callgirl - 1 books and stories free download online pdf in Marathi

कॉलगर्ल - भाग 1

टीप : कॉलगर्ल कादंबरी अमेझॉन किंडल वर प्रकाशित झाली आहे. प्रतिलिपीवर कॉलगर्लचे काही भाग अंशतः प्रसिद्ध झाले आहेत. संपूर्ण कादंबरी अमेझॉन किंडलवर सशुल्क उपलब्ध आहे.

भाग पहिला

ती घटना दोन दिवसांपूर्वी घडून गेली होती पण यश अजूनही त्यातून सावरला नव्हता. जगात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे विज्ञान आहे यावर त्याचा ठाम विश्वास होता. पण त्याच विश्वासाला धुडकावून लावणारी घटना यशने अनुभवली होती. त्याचं वैज्ञानिक मन ते स्वीकारायला तयार नव्हतं पण ती घटना डोळ्यादेखत घडल्याने तो पुरता घाबरला होता. यश प्रधान, मुळचा मुंबईचा, पेट्रोकेमिकल इंजिनिअर, IIT मद्रासचा post graduate गोल्ड मेडलीस्ट स्टूडंट, अमेरिकेतील एका मोठ्या पेट्रोलीअम कंपनीत campus selection झालेलं, भरभक्कम package, पंधरा महिने भारतात जॉब करावा लागणार होता आणि त्या performance वर अमेरिकेत परमनंट जॉबची ऑफर होती. भारत सरकारला कोकणातील ‘सावरी’ गावाजवळ समुद्रात नैसर्गिक तेलाचे साठे सापडले होते. ते तेल वापरायोग्य आहे की नाही याची टेस्टिंग यशची कंपनी करत होती, यशची तिथेच appointment झाली होती. रोज खोल समुद्रात जाऊन तेलाचे samples आणायचे, त्यांच्या वेगवेगळ्या टेस्ट घेऊन results maintain करावे लागायचे. सोबत काही चायनीज experts आणि आजूबाजूच्या गावातील हेल्पर असायचे. काम सुरु होऊन तीन महिने झाले होते. बाकी सगळं सुरळीत चालू होतं पण एक अडचण होती. ‘सावरी’ म्हणजे समुद्राच्या कुशीत वसलेलं छोटंसं गाव. जेमतेम दोन तीन हजार वस्तीचं. गावात राहण्यासाठी हॉटेल सोडाच पण साधं लॉजही नव्हतं. सावरीपासून जवळचं शहर होतं रत्नागिरी, तेही चाळीस किलोमीटर दूर होतं. वाटेत घनदाट जंगल, अन रस्ता म्हणजे फक्त पायवाटच होती. गावात भाड्याने राहण्यासाठी घरं तर होती पण बॅचलरला जागा द्यायला कुणी तयार नव्हतं. त्यामुळे यशला रोज रात्री त्या अवघड रस्त्याने एकटंच गाडी चालवत रत्नागिरीला जावंलागायचं. रस्ता अवघड असल्याने जिप्सीशिवाय पर्याय नव्हता. तसं कंपनीने चायनीज लोकांसाठी कंटेनरची घरे बनवून दिली होती पण यशला त्या पत्र्याच्या डब्यात नकोसं व्हायचं. त्यात त्या चायनीज लोकांचं जेवण म्हणजे चमत्कारच असायचा. रोज काहीतरी चित्रविचित्र पदार्थ बनवण्याची त्यांच्यात चढाओढ असायची. यशला ते सगळं बघून किळस यायची. त्यमुळे तो रोज सावरी ते रत्नागरी ये जा करायचा. काम संपवून तो निघायचा तेव्हा किरर्र अंधार पडलेला असायचा. घनदाट जंगल, तो किर्र अंधार अन खडबडीत रस्ता, सोबत कोणी चिटपाखरू नसायचं, रस्त्याने सर्वत्र सामसूम असायची. “आत्ता ही परिस्थिती, तर पावसाळ्यात काय होणारयं देव जाणे” यश स्वतःशीच बोलायचा. ड्रायव्हर ठेवायचा ही त्याने प्रयत्न करून पहिला पण कोणी टिकायचं नाव घेत नव्हतं. याच परिस्थितीत तीन महिने उलटले होते पण आणखी बारा महिने म्हणजे पूर्ण वर्ष बाकी होतं. कधी ते संपतात अन कधी मी अमेरिकेला जातो असं यशला झालं होतं. कारण यशची आई, मोठा डॉक्टर भाऊ, वाहिनी, त्यांचा मुलगा पुष्कर सगळेच अमेरिकेत होते. दादा आणि वाहिनीला तिथली सीटीझनशिप मिळाली होती, आई छोट्या पुष्करला संभाळण्यासाठी तिकडे गेली होती. तिलाही ग्रीनकार्ड मिळालं होतं. त्या सर्वांच्या आठवणीने यश व्याकूळ व्हायचा. रोज कँलेंडरवर दिवस मोजायचा. दिवस तसे बरे चालले होते पण गेल्या काही दिवसांपासून घडणाऱ्या विचित्र घटनांनी यश पुरता भांबावला होता. एके दिवशी यशला निघायला उशीर झाला किर्र अंधारात त्याची गाडी जंगलात शिरली अन एवढ्यात पाठीमागून गाडीला कोणीतरी जोरदार धक्का दिला. यशने चमकून मागे पहिलं तर एक भलं मोठं अस्वल गाडीवर चाल करून येत होतं. यशने ऍक्सलेटर जोरात दाबला, गाडी वेगात पुढे गेली. तसं अस्वल गाडीचा जोरात पाठलाग करू लागलं. रस्ता बरोबर नसल्याने गाडी काळजीपूर्वक चालवावी लागत होती. गाडीचा वेग कमी झाला कि अस्वल पाठीमागून धडक द्यायचं. तास-दीडतास हा खेळ सुरु होता. जंगल संपत आलं अन समोर रत्नागिरी हायवे दिसू लागला तेव्हा अस्वलाने पाठलाग सोडला. यशची गाडी चालवून पुरती दमछाक झाली होती. सकाळी यशने गाडीची अवस्था पाहिली तेव्हा अस्वलाच्या धडकेने गाडीचा मागील पत्रा पुरता चेमटून गेला होता. थोडक्यात वाचलो म्हणत यशने सुस्कारा सोडला. त्यादिवशी पासून यश साईटवरून लवकर निघायचा पण पुन्हा एकदा असाच उशीर झाला. त्या दिवशी घनदाट जंगलात, किर्र अंधारात वाघिणीने तिच्या बछड्यांसह यशचा रस्ता अडवला होता. वाघीण आपल्या बछड्यांना घेऊन रस्त्यातच बसली होती. यश होर्न वाजवून बेजार झाला पण ती हलायचं नाव घेत नव्हती. शेवटी कंटाळून यश गाडीतच झोपला. पहाटे पहाटे केव्हातरी ती फॅमिली निघून गेली. या प्रकाराने यशला घनदाट जंगलाची किर्र अंधाराची अन वेड्यावाकड्या रस्त्याची भीतीच बसली. पण कालची घटना जरा वेगळी होती. नेहमीप्रमाणे यशला निघायला उशीर झाला होता. आज समोर काय वाढून ठेवलंय याचाच विचार करत तो गाडी चालवत होता. एवढ्यात गाडीच्या काचेवर धपकन काहीतरी पडलं, अंधारात काय ते दिसलं नाही पण मनुष्याकृती असल्याचा भास झाला. आपण विचाराच्या तंद्रीत कुणाला तरी उडवलं हे यशच्या लक्ष्यात आलं. त्याने काचदिशी ब्रेक दाबून गाडी थांबवली. खाली उतरून पहिलं तर कुणीच नव्हतं. गाडीखालीही कुणीच दिसलं नाही. काहीतरी जनावर असेल असं विचार करून यशने तशीच गाडी दामटली. सकाळी येताना परत त्याने आजूबाजूला निरखून पाहिलं, पण काहीच दिसलं नाही. रक्ताचे डागही नव्हते. घडलेला प्रकार अजबच होता. साईटवर आल्या आल्या बबन समोर आला. बबन हा साईटचा शिपाई, तो दिवसभर यशच्या सोबतच असायचा. यश सांगेल ते काम करायचा. थोडक्यात, तो यशचा सांगकाम्याच होता. गाडीचा फुटलेला काच बघून त्याने यशला विचारलं, “काय सायबानु गाडी कुठं ठोकली ?” त्याच्या बोलण्याने यशची तंद्री भंगली “अं ? अरे काल जाताना कुणाला तरी उडवलं मी. पण कुणी दिसलंच नाही. प्राणी नव्हता, माणूसही नव्हता. काय होतं कोण जाणे ? अजबच प्रकार होता. मी खाली उतरून पाहिलं पण कोणीच नव्हतं.” यशच्या बोलण्याने बबन चमकला. तो गाडीच्या जवळ गेला. त्याने फुटलेल्या काचाकडे निरखून पाहिलं आणि झटक्यात गाडीपासून दूर झाला. “देवा देवा रामा रामा रवळनाथा भोलेनाथा” असं बडबडायला लागला. “काय झालं बबन? कसले मंत्र पुटपुटतोयस ?” तरी बबनचं पुटपुटणं चालूच होतं. “अरे काय झालं ते तरी सांगशील ?” “सायबानु तुमची खैर झाली. कालचा प्रकार साधा नव्हता, ती भुताटकी होती. ती हडळ तुमच्यावर चालून आली होती. काल अष्टमीचा दिवस, या दिवशी ती जंगलात थयथय नाचते. येणाऱ्या जाणाऱ्याचा जीव घेते. नायतर जल्माचं भारावून सोडते. तुमची पुण्याई थोर म्हणून तुमी वाचलात.” “चल रे, काही तरी बडबडू नको. या सगळ्या भाकड कथायेत. तुम्हा कोकणी माणसांना काहीतरी मनोरंजन लागतचं. त्यात भूत म्हणजे तुमच्या आपुलकीचा विषय. तुम्ही लोकांनी कोकणाला अगदीच बदनाम करून सोडलंय.”
“नाय सायबानु, रवळनाथाची शपत, खोटं नाय बोलत. वाटला तर फोरेष्टच्या सायबाला विचारा. त्यच्या माणसांचा गाडीचा काच अष्टमीलाच फुटला हाय.” “गप्प बस. उगाच याच्या त्याच्या साक्षी काढू नकोस. उद्या शनिवार रविवार सुट्टी आहे. मला आजच काम अटपायचयं, पुन्हा रिपोर्ट्स मेल करायचे आहेत. तो लॉन्चरचा खलाशी आला का? लॉन्चर सुरु करा, आपल्याला samples घ्यायला आत समुद्रात साईटवर जायचंय.” “सायबानु, तुमाला खोटा वाटत असेल तर हे बघा, त्या हाडळीनं तिची खूण सोडलीये इथं. हा बघा केसांचा पुंजका.” तसा यश चमकला. त्यानं गाडीजवळ येऊन पाहिलं. फुटलेल्या काचामध्ये खरोखर लांब लांब केसांचा पुंजका अडकला होता. “सायबानु तुमचं नशीब थोर! गाडीबाहेर उतरून पहिलं तरी तुमाला काय झाला नाय. त्या हाडळीनं झपाटला ना, तर माणूस पुरता कामातून जायचो. या पुढं काय बी झाला तरी गाडीबाहेर उतरायचा नाय. तुमाला रवळनाथाची आण हाय
...क्रमशः

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED