रंग हे नवे नवे - भाग-5 Neha Dhole द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

रंग हे नवे नवे - भाग-5

अादितीने दोघांनाही message केलेल्या ठिकाणी ते पोहचले. ह्या वेळेस मैथिली आधी आली होती. थोड्यावेळाने विहान आला. 'Hii, कधी आली?', त्याने विचारले. 'दिलेल्या वेळेत', मैथिली म्हणाली. 'तू खरच अशीच बोलते का ग? की फक्त माझ्या सोबतच अस बोलते?' 'अरे काय चुकीचं बोलले मी. ज्या वेळेला सांगितलं त्या वेळेला मी हजर होते.' 'बरं बरं, माझंच चुकलं मी उशिरा आलो बस्स. ह्या वेळेस प्लीज भांडण नको', विहान म्हणाला. 'अरे मी भांडायच्या उद्देशाने वगैरे नाही म्हणाले. मी साधंच बोलले.', मैथिली म्हणाली. विहानने तिला एक छानसा व्हाईट rose चा बुके दिला. 'wow white roses!!!' मैथिली तर एकदम खुश झाली. 'तुला कस कळलं की मला white rose आवडतात.' ती म्हणाली. 'आता हिला काय सांगू तुझी profile चेक केली.', तो मनातच विचार करत होता. 'अरे सांग न?', मैथिलीने पुन्हा विचारलं. 'तुला आवडतात? मला नव्हतं माहिती. मागच्या वेळेस आपलं भांडण झाल ना तर हा पांढरा रंग शांततेच प्रतिक म्हणून आणला, बाकी काही नाही', आणि नेहमीचाच हसला. विहानने वेळ मारून नेली. 'Good! चांगला सेन्स ऑफ ह्युमर आहे तुझा', मैथिली म्हणाली. खर तर तिलाही हसू आलं विहानच उत्तर ऐकून. 'हो मग आहेच मी ग्रेट!', विहान म्हणाला. 'झाला हा परत सुरू', मैथिली मनातच म्हणाली. तिचा चेहरा पाहून विहान म्हणाला. 'इतका वाईट बोललो का मी?', 'नाही नाही रे अस काही नाही. बाय द वे तुझ्या पैंटिंगस पण खूप सुंदर आहेत हा! मला खुप आवडल्या.', मैथिली म्हणाली. 'wait wait मी तुला माझ्या पैंटिंगस कधी दाखवल्या?' विहानने तिला मध्येच थांबवलं. 'अरे यार का काढला हा विषय मी? आता जर ह्याला कळलं की मी ह्याची profile चेक केली तर तर हा आणखीन चढेल. आता काय करू?', ती मनाशीच विचार करत होती. 'अग ए, बोल.. कुठे पहिल्या तू???', मैथिली अजूनही शांतच होती. 'माझ्या paintings कुठे पाहिल्या यार हिने. google var तर दाखवण्याऐवढा मी मोठा नाही आहे.' 'ohhh', तो विचार करून म्हणाला 'मैथिली, if I'm not wrong, तू fb वर तर नाही बघितलस, हो कारण मी फक्त तिथेच share केल्या आहेत. बोल ना मैथिली', तो एकटाच बोलत होता. 'हो मी fb वरच बघितल्या.', 'ohhoo!! माझ्यावर research केलं म्हणजे तू!' 'तुझ्या वर का research करू मी? काय संबंध?', 'ते तुलाच माहिती, पण तू प्रोफाइल visit केली हे मात्र नक्की, कारण पैंटिंगस फक्त आणि फक्त facebook वरच आहेत. come on यार आता खोट नको बोलू. करतात मुली मला search. आहेच मी तसा, त्यात तुझा काही दोष नाही. नाही बोलणार मी तुला काही.', विहान म्हणाला. 'किती overconfidence आहे रे तुला स्वतःवर. किती ग्रेट समजतो स्वतःला', मैथिली म्हणाली. 'हे बघ, ह्याला overconfidence नाही स्वतःवर प्रेम करणे म्हणतात आणि माझं आहे स्वतःवर आणि म्हणूनच इतरही लोक करतात.', तो म्हणाला. 'बर आणखीन काय काय माहिती काढली माझी?', त्याने परत विचारले. 'अरे ए, मी काही तुझी माहिती वगैरे नाही काढली. मी आपलं fb बघत होते, suggestions मध्ये तू आला तर म्हंटल बघू तरी काय करतो नेमका हा! तुला विचारलं त्या दिवशी तर तू काही नीट उत्तर दिलं नाही, मग म्हंटल की बघुयात आपणच thats it आणि तिथे दिसले मला ते पैंटिंगस बस्स!!', मैथिली बोलून मोकळी झाली. त्याने मनाशीच विचार केला.'हो!आणि मी इतकंच पाहिलं बस्स. बाकी तू सांग आता अजून काही होत का बघण्यासारखं.' 'माझ्यात काय सगळंच सांगण्यासारखे आहे. तुला काय ऐकायचं आहे सांग?', विहान ने विचारल. 'तुझं कौतुक सोडून सांग मला ते ऐकायचं आहे. तू म्हणजे आयुष्यात स्वःताच कौतुक सोडून अजून काय करतो?', मैथिलीने विचारलं. आता विहान गप्पच झाला. त्याने मग व्यवस्थित स्वतःबद्दलची सगळी माहिती दिली. 'good म्हणजे एकंदरीत तू so called well settled आहेस.' 'हो अस म्हणायला हरकत नाही म्हणजे general well settled chya definition नुसार.', विहान पुढे म्हणाला. आणि ते दोघेही हसले. 'बापरे विहान तू म्हणजे ना एंटरटेनमेंटच पॅकेजच आहे.', मैथिली म्हणाली. दोघांनी बऱ्याच वेळ गप्पा मारल्या आणि त्यांच्यात छान गट्टी जमली. 'बापरे विहान अंधार पडला आहे किती वेळ झाला.' 'माझ्या सोबत वेळ कसा जातो समजत नाही ना', विहान म्हणाला. 'Shut up विहान! पुन्हा चालू नको होऊ.', मैथिली म्हणाली. 'अरे यार मैथिली, तू मला काही बोलूच देत नाही. मी काही बोलणार की म्हणते चालू नको होऊ.', तो नाटकी रागात म्हणाला . 'अरे गेले चार तास तुझंच एकतीये मी! हद्द च झाली ही तर. आता इतका बोलून पण म्हणतो की मी बोलू देत नाही आणि एक सांगू का तू रागात आणखीन छान दिसतो म्हणजे cute वाटतो फार!', ती म्हणाली. 'काय मुलगी आहे राव लोक म्हणतात तू हसताना छान दिसतो. निदान अशी म्हणायची पद्धत आहे, पण तू तर विचित्रच आहे म्हणे रागात cute दिसतो. तसा मुळात मी आहेच चांगला त्यामुळे मी रागातही cute दिसतो नाहीतर तू बघ! रागात तर मंजुलिकाच दिसते. घाबरलो होतो ना मी लग्नात! बापरे मला तर आता पण चेहरा आठवून पण भीती वाटतीये! नकोच विचार करायला.' 'अरे ए, काहीही काय बोलायचं म्हणून बोलतो. ठीक आहे माझी भीती वाटते न, नाही भेटणार पुढच्या वेळेस पासून.' आणि ती निघाली. त्याने लगेच मागे जाऊन तिचा हात पकडला, आणि ती स्तब्धच झाली. पहिल्यांदा कुणाचा तरी झालेला थंडगार स्पर्श आणि आणि तो ही इतका आपलेपणाचा, हक्काचा.. खर तर तिला दोन मिनिटं अस वाटलं की हा हात सोडूच नये.