Sharth - 8 books and stories free download online pdf in Marathi

शर्थ - भाग ८

भाग ८ - शर्थ

प्रस्तुत शिवकालीन ऐतिहासिक प्रेमकथा हि इतिहासातील काही सत्य घटनांना कल्पनेची जोड देऊन लिहिलेली आहे. काही चुका अथवा आक्षेपार्ह आढळल्यास निदर्शनास आणून द्यावे आणि अभिप्राय कळवावे हि विनंती.

येसाजींनी घडलेला प्रसंग सान्गायला सुरुवात केली.

'येसाजींबरोबर असलेले पन्नास एक मावळे चारा भरलेल्या वीस पंचवीस बैल गाड्या घेऊन पुण्यात घुसले. अन मोक्याच्या ठिकाणी दबा धरून बसले. ठरलेल्या वक्ताला हर हर महादेव च्या आरोळ्या घुमू लागल्या. राजांपाठोपाठ येसाजी अन त्याचे मावळे, लाल महालात घुसले. एकच कापाकापी सुरु झाली. समोर येईल त्याला कापलं जात होतं. सगळीकडे आरडा ओरडा, गोंधळ अन पळापळ चालू होती. शिवा महालाखाली येणाऱ्या शत्रू सैन्याला सपासप कापून काढत होता. राजांनी शास्ताखानाच्या दालनाकडे धाव घेतली. मागे येसाजी होताच. तोच खाली शिवा अन एका मोगली सरदाराची जुंपली. तो मोगली सरदार बहुदा खानाचा मुलगा असावा. तलवारीवर तलवारी खणाणु लागल्या. शिवाच्या एका ताकतवर वाराने त्याच्या हातातली तलवार खाली पडली. तोच शिवाने दुसरा वार त्याच्या छाताडावर केला. 'या अल्ला .... बचाओ अब्बू .... ' म्हणत तो खाली कोसळला. इकडे राजांनी खानाला मारण्याचा प्रयत्न केला पण त्याचं बोटांवर निभावलं. खान त्याच्या महालाच्या खिडकीतून उडी मारून पळून गेला. राजांनी माघारी फिरायचा इशारा दिला. सगळे माघारी फिरू लागले. कात्रजच्या जंगलाच्या घाटाने सगळ्यांनी सिंहगडावर पोहोचायचं होतं. सगळे गडावर आले. कात्रजच्या घाटापर्यंत शिवा येसाजीच्या पथका बरोबर होता. मात्र नंतर तो गडावर पोहोचलाच नाही.'

सांगता सांगता येसाजींच्या डोळ्यांत पाणी साठलं होत. एक पहारेकरी दोन तीन वेळा आत येऊन, 'बाहेर कुणीतरी तातडीनं भेटायला आलंय' म्हणून सांगून गेला होता. तोच तो पुन्हा आत आला.
राजे जरा गुश्शातच म्हणाले, "कोण आहे? आणि एवढी काय तातडी आहे? थांबा म्हणावं त्यांना."
पहारेकरी बिचकतचं म्हणाला,"माफी असावी राजं.. म्या लय सांगितलं. पर आयकना त्यो."
राजे जरा त्रासूनच म्हणाले,"ठीक आहे. पाठव." राजांनी शिवाच्या कुटुंबियांना अन पाटलांना बाजूच्या दालनात बसण्यासाठी हुजऱ्याला सांगून त्यांना काय हवं नको पाहायला सांगितलं. पहारेकरी बाहेर जाताच, एक इसम काठी टेकवत आत आला. डोक्यावरची जखम एका पांढऱ्या कपड्यांन बांधली होती. शिवाय चेहऱ्यावरही जखमा झळामुळे त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. डाव्या पायलाही जखम झाल्यामुळे काठीच्या आधारानं तो सावकाश आतमध्ये येत होता. अंगावरचा सदराही मळलेला तर कुठे कुठे फाटला होता. त्याला अशा जखमी अवस्थेत सदरेवर आलेलं पाहून राजांचा राग निवळला.
राजे धीर गंभीर स्वरात विचारलं, "कोण आपण अन हि तुमची अवस्था कशी झाली?"
समोर येताच तो इसम, "मुजरा राजं... मुजरा सुभेदार..." म्हणत थोडं वाकला. आवाज ऐकताच येसाजीराव चमकलेच पण त्या इसमाचा अवतार पाहून क्षणभर गोंधळले.
राजांनी आपला उजवा हात छातीपाशी नेत म्हणाले,"कोण आपण? बोला, काय..."
राजाचं वाक्य मधेच तोडत तो इसम म्हणाला, "राजं.. म्या शिवा... शिवा पांढरे... "
राजे अन येसाजींनी चमकून त्याच्याकडे पाहिलं अन ताडकन बैठकीवरून उठले.
"शिवा ...!" राजांनी एक क्षण येसाजींकडे पाहिलं.

शिवाकडे एक पाऊल टाकलं तोच,

"शिवा ssss", असा टाहो फोडत बाजूच्या दालनात दोन तीन दिवसांपासून गप्प बसलेली पारू धावतच सदरेवर आली. पण शिवा कुठाय? एक क्षण तिने समोरच्या इसमाकडे पाहिलं. डोळ्यांना डोळ्यांची भाषा समजली, ओळख पटली अन धावतच पारू शिवाला घट्ट बिलगली. शिवाच्या हातातली काठी गळून पडली शिवानेही पारुला घट्ट मिठी मारली. राजे अन येसाजी सदरेवर हे दृश्य पाहून अचंबित झाले. पारूच्या मागे शिवाचे आई बाप अन पाटीलही धावत सदरेवर आले. एक क्षण शिवा विसरूनच गेला की, आपण शिवाजी राजांसमोर सदरेवर आहोत. शिवाने स्वतःला सावरलं. पारू त्याच्यापासून विलग झाली. त्याची आई त्याला बिलगून हमसाहमशी रडू लागली. सगळ्यांच्याच डोळ्यांत आनंदाश्रू दाटले होते. राजे अन येसाजी हा चमत्कारिक पण हर्षभराचा प्रसंग आश्चर्यानं पाहत होते. भावनेचा आवेग ओसरल्यावर शिवा राजांसमोर काठीच्या आधारानं येऊ लागला. येसाजी शिवाकडे भारावल्यासारखे पाहत होते. त्यांचेही डोळे अश्रूंनीं डबडबले होते. काय बोलावं काही सुचत नव्हतं.

क्रमशः

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED