अपूर्ण बदला ( भाग १७ ) Dipak Ringe ।बोलका स्पर्श। द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अपूर्ण बदला ( भाग १७ )

दुसऱ्याच दिवशी गावावर संकट येणार असे संकेत दिसत होत.नव्याचा दिवस उजाडलेला पण दिवस मात्र वाटत नव्हता.सकाळ झालेली ती पण वैऱ्याची. जिथे उन डोक्यावर यायला पाहिजे तिथे सगळ्यांच्या छतावर काळे ढग राक्षशी अवतारात अवतरलेले. देवालाही त्यांनी आव्हान केलेलं आज काहीही झालं तरी जीत हि विनाशाची सैतानाची होणार. संपूर्ण गावामध्ये अविराम शांतता पसरलेली सगळ्यांचंच अवसान पडलेले, कोणालाच धर्य नव्हते. सगळयांचाच कपाळावर आठी आलेल्या आपल्या गावावर कोप झालाय म्हणून हे भोगायला येतंय.कोणी घराच्या बाहेर पडायला मागत नव्हतं.आकाशात कावळे काव काव करून इकडे तिकडे येरझारा घालत होत. आज त्यांच्यामध्ये काहीतरी वेगळच दिसत होते ते साधारण कावळे वाटत नव्हते. त्याचे डोळे भकास लाल झालेले आणि त्यांची दृष्टी गावातली प्रत्येक माणसावर होती.

सगळीकडेच किलबिलाट सुरु झालेला. संपूर्ण गाव अंधारात विलीन होत होता. गावावर काळोखाचं राज्य आलेलं.संपूर्ण गावावर काळोखाने वर्चस्व केलेलं. काळ्या टपोऱ्या ढगांमधून विजांचा कडाकडाट सुरु झाला. गडगडगडगड.

गावातील सगळं माणसे भेदरली त्यांचा रक्ताचं पाणी झाल,जीव गळ्याजवळ आला सगळयांनीच सुटकेचा निश्वास सोडला आणि एक भीतीचा आवंढा गिळला. सगळीकडे वादळ वारा सुरु झालेला वादळाचा सुंनननणणनणण आवाज सुरु झालेला.

त्यातच अचानक सगळीकडे निरव शांतता पसरली. सगळ्यांनाच वाटले संकट टळले. पण कशावरून हि संकटापूर्वीची स्मशान शांतता नसेल? सगळ्यांनी आशेचा श्वास घेतला.हरीच्या आईने तर देवाला गारानेच घातलेलं त्यामुळे तिने लगेच व्यक्त केले देव पावला.

अचानक गावामध्ये ओरडण्याचा आवाज सुरु झाला. किश्याचा धाकटा नंदू गायब झालाय हि बातमी ऐकताच सगळे गावकरी बेचिराक झाले. सैतानाने आपला डाव साधला. कोणी बोलतंय वादळामध्ये हरवला तर कोणी बोलतय वादळात अडकून वादळाने त्याला देवाघरी नेले. कुणाचे ऐकायचे? किश्याची अवस्था तर बघण्यासारखी नव्हती. त्याची बायको तर शून्यात पाहत एकटक टक लावून अश्रूधारा गाळत होती . पण नंद्याचा मोठा भाऊ जो त्याबरोअबर खेळत होता तो आकाशाकडे टक लावून बघत होता. त्याला असे काही दिसले कि त्याची तंद्रीच उडाली दोघे भाऊ खेळत असताना अचानक चेंडू झाडाझुडपात गेला आणि त्याचाच फायदा घेऊन त्या पिशाचाने त्या सैतानाने नंदूला उचलला . आणि आंब्याच्या झाडाच्या दिशेने घेऊन गेला त्याचे खोलवर गेलेले डोळे बिभूल बाहेर आलेले, खिळ्यासारखे दात आणि जागोजगी जखमा आणि लाळकाळ रक्त, हातापायाचे मांस तुटून लटकत होत. समोरच दृश्य पाहून केशव जोरात किंचाळला आणि जाग्यावर आकाशाकडे टक लावून बघू लागला.

सगळी माणसे त्या आंब्याच्या झाडाच्या दिशेने गेले. जरी सैतान शक्तिशाली झाला असला तरी आज अजून एका मुलाचा घात होणार होता. म्हणून सगळे सैरावैरा इकडेतिकडे शोधू लागले. नक्की कुठे घेऊन गेलाय तो सैतान? सुरेश आणि मंगेश काही माणसांना घेऊन नदीच्या दिशेने गावापलीकडे गेले. शोधात असताना एकाला नंदू सापडतो तो त्याच्या वडलांना खबर करतो. जाग्यावर पोहचताच आपल्या मुलाला बघून किश्या जाग्यावरच पडला त्याला गरगरल्या सारखं होऊ लागत नंदूची आई तर जाग्यावर कोसळते. समोरच दृश्यच तस होत. सैतानाने घात केला होता. आज पुंन्हा एका निष्पापची हत्या घडली होती. ती पण खूप भयानक त्याच्या शरीराचे तुकडे पडलेले. हात मुळापासून उपटून आजूबाजूला टाकलेले. मुंडी धडासकट उपटून टाकलेली डोळे बाहेर काढलेले. कान चावून खाल्लेले डोक्यातील मेंदू दगडावर आपटल्याने बाहेर पडलेला. पोटातील आतड्या उपसून काढलेल्या. सगळ्या शरीराची नासधूस केलेली त्या सैतानाने. खूप ताकदवर झालेला. त्याला हे सर्व करायला आनंदच येत असावा बहुतेक!

सगळी माणसे एकत्रित जमलेली. नदी किनारीच होती, आता संध्याकाळची वेळ होयला अलेली सगळ्यांच्या चेहऱ्यावर दुःखाचे भाव होते , आणि अचानक वातावरणात बदल जाणवू लागला सगळीकडे कुठला तर्री आवाज घुमत होता, ढग पुन्हा दाटून आलेले कावळे पुन्हा जमले, आकाशात काव काव करत आंब्याच्या झाडाच्या दिशेनं पळत होते सैतानाची चाहूल होती, विजांचा गडगडाट सुरु झाला. सगळी माणसे घाबरली होती. सगळे तशेच मुर्द्याला सोडून सैरावैरा घर गाठू लागले. कुणाची हिम्मत होत नव्हती. त्यातच सुरेश आणि मंगेश सर्वाना प्रोत्साहित करत होते. ही वेळ पळण्याची नाही तर सैतानाशी दोन हात करायची आहे. आत्ता घाबरून चालणार नाही, जेवढे आपण घाबरू तेवढे सैताण आपल्यावर वर्चस्व करणार. त्यातच एक पुढे येऊन बोलला दोन हात करणार तरी कुणाशी जर माणसा-माणसामध्ये लढाई असती तर ते शक्य होते पण इथे सामना करायला शत्रूच दिसत नाही आहे. आणि ह्या लहान पोराची काय अवस्था केले यावरुन तर कोणाचं त्याच्याशी लढाईचा विचार करणार नाही. आत्ता आपली सुटका नाही आहे ह्यामधून.

क्रमशः