रंग हे नवे नवे - भाग-6 Neha Dhole द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

रंग हे नवे नवे - भाग-6

'ए अस असतं का मैथिली, मी तर आपला सहजच बडबड करत होतो. इतकं मनावर नको घेवुना.', विहानच्या बोलण्याने ती भानावर आली. 'भीती वाटते ना तुला माझी, मग कशाला थांबवतोस!' मैथिली म्हणाली. 'अरे यार sorry ना.. हो गयी गलती.. अब मान भी जाओ!!', तो म्हणाला. 'तू एक नंबरचा नौटंकी आहेस. ती हसतच म्हणाली. तुझा ना राग करायचा म्हंटल ना तरीही नाही करू शकत.', मैथिली म्हणाली. त्याने पुन्हा सुरू केलं 'अरे मैथिली!! मुझे भगवान ने बनाया...' 'बस्स पुरे', मैथिली त्याला मध्येच अडवत म्हणाली. 'चल निघू आता मला उशीर होतोय' मैथिली पुढे म्हणाली. 'हो निघ ना मी कुठे अडवलं', विहान म्हणाला. 'हात सोडशील तर जाईन न', ती म्हणाली. 'ohh sorry', आणि त्याने तिचा हात सोडला. 'ए पण पुन्हा केव्हा भेटायच?', त्याने गंभीर होऊन विचारलं. 'भेटू ना लवकरच.. आता जाऊ तर दे.', ती म्हणाली. 'बाय! हळू जा पोहचल्यावर फोन कर', तो म्हणाला. 'हो', ती हसूनच म्हणाली.
मैथिली घरी आली. आज तिचे मन अजिबात थाऱ्यावरच नव्हते. काहीही केल्या विहान तिच्या डोक्यातून जातच नव्हता आणि त्याने हक्काने पकडलेला तिचा तो हात. ती अजूनही तो स्पर्श विसरू शकत नव्हती. 'मी का इतका विहानचा विचार करतीये, मला आवडतोय तो? छे !!! मला सध्या सगळं लक्ष माझ्या phd वर केंद्रात करायचं आहे. आता ह्या कशातही गुंतायच नाही. तरीही मग विहान का इतका मनात बसला, त्याच्या भेटीची इतकी का ओढ लागली. नाही त्याचा विचार मला बाजूला करावाच लागेल नाहीतर मी माझ्या अभ्यासात लक्ष नाही देऊ शकणार.', ती मनातच विचार करत होती. इकडे विहानची अवस्था पण काही वेगळी नव्हती. 'मैथिली! मैथिली! काय करू तुझा चेहराच डोळ्यासमोरून जात नाही आहे. वेड लावायचंच बाकी ठेवलं तू मला. तुझं स्पष्ट बोलणं, तिरकस वागणं, स्वच्छंदी जगणं, तुझा बेधडक पणा हे सगळंच खूप आवडल गं मला. खूप मुली पाहिल्या पण हे सगळे गुण तुझ्या एकटीमध्येच बघायला मिळाले. मान्य आहे मी तुला सुरवातीला ओळखण्यात चूक केली पण आता मी पुरतं ओळखलं आहे तुला. मला नाही वाटत की ह्या पेक्षा चांगली मुलगी मला भेटू शकेल. Actully दुष्यंत was right! माझ्या भावाला काळजी आहे माझी, उगाचच गैरसमज करून घेतला मी. कस सांगू पण मी मैथिलीला की आवडली तू मला? ती हो म्हणेल? मला पहिल्यांदा इतकी भीती का वाटत आहे कुणीतरी नाही म्हणण्याची? नाही, ती नाही म्हणणार नाही. पण हो ही म्हणणार नाही, कस पटवू यार हिला. ती तर हसण्यावारच नेईल हे सगळं. जाऊ दे मी बोलून टाकणार, हो म्हणेल किंवा नाही. हेच ठीक राहील.', तो त्याचाच विचार करत होता.

आता मैथिलीच्या दिवसाची सुरुवात विहानच्या message ने आणि रात्र ही त्याच्याच message ने होत होती. तिने कितीही विचार केला तरी नकळतच तीही त्याच्यामध्ये गुंतत चालली होती. विहानचं वेळोवेळी तिला मदत करणं, तिला प्रत्येक गोष्टीसाठी प्रोत्साहन देणं हे नकळत तिला आणखी त्याच्या जवळ आणत होतं. असाच एके सकाळी तिला विहानचा फोन आला. 'Hey मैथिली,आज फ्री आहेस का?' 'अरे, आज संक्रांत!! घरी बरच काम आहे, का रे? काही विशेष?', मैथिली म्हणाली. 'काय यार तुझं, मी तुला म्हणणार होतो आज पतंग उडवायला येते का? पण तुला तर वेळच नाही.' विहान म्हणाला. 'अरे पण मला कुठे उडवता येतं? मी येऊनही काय करणार?', मैथिली म्हणाली. 'त्यात अस काही रॉकेट सायन्स नाही आहे आणि जगात कुठलीही गोष्ट अशक्य नाही आहे पण तुला यायचं नाही आहे हे सांग. उगाच कारण देऊ नको आणि मी काही भारतात दरवर्षी नसणार आहे संक्रांतीला', विहान तिला थोडं चिडूनच म्हणाला. 'तू चिडू नको यार.. खरच माझं आज थोडं अवघडच आहे, पण बघते मला दुपारी वेळ मिळाला तर', मैथिली म्हणाली. 'नको जाऊदे तुला यायचंच नाही तर ठीक आहे. कशाला वेळ काढते उगाचच तू. तुझे काम continue कर. मी माझं बघतो नाहीतर बसतो घरीच.', विहान थोडा रागातच म्हणाला आणि त्याने फोन कट केला.