र असे पण आनंद झाल्यासारखे हसू उमटू लागले. ते विचित्र हसू ऐकून हरीच्या पूर्ण शरीराला घाम फुटला होता. त्या दिवशी मी माझा बदला पूर्ण नाही करू शकलो. पण! पण आत्ता ती वेळ आली आहे ,मी माझा बदला तुला मारून पूर्ण करेल. हा......हा........हा...... ती आकृती आता जोरजोरात खिदळायला लागली. त्यातच त्या आकृतीने हरीवर झेप टाकली.

आई............एकदाच जोरात किंकाळी फोडून हरी अंथरुणातून उठला. त्याच पूर्ण शरीर थरथर कापत होतं. त्याच्या डोक्यामध्ये प्रश्नांनी चांगलीच जागा केलेली. त्याच डोक ठणकू लागलं. आपल्यालाच का असलं भयानक स्वप्न पडल? आणि ती विचित्र सावली कोण होती ? आणि कोणत्या बदल्याबद्दल ती माझा जीव घेणार होती? मी कुणाचा वाईट केलंय? आणि ते आंब्याचं झाड ? काय आहे त्या झाडावर ? काय रहस्य आहे त्याचं? आता मात्र तो डोक्याला हात लावून डोक दाबू लागला, त्याला काहीच सुचत नव्हते.

हरीला अशा अवस्थेत बघून त्याची आई पूर्ण घाबरली होती.

काय रे हरी काय वाईट स्वप्न बघितलास का? एवढा का घाबरलास?

हरी विचार करू लागला, आईला झालेला प्रकार सांगू का नको ?

हरीने स्वप्नात बघितलेला प्रकार सविस्तर त्यांच्यासमोर एखादया कथेप्रमाणे मांडला. त्यावर त्याचे बाबा एवढेच म्हणाले कि तुम्ही कोणीही त्या आब्याच्या झाडाकडे एकटे जात जाऊ नका. तुझ्या मित्रांना पण सांग जर कधी मला कळले कि तुम्ही नदी पलीकडे गेलेले तर मग...

हरीच्या आईने खुणावत हरीकडे बघितले. आणि होकारार्थी मान हलवली, मात्र हरीचे बाबा वेगळ्याच विचारात गुंग होते.आणि काहीतरी पुटपुटत बाहेर गेले.

आज नववीची परीक्षा संपून उन्हाळी सुट्ट्या मिळाल्या होत्या, हरी सुद्धा घरीच होता. रात्री पडलेल्या त्या अगणित आणि अकालनीय स्वप्नावर तो विचारविनिमय करत होता. त्याच दरम्यान त्याला बाहेरून आवाज आला, मात्र त्याला वाटलं आपल्याला पुनः भास झाला. त्यामुळे तो पुन्हा डोक खाजवत त्यावर विचार करू लागला,जेवढा कधी अभ्यासाचा विचार केला नसेल तेवढा तो स्वप्नाचा विचार करत होता, तसही त्याच्या जीवनमरणाचा प्रश्न होता. त्यामुळे त्याला ते रहस्य जाणून घेतलच पाहिजे नाही का ? कोणी आपला जीव घेण्याच्या बाता मारत असेल तर थोडं आपण त्याला मारण्याची संधी देणार आहोत. परतवार तो नकळत होतोच. तसाच हरीच्या मनामध्ये आणि डोक्यामध्ये स्वप्नाचे नकळत विचार जागा करून बसलेले. आणि तेच डोक्यामध्ये आपलं काम बजावत होते.

“हरी”.... पुनः आवाज आला.

हरीला एका मुलाचा पण ओळखीचा आवाज वाटत होता.आपल्याच कोणी जवळच्याने आवाज दिला असा त्याला भास झाला. नकळत आलेली आवाजाने हरी थोडा दचकला. अगोदरच मनामध्ये भीतीने काहूर माजलेले आणि त्यात असा नकळत आलेला आवाज.

हरीने त्याकडे दुर्लक्ष केलं, तसं पण तो आवाज कुठून आला तेवढं ऐकण्याचाही वेळ नाही भेटला.

तो त्याच्या विचारांमध्ये गुंतलेला. त्यामुळं त्याला आवाजाची झुळूकही नाही लागली.

पुन्हा तसाच ओळखीचा आवाज आला. आणि आत्ता त्याने स्पष्ट ऐकला. आवाज समोरच्या घराच्या दिशेने आलेला. पण हे कस शक्य आहे. हरी अजून विचारात पडला ! हे घर तर महिन्याभर बंद आहे. मग मला आवाज कोणी दिला?हरीच्या डोक्यामध्ये आता खूप सारे प्रश्न जागत होते.मनामध्ये भीतीचा सावटही सुरु झाले.

“हरी”................वापस आवाज आला. आता हरीने स्पष्ट आवाज ऐकलेला त्यामुळे तो आवाजाच्या दिशेने पाहू लागला.

समोरून दोन सडपातळ आणि उंचीला पाच फूट सावळे-कावळे हरीचे मित्र श्याम आणि रम्या होते. हरीने त्याना हाताने खुणावून बोलावले. त्यांना सोफ्याच्या दिशेने बसण्याचा इशारा केला.शिवाय त्यांच्या रोजच्या गप्पा चालू झाल्या, मात्र हरी आजूनही मनातल्या मनात घाबरतच होता त्याच्या मनामध्ये आता "भिती" ह्या विचित्र शक्तीने, आभासाने घर केले होते.

कधी आला रे तुम्ही...?

हे काय. तुझ्या समोरून तर आलोय.

तसं नाही रे ! म्हणजे, अगोदर येऊन इथे कुठे थांबला होतात का ? हरीने त्या घराच्या दिशेने खुणावून त्या दिशेला बसलेले का अगोदर, असे विचारले.?

नाही रे! आम्ही तर सरळ तुझ्या समोरून आलोय.

हरी जरा गोंधळला.

सरळ आलाय ना! मग एकदाच आवाज द्यायचा ना! सारखा सारखा आवाज देवून लपून कशाला बसलेलेत?

अरे तुला म्हणालो ना, आम्ही आत्ताच आलोय. तसही तुला आवाज दुसऱ्या कुणीतरी दिला असेल.

पण हे कस शक्य आहे? इथे तर कोणीच नव्हत. मग मला कोणी आवाज दिला? हरी मनातच विचार करू लागला.

नक्की तू बरा आहेस ना. तुला कोणी झपाटला तर नाही ना? श्याम आणि रम्या दोघेही हसायला लागले.

हरीने डोक्याला घट्ट पकडून दाबून ठेवले. त्यालाच कळत नव्हते काय होतंय? मनाला धीर देत आपल्याला भास झाला असेल अस समजाऊ लागला.

अरे अजूनही तू त्याच गोष्टीचा विचार करतोय?

क.... क कसला हरीने अडखळत अडखळत विचारले.

तू तर अजूनही घाबरलाय. तुझ्या बोलण्यावरून समजतंय.

हरी तसा दिसायला तब्बेतीने असला तरी तो खूप घाबरत होता,जरी दिसायला धाकड असला तरी, त्याच उंदारच काळीज होत. प्रत्येक क्षणाला मांजराची भीती! हरी दिसायला गोराभामटा होता. वजनानुसार असलेली उंची, शोभून दिसत होती.काळेभूर डोळे, आखूड नाक, आणि गोल चेहरा. एकदम राजबिंडा सारखा दिसायचा.

काय शाळेचा दिवस आठवला वाटत ? रम्याला एका हाताने टाळी देत श्याम हसायला लागला.

शाळेच नाव ऐकताच हरीच अंग थरथरायला लागलं. त्याच्या संपूर्ण शरीराला धडती भरली. पण मित्रांसमोर आपली फजेती होईल म्हणून, तो निडरतेचा हावभाव चेहऱ्यावर दाखवू लागला.

मी नाही घाबरत कुणाला. ते जाऊदे आपला सखा कुठे आहे? पेहेलवान! जाउदे हरी मनातून खुश झाला. त्याला विषय बदलायला काहीतरी कारण भेटल होत.

येतच असेल तो. तो इथे येणार नाही अस होणार आहे का? पेहेलवान आहे मग कायतरी खाऊन पिऊनच येईल.

अरे बोल, बोलना. का थांबलास? समोरून भला मोठा तगडा गड्यावाणी दिसणारा गोट्या येताना श्यामला दिसला. सहा फुट उंची, सावळा वर्ण आणि वर झालेले केस, मसल्स दाखवत गोट्याची एन्ट्री झाली.तसे संपूर्ण घरात सायलेंट मोड सुरु झाला.

हरी,रम्या आणि श्याम,आणि गोट्या ह्यांचं गाव शहरापासून ६० ते ७० किमीच्या दूरवर नदीच्या काठी. एक छोटस पण निसर्गाला साजेस सुंदर गाव होतं. गाव दिसायला जरी छोट असल तरी, गावात खूप सुखसुविधा आहेत, निसर्गाचा त्यांच्या गावावर चांगलाच आशीर्वाद होता. त्यामुळे गावाने कधी दुष्काळ कसा असतो, ते अनुभवले नव्हते, ह्या निसर्गरम्य गावाला चारही बाजूने डोंगराने घेराव घातला होता. जसा जणू पर्वतरांगाने त्यांचा गाव आपल्या कुशीमध्ये घेतला आहे. जसा गायीपासून दूर झालेलं कोकरू खूप दिवसातून भेटल्यानंतर आई त्या कोकराला आपल्या कुशीमध्ये जागा करते, आणि कुरवळते. डोंगरामधून निघणारी भली मोठी व दूरवर कुठल्यातरी समुद्राला जाऊन मिळणारी नदी. जणू सर्वाना संदेशपरिवहन करते की कधीच थकून जाऊ नका, समाजसेवा करत राहा. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दुःखाला मागे टाकत माझ्यासारख वाहत रहा. पुढे पुढे चालत राहा मागे फिरू नका. तसेही कोणी म्हटले आहे River Never Go Rivers So Live Like River.

गावामध्येच दहावीपर्यंत शासनाने शाळा उघडून दिली होती. त्यामुळे त्यांना दुसऱ्या गावात जाऊन शिक्षण घेण्याची कधी गरजही भासली नाही. आजूबाजूची दहापंधरा गावातील मुले ह्याच गावात येऊन आपले शिक्षण पूर्ण करून पुढील शिक्षणाला शहराकडे किवा तालुक्याला जाण्यासाठी सज्ज असायचे. शाळेच्या आजूबाजूच्या परिसरात खूप सारे झाडे होती आंबा, काजू, चिकू यांसारखे खूप झाडे असल्याने मुलांची चांगलीच मजा झाली होती. त्यामध्येच एक असा आंब्याचं झाड होतं जे शाळेपासून थोडा दूरवर पण नजदीक होतं. ते आंब्याचं झाड दिसायलाही विचित्र आणि भले मोठे होते.

ह्या चार मित्रांमध्ये शाळेच्या दिवसांत बेट लागलेली, की प्रत्येकाने शाळेच्या आंब्यावरून आंबे टिपून आणायचे. उद्या शाळेला सुट्टी पडणार होती, आणि आज नेमकी हरीवर आंबे आणायची वेळ आली होती, तसं पण तोही लगेच तयार झाला कारण उद्यापासून सुट्ट्या मिळणार होत्या.

हरी शिक्षकांना खोटनाट कारण सांगून भर दुपारी त्या भल्यामोठ्या विचित्र दिसणाऱ्या आंब्याच्या झाडाखाली आंबे टिपू लागला.त्या आंब्याच्या झाडाखाली गेल्यानंतर तो एकदम खुशच झाला. कारणही तसच होत, त्या दिवशी त्याच्या भाग्याने त्याला चांगलीच साथ दिली होती. आंब्याच्या झाडाखाली पुरणार नाहीत इतके आंबे कोसळले होते. त्यामुळे तेच आंबे हरी लगबगीने उचलू लागला. आंबे गोळा असताना अचानक धबधबा दोन ,चार,पाच,सहा,एकसाथ आंबे पडू लागले.

काही क्षणासाठी त्याला काहीच समजले नाही. ह्यावर खुश व्हाव की पळून जावं. हरीला चांगलाच घाम फुटला, त्यासाठी त्याने नजर आंब्याच्या झाडावर फिरवली, झाडावर बघताच त्याची दातखिली बसली. त्याने जेवढे जमवलेले आंबे तेवढे सगळे हातातून खाली कोसळले, त्याने जे बघितले त्याच्यामुळे त्याच्या अंगात उनंच उरल नव्हत. तो एकदम थरथर कापू लागला. त्याने जे बघितले त्याच्याने कोणीही शुद्ध हरपून जाईल.असंच काहीस त्याने पाहिलं.

आंब्याच्या झाडावर बरोबर मध्यमस्थानी एक काळी आकृती उभी होती. तिचे ते सडके तोंड, जागोजागी फाटलेला चेहरा आणि वरून कापलेली मान, आणि मानेमधून येणारा काळा रक्तस्त्राव , बाहेर आलेले पांढरे शुभ्र बिबुल, आणि लाल रक्तासारखे तीक्ष्ण डोळे हरीला असे बघत होते जसे त्याने त्याच्यावर अत्याचार केला आहे. त्याच्या शरीर अस्पष्ट दिसत होते, आणि त्याच्यावर घातलेले घाव जणू त्याला खूप भयानक मृत्यू दिला आहे.

हे पाहता त्याने काही हालचाल करायच्या अगोदर हरीने तिथून पळण्याचा मार्ग निवडला. मात्र हरीच्या डोळ्यासमोर त्याने पाहिलेले हिडूसवाने सडलेले शरीर दिसत होते.

हरी कसातरी धापा टाकत शाळेत पोहचला. मुकाट्याने आपल्या जागेवर जाऊन बसला, पूर्ण शरीर घामाने भरलेले, छातीमध्ये भीतीने घड्याळाच्या ठोक्यासारखे ठोके पडत होते.

हरी एवढा का घाबरलाय? म्हणून मित्रांनी विचारल. पण हरीची काही बोलण्याची मनस्थिती नव्हती. म्हणून त्यांनी शाळा सुटल्यानंतर बोलण्याचे ठरवले.

क्रमशः