Tevha well nidhun geli hoti books and stories free download online pdf in Marathi

तेव्हा वेळ निघून गेली होती

अग आई ग... किंचाळल्या स्वरात श्रेयशी बोलली , तिच्या पायाला ठेच लागली आणि त्याची वेदना असह्य होत होती. म्हणूनच ती एका बेंचवर जाऊन बसली आणि जेव्हा बसली तेव्हा तिला कोणाचा तरी स्पर्श जाणवला , तो मऊ हाताचा स्पर्श तिला दुःख विसरायला लावेल असाच होता. तिला त्या स्पर्शाने बर वाटत होत तिने मग तीच डोकं बाकावर टेकवल, तो मऊ हाताचा स्पर्श दुसरा तिसरा कोणाचा नसून आपल्या बाळाचा होता , आई दुखतंय काय ग, झोलात लागलं काय..??
नाही राजा होईल की बलं तू चल आपण तुझ्यासाठी काही तरी घेऊ खेळणं म्हणून ती उठते तिला वेदना होत असतात पण बाळाच्या काळजीपुढे काही नाही ,सगळे जण तिला विचित्र नजरेने बघत असतात हि अशी काय वागते, एवढं कुठून आलं प्रेम आलं तिला हां, सगळे आपल्याकडे असे का बघत आहेत ह्याकडे लक्ष न देता, ती बाळाला फुगेवाल्याकडे घेऊन जाते, "भैया एक फुगा द्या ओ माझ्या बाळासाठी, भैया तिच्याकडे आवक नजरेने बघत असतो अरे हि अशी काय, बाळ पण त्याच्या ह्या नजरेला हसतो नि बोलतो," वा मला फुगा मिलाला आई मला आवलला फुगा" त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद ती बघतच असते ,तिला पण खूप आनंद होत असतो , त्याची पटपट बोलण्याची धडपड तीच प्रेम अजून वाढत जात .

घरी आल्यावर ते दोघे फ्रेश होतात . श्रेयसी," आता आपण मस्त मस्त बाबांसाठी जेवण करायचं "
"हो मस्त मस्त कलूया आणि बाबा पण खूप खुश होतील"
मग तो जोरात तिला मिठी मारतो
"अरे हो हो आधी तुला मस्त खायला देते हां दूध"
"नाही नको(नाकाला हात धरून) नकोय ग मला ते दुदू आई ग मला नाही आवलत ते"
त्याच हे बोलणं ऐकून ती त्याला आपल्या कुशीत घेते हे दूध घ्यायचं असत मस्त असत आईच नाही ऐकणार तु" रुसण्याचं नाटक करते
"हां मग दे पण लुसू नको तू, मला नाही आवलत"
मग ती पटकन जाते , दूध गरम करते आणि बाळाला देते.
तेवढ्यात दारावरची बेल वाजते, "बाबा आले बाबा आले" असं बोलत तो पुढे येतो , त्याची धावपळ बघून श्रेयशी जोर जोरात हसत असते. ती दार उघडते आणि तिचा हसारा चेहरा बघून केतनला बरं वाटत , केतनला पण कळत असत कि श्रेयशीच वागणं पण तो तिला काही बोलत नाही ,
श्रेयशी बाळाला कडेवर घेऊन स्वयंपाक घरात जाते, त्याला ओट्यावर ठेवते आणि चपाती करताना त्याच्याकडे बघते "आई गोल गोल चपाती वा,मला पण दे ना"
"अरे हो हो देणार देणार गरम आहे ना थांब हा थोडावेळ"
तेवढ्यात केतन पाणी आणायला हाक मारतो आणि आणि श्रेयशी बाळाला खाली ठेवते " तू इथेच खेळ हां मी आले बाबांना पाणी देऊन"
श्रेयशी पाणी घेते आणि बाहेर जाते, त्याला पाणी देऊन ती आत जाते तेवढ्यात केतन तिचा हात पकडतो आणि शेजारी बसायचा आग्रह करतो पण बाळ आत एकटाच आहे, म्हणून ती हात झटकून ती आत जाते, आणि आत बघते तर बाळ आत नव्हतं , बाळ कुठे गेल म्हणून ती केतन ला सांगायला बाहेर आली, तिला घाबरलेल बघून तिला धीर देतो , आता आपलं बाळ दिसत नाही तर तिचा जीव कासावीस होतो , "केतन अरे आपल बाळ कुठे आहे शोध ना, मला ना कळात नाही आहे"
आता केतनला काय करावं सुचत नाही म्हणून तो मनाशी पक्क ठरवतो आणि तिला बाळाच्या खोलीत घेऊन जातो , तर खोली सगळी बाहुल्या, खेळणी ने भरले असतात पण त्यात आपलं बाळ दिसत नव्हतं , तिला काय झालंय हे कळत नसत ,ती अचानक खाली बसते सगळी खेळणी घेऊन हृदयाशी कवटाळते, आणि खूप रडत बसते ,कारण तिला जाणवत कि, " आपण आपल्या बाळाला जन्मला येण्याआधीच त्याला मारून टाकलेलं असत का तर आपल्या करिअरसाठी"
त्याच अस्तित्व आपल्याला असं का जाणवतंय का तर आईच्या मुलाचं नातं हे पहिल्या दिवसा पासून निर्माण होत आणि ह्याची जाणीव श्रेयसी ला व्हावी म्हणून तिला अचानक हे जाणवलं , आणि अचानक तिला लागलेली ठेचची वेदना जाणवते , त्याचबरोबर आपण तीन महिना आधी घेतलेला निर्णय हां चुकीचा होता आणि त्याची चुकीची वेदना इतकी महागात पडेल अशी कल्पना पण तिने केली नव्हती.
ह्या वेदनेच आयुष्यभर खापर आपल्या मनात राहणार ," एक आई न होण्याचं सुख" तिच्या माथी लागलं .आणि हे दुख आयुष्यभर असणार .
आणि हे जेव्हा श्रेयसीला कळालं तेव्हा वेळ निघून गेली होती
आता तर ती सगळे खेळणी घेऊन, रडत केतनच्या मांडिवर डोकं ठेवन रडत होती.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED