शेवटी अजय अन यशने तिला ओढतच काउचवर आणले. लिंबू पाणी पाजल्यावर ती जरा शुद्धीवर आली. यशच्या हातात रेडबुलचा टीन बघून ती वैतागली.
“यार यश, मी मुलगी असून रम पिते. आणि तू रेडबुल पितोस. शी...!!! मला तुझी लाज वाटते यार. रेडबुल फेकून दे, ही बिअर पी, करोना आहे यार.......इसके लिये तुम होस्टेलपे झगडते थे.”
“नको यार अनु... रात्री आईशी स्काईपवर बोलायचं आहे. प्लीज आज नको.”
यार एक ग्लास बिअर......अपने भाभीकी respect के लिये इतना भी नही करेगा?” असं म्हणत ती उठायला गेली अन धडपडली. तिच्या आग्रहामुळे यशने एक ग्लास बिअर पिली.
“सिगरेट नही पियेगा........अपनी भाभीकी हातसे.........एक कश एक कश म्हणत तिने सिगरेट यशच्या तोंडाला लावली.” त्याने बळजबरीच एक कश घेतला.
“लव्ह यु डीअर” म्हणत अनुने यशच्या गालाची पप्पी घेतली अन परत डान्स फ्लोअर वर गेली.
x x x
रात्रीचे तीन वाजले होते. यश एकटाच हॉलमध्ये बसला होता. त्याने स्काईप सुरु केलं. आईला समोर बघून त्याच्या बैचन मनाला विसावा मिळाला.
“hello आई, कशी आहेस? तब्येत कशी आहे तुझी?”
“मी बरी आहे रे बाळा.....तू कसा आहेस?”
“मी मजेत...... मुंबईला आलो आहे..अजयकडे.”
त्यांच्या गप्पा सुरु होत्या. आईने यशला वेळेवर जेवण्यास सांगितलं. तब्येतीला जपायला सांगितलं. दादा वाहिनीही यशला बोलले. यश त्या सर्वांना खूप मिस करत होता. त्याला लगेचच अमेरिकेत जावेसे वाटत होते.
“हेलो यश चाचू, how are you?” यशचा चार वर्षाचा पुतण्या पुष्कर यशशी बोलत होता
“I am fine. how are you पुष्कर?”
“I am also fine. चाचू तू us ला कदी येणाल? next week मदे माजी फँन्सी द्लेस कोम्पितिशन आहे, मी त्यात मात्मा गांदी होनाले. तू ये ना प्लीज, आपण enjoy कलू. तू येणाल ना?”
“हो बाळा, मी नक्की येईल.”
“बाय चाचू....”
“बाय.”
यशच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. त्या रात्री तो खूप रडला.
सकाळी यश, अनुजा, अजय ब्रेकफास्टसाठी बसले होते. यशचे रडून सुकलेले डोळे सर्व काही सांगत होते. अनुजाने अजयला खुणावले तसा अजय म्हणाला,
“काय झालं यश? काही प्रॉब्लेम आहे का?”
“नाही रे काही नाही, असं का विचारतोयस?”
“नाटक बंद कर आणि खरं सांग काय प्रॉब्लेम आहे ते?”
“खरंच काही नाही.”
“यश तू एवढा innocent आहेस, की तुझ्या मनातला प्रत्येक विचार तुझ्या चेहऱ्यावर लार्ज font मध्ये प्रिंट होतो. त्यामुळे खोटं बोलणं तुला जमत नाही, खरं सांग काय झालंय?”
“हो, आणि काल रात्री तू रडत होतास, हे तुझे डोळेच सांगतायेत..आणि दुसरी गोष्ट, हे कोकण-बिकन शी तुझा सीन जमत नाहीये. काय इश्यू आहे ते क्लिअर सांग.” अनुजा यशचा हात हातात घेत म्हणाली.
यशने त्या दोघांना आजपर्यंत घडलेली प्रत्येक गोष्ट सांगितली. तो सांगताना एवढा सिरिअस होता कि त्या दोघांना विश्वास ठेवण्यावाचून पर्याय नव्हता.
“तर मग यावर सोल्युशन काय?”
“सोल्युशन एकच आहे, मी जॉब सोडतोय, उद्याच resign देतोय.”
“क्काय? वेडा आहेस का? त्या फालतू हडळ का काय त्यासाठी तू जॉब सोडणार आहेस?
“माझ्याकडे दुसरा पर्याय नाहीये आज्या.”
“मूर्ख आहेस मग तू.....अक्कल मातीत गेलीये तुझी....अनु तू सांग यार याला समजावून.”
“आज्या तुला कळतंय का? मी कोणत्या सिच्युएशनमधून गेलोय ते? अरे दोनदा माझ्या जीवावर बेतलं होतं. उद्या जर बरं वाईट झालं तर कोण जबाबदार आहे?”
“काही होणार नाही. एक विथ लायसन्स रीवाँल्वर घेऊ. जे समोर येईल ते ठोकून टाकू. पुढंच पुढ बघता येईल.”
“उगाचच काही बडबडू नकोस, तुला परिस्थितीची कल्पना नाहीये.”
“हो का? तुला चांगलीच कल्पना आलीये. त्या फालतू हाडळीसाठी हा जॉब सोडणार आहे, अनु सांग यार याला समजावून...नायतर हा माझ्याकडून फटके खाईल.”
प्रकरण हातघाईवर आलं तसं अनु मध्ये पडली.
“एक मिनिट, एक मिनिट दोघेही शांत व्हा प्लीज. यश तुला जॉब सोडायचा आहे, अजय तू जॉब सोडायच्या oppose आहेस. लेट्स टेक pros and cons. अजय तू जॉब चे advantages सांग.”
१)या जॉबमुळे हा आपल्या बँच मध्ये सर्वात आधी सेटल झालाय.
२)याला आज literally देशाच्या राष्ट्रपतीपेक्षा जास्त सँलरी आहे.
३)एक वर्ष भारतात काढल्यावर हा लगेच अमेरिकेत जाईल.
४)आणि अमेरिकेत हा फँमिली सोबत राहू शकेल.
“जॉब जर सोडला तर हा disturb होईल. पुन्हा दुसरा जॉब कसा असेल माहित नाही. एवढी सँलरी मिळेल याची गँरंटी नाही मग अमेरिका तर दूरची गोष्ट आहे. त्यात अमेरिकेत नवीन सरकार आल्यापासून visa मिळणेही अवघड आहे. ग्रीनकार्ड तर विसराच! अमेरिका नाही तर फँमिली नाही, फँमिली नाही तर स्टेबल राहणार नाही, उलट आपल्या दोघांच्या डोक्याला ताप देत बसेल.” अजयने एका दमात सर्व सांगून टाकले.
“तेरी बात मे दम है बॉस! यश तू सांग, जॉब सोडल्याने तुझा काय फायदा होणार आहे?”
यश विचार करू लागला, पण फर तर फर हाडळीपासून सुटका एवढी एकच गोष्ट होती. आणि यासाठी एवढ्या सगळ्या गोष्टीवर पाणी सोडणं त्याला चुकीचं वाटू लागलं.
त्याची अवस्था अनुच्या लक्ष्यात आली.
“हे बघ यश, तुझा प्रॉब्लेम जेन्युईन आहे. पण त्याला आपण दुस-या अँगलने बघू. कंपनीने तुला accommodation दिलंय, पण तुला तिथे राहायचं नाहीये. रत्नागिरीहून अप-डाऊन करायची तुझी इच्छा नाहीये. गावात घर मिळू शकेल पण त्यासाठी तुझी फँमिली पाहिजे. तुझी family तर us मध्ये आहे. आता एकतर तुला कंपनी accommodation मध्ये राहावं लागेल किंवा अप-डाऊन करावं लागेल किंवा family आणावी लागेल.”
“family तर शक्यच नाही. आईला us मधून ‘सावरीसारख्या’ गावात आणणं शक्यच नाही. दादा वाहिनी परवानगी देणार नाहीत. अन माझीही इच्छा नाही.”
“मी original family विषयी नाही, तर डमी family विषयी बोलत आहे.”
“म्हणजे???” यश आणि अजय दोघांनी एकदम विचारलं.
“म्हणजे कॉलेजात तुम्ही आजारी नसताना देखील खोटं medical ceritificate आणायचा. तसचं आपण यशचं लग्न झालं नसताना त्यासाठी खोटी बायको आणायची.”
“खोटी बायको आणणं काय medical certificate आणण्याएवढं सोपय का? आणि मला तिथे एक वर्ष काढायचं आहे, वर्षभर माझ्यासोबत कोण राहायला तयार होईल? common यार अनु, काही तरी impossible नको सांगू.”
“यश, impossible असं काहीच नाहीये. माझा प्लान तर ऐकून घे.”
“आपण तुझ्यासाठी एक डमी वाईफ शोधू. तुम्ही दोघं मिळून गावात राहायला जा. नवरा-बायको म्हणून राहण्याचं नाटक करा. house owner ला विश्वासात घ्या. दीड दोन महिन्यांनी आपण तुझी वाईफ प्रेग्नंट आहे असं सांगू. हवं तर तसं medical certificate बनवू. तिला complete bedrest सांगितल्याने आणि या छोट्या गावात हॉस्पिटल facility नसल्यानं, तुझी बायको तिथे राहू शकणार नाही म्हणून ती पुढील महिने डिलेव्हरीसाठी माहेरी येईल, आणि डिलेव्हरी नंतरचे तीन महिने बाळ आजारी असल्याचं सांगू. ०९ महिने प्रेग्नन्सी ०३ महिने बाळाची cure, १२ महिने झाले कि तुझी ट्रान्स्फर होईल. आणि तू डीरेक्ट US ला जाशील.”