The incomplete revenge - 18 books and stories free download online pdf in Marathi

अपूर्ण बदला ( भाग १८ )

काही लोक मशाली घेऊन नदीच्या दिशेने आले. सगळ्यांनाच पुढच्या संकटाची जाणीव झालेली त्यातच त्या सैतानाच्या कैदेत असलेल्या कावळ्यांनी त्यांच्या धारधार नख्याने गावकऱ्यांवर हल्ला चढवला. खुपजण घायल झाले. सर्वानी एकमेकांच्या हातातल्या मशालीनी कावळ्यांना जागीच पाडले. सगळ्या कावळ्यांना पडलेले पाहून सैतान चवताला. आणि एकदाच जोरात ओरडला त्याच्या ओरडल्याने सगळीकडे एक भीषण वादळच तयार झाले. आणि त्या वादळात तयार झाली ती त्या सैतानाची भयानक आकृती. आंब्याच्या झाडासमोरच एक काळभोर उंच भयानक खोलवर गेलेले डोळे बाहेर पडलेली बिभूले अर्धी मान तुटलेली लोंबकत जळलेल मांस भयानक दिसणारी आकृती तो सैतान आता स्पष्ट दिसू लागला.

त्या भयानक सैतानाला बघून सगळेच भेदरली, त्यांचं अवसान सांडल. भीतीमुळे हात पाय थरथरु लागले घामाने अंघोळी झालेली त्यातच सुरेश पुढे येऊन म्हणाला, कोण आहेस तू? आणि का आमच्या जीवावर उठलाय? आम्ही काय वाकड केलंय तुझं ? त्याच्यातच त्या सैतानाने सुरेशकडे नजर फिरवली, लालकाळी नजर भयानकच वाटत होती.

त्यातच ती आकृती भयानक हसू लागली हिईईईईईईईई हिईईईईईईईई. हे तू मला विचारतोय? काय बिघडवलाय तुझं? जा तुझ्या बापाला विचार त्यांनी काय चूक केली ते? आणि त्या सैतानाचा चेहरा बदलू लागला तो त्याच्या वास्तविक रूपात यायला लागला आणि सगळ्यांच्या नजरा समोर च दृश्य टिपू लागल्या. सुरेश आणि मंगेश तर एकटक बघतच राहिलेत नकळत सगळ्यांच्या तोंडातुन त्याचे नाव आले "सख्या" आणि तो जोरजोरात हसायला लागला.

सुरेशच्या बांचे बाबा म्हणजे त्याचे आजोबा दौलती. आणि मंगेशच्या आजोबा हनुवती हे चांगलेच मित्र होते. गावातील रुबाबी जोडी. सगळा गाव ह्या दोघांना खूप घाबरायचं. गावात मोठं घराणं हे दौलतीचंच होत. त्यामुळे गावात त्याची वट होती .स्वतःवर खूप अभिमान होता. दौलतीने गावातल्या माणसांना चांगलाच चकवा दिलेला जे गरजू लोके होती, त्यांची तो मदत करायचा आणि हि सवय त्यांच्या घरातल्या सगळ्यांनाच आवडायची. सुरेशचे बाबा सुरेश लहान असताना सारखे बोलायचे ह्याच्या नंतर तुलाच त्याच्या जाग्यावर बसून सगळं कार्यभार सांभाळायचा आहे .पण त्यांला कुठे माहिती होत की त्याचे आजोबा मदतीच्या नावावर गावकर्यांची जमीन स्वतःच्या नावावर करायचे.

त्याच्या आजोबाचा गावाच्या बाहेरची जमीन जिथे काजू चिकू आंबे सगळे होते आणि जमीनही दूरवर पसरलेली त्या जमिनीवर डोळा होता पण त्या जमिनीचा मालक ती जमीन सोडत नव्हता त्यामुळे तो दौलतीच्या वाटेवरचा एक काटाच झालेला. दौलतीने आपल्या मुलाकडून त्या जमिनीची माहिती काढली .ती जमीन सखाराम अशा माणसाच्या नावावर होती. त्याला एक एकुलता एक मुलगा होता आणि त्याची बायको. सख्याला कसलीही कमतरता नव्हती गावाच्या बाहेर दूरवर पसरलेली जमीन होती आणि फळाफुलांची बाग सोबत शेतीही करायचा त्यामुळे त्याची जमीन त्याच्याकडे शाबूत होती.

दौलतीला कसही करून ती जमीन पाहिजे होती त्यासाठी तो काहीही करायला तयार होता. त्याने त्याच्या मुलाच्या मदतीनं सोबत हनवतीही होता. सख्याला संपण्याचा निर्णय घेतला.

रात्रीची वेळ होती गावातल्या काही भ्रस्ट लोकांना घेऊन दौलतीचा मुलगा सगळे वनराईत म्हणजे सख्याच्या शेतावर गेलेत. पाठीमागून सख्याच्या मुलाला हनवतीने फूस लावून शेतावर नेले आणि तिकडेच त्याला मारले. आणि सगळे शेत जाळून टाकले, गावात वाऱ्यागत बातमी पसरली, सख्याच्या शेताला आग लागली सोबत त्याचा मुलगा हि आगीत गेला. हि बातमी ऐकताच सख्याची बायको जाग्यावर कोसळली. सख्या पार खचून गेला एकुलता एक लग्नाचा मुलगा होता. त्या झटक्याने सख्याची बायकोने जाग्यावर प्राण सोडला. सखा चांगलाच जाणून होता हे सगळं कोणी केलं असेल? म्हणून आणि म्हणूनच तो थेट शेतावर पोचला. बघतो तर पूर्ण शेत खाक होऊन गेलं त्याचा मुलाला बाहेर काढलेल. समोरच दौलतीच मुलाला बघून सख्याने हेरलं सोबत त्याचे साथीदार हि होते आणि त्यातच तो त्याच्यावर धावून गेला. दौलतीच्या मुलावरचा वार चुकून हनवतीला लागला आणि तो जाग्यावर पडला हे बघताच सगळ्यांनी त्याला पकडलं. आणि कोयत्याने त्याच्या मानेवर वार केला तरी तो काही हरला नाही. त्या सगळ्यांना हातुलून त्याने दौलतीच्या मुलावर वार केला त्याच्या हाताला जखम झाली आणि खाली पडला. पाठून कोणीतरी त्याच्या डोक्यात मोठा दगड घातला आणि त्याला जाग्यावर पाडला आणि त्याच आगीत फेकून जिवंत जाळला. आगीत होरपळून जाता जाता त्याने शपथ घेतली कि पुन्हा येऊन मी माझा बदला घेणार तुमच्या कोणतीच पिढी शाबूत ठेवणार नाय. तुम्ही माझ्या मुलाला खाल्लं मी तुम्हाला खाणार आणि त्याने आपला प्राण सोडला.


क्रमशः

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED