Julale premache naate - 14 books and stories free download online pdf in Marathi

जुळले प्रेमाचे नाते - भाग-१४

सकाळच्या अलार्मने मी भटकंती ची आठवण करून देताच मी उठले... पटकन फ्रेश व्हायला गेले.. फ्रेश होऊन आले. तर काय घालू सुचत नव्हतं... एकतर जंगलात जायचं म्हणून, मी एक रेड टॉप आणि त्यावर माझं आवडत पिंक स्वेटर घातलं. खाली ब्लॅक विथ साईड रेड स्ट्रिप्स असलेली ट्रॅक पॅन्ट घातली.. आणि खाली स्पोर्टशूज घालायचे ठरले. हाय पोनीटेल घालून मी तय्यार झाले.


तय्यार होऊन मी हर्षुच्या रूममधे गेले आणि तिला उठवलं.. कशी तरी ती उठली. मग राजच्या रूममधे जातानाच तो मला त्याच्या रूममधुन बाहेर येताना दिसला... त्याला बघून मी लगेच त्याला विश केलं. "गुड मॉर्निंग राज.".... "अरे वाह..! लवकर उठलीस.. गुड मॉर्निंग प्रांजल." "हो म्हणजे काय भटकंतीला जायचं मग लवकर नाही का उठणार...??" मी डोळा मारत सांगितलं.. "चला मग खाली जाऊया" मी आणि राज खाली गेलो.

डायनिंग वर आज लवकरच नाश्ता लावण्यात आला होता.. आम्ही नाश्ता करताना हर्षुही आली.. तिला बघून ती अजून ही झोपेतच वाटत होती.. "काय मॅडम झोप झाली नाही वाटत..??"
"नाही ग झाली प्राजु.".. तिने जांबई देतच म्हटलं.. या सगळ्यात माझं लक्ष होत ते निशांतकडे कारण तो अजून ही आला नव्हता...

"गाईज अजून निशांत आला का नाहीये.???" न राहून मीच विषय काढला.. तेव्हा राज आणि हर्षु ला ही काळजी वाटू लागली. कारण निशांत आमच्यापेक्षा लवकर उठायचा. आम्ही आमचा नाश्ता तिथेच टाकून त्याच्या रूमध्ये जायला निघालो. राज ने दरवाजा डोकावला.. पण त्याने उघडला नाही. हे बघून मी आणि हर्षुने त्याला आवाज दिला... थोड्यावेळाने त्याने दरवाजा उघडला... "काय झालं गाईज..??? सगळे माझ्या रूमच्या बाहेर असे का उभे आहात..??"

"निशांत.., अरे जायचं आहे ना आपल्याला भटकंतीसाठी." मी पुढे येत म्हटलं.. "अरे यार..!! सॉरी मी विसरलो... गाईज मला काही जमणार नाही कारण माझं डोकं दुखतंय.. सो तुम्हीच जावा.. मी आराम करतो रूममधे.." त्याच्या या बोलण्यावर सर्वांचेच चेहरे उतरले... "काय यार...!!" राज परत निघून गेला त्याच्या रूममधे.. पण मी आणि हर्षु निशांतच्या रूममधे गेलो.


"निशांत, तुझं डोकं दुखत होत तर मला सांगायचं ना..." हर्षु नकळत बोलून गेली... "म्हणजे मला बोलायच होत की.., आम्हाला कोणाला एकला बोलला असतास तर आम्ही मेडिसिन दिली असती.. मग मी माझ्या जवळची एक क्रोसीन ची गोळी दिली. "तु झोप आपण आज जायचं कॅन्सल करू.. उद्या जाऊया." मी शांतपणे बोलले..


"नको प्रांजल.., तुम्ही जावा. तुम्ही तर तय्यार देखील आहात." त्याने बेडवर पडत सांगितलं.. "नको निशांत. तु ठीक हो मग आपण सगळे जाऊया.." मी माझ्या रूममधे जात बोलले. स्वतःच्या रूममधे आल्यावर परत झोपले. जाग आली तेव्हा सकाळचे दहा वाजून गेले होते.. परत जाऊन फ्रेश होत खाली आले तर राज गार्डनमध्ये बसला होता..

"हॅलो..,काय करतो आहेस.. झोपला नाहीस वाटत परत. मी स्वतःचे डोळे चोळत विचारल. "नाही ग.., नाही झोपलो. चल येतेस का..??" "कुठे..??" माझं थोडं का आहे चल फिरून येऊया.. तसही निशांत झोपला आहे आणि काही हवं असेल तर हर्षु आहे आणि सोबत घरात माणसं देखील आहेत. जा तय्यार होऊन ये आपण जाऊन येऊ लवकर...

खरतर मला जायचं नव्हतं. पण त्याच्या आग्रहा खातर जावं लागणार होत. मी चेंज करून निशांतची भेट घेण्यासाठी त्याच्या रूममधे गेले.
" हेय निशांत येऊ का..?? कस वाटतंय आता..? अजून डोकं दुखत असेल तर आपण डॉक्टरांकडे जायचं का..??" माझे प्रश्न काही संपत नव्हते... "हो.., मी आता ठीक आहे. डॉक्टरकडे जायची गरज नाही. पण तु कुठे निघालीस...??"

"अरे ते मी आणि राज जरा बाहेर जाऊन येतोय.. खरतर मला नव्हतं जायचं तुला सोडुन. पण त्याने खूपच आग्रह केला त्यामुळे जाऊन येते.. हा पण तुला बर नसेल वाटत तर नाही जात." "अग ये जाऊन तसही आजचा प्लॅन माझ्यामुळे बिघडला आहे." त्याने हसूनच रिप्लाय दिला..

राजने आपली जीप बाहेर काढत मला आवाज दिला..."प्रांजल....चल निघुया आपण." मी निशांतला स्वतःची काळजी घ्यायला सांगुन खाली जायला निघाले. मी निशांतच्या रूममधुन बाहेर निघतानाच माझा धक्का हर्षुला लागला.
"सॉरी सॉरी..." "इट्स ओके ग." तिच्या चेहऱ्यावर चांगली लाली चढली होती. "काय एवढी खुश कशाला..??? मी सहज विचारले." तिने फक्त निशांतच्या रूमकडे बोट करत लाजून स्माईल दिली. मी देखील ऑल द बेस्ट देत खाली आले.


आम्ही दोघे जीपमध्ये बसुन निघालोगेलो. खरतर आम्ही निघालो, पण माझं मन मात्र निशांतच्या रूमजवळच घुटमळत राहीलं.. गाडी चालवताना राज ची बडबड चालूच होती., पण माझ काही त्याच्या बोलण्याकडे लक्ष नव्हतं.. तिकडे निशांत काय करत असेल.., आणि त्यात हर्षु त्याच्यासोबत आहे. नकळत का होईना मला हर्षु निशांत सोबत असल्याचा राग येत होता आणि थोड जेलस ही वाटत होतं. त्यात मी तिला ऑल द बेस्ट देऊन आले याचाही आता राग उलट होता..


इकडे निशांत आपल्या रूममध्ये बसुन बोर होत होता, पण सांगणार कोणाला. खर तर त्याला माझ्यासोबत टाईम स्पेन्ड करायचा होता, पण ते शक्य नव्हतं. काही तरी करू अस ठरवून तो बाहेर पडत असता, हर्षु आत आली. "हेय..., कस वाटतंय आता तुला..?? हा घे गरमागरम चहा तुझ्यासाठी बनवून घेतला. तुझं डोकं दुखतंय ना म्हणुन...." निशांत चहाचा कप घेत बेडवर बसला. "आता ठीक वाटत आहे.., पण या रूमध्ये जीव घुसमटतोय माझा.. जवळ काही फिरण्यासाठी आहे का..??" "हो आहे ना... खूप काही आहे. हवतर आपण जाऊया का...?" त्याने फक्त तिच्याकडे पाहिलं. खरतर त्याचा मुड नव्हता.., पण एकतर इकडच्या भागा बद्दल काहीच म्हाहित नसल्याने तो बळेच तय्यार झाला.

ते दोघे राजच्या शेतात गेले. तिथे छान बसायला केलं होतं.. इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्या. तोच निशांत बोलु लागला.. "हर्षल मी तुला उभा आधी पाहिलं नाही ग कॉलेजमध्ये.... कितवी मध्ये तु ऍडमिशन घेतलंस...!." "मी अकरावीत असतानाच घेतलं. "एक सांगू का निशांत." "हा बोल ना.." "तुला म्हाहित आहे का... तुला मी पहिल्यांदा कधी बघितले होत ते...," निशांत ने प्रश्नार्थक नजरेने हर्षुकडे पाहिलं." कधी..??" "आमच्या ज्युनिअर स्टुडेंटचा तो पहिलाच दिवस होता आणि तु गेटमधून तुझी बाईक घेऊन आलेलास. लाईट ब्लू कलरचा शर्ट आणि खाली ब्लॅक पॅन्ट.... कसला हँडसम दिसत होतास. मी तर बघतच राहीले होते तुला... मग प्राजुनेच मला ओढत क्लासरूम मध्ये नेलं होतं." ती मधेच स्वतःची जीभ चावत बोलली.
यावर निशांत छान हसला देखील. "अरे वाह...! अजून लक्षात आहे मी काय घातल होत ते.. ग्रेट.." असेच ते गप्पा मारत तिथे बसले.


इकडे मी आणि राज त्याच काम संपवुन निघालो.. त्यानेच शेताजवळ जाऊया म्हणून सांगितले.. आम्ही जीपने शेताच्या दिशेने निघालो. "किती हिरवळ पसरली आहे ना सर्वत्र... मला असा निसर्ग खुप आवडतो. माझं तर स्वप्न आहे की, मी माझ्या होणाऱ्या नवऱ्यासोबत आमचे आनंदाचे क्षण अशाच निसर्गाच्या सानिध्यात घालवावे. " किती रोमँटिक नाही...!!!".... "मला आवडेल.." त्याच्या या वाक्याला मी राजकडे बघितल. त्याने माझ्याकडे बघून एक छानशी स्माईल दिली. आम्ही जीप बाजूला लावून खाली उतरलो आणि पायीच निघालो.. मी आणि राज गप्पा मारत जात होतो... पुढे जात आम्ही एका ठिकाणी पोहोचलो जिथे बसायला केले होते. बोलता बोलता माझी नजर समोर गेली आणि मी बघतच राहिले. माझ्या डोळ्यांना विश्वासच बसत नव्हता की, समोर निशांत आणि हर्षु, हसुन एकमेकांना टाळ्या देत गप्पा मारत होते.

आम्ही देखील चालत तिथे पोहोचलो. आम्हाला बघुन हर्षु आमच्याकडे आली. "आलात तुम्ही फिरून म्हणजे काम करून...? कस वाटलं प्राजु तुला आमचं गाव..? मज्जा केलीस की नाही राज सोबत." मी रागात निशांतकडे बघितले..., " हो.., मग काय खुप मज्जा केली आम्ही. पण आता मला भुक लागली आहे. राज चल ना मला खुपच भूक लागली आहे.." आणि मी रागाच्या भरात राजचा हात धरला व त्याला खेचतच घेऊन जाऊ लागले. हे निशांत शांतपणे बघत होता. जस की त्याला काहीच फरक पडत नसावा.

मी चालत निघाले असता., खाली असलेल्या चिखलामुळे माझा पाय घसरला आणि मी पडणारच होते की राजने माझा हात पकडला.. आणि मला झेलल. हे बघताच निशांत स्वतःच्या जागेवरून उठला. हर्षु हे बघून तर उड्याच मारू लागली. मी पटकन स्वतःला सावरत पुढे आले. मागे राज ही गालातल्या गालात हसत होता. मी मागे वळून न बघताच सरळ मेन रोडवर येऊन गाडीमध्ये जाऊन बसले. मागून तिघेही आले आणि आम्ही बंगल्याच्या दिशेने निघालो.

बंगल्यावर येताच मी बाहेरच असलेल्या पाण्याने माझे चिखलाने भरलेले पाय धुतले व स्वतःच्या रूममध्ये निघून गेले. माझ्या रूमचा दरवाजा उघडाच राहिल्याने राज आत आला. मला बेडवर झोपलेलं बघुन त्याने माझ्या अंगावर अंथरून घातल आणि माझ्या हातावर किस करणारच होता की..., निशांत तिथे पोहोचला. "राज...! तु इथे काय करतो आहेस..?" ... "ते मी प्रांजलला जेवायला बोलवायला आलेलो, तर ही झोपली म्हणुन अंथरून घातल तिच्या अंगावर.., पण तु काय करतोस इथे निशांत..?" "ते.., मी देखील प्रांजल ला बोलवायला आलेलो जेवायला. तिला मघाशी भूक लागली होती आणि त्यात सकाळी नीट नाश्ता ही तिने केला नव्हता. नीट खाल नाही तर चक्कर येते पागल ला... म्हटलं माझ्या बाजूच्याच तर रूममध्ये आहे तर बोलावू. पण वाटत थकली आहे.. बघ किती शांत झोपली आहे." "हो.., तेच तर किती गोड दिसते आहे ना शांत झोपल्यावर एकाद्या परी सारखी...! जाऊदे तिला झोपुदे आपण जाऊया जेवायला. आणि दोघे ही खाली निघून गेले.


काही वेळाने मी उठले. बघते तर घडाळ्यात संध्याकाळचे पाच वाजले होते. स्वतःचा हात स्वतःच्या डोक्यावर मारत मी फ्रेश व्हायला गेले. फ्रेश होऊन आल्यावर पोटात भुकेची जाणीव झाली. खाली आले तर सगळीकडे शांतता होती. मग मीच किचनमध्ये गेले. तोच माझ्या मागून एक नोकर आला..." मॅडम काही पाहिजे होत का तुम्हाला...??"
"हो, ते मला भूक लागली आहे. जेवायला वाढता का मला...?"

"मॅडम खर तर दुपारचं अन्न संपलं आहे. सॉरी आम्ही शीळ अन्न ठेवत नाही." त्याने मान खाली घालून एका दमात सांगितलं. "इट्स ओके.." मी मागे फिरत स्वतःच्या रूमध्ये आले. आता तर भूक देखील सहन होत नव्हती. मग मनाशी काही ठरवून मी निघाले.

संध्याकाळचे सात वाजले असतील. निशांत माझ्या रूमध्ये आला. माझ्या रूमच दार वाजवल तर दार उघडत होत. तो आत येत मला आवाज देऊ लागला.... "प्रांजल...., ए हनी-बी.... कुठे आहेस..?? आधी त्याला वाटलं की मी मुद्दाम करते आहे. कुठे तरी लपले आहे. पण नंतर त्याला जाणवलं की, मी माझ्या रूममध्येच नाहीये. हे लक्षात येताच त्याने जाऊन हर्षुच्या रूममध्ये शोधलं. नंतर राजच्या. "अरे निशांत काय झालं...? एवढा पॅनिक का होतो आहेस..?...राज.
"राज अरे... ते.. म्हणजे प्रांजल आपल्या रूमध्ये नाहीये." "काय..?? तु सगळीकडे पाहिल्यास का.???" नाही मी आताच तिच्या रूममधून आलोय ती नाहीये तिच्या रूममधे..... तुम्ही ही मला मदत करा." आता सगळे मला शोधत होते. निशांतने घडाळ्यात पाहिलं. साडे सात झालेले आणि बाहेर अंधार ही होत होता.


राज मला वाटत आपण बाहेर जाऊन बघूया. तोच एक नोकर बोलला..." राज सर..., तुम्ही प्रांजल मॅडमला शोधत हातात का .?" निशांत पूढे येत त्याने त्याला विचारले..., "हो., प्रांजल बद्दल... तु तिला पाहिलस का..?? काही बोलुन गेली का कुठे जाते आहे ते..??" "सर.., त्या मॅडम आलेल्या खाली, भूक लागली म्हणुन पण काही नव्हत त्यामुळे स्वतःच्या रूममध्ये गेल्या. निशांत आणि राज बाहेर निघत होते की, माझी आणि त्यांची एकमेकांना धडक झाली... "हेय बॉइज कुठे जात आहात..?"

"तु कुठे गेलेलीस..? प्रांजल..." निशांत माझ्यावर ओरडत होता. "सांगून जाता येत नाही का..? निदान स्वतःच्या बेस्ट फ्रेंड्स ला तरी सांगून जायचं होतंस. एवढ्या मोठ्या ठिकाणी जिथे रेंज नाही अशा ठिकाणी कस शोधायचं आम्ही तुला." मी स्वतःची मान खाली करून सगळं ऐकत होते... "आता बोलणार ही आहेस की अशीच मठ्ठा सारखी उभी राहणार आहेस." मी वर पाहिलं... "मला भूक लागली होती.., पण घरी काहीच नव्हतं म्हणून बाहेर गेले होते. तुमच्या रूममध्ये आले होते पण प्रत्येक जण शांतपणे झोपल्यामुळे मी कोणाला काही सांगितलं नाही की उठवलं."


एवढं बोलुन समोरच्या टीपोयवर ठेवलेल्या ग्लासामधलं पाणी एका घोटात संपवले. आणि तडक स्वतःच्या रूममध्ये निघून गेले. तेवढ्यात राजने सगळ्या नोकरांना बोलावले.
"आता मला सांगा तुमच्यापैकी कोणी प्रांजल मॅडमला जेवण नाहीये हे सांगितले...? एक नोकर भीत भीत पूढे आला.... 'सर मीच बोललो की जेवण संपलं आहे.., खर तर आपल्याकडे शीळ अन्न ठेवत नाही. त्यामुळे दुपारचं सगळं अन्न आम्ही संपवलं होत." राजने एक जळजळीत कटाक्ष त्या नोकरवर टाकला... गेट आऊट... सॉरी सर... मी म्हटलं निघून जा... आताच्या आता.. तो देखील रागावला त्या नोकरांवर. निशांत माझ्या रूममध्ये आला.... "हनी-बी, तुला काही झालं असत तर.... आधीच मुंबईत एक किस्सा झाला होता. म्हणून मला काळजी वाटत होती यार तुझी.. तु एकदा मला उठवायच होतस ना.."

मी त्याच्याकडे बघितल आणि स्वतःच तोंड फिरवल... "मी का तुला सांगु... आज तुझं डोकं दुखत होत असा बोललास ना मला आणि बरा फिरायला गेलास हर्षु सोबत. मग मी का सांगून जाऊ तुला.." "अरे पागल... खर तर मला तुझ्यासोबत टाईम स्पेन्ड करायचा होता. पण तू न थांबता, ती थांबली.. या वाक्याला निशांत तोंड फुगवून बसला.. "ए आता तू मला मनवायच हा... तुझा नंबर नंतर येईल." यावर त्याचा राग कुठल्या कुठे उडून गेला.

माझा चेहरा आपल्या ओंजळीत घेत त्याने मला समजावलं...."हे बघ हनी-बी... आज केलंस. पण परत पूढे अस कधीच करायचं नाहीस तु., कळलं का..? मला एकट सोडून कधी म्हणजे कधीच जायचं नाहीस...प्रॉमिस कर मला." मी मान डोलावत प्रॉमिस केलं.. तर त्याने चक्क मला जवळ खेचून एक मिठी मारली. मी जरा अवघडलेच होते त्या मिठीत... "बाय द वे काही खाल्लस की, नाही एवढी बाहेर गेली होतीस ती...?" मी रडका चेहरा करत त्याच्याकडे पाहिलं... "काहीच नाही.. आता मला खूप भूक लागली आहे." माझ्या रडक्या चेहऱ्याला बघत तो हसायला लागला. आणि मी उशीने त्याला मारू लागली. हे सगळं कोणी तरी दरवाजा आड राहुन बघत उभं होत. आणि काही क्षणात रागात निघून गेल.

आजचा जेवणाचा छान बेत होता. मी काही न खाल्याने लवकर जेवण बनवण्यात आलेल. आम्हाला बोलावण्यात आले तशी मी पळत जाऊन डायनिंग वर बसले. ते तिघे ही मग मला जॉईन झाले. "मॅडम तुमच्यासाठी राज सरांनी खास बेत करायला लावलाय आम्हाला... प्लीज एन्जॉय." प्रचंड भुकेने मी जेवणावर तुटून पडले. पोट फुटेपर्यंत जेवण झाल्यावर उठले. त्यानंतर एकटीच गार्डनमध्ये जाऊन बसले होते. मागून थंडगार हातांचा स्पर्श माझ्या डोळ्यांना झाला. तो राज होता... "मग प्रांजल कसा वाटला बेत .?? आवडला का..? आणि हो पोटभर जेवलीस की नाही..?" "राज..,! बेत कमाल होता. मी पोटभर नाही तर पोटफुटे पर्यंत जेवले.." यावर आम्ही दोघेही हसलो.

आणि अजून एक गोष्ट... तुला कधीही भूक लागली की मला सांगत जा.. आपण तुला हवं असलेलं खायला जात जाऊ ओके.." मी मानेनेच होकार दिला. "चला मग झोपायला जाऊया...राज गुड नाईट. त्याने ही मला विश केलं. मी स्वतःच्या रूममध्ये आले आणि बेडवर आडवी झाले. पण झोप काही लागत नव्हती. म्हणून कंटाळून मोबाईल बघितला तर त्याची ही रेंज गेली होती. कंटाळून बाहेर आले. छान थंड हवा वाहत होती. बाहेर निशांत ही उभा होता. "काय झोप नाही का आज...??"..मी. "नाही येत आहे." "तु झोपली नाहीस अजुन...?" निशांत. "नाही मच्छर किती आहेत त्या मोजायला आली आहे बाहेर." यावर निशांत खळखळून हसला... पागल...! चल खाली जाऊन बसुया..


आम्ही दोघे त्या रात्रीच्या शांततेत खाली आलो. गार्डरमध्ये दगडात कोरीव काम करून बसायला बनवल होत. आम्ही जाऊन बसलो. आम्ही आल्यापासून एकदाही पाऊस आला नव्हता. पण समुद्र जवळ असल्याने छान थंड हवा सुटली होती. त्या हवेमुळे माझे केस देखील हवेवर डुलत होते. आमच्या गप्पा चालू होत्या. "काय बोललीस तु रूममध्ये असताना..! मी हर्षल सोबत गेलो. आणि तू गेलीस ती राजसोबत.., आणि ते काय होत.. राजचा हात धरण वैगेरे... "अरे यार..!" मी नाकावर आपला हात धरला. "आता काय झालं..!!" निशांत.

"अरे जळण्याचा वास येतोय ना.." आधी त्याला कळलंच नाही. त्याने ही वास येतोय का चेक केलं. नंतर त्याच्या डोक्यात ट्यूब पेटली... " हो का, मी जेलस झालो... अस बोलायच आहे तुला... थांब तुला बघतोच.." मी गार्डनमध्ये धावले. तो देखील माझ्यामागे धावला.

आम्ही एकमेकांच्या मागे धावत असता, अचानक पावसाला सुरुवात झाली. आम्ही दोघेही एका छोट्याशा आडोश्याला थांबलो. अचानक आलेल्या पावसामध्ये आम्ही दोघेही थोडे भिजलोच..अचानक का कोण जाणे.. निशांत माझ्याजवळ सरकला आणि माझ्या गालावर रेंगणारी, व पावसात भिजलेली बट त्याने आपल्या हाताने बाजूला केली. तोच आकाशात वीज चमकली आणि मी त्याला बिलगले. काही वेळ तसाच गेला. नंतर स्वतःला त्याच्यापासून दूर करत आम्ही दोघेही दुसरीकडे बघत उभे राहिलो.

काही वेळाने पाऊस देखील कमी झाला. हे सगळं कोणी तरी रूमच्या गॅलरीत उभं राहून बघत होत. आम्ही बंगल्यात आलो... "प्रांजल... चेंज करून नीट केस पूस... एवढं सांगून निशांत स्वतःच्या रूममध्ये निघून गेला. मी देखील लाजून स्वतःच्या रूममध्ये आले. परत सगळं चेंज करून मी बेडवर पडले. मघाशी घालवलेला निशांत सोबतचा क्षण आठवून गालातल्या गालात हसत निद्रेच्या स्वाधीन झाले.

to be continued.......

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED