एडिक्शन - 3 Siddharth द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

एडिक्शन - 3

विवाहापूर्वी पाहिलेली तिची सारी स्वप्न आता गळून पडाली ..लग्नानंतर काही दिवस तरी मुलीच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यालायक असतो पण ईथे तर तो काही दिवसातच दूरवर उडून गेला ..सारी स्वप्न , साऱ्या अपेक्षा फोल ठरल्या आणि ते जीवन एक श्राप वाटू लागला तरीही ती जगत होती ..एक श्राप बनून
एका दिवसाची गोष्ट ..ती राजकुमारी घरकाम करत बसली होती आणि तेवढ्यात तो राजकुमार आला ..आज त्याने खूप जास्त दारू प्यायली होती त्यामुळे त्याला स्वतःचाच भान नव्हतं ..समोर काही अंतरावरच त्याची आईदेखील बसून होती ..त्याने बॅग ठेवली आणि सरळ किचनमध्ये गेला ..ती काम करत असताना तिच्या शरीराच्या प्रत्येक भागाला तो स्पर्श करू पाहू लागला ..सासूबाई समोर आहेत म्हणून तिने त्याला मनाई करण्याचा प्रयत्न केला ..तरीही तो बाजूला व्हायला तयार नव्हता शेवटी तिने रागाने त्याला बाजूला सारल आणि त्याला तो अपमान वाटला ..तो सरळच तिच्या अंगावर धावत गेला आणि तिच्या डोळ्यांसमोर तिचे वस्त्रहनन झाले ..तिला ते सर्व असह्य झालं ..त्याक्षणी स्वतःच्या जगण्याची किळस वाटू लागली..स्वताची लाज वाचवावी म्हणून ती तशीच धावत बेडरूमला गेली एव्हाना सासूबाईंने देखील डोळे बंद केले होते ..तोही तिच्या मागे धावतच गेला ..ती बिचारी अश्रू गाळत होती आणि हा फक्त आपली हवस पूर्ण करत होता ..तिच्या एका अश्रूकडे देखील त्याची नजर गेली नव्हती आणि त्याने तिला ओरबाडण्यास सुरुवात केली ..त्याची भूक भागेपर्यंत त्याने तिला सोडले नाही ..भूक भागली आणि तो तसाच झोपी गेला ..कितीतरी वेळ ती तशीच बसून होती ..ना पोटात अन्न , ना पाणी आणि डोक्यात सतत विचार ..पाहता - पाहता ती एक शोभेची वस्तू झाली ..जीचा सतत उपयोग करून घरातल्या जात होता..
या क्षणापासून ती मात्र फारच कोमेजली ..सासूबाईंशी साधी नजर मिळविण देखील तिला कठीण होऊन बसल..कधी - कधी थोडं फार बोलणारी ती अगदी शांत झाली ..सासूबाईंशी देखील काम पडलं तरच बोलायची ..तिच्या आयुष्यात हैवान आला होता जो तिला प्रत्येक क्षणी ओरबाडून खायचा तरीही तिला त्याविरोधात एक शब्द काढता येत नव्हता ..आई - वडीलही गरीब त्यामुळे त्यांना हे सर्व सांगून त्रास द्यायचा नव्हता त्यामुळे तिने शांत राहनच पसंद केलं ..तो प्रसंग पुन्हा एकदा येऊ नये म्हणून स्वताच त्याला स्वताच शरीर अर्पण करू लागली ..तो आपली अतृप्त इच्छा पूर्ण करायचा नंतर झोपी जायचा ..आता हे रोजचंच होऊ लागलं आणि आपल्यावर कुणीतरी अन्याय करतंय हेसुद्धा ती विसरून गेली ..कधी - कधी या नरकामधून पडून जाण्याचा तिला विचार यायचा पण तेवढी हिम्मत ती गोळा करू शकली नाही ..
दिवस जात होते आणि ती आपल्या त्याही स्थितीत आनंद शोधण्याचा प्रयत्न करू लागली ..तेवढ्यात एक खूषखबरी आली आणि तिला जगण्यासाठी नवीन उमेद मिळाली ..त्या राजकुमाराला आपल्या पोटात एक छोटी राजकुमारी असल्याची बातमी मिळाली आणि तिचे सारे दुःख जणू ती क्षणात विसरून गेली ..एकदा की छोट्या राजकुमारीचे दर्शन झाले की राजकुमारालाही आपल्या जबाबदारीचे दर्शन होईल अशी आशा तिच्या मनात निर्माण झाली ..आणि ती त्या छोट्या राजकुमारीच्या येण्याची वाट पाहू लागली ..सेकंद मिनिटात बदलले ..मिनिटं तासात आणि तास महिन्यात ..9 महिन्यानंतर तिचा जन्म झाला ..गोंडस बाळ पाहून तीच शरीर पुन्हा एकदा खुलायला लागलं ..मातृत्त्वाची ऊब तिला तिच्या जन्माने मिळाली ..मोठ्या - थाटामाटाने तिने चिमुकलीच नाव श्रेयसी ठेवल ..श्रेयसी येण्याने राजकुमारीच आयुष्य फारच बदललं होत..तिला अंधारातही प्रकाशाची आशा निर्माण झाली परंतु फक्त काही काळासाठीच..तिला वाटलं होतं की श्रेयसीचा जन्म झाल्याने राजकुमारात थोडा फार तरी फरक पडेल पण तिची हीदेखील आशा इतर आशेप्रमाणे फोल ठरली ..उलट श्रेयसीच्या येण्याने त्याला राजकुमारीसोबत शारीरिक संबंध ठेवता येत नाही म्हणून तो श्रेयसीचा तिरस्कार करू लागला ..कधी - कधी त्याला राहवलं नाही की जबरदस्ती करून तिच्यावर तुटून पळायचा मग बाजूला ते तान्हुल बाळ रडत आहे याची परवादेखील त्याने कधीच केली नाही ..एखादा पुरुष एवढ्या खालच्या थराला जाऊच कसा शकतो अस तिला वाटून जायचं पण स्त्रीच्या जातीने फक्त भोगायच असत हे तिने जाणल आणि नाईलाजास्तव किळसवाण जीवन जगू लागली ..श्रेयसी जशी - जशी मोठी होऊ लागली तिला सांभाळता - सांभाळता तिचेही दिवस निघू लागले ..पण अलीकडे अत्याचारांनि सीमा गाठली आणि तिला हे जीवनच नकोस वाटू लागलं ..
पाहता - पाहता 5 वर्षे झाली ..एके दिवशी आई बाहेर गेली असल्याने श्रेयसी तिची वाट पाहू लागली ..सकाळी बाहेर निघालेली राजकुमारी सायंकाळ झाली तरीही घरी परतली नव्हती ..इकडे श्रेयसिने रडून - रडून आपले हाल करून घेतले ..आजी तिला समजवण्याचा प्रयत्न करीत होती तरीही तिच्या डोळ्यातील अश्रू थांबायला तयार नव्हते ..तेवढयात तो राजकुमार घरी आला ..तो आजही खूप पिउन आला होता ..आल्या - आलीच त्याने तिला शोधण्याचा प्रयत्न केला पण ती कुठेच दिसली नाही ..तिला घरात न बघून त्याने शिव्यांची लाखोळी व्हायला सुरुवात केली ..शेवटी तो थकला आणि तसाच जाऊन बेडवर पडला ...
दोन - तीन दिवस झाले होते पण राजकुमारीचा काहीच पत्ता नव्हता ..श्रेयसीला आणि सासूबाई फक्त तिची येण्याची वाट पाहत होत्या ..ती तर आली नाही पण एक खबर मात्र उडत - उडत कानावर आली ..ती खबर म्हणजे राजकुमारी बाजूच्याच मुलासोबत पळून जाण्याची ..तशी राजकुमारी दिसायला फार सुंदर त्यामुळे कुठलाही पुरुष तिच्याकडे सहज आकर्षिला जायचा ..ही खबर ऐकताच सासूबाईंनी डोक्यावर हात मारून घेतला ..खर तर त्यांना राजकुमारीच्या जाण्याच दुःख नव्हतं पण तिने श्रेयसीलादेखील सोबत घेऊन जाण अपेक्षित होत ..पण ती गेली एकटीच बिचाऱ्या छोट्याश्या मुलीला त्या नरकात सोडून ..तिच्या डोक्यात विचारांनी थैमान घालायला सुरवात केली आणि तिने भीतीने अलगद श्रेयसीला मिठीत घेतल..त्या गोंडस मुलीकडे पाहून तिला भरून आलं होत त्यामुळे ती पटापट कपाळाच चुंबन घेऊ लागली ..
हळुहळु राजकुमारीची घरी परत येण्याची आशाही मावळली आणि सर्वच आपल्या कामात व्यस्त झाले ..श्रेयसीची आजी तिच्या बाबांना फार ओरडायची पण तो तीच काहीच ऐकायला तयार नव्हता ..तो जेवढही कमवायचा तेवढे सर्व पैसे नशेत उडवायचा त्यामुळे दोघींची खाण्यापिण्याची ओढाताण व्हायची ..पण येणारा प्रत्येक दिवस समोर ढकलत ते दिवस काढू लागले ..राजकुमारी गेली पण श्रेयसीला भयानक नरकात सोडून ..हा नरक कदाचित अस काहीतरी देणार होता जे श्रेयसिने विचार देखील केलं नव्हतं ..

क्रमशः...