"तू तिथे का गेलीस मी बोलोलो होतो ना नाही जायचं तरी पण तू गेली का ऐकत नाहीस माझं" हेमंत किरणला बोलत होता
किरण खूप वैतागलेली असते तिला असं वाटलं उगाच ह्याला सांगितलं आता खा ओरडा.
किरण-हेमंतच्या रिलेशनशिपला ३ वर्ष पूर्ण होतील , त्यात तिने पहिल्यापासून सतत त्याच ऐकलं असत तो म्हणेल तसं ती वागायची आणि ह्याचाच तो आतापर्यंत त्याचाच फायदा उठवायचा
तिला इतकी चीड यायची कि तिला असं वाटायचं की बस आता पुढे नाही workout होणार म्हणून ती बोलायाला जायची तेव्हा तो फक्त तिला इतकं बोलायचा की," किरण मला माहितीय मी तुला खूप त्रास देतो पण माझी बाजू समजून घे , आज पर्यंत मी कोणावर इतकं प्रेम केलं नाही ग तू पहिली मुलगी आहेस कि तिच्यावर मी इतकं प्रेम करतो आणि तू माझ्या आयुष्यात आल्यापासून खूप change झालोय , आयुष्यात जबाबदाऱ्या काय ते कळायला लागलंय, हां मला माहितीय ( तिचा चेहरा हातात पकडून )माहितीय मी तुला खूप बोलतो , पण त्या मागे पण खूप प्रेम आहे. माझ्या बाबतीत कस आहे माहितीय काय कि मी ज्या व्यक्ती किंवा वस्तुवर प्रेम केलं की ती माझ्यापासून दूर जातात आणि आता तुला नाही गमवायच, म्हणून मी चिडचिड करतो आणि खुप बोलतो .
किरणला समजत ती फक्त शांत होते तिचा राग निघून जातो , कारण आपल्यावर एवढं प्रेम करणारा माणूस मिळणे अशक्य आहे. ती बोलते, "मग त्या दिवशी तू मला का ओरडला मी जस्ट गेले होते तर
माहितीय तुला सांगून नाही गेले म्हणून इतकं ओरडायच "
हेमंत ," अग वेडाबाई म्हणून तर ओरडलो त्या ह्यासाठी तू गेलीस ते गेलीस नि काय सांगून नाही गेलीस , त्यात माझा जीव कासावीस झाला तुझ्या आईला कॅ।ल केला तर कळलं त्यांना पण माहिती नाही मग अजून राग आला की ही गेली कुठे म्हणून राग आला आता ह्यात चुकी कोणाची माझी कि तुझी...?? "
(किरण काही न बोलता दुसरीकडे तोंड करून बसते कारण चुकी तिचीच असते)
"एक सांगायचंय तुला ", हेमंत बोलतो
काय ?- किरण
हेमंत- "मी परवा घरी येतोय तुझ्या मागणी घालायला आता तुला कायमच न्यायला आणि खूप ठिकाणी माझ्यासोबतच आयुष्यभर फिरवायला".
" काय खरंच", तिचा जीव धडधडत असतो कारण आपण लग्न करणार ह्याची कल्पना तिने घरी दिली होती पण आता ते स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहे ह्याचा तिला आनंद होतो
अखेर तो दिवस उजाडतो हेमंत किरणच्या घरी मागणी घालायला येतो, तो खूप बिंदास असतो पण किरण खूप टेन्शन मध्ये असते कारण ती पापांकडे बघते तर ते थोडे टेन्शनमध्ये आलेले असतात , त्यांची एकुलती एक मुलगी आता मोठी झालेली असते आणि तिनेच स्वतःच्या परीने मुलगा पसंत केलेला असतो,
पाहुणे येतात बसतात, किरण बाहेर यायला लाजत असते तेव्हा हेमंत डोळ्याच्या इशाऱ्याने तिला comfortable करतो , ती बाहेर येते त्याच्या बाजूला बसते
"हां मग बोलणी करायला सुरुवात करूया "हेमंतचे काका बोलतात
खर्चचाचा गोष्टी आहेत ते आपण अर्धा करयांचा असा ठरत
आता वेळ येते ती देवाण-घेवाण मुद्दयावर तेव्हा किरणचे बाबा विचारात ,"मग तुम्हाला किती हुंडा हवाय ?"
ह्या प्रश्नाने किरण फक्त बाबांकडे बघत असते तीच डोकं गरम झालेलं असत ती बोलणार तेवढ्यात हेमंत बोलतो ," बाबा किरण तुमची मुलगी आहे , वस्तू नाही की तुम्ही तिची किमंत रुपयाने करणार , मला पण दोन बहिणी आहेत त्यावरून बोलतोय कि तुम्ही काही नाही दिलात तरी आम्ही तिला स्वीकारू"
त्याच्या बोलण्यावर किरण बघत बसते म्हणजे माझा मुलगा निवडण्याचा निर्णय बरोबर आहे.