कॉलगर्ल - भाग 2 Satyajeet Kabir द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कॉलगर्ल - भाग 2

ठीक ठीक म्हणत यश पुढच्या कामाला लागला.

लॉन्चर समुद्रात निघाली. समुद्राच्या लाटा बोटीला धडकत. त्यामुळे बोट हळूच डूचमळे. समुदपक्षी मासे खाण्यास समुद्रावर घिरट्या मारत असत. हिरवी गर्द झाडी, ओळीत नारळाची झाडे, निळाशार समुद्र, मोठे नयनरम्य दृश्य होते. लॉन्चर पाणी कापीत समुद्रात शिरली. अंतर कापीत साईटवर आली.

“चला सायबानु, sample घ्यायचा ना?” बबनच्या बोलण्याने यश भानावर आला. त्याच्या डोक्यातून हडळ अन केसांच्या पुंजक्याचा विषय जात नव्हता. दिवसभर तो त्याच तंद्रीत होता. फोरेस्ट ऑफिसरने ही फोनवर या गोष्टीला दुजोरा दिला. तसेच अशा घटनेमुळे दोन कर्मचार्यांच्या डोक्यावर परिणाम झाल्याचं सांगितलं. आणि काळजी घ्यायचा सल्ला दिला. बबनच्या बोलण्यात तथ्य होतं. यशला आता त्या रस्त्यानं प्रवास करणं अशक्य वाटू लागलं. त्यानं त्या दिवशीची रात्र चायनीज मित्रांसोबत कंटेनर मध्ये काढली. सकाळी तडकाफडकी रत्नागिरी गाठली आणि तातडीने अजयला फोन लावला. यशची सगळी फॅमिली तर अमेरिकेत होती. भारतात जिवाभावाचा म्हंटल तर फक्त अजयच होता. त्याचा क्लासमेट, रुममेट, बेस्ट फ्रेंड.

“आज्या, कुठं आहेस? आज विकली ऑफ आहे ना? मी येतोय.”
“ये ना डार्लिंग, तुझ्यासाठी तर प्रत्येक दिवस विकली ऑफच आहे.”
यश फ्लॅटवर पोचला तोवर दुपार होत आली होती.
“या, या, प्रधान साहेब. आमच्या गरीबखाण्यात तुमचे स्वागत आहे. बोला काय सेवा करू तुमची?”

“बोलबच्चन बंद कर. काय अस्ताव्यस्त पसारा केलाय फ्लॅटमध्ये? अनु कुठं गेलीये? तिचा आज विकली ऑफ नाहीये का?”

“अरे ती बेंगलोरला conference साठी गेली आहे. आजच येतीये. मी तिला रिसीव्ह करायला airport ला चाललोय. चल येतोस?”

“तरीच म्हंटल, अनु असताना एवढी घाण करायची तुझी हिम्मत कशी झाली? मी इथेच थांबतो तू ये जाऊन.”

“यार जरा साफ-सफाई करून ठेव ना. नाय तर शिव्या खाव्या लागतील.”

“ठीकय ठीकय जा तू”

“thanks डार्लिंग. love you चल येतो.”

अजय गेल्यावर यशने फ्लॅट आवरायला सुरुवात केली. या आज्याचं सेट आहे यार, मुंबईत जॉब आहे, duplex फ्लॅट आहे. अनुजा सारखी कमावती live in पार्टनर आहे. आणि मी मात्र दूर कोकणात वाघ अस्वल, हडळ अन समुद्र यांच्यात अडकलो आहे. डोअर बेल वाजली. यशने दरवाजा उघडला.
“hello innocent guy. How are you? थकलेला दिसतोयेस.” अनुजा यशला मिठी मारत म्हणाली.
“Hi अनु, कशी झाली conference?”
“bullshit, conferences तो आती-जाती रेहती है. तू बता? आजकाल निसर्गाच्या सानिध्यात असतोस, समुद्र वगैरे भारीये यार, तुझा सीन set ये.”
“प्रत्येकाला दुसऱ्याचीच बायको सुंदर वाटते अनु, मला तुमची लाइफ सेट वाटते, तुला माझी. बाकी काही नाही.” यश तिला पाण्याचा ग्लास देत म्हणाला.

“पण एकाची बायको अशी असते की ती सर्वांनाच सुंदर वाटत असते. तो तू आहेस. you know? इथं sea facing appartment ला ०२-०३ cr. मोजावे लागतात. तू तर रोजच तिथे जातोस.”
“बँकेचा कँशीअर दिवसभर पैश्यात खेळतो, म्हणून त्याला श्रीमंत थोडंच म्हणता येतं? Assumptions always becloud reality.”
“love you यार, तुझ्या metaphors ची मी फँन आहे. यश यार तू रायटर नाहीतर फिलोसॉफर हो, काय हे पेट्रोल वैगेरे.”

“बस बस, आता तेवढंच करायचं बाकी आहे.”
अनु फ्रेश होऊन आली तेव्हा हॉलमध्ये अजय अन यश बोलत बसले होते.
“मग, आज वीकेंड चा काय प्लान आहे?” अनु अजयला म्हणाली.
“घुमेंगे, फिरेंगे. नाचेंगे, गायेंगे, आईश करेंगे, और क्या? आज तो मौका भी है, दस्तूर भी है, और दोस्त भी है. खूब जमेगा रंग, जब मिल बैठेंगे तीन यार,...... यश, अजय और अजय का प्यार.” असं म्हणत अजयने अनुच्या कमरेत हात घातला अन तिला जवळ ओढली, अनुने ही त्याला गालावर कीस केलं.
“मग यश, कुठे जायचं?”
“मला काय विचारतोस, अनुला विचार.”
“बॉम्बेमध्ये नाईट लाइफ एन्जॉय करायची असेल तर one and only ‘पब हार्बर’, fuck off बंगलोर, I miss बॉम्बे नाईट लाइफ. यश तुला चालेल ना?”

यशने फक्त मान डोलावली. यशची ती थंड reaction अजय अन अनुच्या नजरेतून सुटली नाही. रात्री ‘पब हार्बर’ मध्ये सगळेच enjoyment च्या मूडमध्ये होते. सगळी पब्लिक टल्ली झाली होती. अनुने तर dance floor वर धिंगाणा घातला होता. अजयला तिला आवरता आवरता नाकी नऊ आले होते. तरी ती ऐकत नव्हती.

क्रमशः