callgirl - 10 books and stories free download online pdf in Marathi

कॉलगर्ल - भाग 10

यश आज सकाळी लवकरच साईटवर आला. पुढच्या आठवड्यात कंपनीचे मँनेजर आणि भारत सरकारचे काही अधिकारी साइटला व्हिजीट देणार होते. त्याची तयारी चालू होती. यश समुद्रात सँम्पल आणण्यासाठी आला होता. अनेक सँम्पल्स घ्यायचे असल्याने त्याला बराच वेळ लागला. यश परत किनाऱ्यावर आला तेव्हा सूर्य माथ्यावर आला होता. तो केबिनमध्ये जाणार एवढ्यात त्याला बबन पळत येताना दिसला. तो ओरडतच येत होता.
“काय झालं बबन? एवढी धावपळ कसली चालू आहे?”
“सायबानु, घात झालाय, गोगटे काकूंना नाग डसलाय. बाईसाहेबांनी त्यांना गाडीत घालून रत्नागिरीची वाट धरली हाय. तुम्हाला बी बोलावलंय, तुमचा फोन बंद हाय का?”
“मी आत साईटवर होतो, आत्ताच आलोय, चल बस जिप्सीमध्ये.” यशने लगेच गाडी काढली आणि रत्नागिरीकडे निघाला. जान्हवीचा फोन बंद लागत होता.
“बबन, काय झालंय ते नीट सांग.”
“साहेबानु, मी तुमचं जेवण आणायला वाड्यावर गेलो. गोगटे काकू बागेत काम करत होत्या. माझ्यासंग माझा भाचा बी होता. त्याच्या मास्तरनं मला भेटायला बोलावलं होतं. तुमचं जेवण घ्यावं अन येता येता त्याच्या मास्तरला बी भेटून यावं, म्हणून त्याला बी वाड्यावर घेवून गेलो. बाईसाहेब डबा भरून देत होत्या. इतक्यात बागेतून गोगटे काकू वराडल्या. मी धावतच गेलो तर त्यांना नाग डसला होता. बाईसाहेब बी पळतच आल्या. मला सावरीतला दवाखाना कुटाय म्हणाल्या. पण नाग डसल्याचा इलाज फक्त रत्नागिरीतच होतो मनल्यावर त्यांनी तुमची गाडी काढली. काकूंना गाडीत टाकलं, काकास्नी बी सोबत घेतलं. मला तुमास्नी सांगायला इकडं पाठवलं. अन माझ्या भाच्याला संग घेऊन त्यांनी रत्नागिरीची वाट धरली हाय.”
एवढ्यात जान्हवीचा फोन आला.
“hello यश, कुठे आहेस?”
“मी रत्नागिरीला निघालोय, तुम्ही कुठे आहात?”
“मी काकूंना अँडमिट केलंय. तू लगेच नोबल हॉस्पिटलला ये. काकू खूप सिरीयस आहेत. मला काहीच सुचत नाहीये.”
“काळजी नको करू, आम्ही लगेच पोहोचतो.”

यश हॉस्पिटलमध्ये पोहोचला. बबनला पाहून त्याचा भाचा पळतच आला. जान्हवी नि काका काही दिसत नव्हते.
“साहेबानु, हा मंगेश, माझा भाचा हाय. मंगेशा, बाईसाहेब अन गोगटे मास्तर कुठ हैत?”
“मामा, वाटेत गोगटे मास्तरांच्या छातीत दुखायला लागलं. चक्कर बी आली. मास्तरांना अँडमिट केलंय. आणि ताई गोगटे आजींसोबत आतमध्ये गेल्या आहेत.”
यश आणि बबन डॉक्टरांच्या केबिनबाहेर वाट बघत बसले. मंगेश वाटेत काय काय झालं ते सांगू लागला.
“मामा, ताईनी गावाबाहेर गाडी काढली अन जंगलात दामटली. काकूंना सारखी चक्कर येत होती, ताई त्यांना जागं ठेवत होत्या, एकदा तर काकूंनी पार डोळेच झाकले, श्वास पण बंद पडला. मला तर वाटलं आता खेळच संपला, पण ताईंनी गाडी थांबवली. पर्समधून एक इंजेक्शन काढलं अन आजींना दिलं. आजींनी डोळे उघडले पण श्वास कमी कमी होत होता. आजींची अवस्था बघून मास्तरांच्या बी छातीत दुखायला लागलं. ताईंनी पर्समधून त्यांना पण एक गोळी दिली. मला मास्तरांना सांभाळायला सांगितलं. ताईंच्या मांडीवर काकू झोपल्या होत्या. ताई त्यांच्याशी सारखं बोलत होत्या. अन एका हाताने गाडी बी चालवत होत्या. त्यात पुन्हा काकूंना उलटी झाली. ताईंनी गाडी थांबवून पुन्हा इंजेक्शन दिलं. आम्ही हॉस्पिटलमध्ये आलो अन काकूंना अँडमिट केलं. काकूंची तब्येत लय बिघडली हाय. मास्तरांना बी अँडमिट केलंय.”
एवढ्यात केबीनमधून जान्हवी बाहेर आली. तिने यशला पाहिलं, अन त्याच्याकडेच धाव घेतली.
“यश, काकूंना नाग चावलाय, त्या खूप सिरीयस आहेत रे, मला त्यांची अवस्था बघवत नाही.” असं म्हणून रडायला लागली. घामानं डबडबलेल्या जान्हवीला यशनं शांत केलं. तिला पाणी प्यायला दिलं. तिचे डोळे पुसले.
थोड्यावेळाने डॉक्टरांनी या दोघांना केबिनमध्ये बोलावले.
“तुम्ही गोगटे सरांचे relatives आहात का?”
“नाही डॉक्टर, आम्ही त्यांचे शेजारी आहोत. आम्ही त्यांचं घर रेंटवर घेतलंय. काकूंची तब्येत कशी आहे? त्या सिरीयस आहेत का?”
“not at all. now she is out of danger.”
यश व जान्हवी दोघांनीही सुस्कारा सोडला. जान्हवी म्हणाली,
“डॉक्टर, काकूंना चावलेला साप कोणता होता?”
“banded krait. त्याला आपण ‘मण्यार’ म्हणतो. याचं विष नागापेक्षा पंधरा पट विषारी असतं. या विषाला neurotoxic म्हणतात. हे विष माणसांच्या मेंदूवर परिणाम करतं. श्वासोच्छास बंद पडतो, पोट दुखून उलटी होते आणि माणूस मरतो. तुम्ही अर्धा तास उशीर केला असता तर आपण काहीच करू शकलो नसतो. गोगटे सर सावरीला राहतात ना? मी त्यांना ओळखतो. ते इथे केळकर कॉलेजचे प्रिन्सिपल होते. पेशंटला साप कधी चावला होता?”
“सकाळी दहाच्या सुमारास. मी त्यांना लगेच गाडीत घेऊन आले.”
“तुम्ही इथे बारा-साडेबाराच्या सुमारास आलात. मण्यार चावल्यास फार तर तासभर माणूस जगतो. तुम्ही वाटेत काही औषधोपचार केले होते का?”
“actually मी काकूंना वाटेत ‘antisnake venom’ चं इंजेक्शन दिलं होतं. पण त्यांना परत उलटी झाली. आणि श्वासही बंद झाला. मग मी पुन्हा ‘एँट्राँपिन आणि निओस्टीग्मीनचा’ डोस दिला होता.”
“correct. मी ही तोच विचार करत होतो. पेशंट अँडमिट झाला तेव्हा respiration व्यवस्थित चालू होतं. मण्यार चावल्यावर असं कधीच शक्य नसतं. पेशंट हॉस्पिटलमध्ये येईपर्यंत त्याचा श्वास थांबलेला असतो. तुम्ही आमचं ७५% काम आधीच केलं होतंत. पण सावरीमध्ये तुम्हाला हे antivenoms कसे काय उपलब्ध झाले?”
“actually आम्ही मागच्या महिन्यात मुंबईहून इथे रहायला आलो. मी येताना सोबतच घेऊन आले होते.”
“तुमचं profession काय आहे? are you doctor?”
“नाही मी M.pharmacy ची student आहे. degree ला असताना मी ‘herpetology’ बद्दल बरंच वाचलं होतं. मी स्वतःसाठी नी इतरांसाठी एक small medical kit नेहमीच कँरी करते. त्यात ताप, सर्दी, डोकेदुखी डायरिया या किरकोळ आजारांसाठी medicines असतात. कोकणात साप आणि विंचवांचा सुळसुळाट असतो असं ऐकलं होतं. तेव्हा factor of safety म्हणून kit मध्ये anti snake venoms अँड केले होते, ते असे कमी आले.”
“अमेझिंग! पेशंटसोबत एवढ्या expert pharmasist असताना पेशंट वाचणार हे तर नक्कीच होतं. तुमच्या presence of mind चं कौतूक करावं तेवढं कमी आहे. सावरीमध्ये मण्यार चावल्यानंतरही वाचलेला हा पहिलाच पेशंट असावा. bye the way मी डॉ. सचिन साळवी. तुमचा परिचय?”
“मी जान्हवी प्रधान, हे माझे मिस्टर यश प्रधान. सावरीमध्ये पेट्रोकेमिकल प्रोजेक्ट चालू आहे, हे त्याचे इनचार्ज आहेत.”
“hello मिस्टर प्रधान, glad to meet you. your wife is very intelligent. you should proud of her.”
“thank you डॉक्टर. I always proud of her.”
यशला जान्हवीचा खरंच अभिमान वाटला.
“डॉक्टर, गोगटे काकांची तब्येत कशी आहे?” यशने विचारलं.
“not serious. पत्नीची अवस्था बघून त्यांचं blood pressure वाढलं होतं. heart attack आला असता पण सुदैवानं तसं काही झालं नाही, तुम्ही वाटेत गोगटे सरांनाही treat केलं होतं का?”
“हो. म्हणजे actually मी drive करत असताना काकांच्या छातीत दुखायला सुरवात झाली. आणि घामही येत होता.ही सगळी hypertension ची म्हणजेच systolic blood pressure ची symptoms आहेत. म्हणून मी त्यांना aspirin दिली.”
“very good. aspirin मुळे blood clotting कमी झालं, आणि narrowed artery मधला blood flow regulate झाला. great. मिस्टर प्रधान मी तुम्हाला म्हंटल नव्हतं you should proud of her.”
“thanks doctor. as a medical student this is my duty. डॉक्टर गोगटे काकांचा मुलगा जर्मनीत असतो, त्यांना inform करू का?”
“now both patients are out of danger. तुम्ही inform करू शकता. पण लगेच इकडे यायची गरज नाही. आणि तुमच्यासारख्या intelligent expert असताना तर मुळीच नाही. आज त्यांना इथे राहू द्या. उद्या सकाळी discharge देऊ. मिसेस प्रधान, you saved two lives today. तुम्ही नसता तर हे चित्र वेगळं असलं असतं. god bless both of you. have a good day.”

यश आणि जान्हवी काकांच्या रूममध्ये आले. जान्हवीला पाहताच काका उठायची धडपड करू लागले. बबनने त्यांना सावरलं.
“मालती कुठंय? तिची तब्येत कशी आहे? मला तिला भेटायचय.”
यशने काकांना समजावलं. धोका टळल्याचं आणि काकू ठीक असल्याचं सांगितलं. काकूंचा आराम झाला की भेटायची परवानगी असल्याची हमी दिली. काका शांत झाले. थोड्या वेळाने म्हणाले,
“यश, तुझी बायको झाशीची राणी आहे. तू तिचा पराक्रम बघायला हवा होतास. एका हाताने मालतीला सावरत होती, दुसऱ्या हाताने गाडी चालवत होती. हिने मालतीवर वाटेतच उपचार सुरु केले होते. माझ्या छातीत दुखायला लागलं तर हिने मलाही गोळी दिली. सावरीत मला आज सत्तर वर्ष झाली पण साप चावलेला पेशंट कधी वाचल्याचं मला आठवत नाही. पोरी, तुझ्या रूपाने साक्षात धन्वंतरीच धावून आला. म्हणून आम्ही वाचलो. माझी म्हातारी गेली असती तर मी कुणाकडे पहायचं होतं? ती माझ्या घराची लक्ष्मी आहे. तिच्याशिवाय माझं घर, घर नसून स्मशान झालं असतं. तू माझ्या घराची लक्ष्मी यमाच्या दारातून सोडवून आणलीस. पोरी, मी वयाची चाळीस वर्ष विद्यादान केलं. पोरांना भरभरून शिकवलं. प्रसंगी पदरमोड केली पण मुलांच्या शिक्षणासाठी मागे पुढे पाहिलं नाही. या म्हता-याच्या गाठी थोडी फार पुण्याई जमा झाली असेल तर तुला आशीर्वाद देतो, ‘तू खूप सुखी होशील, तुझा संसार सोन्याचा होईल. तुझी मुलं विद्वान होतील, खूप पुढे जातील.’ काकांनी जान्हवीच्या डोक्यावर हात ठेवला. त्यांना भावना आवरणं कठीण झालं. ते रडू लागले.
त्यांना पाहून यशला गहिवरून आलं. त्यानं जान्ह्वीकडे पाहिलं, तीही रुमालाने डोळ्यातले अश्रू पुसत होती.”

क्रमशः

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED