The incomplete revenge - 16 books and stories free download online pdf in Marathi

अपूर्ण बदला ( भाग १६)

गाडीच्या बाहेर पाऊल टाकताच एक छोटीशी गार वाऱ्याची झुळूक त्या महिलेच्या मानेवरून गेली. तिला मनात धस्स झाले ती गांगरून इकडे तिकडे पाहू लागली. नकळत तिच्या डोळ्यातू असावे गळू लागली. तिचा त्रास त्यालाही समजत होता पण त्याचीही तीच अवस्था होती. मनावर दगड ठेऊन सगळं विसरण्याचा त्याचा अनिश्क्रिय प्रयत्न तो करत होता. त्याने तिला आपल्या बाहूंमध्ये जखडून चालू लागला. आणि सुरेशच्या घराच्या दिशेनं म्हणजेच हरीच्या घरी येऊन ते दांपत्य उभे राहिले. रव्याच्या आईबाबांना अचानक आणि एवढ्या तातडीने आलेले पाहून हरीच्या बाबांचा आनंद गगनात मावणारा नव्हता. पण त्यांचंही दुःख होतच म्हणून वेळेचे अनुमान ठेऊन ते त्याच्याकडे पाहत होते. आणि आल्याबद्द्ल कडकडून आलिंगन दिले. खरंच माझ्या एका शब्दावर तुम्ही दोघांनी कुठलाही विचार न करता तुम्ही आलात खरंच बरं वाटलं. असं काय करताय तुम्ही? हरी पण आमच्याच मुलासारखा आहे आम्हला.जसा आमचा रव्या! आणि बोलता बोलता त्यांना एकदम गहिवरून आले. दोघांना लगेच घरामध्ये बोलावलं थोडावेळ पाणी प्यायलं आणि पहिलं ते त्यांच्या घरी निघाले. तसही त्यांचं स्वतःच घर होत म्हणून पहिलं ते त्यांच्या घराकडे गेले. महिना उलटून गेलेले तरी त्यांनी तिकडे हुडकले नव्हते.

जर कोणी आपलं स्वतःच घर सोडून कुठे दुसरीकडे राहण्यासाठी गेलं तर त्या घराला घरपण राहत नाही. ते जरी निर्जीव असलं दगडांनी बनवलं असलं तरी त्याच्यात माणसाप्रमाणे माया असते. जेव्हा घरात हस्तीखेळती माणसे असतात तेव्हा घराला घरपण येत. घर एकदम हसताना एकदम खुश वाटत पण जेव्हा त्याच घरात कोणी नसत त्याला एकट सोडून दुसऱ्याच्या घरात भाड्याने राहायला जातात. तेव्हा तेच घर आपल घरपण सोडून देत. जस एखादा माणसाच्या आयुष्यातील प्रिय व्यक्ती निघून जाते आणि तो ज्या प्रकारे खचत जातो आणि शेवटी आपला प्राण गमावतो तसाच घराचं असत पूर्ण घर पोखरून निघून जात जागो जगी घराला तडे पडतात. कारण काळजी घेणारा दुसऱ्याच्या घरी भाड्याने राहायला गेलेला असतो, तो स्वतःच घर सोडून दुसर्याच घर सांभाळत असतो. त्याचमुळे ते घर दुःख सावरू शकत नाही, म्हणून हळू हळू सगळं घर आपला दम तोडतो आणि कोसलू लागतो ते बेघर होत.

वडिलोपार्जित जपलेले सुंदर घर

त्या घरात सरले आयुष्य तयाचे

ज्या घराणे दिले सारे आयुष्य त्याचे

ज्या घरामध्ये नांदले लहानपण जयाचे

माणसू समजून जपले ज्या घराला

सुख-दुःख वाटले ज्या घराणे

संकटे झेलून भक्कमपणे पाठीशी राहिले ते

उन्ह,वारा पाऊस धारा सगळे घेतले स्वतःच्या मनावर

तरीही स्वतः डगमगले नाही

आली तुझ्यावर शुद्र आपत्ती

म्हणून गेला सोडूनी एकट्याला

काय आणि कुणाकडे बघून निर्जीव घराणे उभे राहायचे

तुझ्यामुळे माणसाप्रमाणे खेळत राहिलेले

दिसते आत्ता भकास राक्षसाप्रमाणे

त्याच दोषात अवसान सांडून गलून पडलं बिचारे एकटे

वाट पाहत तुझी निर्जीवांप्रमाणे

वाट पाहत तुझी निर्जीवांप्रमाणे ......

सुरेश आणि त्याच्या बायकोने घराकडं बघितलं तर भकास वाटत होत. महिनाभर बंद राहिल्याचा परिणाम होता. घराजवळ जाऊन घराला स्पर्श करताच सुमतीला आपल्या घराबद्दल हेवा वाटला. तिला क्षणभर सुन्न झालेले. त्याच विचारात कुलूप उघडण्याचा आवाज आला तसा घरामध्ये काहीतरी खुडबुडण्याची लहर मनात आली.दरवाजा उघडताच आतून वटवाघूळ त्यांच्या डोळ्यासमोरून उडत गेली. घर पूर्ण खाली होत आणि त्या घरात डाव्या बाजूला भिंतीवर टांगलेल्या फोटोकडे सुमतीच लक्ष गेलं. तिला ह्यावेळेस रडायला कुठली आठवण जागी करायला कारण नाही भेटलं. ती घसा सुखेपर्यंत रडली मंगेशने तिला कसातरी सांभाळलं आणि तिला समजाऊ लागला जर आपला रव्या इथे कुठे असेल आणि त्यांने जर तुला रडताना पाहिलं तर त्याला चांगलं वाटणार आहे का? शांत हो बघू तेव्हाच भिंतीवर लटकलेला फोटो खाली आदळला आणि एकदम वाऱ्याची झुळूक घरामध्ये पसरली. त्या थंड झुळकीने त्या दोघांचं शरीर शहारलं आणि त्यातच त्यांना रव्याची इथेच असण्याची आशा मनामध्ये दाटून गेली.


क्रमशः

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED