Understand Komal books and stories free download online pdf in Marathi

समजूतदार कोमल


कोमल खूप बिंदास असते, तिला जे हवं ते तिला सहज मिळत असत, कारण ती नशीब घेऊन जन्माला आली असते, कोमल दिसायला सुंदर असते,तिचे काळेभोर डोळे, नाजूक ओठ, फुगलेले गाल, नाजूक बांधा,काळेभोर केस ती दिसायला सुंदर होती पण स्वतःला जास्त आरशात बघणं नाही, नट्टापट्टा करणं नाही कारण ती साधी पण आकर्षक दिसायची म्हणूनच अश्या लोकांची गणना तूळ राशीमध्ये केली जाते गेली,
आज तिच्या ग्रॅजुअशन चा शेवटचा दिवस होता, आज तिला खूप बर वाटत होत सगळं कसं हलकं हलकं वाटत होत, पण आता खरी परीक्षा होती... ती कॉलेज मधून बाहेर पडलोय आता पुढे काय...? म्हणून तिने नौकरी पेजवर अप्लाय केलं आणि एका आठवड्यात तिला अकाउंट डिपार्टममध्ये नोकरी मिळाली, खूप खुश होती कोमल, मग तिच्या आई-बाबांनी लग्नाचं पाहायला सुरुवात केली, स्थळ आली पण त्यामध्ये कोणाचं स्थळ जुळतं नव्हतं, गेले सहा महिने आई-बाबा ह्या गोष्टीमुळे त्यांना टेन्शन आलेलं,कोमलला आईबाबांची अवस्था दिसत होती, पण ती पण ह्यासाठी काही करू शकत नव्हती.
एकदिवस कोमल आणि मैत्रणी एका मार्केटमध्ये गेले,खूप दिवसांनी सगळे भेटले,फिरले मग लग्नाचा विषय आला तेव्हा कोमलला विचारलं कि तुला कसा मुलगा हवाय तर कोमल बोलली,"जो माझ्यासाठी कधी त्याच्या आईबाबांना सोडणार नाही असा मुलगा मला हवाय" सगळ्यांना तीच उत्तर पटलं, आणि मागे बसलेल्या तुषारने तीच बोलणं ऐकलं आणि न बघता तो तिच्या प्रेमात पडला तिला मागे पाहण्यासाठी तो मागे वळला तेवढ्यात ती तिथून गेली, पण त्याने तिचा आवाज ऐकला होता तो तिच्या आवाजाच्या दिशेने गेला आणि त्याने तिला पाहिलं, तो पाहतच बसला आणि म्हणाला करणार तर हिच्यासोबतच लग्न करणार, त्याने मग तिचा चोरून फोटो काढला आणि तिथून तो निघाला.
तुषार एक हुशार मुलगा, प्रत्येक कामात अडथळा आला तरी तो त्यातून बाहेर पडत असे असा एक आर्मी जवान. एकदा ठरवलं आणि त्याने ते करूनच दाखवलं तो सहा महिन्यांनी घरी आला,त्याच्याही घरी लग्नाची बोलणी सुरू होती , आईबाबा त्याच्यामागे लग्नासाठी मागे लागले होते.
मार्केटवरून घरी आला तेव्हा सगळे जेवायला बसले आज तो खुश होता पण त्याच कारण... कोणाला कळालं नाही सगळे आपल्याच गडबडीत होते, तुषार हॉलमध्ये सोफ्यावर बसलेला सतत कोमलच्या विचारात होता त्याने मोबाईल काढला आणि तिचा फोटो पाहत बसलेला तो इतका मग्न झाला की त्याच्यामागे बाबा कधी आले ते कळालं नाही, अचानक आलेल्या बाबांसमोर त्याची नजर वर होत नव्हती, बाबांना पण त्याच हे वागणं कळालं होत त्यांनी डोळे मिचकाउन हो म्हटलं,
दुसऱ्या दिवसापासून बाबांनी कोमलची हिस्टरी काढली, तेव्हा कळालं कि तिच्या घरचे पण स्थळ बघत आहेत, दोघा घरच्यांनी बोलणि केली आणि हे लग्न पक्क केलं आता फक्त कोमल आणि तुषार बोहल्यावर चढायचे बाकी होते, पण त्याआधी तुषार आणि कोमलने भेटणं गरजेचं होत म्हणून तुषारच्या चुलत बहिणीच्या रेखाच्या लग्नाला बोलावलं आणि लग्नाचा दिवस उजाडला तेव्हा कोमलने मस्त साडी नेसली होती, तुषार तिच्याकडे बघतच बसला होता, त्याने ओळख व्हावी म्हणून त्याने तिला रेखाच्या रूममध्ये घेऊन गेला ओळख झाली तसा तो निघून गेला,
"मग कसं जमलं तुमचं लव्ह मॅरीज कि अरेंज मॅरीज आणि ," कोमलने रेखाला विचारलं
रेखा ," लव्ह मॅरीज आता घरच्यांनी पण समंती दिली मग लव्ह कम अरेंज मॅरीज हा हा हा"
दोघी मिळून हसतात
पुढे रेखा बोलते," कि मी तर एका अटीवर लग्नाला तयार झाले, सांगितलं आईबाबांना सोडून माझ्या सॊबत राहणार असशील तरच मी लग्न करेन मग काय झाला सुहास तयार"
रेखाच्या बोलण्यावर कोमल बोलते," आताच आलेल्या व्यक्तींसाठी जो 23 वर्ष आईवडिलांच प्रेम विसरू शकतो,
ती व्यक्ती कधी पण तुला सोडू शकते मी तर अश्या व्यक्तीसोबत लग्नसुद्धा केलं नसत,नेव्हर"
तिच्या बोलण्यावर रेखाला विचार करायला लावलं आणि हे सगळ बोलणं तुषार आणि सुहासने ऐकले
आपली होणारी बायको किती समजूतदार आहे हे तुषारला कळालं, आपल्या लग्नाआधी कोमलने जो पुढाकार दाखवला त्याबद्दल कोमलचे आणि तुषारचे सुहासने आभार मानले.
आणि त्याचप्रमाणे येत्या एका आवड्यात कोमलच आणि तुषारच निर्विघन पणे पार पडले.
किती हि आपण मोठो होवो आपल्या आईबाबाना कधी विसरू नये कारण त्यांनी आपल्यासाठी खूप कष्ट घेतले असतात.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED