Julale premache naate - 18 books and stories free download online pdf in Marathi

जुळले प्रेमाचे नाते - भाग-१८

आज लवकरच कॉलेजमध्ये गेले. निशांतच्या कालच्या वागण्यामुळे त्याच्याशी बोलणं गरजेच होतं. मी गेले, म्हटलं आज प्रॅक्टिस असेल तर आजच निशांतशी बोलेन. पण तो काही ऑडीमध्ये दिसत नव्हता. ऑडीमध्येच काय कुठेच दिसत नव्हता निशांत. म्हणुन त्याला कॉल केला. तर तो कॉल काही घेत नव्हता. "आता या मुलाला काय झालय नक्की". स्वतःशी बडबडत मी कॅन्टीनमध्ये बघायला गेले. निशांत कुठेच नव्हता. ना कॅन्टीनमध्ये.., नाही लायब्ररीत की, क्लासरूमध्ये. स्वतःच्या क्लासरूमधे आले तर, तर आज हर्षु ही आली नव्हती. आजचे लेक्चर्स अर्धे संपवुन मी आज पहिल्यांदाच कॉलेजला बंक मारत निशांतला भेटायला निघाले. ऑटोने त्याच्या बंगल्याजवळ पोहोचले.


आत जाताच गार्डनमध्ये आजोबा नवीन झाडं लावत बसले होते. "आजोबा....,कसे आहात." मी आत जातच त्यांच्या पाया पडत विचारलं.... "अरे प्राजु बाळा..?? मी छान आहे. तु कशी आहेस बाळा. आणि आज कॉलेज नाही का??" त्यांनी हातातल काम बाजूला ठेवत विचारलं... "हो आज लवकरच संपले लेक्चर्स म्हणून म्हटलं यावं भेटायला.. आपले खडूस महाराज कुठे आहेत." मी आजोबांना हसुन विचारल. त्यांनी हात बंगल्याकडे दाखवत हसले.


"आजोबा आलेच हा त्याला भेटुन.." मी एवढं बोलुन बंगल्याकडे जायला निघाले. आत जाताच समोर आजी भेटल्या. त्या गार्डनच्या दिशेनेच निघाल्या होत्या. "अरे प्राजु बाळा.., कशी आहेस.??" "मी छान आजी तुम्ही कशा आहात." मी लगेच वाकुन त्यांच्या पाय पडले. "मी पण एकदम मस्त.." "कुठे आहे" मी हाताने खुनवुनच विचारल. त्यांनी फक्त वर हात करून दाखवत आजी गार्डनमध्ये निघुन गेल्या.

मी जिना चढुन वर गेले. निशांत स्वतःच्या रूममधे झोपला होता. मी रूमध्ये एंटर केलं, तर निशांत बेडवर झोपला होता. मी स्वतःची बॅग टेबलावर ठेवत पूढे गेले. बेडवर झोपलेला शांत निशांत किती गोड दिसत होता. त्याचे ते विस्कटलेले सिल्की केस छान वाटत होते. समोरच्या गॅलरीतुन आलेले उन्हाचे कवडसे त्याच्या चेहऱ्यावर येऊन थांबले होते. त्यामुळे तो अजुनच हँडसम दिसत होता.


हे सगळं न्याहाळत मी कधी त्याच्या बाजूला येऊन बसले हे देखील मला कळलं नाही. मी त्याला न्याहाळत असताना अचानकपणे त्याने स्वतःचे डोळे किलकिले करत उघडले... "हेय, स्वीटहार्ट.., गुड मॉर्निंग" बोलून तो कुशीवर वळुन परत झोपला. त्याच्या या वाक्याने मी मात्र चांगलीच गुलाबी झाली. काही वेळाने त्याने परत वळून पाहिलं आणि समोर मला बघून तो जरा ओरडलाच.


"तु..., तू इथे काय करते आहेस. आणि कधी आलीस. काही पाहिलं, किव्हा ऐकलं तर नाहीस ना??" स्वतःच्या अंगावर चादर घेत तो ओरडलाच. "अरे अरे मी काही नाही पाहिलं. आणि हो मी काय आता इथे येऊ पण नको का. की येण्याआधी तुझी परमिशन घ्यायला हवी." मी जरा स्वतःच तोंड वाकड करत बोलते झाले.... "मी अस कधी म्हटलं.., इकडे येऊ शकतेस पण माझ्या रूममधे काय करते आहेस की, चुकून आलीस. हे माझं घर आहे. निशांत चिटणीस. नाही की राज सरनाईक." निशांत मिश्किलपणे हसत बोलला. त्याच्या त्या वाक्यावर जरा वाईट वाटलं.


"पण मी इथे आजी-आजोबांना भेटायला आहे." मी पण जरा रागातच बोलले. "पण हा माझा रूम आहे. आजी-आजोबांचा नाही." तो स्वतःच्या मोबाईलमध्ये बघत बोलला. मी मग नाक मुरडत निघाले. मला वाटलं तो थांबवले पण तो स्वतःच्या मोबाईलमध्ये डोकं घालून बसला होता. हे बघुन मग मीच खाली निघुन आले. "खडूस कुठचा."

खाली आजी गार्डनमध्ये बसल्या होत्या तर आजोबा फुलं झाडं लावत होते. मी देखील लगेच त्यांना मदत करायला गेले. "आजोबा हे कोणत फुलझाडं आहे.??" मी लगेच विचारल. "बाळा हा बट-मोगरा आहे. हा मोगऱ्याचाच एक प्रकार आहे, पण यात पाकळ्या जास्त असतात भरलेल्या. सुगंध ही छान येतो. आणि हो.., हे निशिगंधाच झाड. या फुलांचाही छान सुगंध येतो." मी लगेच वाकुन सुगंध घेतला. खरच खुप सुंदर होता तो सुगंध मनाला फ्रेश करणारा.


"आणि हे तुझ्या आजीच आवडत फुलझाडं बर का! रातराणी." आजोबांनी एका फुलझाडाकडे बोट करत दाखवलं. "हे फुल रात्रीच्या निरभ्र चांदण्याच्या प्रकाशात उमलणार फुलं आहे." आजोबा सगळया फुलांची नावं आणि त्यांचे गुणधर्म सांगत होते.... "आणि हो अजून एक या रविवारी ये हा आपल्याकडे. आपण नर्सरीमध्ये जायचं आहे. मी निशु बाळाला सांगणारच होतो तुला सांगायला. पण तू आलीस ते बरच झालं आता नेक्स्ट संडे तय्यार रहा." आजोबा हसत सांगत होते. मला ही ते ऐकून गंमत वाटली. मी अंगठा वर दाखवुन माझा होकार कळवला.


काही वेळाने खडूस खाली आला आणि आम्ही होतो तिकडे येऊन बसला. त्याचा आताही माझ्याकडे लक्ष नव्हता. मी नाक मुरडत आजोबांना कामात मग करू लागले. ते करताना माझे केस मध्ये मध्ये येत होते ते बघून आजोबांनी आजीला हाक मारली. "अग ऐकतेस का ग.. प्राजुचे केस जरा वर बांधून दे तिचे हात मातीमध्ये आहेत." "अहो मला कुठे जमत, स्वतःचेच कसे तरी बांधते." त्यांनी लगेच कारण पुढे केलं.. खरतर त्यांना निशांतला बांधायला सांगायचं होत म्हणून त्या अशा बोलल्या होत्या.

"आजोबा असुद्या मीच बांधते" अस बोलून मी माझे हात धुवायला उठणारच होते की, आजींनी निशांतला हाक मारली......."निशु बाळा..,जा तिचे केस वर बांधून दे." आजींच्या बोलण्याकडे निशांतच काही लक्ष नाही हे बघून त्यांनी त्याचा मोबाईल काढून घेतला.. "अग आजी... काय हे छान गेम चालु होता ना माझा." निशांत जरा चिडतच बोलला. "तुला काही तरी सांगितलं मी.." जरा नाकुशीतच निशांत उठुन माझ्याकडे आला आणि माझे मोकळे केस एकत्र केले.


त्याच्या त्या स्पर्शाने मी मात्र सुखावत होते. त्याचा स्पर्श आनंद देऊन जात होता. मला गालातल्या गालात हसत बघून आजोबा ही हसत होते सोबत आजीही. फक्त निशांत काय तो कंटाळवाणा चेहरा घेऊन कस तरी काम करून पाळण्याचा प्रयत्न करत होता. पण त्याच्यावर नजर ठेवुन होत्या त्या आजी. "निशु बाळा निट बांध, ते बघ मागून बाहेर आलेत केस." आजी निशांतला माझ्या केसांची वेणी घालायला शिकवत होत्या. "अग आजी तूच घाल ना ग मला नाही जमत आहे." जरा त्रासिक चेहरा करत निशांतने आजीकडे पाहिलं. "कर गप्पपणे." आता आजीही जरा रागाने बोलल्या तस निशांतने लगेच कशी तरी वेणी घातली. आणि आजीकडून स्वतःचा मोबाईल घेऊन स्वतःच्या रूमध्ये निघून गेला. अक्षरशः पाळालाच. त्याच्या या कृतीने आम्ही मात्र खो-खो हसत होतो.


भले आमच्यासमोर तो रागात आणि त्रासिक चेहऱ्याने करत असला, तरीही जाताना मात्र त्याच्या चेहऱ्यावर एक स्माईल होती. तो रूमध्ये जाऊन बसला आणि मोबाईलचा कॅमेरा ओपन बघून तो गॅलरीत फोटो बघू लागला. त्याला त्यात मघाशी माझ्या केसांची वेणी घालत असतानाचे फोटो सापडले. ते फोटो आजीने एकदम हुशारीने काढले होते. ते बघत असताना नकळत त्याच्या चेहऱ्यावर हसु उमटल होत. "ही आजी पण ना..., खतरनाक आहे. कधी काढले फोटो ते सुद्धा कळलं नाही मला." स्वतःशीच बोलत तो फोटो न्याहाळत बसला.


इकडे मी हातातलं काम संपवुन आता आले आणि जरा फ्रेश झाले. आईला कॉल करून सांगून ठेवल की, मी निशांतच्या घरी आले आहे. नाही तर परत लेट झाला तर रागावायची. कॉल वर बोलून मी निशांतच्या रूममधे गेले तर तो टीव्ही बघत बसलो होता. "येऊ का आता." मी दरवाजा वाजवतच मुद्दामच विचारलं. त्याने एकदा माझ्याकडे पाहिलं आणि परत टीव्ही बघत बसला. मी परत मुद्दामहून त्याला त्रास देण्यासाठी विचारल असता चिडून त्याने टीव्ही बंद केला....

"तु कधीपासून परवानगी घेऊन येऊ लागलीस." जरा त्रासिक चेहऱ्याने त्याने माझ्याकडे बघितल. "काय आहे ना आज बोललास ना आता कशी आलीस, हा माझा रूम आज वैगेरे, म्हटलं परवानगी घेऊन आत जाऊया. नाही तर परत राग यायचा." मी आत जात माझं बोलणं संपवलं. आतमधे जाऊन चेअरवर बसले. "काय झालं आहे नक्की.." मी सरळ मुद्याला हात घातला.


"कुठे काय... काही नाही." काही न बोलता निशांत मोबाईल घेऊन बसला. मी चेअरवरून उठुन जाऊन त्याच्या शेजारी बसले.... "निशांत काय झालं आहे.?? राजच्या घरी जाऊन आल्यापासून तु नीट वागत नाही आहेस की, बोलत आहेस. एवढा कसला राग आला आहे तुला कळेल का मला..??" मी जरा स्वतःचा आवाज चढवत विचारल. "काही नाही.." हट्टी असल्याने तो काही बोलत नाही बघून मी जायला निघु लागले. "ठीक आहे.. नको सांगुस तस ही मी तुझी बेस्ट फ्रिएन्ड थोडीच आहे. जे मी तुला हक्काने काही विचारु आणि तु ते सांगशील." मी निघाले बघून त्याने थांबवलं. "तुझं आणि राजच काही चालू आहे का ?" त्याने मोबाईलमधुन स्वतःच डोकं वर काढत विचारलं.


मी लगेच मागे फिरले.., "काय बोललास निशांत तु.??? म्हणजे नक्की काय बोलायचं आहे तुला.??" मी प्रश्नार्थक चेहरा करून उभी राहिली. "काल मी तुम्हाला जरा वेगळ्या पोसीशनमध्ये पाहिलं, तुम्ही किस करत होतात का.....???" त्याने जरा चाचरतच प्रश्न केला. "निशांत शट अप.. तोंडाला येईल ते बोलु नकोस." त्याच्या या प्रश्नाने मी मात्र चांगलीच रागावली होती. "तुला वाटत आहे तस काहीच झालं नाहीये. काल त्याच्या डोळ्यात काही तरी गेलेलं आणि ते बघण्यासाठी मी वाकुन त्याच्या डोळ्यात फुंकर मारत होते नाही की..., शी तु खुपच वाईट विचार केलास निशांत. मला तुझ्याकडुन ही अपेक्षा नव्हती." एवढं बोलून मी अक्षरशः रडूच लागले.

"अरे हनी-बी माफ कर मला.., खरच माझ्या चुकीच्या बघण्यामुळे मी तुला चुकीचं समजलो. पण ते तसच दिसत होतं." त्याच्या या वाक्यावर मी जाऊन त्याच्या अगदी जवळ गेले. डोळ्यात डोळे घालुन त्याच्याकडे पाहिलं.. "आता आपल्याला कोणी पाहिलं तरी तेच वाटेल नाही निशांत....?"
माझ्या या वाक्यावर मात्र त्याने स्वतःची नजर वळवली आणि मान खाली घातली. "मला माफ कर प्रांजल" त्याच्या तोंडातुन कसे तरी शब्द बाहेर पडले. मी एक नजर त्याच्या वर टाकली आणि बाहेर निघाले. स्वतःची बॅग घेत मी कोणालाही न भेटता निघुन गेले.


संध्याकाळ उलटुन रात्रीने स्वतःचं साम्राज्य चोहीकडे पसरवल होत. त्यात भर म्हणून तो पाऊस ही कोसळत होता. कदाचित त्यालाही दुःख झालं असावं. त्यालाही कोणी तरी ऐकवलं असाव. जसं आज निशांतने गैरसमज करून मला ऐकवलं होत. त्याने उच्चारलेला "किस" हा शब्द सारखा कानात घुमत होता. मी चालत होते. वर कोसळणाऱ्या पावसात भिजत. छत्री असूनही ती बॅगेमध्येच पडून होती. त्या कोसळणाऱ्या सरींसोबत माझ्या डोळ्यातून वाहू पाहणाऱ्या सारी ही मिक्स झालेल्या. बर झाला तो सोबतीला पाऊस होता, नाही तर सर्वांना कळलं असत की, डोळ्यातुन अश्रु येत आहेत.


या सर्वांत मी हे देखील विसरली की आपण ऑटो करून ही जाऊ शकत होतो. पण निशांतच्या शब्दचं एवढे जहरी लागले होते की, भान हरपून मी त्या रस्त्यावरून चालत निघाले. सगळं सारखं आठवत होत. पण पाऊस आणि डोळ्यातील अश्रू काही थांबत नव्हते. चालता चालता मी रस्त्याच्या मधोमध कधी आले याचं ही मला भान राहील नाही आणि जाग आली ती मागून एका मोठया ट्रकच्या आवाजाने. त्या ट्रकचा आवाज कानात घुमला आणि.............

to be continued.........


( कथेचा हा पार्ट कसा वाटला नक्की सांगा. कथा पूर्णपणे काल्पनिक आहे.)

स्टेय ट्युन अँड हॅपी रीडिंग गाईज.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED